आजचं मार्केट – २२ ऑक्टोबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २२ ऑक्टोबर २०२१

आज क्रूड US $ ८५.२५ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७५ च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९३.६० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.७० VIX १८.०० PCR ०.६४ होते. USA मधील IBM चे निकाल अनुमानापेक्षा कमी आले.

आज 3 i इन्फो चे रिलिस्टिंग झाले. हे रिलिस्टिंग Rs ३१.४५ वर झाले. आज स्टील स्ट्रीप या कंपनीचे निकाल चांगले आले. कंपनीच्या १ शेअरचे २ शेअर्समध्ये स्प्लिट होणार आहे.

आज रेल्वे मंत्रालयाने सांगितले की राजधानी, शताब्दी, मेल,एक्स्प्रेस, गाड्यांमध्ये ‘कुक्ड फूड’ ची सेवा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिली जाईल. मार्च २०२० पासून कोरोनाच्या संकटामुळे ही सेवा रद्द करण्यात आली होती. या आधी ही सेवा २४०० गाड्यांमध्ये पुरवली जात होती. यामुळे IRCTC च्या शेअरमध्ये तेजी आली.

आज सरकारने टेलिकॉम कंपन्यांसंबंधात नियम सोपे केले. एरियल फायबर लावायला मंजुरी दिली. जी कागदपत्रे सादर करायला लागतात त्यांची संख्या कमी केली.

राजरतन वायर या कंपनीचे निकाल चांगले आले. प्रॉफिट १३६% तर उत्पन्न ७३% वाढले. ६% ते ८% इनपुट कॉस्ट वाढली पण ती त्यांनी ग्राहकांकडे पास ऑन केली. कंपनी थायलंड येथील प्लांटचा क्षमता विस्तार करत आहे. या साठी आवश्यक ते फंड्स कंपनीकडे आहेत.

GAIL ही सरकारी क्षेत्रातील कंपनी हायड्रोजनचे उत्पादन करण्यासाठी प्लांट लावणार आहे. अलकेम लॅबच्या ‘PREVALITE’ च्या जनरिकला USFDA कडून मंजुरी मिळाली. ऑरोबिन्दो फार्माच्या ‘ZIPSOR’ या जनरिकला USFDA कडून मंजूरी मिळाली.

KEC या कंपनीला Rs १८२९ कोटींची ऑर्डर मिळाली.

IEX या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. कंपनीने तुमच्या जवळील १ शेअर्ससाठी २ बोनस शेअर मिळतील असे जाहीर केले.

अपोलो पाईप्स या कंपनीने तुमच्या जवळील १ शेअर्ससाठी २ बोनस शेअर मिळतील असे जाहीर केले.

कॅनफिना होम्स या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. ही कंपनी सरकारी नोकरीत असलेल्या कर्मचाऱ्यांनाच कर्ज देते. त्यामुळे NPA चे प्रमाण कमी असते.

तानला प्लॅटफॉर्म्स, JSW स्टील, TCI एक्स्प्रेस, शांती गिअर्स, हिंदुस्थान झिंक, फेडरल बँक, येस बँक, महिंद्रा हॉलिडेज यांचे निकाल चांगले आले. इंडिया मार्ट आणि HDFC लाईफचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल सर्व साधारण होते. .

PVR या कंपनीचे उत्पन्न वाढले,तोटा कमी झाला. इनॉक्स लेजर या कंपनीचे उत्पन्न वाढले पण त्याच बरोबर तोटाही वाढला. या दोन्ही कंपन्यांचे मल्टिप्लेक्सेस आहेत.

सुप्रीम इंडस्ट्रीजचे प्रॉफिट(P) वाढले उत्पन्न (I) वाढले पण मार्जिन (M) मात्र कमी झाले.

NYKAA या ऑन लाईन ब्युटी, पर्सनल केअर आणि फॅशन प्रॉडक्ट्स स्टोर्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्म असणाऱ्या कंपनीचा Rs ५३५५ कोटींचा ( यात Rs ६३० कोटींचा फ्रेश इशू आहे) IPO २८ ऑक्टोबर २०२१ रोजी ओपन होऊन १ नोव्हेंबरला बंद होईल. याचा प्राईस बँड Rs १०८५ ते Rs ११२५ आहे. मिनिमम लॉट १२ शेअर्सचा आहे. नवीन रिटेल स्टोर्स आणि वेअरहाऊसेस उधडण्यासाठी तसेच भांडवली खर्च आणि कर्ज फेडण्यासाठी या इशूचे प्रोसीडस वापरण्यात येतील.

आज मेटल आणि IT सेक्टर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले , बँका आणि रिअल इस्टेट या क्षेत्रात तेजी होती.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६०८२१ NSE निर्देशांक निफ्टी १८११४.बँक निफ्टी ४०३२३ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.