आजचं मार्केट – २७ ऑक्टोबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २७ ऑक्टोबर २०२१

आज क्रूड US $ ८६.२० प्रती बॅरेलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७५ च्या आसपास US $ निर्देशांक ९३.९६ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.६० विक्स १६.९३ PCR ०.९८ होते.

UPS, GE, आल्फाबेट, ट्विटर, ३M या कंपन्यांचे निकाल सुंदर आले. USA ने चिनी टेलिकॉम कंपन्यांवर खूपच बंधने घातली आहेत. USA मध्ये सुपररीच नागरीकांवर टॅक्स लावण्याचा प्रस्ताव आहे. FII ने भारतीय मार्केटमध्ये विक्री केली.

ऍक्सिस बँकेची लोन ग्रोथ स्लो झाल्यामुळे ADR दबावात होते. सिप्लाचे प्रॉफिट उत्पन्न वाढले पण US चा रेव्हेन्यू थोडा कमी झाला ऑपरेटिंग मार्जिन कमी झाले,. अंबुजा सिमेंट डिझेल आणि कोळशाचे वाढलेले भाव आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे मार्जीन कमी, महानगर गॅस लिमिटेड, टॉरंट फार्मा यांचे मार्जिन कमी झाले.

स्टेट बँक ऑफ इंडिया अशुअरन्स, आरती ड्रग्स. SKF इंडिया यांचे निकाल असमाधानकारक होते.

मारुतीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेप्रमाणे असमाधानकारक होते.कंपनीने वारंवार वाढणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती, सेमी कंडक्टर चिप्सची टंचाई यांच्या बाबतीत निवेदन दिले होते. कंपनीला काही दिवस त्यांचे प्लान्ट बंद ठेवायला लागले होते. प्रॉफिट Rs ४७५ कोटी, उत्पन्न Rs २०५३९ कोटी. EBITDA Rs ८५५ कोटी होते. ऑपरेटिंग मार्जिन ४.२% होते.

हिरो मोटो कॉर्पने यूएई मध्ये नवे डिलरशिप ऑफिस उघडले.

IRB इन्फ्रा चे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले, कंपनी त्यांचे नॉन कोअर ऍसेट Rs ४५० कोटींना विकणार याचे प्रोसिड्स कर्ज फेडण्यासाठी आणि भांडवली खर्चासाठी वापरण्यात येतील. स्पेन च्य सिन्ट्रा कडून Rs ३१८० कोटी २४.९% स्टेक GIC कडून Rs २१६७ कोटी १६.६% स्टेक.एकूण Rs ५३४७ कोटी मिळणार. Rs २११.७९ प्रती शेअर या भावाने ही प्रेफरंशियल अलॉटमेंट केली जाणार. म्हैसकर यांच्य कडे ३४% स्टेक राहील आणि व्यवस्थापन IRB कडे राहील . यातून Rs ३२५० कोटी कर्ज फेड, Rs १४९७ कोटी ग्रोथ कॅपिटलसाठी तर Rs ६०० कोटी इतर सामान्य खर्चासाठी वापरले जातील.

बिर्ला सॉफ्ट, पर्सिस्टंट सिस्टिम्स, ABB, त्रिवेणी टर्बाईन, ENIL, शेमारू, IIFL फायनान्स, लक्ष्मी मशीन टूल्स, श्री दिग्विजय सिमेंट, IOB, बटरफ्लाय गांधीमती, KPR मिल्स,JK पेपर, प्राज इंडस्ट्रीज,वेलस्पन इंडिया, युनायटेड स्पिरिट्स, TTK प्रेस्टिज, वर्धमान टेक्सटाईल (Rs ३४ प्रती शेअर लाभांश) यांचे निकाल चांगले होते.

युनायटेड ब्रुअरीजचे बीअर व्हॉल्युम्स ५०% ने वाढले.

NCLT ने झी एंटरप्रायझेसला EGM बोलावण्यापासून रोखले.

TTK प्रेस्टिज या कंपनीने त्यांच्या एक शेअरचे १० शेअर्समध्ये विभाजन केले.

डिशमन फार्माच्या स्वित्झरलँडमधील युनिटला USFDA ने मंजुरी दिली.

लाल पाथ लॅबने सबर्बन डायग्नॉस्टिक्सचे अधिग्रहण केले.

न्यूजेन केमिकल्सने नवीन प्रॉडक्शन चालू केले.

अक्षर केमिकल्स २९ ऑक्टोबर २०२१ रोजी शेअर बायबॅक वर विचार करेल.

टायटन या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल सुंदर आले.

अडानी पोर्ट्सचे उत्पन्न वाढले प्रॉफिट कमी झाले.

आज IT, फार्मा, FMCG क्षेत्रातील कंपन्यांमध्ये खरेदी झाली, मेटल्स बँकिंग आणि पॉवर शीसंबंधीत कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रॉफीट बुकिंग झाले

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६११४३ NSE निर्देशांक निफ्टी १८२१० आणि बँक निफ्टी ४०८७४ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.