आजचं मार्केट – २८ ऑक्टोबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २८ ऑक्टोबर २०२१

आज क्रूड US $ ८३.०० प्रती बॅरेलच्या आसपास तर रुपया US $ १ = Rs ७५ च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९३.८४ US १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.५४ VIX १८.४१ आणि PCR ०.६४ होते.

आज USA मध्ये डाऊ जोन्स मंदीत तर NASHDAQ तेजीत होते. युरोप आणि एशियातील मार्केट्स मंदीत होती. USA चे GDP चे आकडे येतील. बँक ऑफ जपान आणि युरोपियन सेंट्रल बँकेचे निर्णय कळतील. USA मध्ये क्रूडचे साठे वाढले. त्यामुळे क्रूड आज काही वेळ थोडेसे मंदीत गेले. क्रिप्टोची किमतीत १०% पडली.

चीनने कोळशाच्या किमतीवर निर्बंध घातल्यामुळे त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मेटल आणि कोळसा यांच्या किमतीवर परिणाम झाला .

सुप्रीम कोर्टाने भारती एअरटेलला GST अंतर्गत Rs ९२३ कोटी रिफंड देण्यास नकार दिला.

भारतीय मार्केट्समध्ये गेले आठवडाभर FII विक्री करत आहेत. १ आणि २ नोव्हेम्बरला फेडच्या FOMC बैठकीत काय निर्णय होतो यांच्याकडे सर्वांचे लक्ष असेल. फेडच्या अध्यक्षांनी आम्ही बॉण्ड्स खरेदीचे टेपरींग करण्यासाठी तयार आहोत असे सांगितले. त्यातून कोरोनाचा D व्हरायन्ट अजून काही ठिकाणी संसर्ग/ मृत्यू घडवत आहे.

आज ITC चे दुसऱ्या तिमाहीचे निकाल आले. FMCG, पेपर हॉटेल व्यवसायात प्रगती झाली. निकाल चांगले होते. सिगारेट सेक्टरमध्येही प्रगती झाली.

टायटनचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. ज्वेलरी, आयवेअर, वॉचेस या सर्व विभागात चांगली प्रगती झाली. कंपनीने काही नवीन स्टोर्सही उघडली

L & T च्या ऑर्डर बुकात चांगली वाढ झाली. प्रॉफिट वाढले. पॉवर आणि हायड्रोकार्बन विभागात चांगली प्रगती झाली.
बजाज ऑटोचे उत्पन्न फायदा वाढले, वाढलेल्या कच्च्या मालाच्या किमतीमुळे मार्जिन कमी झाले.

सोना कॉम या कंपनीचे निकाल चांगले आले इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी विभागात चांगली प्रगती झाली.
रेमंड ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली. कंपनीचे कर्ज कमी झाले.

मास्टेक या कंपनीचा व्यवसाय मुख्यतः UK मध्ये आहे. UK सरकारने अंदाजपत्रकात आणि सरकारी खर्चात वाढ केली.याचा फायदा मास्टेकला होईल.

कॉस्मो फिल्म्स,युनायटेड स्पिरिट्स,हॅप्पीएस्ट माईंड, D.B कॉर्पस, जिंदाल स्टेनलेस (हिस्सार) जॉन्सन हिताची (तोटा कमी झाला) इमामी पेपर, मेरिको, इंडियन बँक विनती ऑरगॅनिकस, APL अपोलो ट्यूब्स, एअरटेल आफ्रिका या कंपन्यांचे दुसऱ्या तीमाहीचे निकाल चांगले आले.

ओरॅकल, इंडसइंड बँकेचा निकाल चांगला आला. कॉर्पोरेट लोन वाढले. रिटेल पोर्टफोलिओ कमी झाला.

NYAKAA या स्टार्ट अप कंपनीचा IPO आजपासून सुरु झाला. हा IPO Rs ५३५० कोटी ( यात Rs ६३० कोटींचा फ्रेश इशू आणि Rs ४७२२ कोटींची OFS आहे.) ह्या IPO चा प्राईस बँड Rs १०८५ ते Rs ११२५ आहे. ही एक ON लाईन ब्युटी आणि फॅशन प्रॉडक्टसची विक्री करणारी कंपनी आहे. नंतर या कंपनीने ४० शहरात आपली स्टोर्स उघडली. कंपनीने काही फॅशन क्षेत्रातील कंपन्या खरेदी केल्या. कंपनीचा ग्रोथ मर्चन्डाईझ व्हॅल्यू Rs ४००० कोटी आहे आणि वाढत आहे. रेव्हेन्यू Rs २४४० कोटी झाले. प्रॉफिट Rs ६२ कोटी आहे.

पॉलिसी बाजारचा Rs ५७०० कोटींचा IPO १ नोव्हेम्बरला ओपन होऊन ३ नोव्हेम्बरला बंद होईल. Rs ३७५० कोटींचा फ्रेश इशू आणि Rs १९०० कोटींची OFS असेल. प्राईस बँड Rs ९४० ते Rs ९८० आहे. पॉलिसी बाजार हा वेगवेगळ्या इन्शुअरन्स कंपन्यांच्या पॉलिसीचे तुलनात्मक फायदे तोटे सांगणारी वेबसाईट आहे इन्शुअरन्स ब्रोकिंग लायसेन्स मिळाल्यावर आता त्यांच्या वेबसाइटवरून कोणीही इन्शुअरन्स पॉलिसी खरेदी करू शकतो बंद करू शकतो तसेच पॉलिसीअंतर्गत क्लैम लॉज करू शकतो. ते इन्शुअरन्स पॉलिसी घेण्यासाठी फायनान्सिंगही करतात पैसा बाजार या कंपनीच्या मार्फत कर्ज देतात.

DOT ने MTNL ला त्यांच्या आर्टिकल्स ऑफ असोसिएशन मध्ये लंड आणि इतर मालमत्ता व ऐकण्यासाठी आवश्यक त्या दुरुस्त्या करायला सांगितले. ही दुरुस्ती झाल्यानंतर नॉन कोअर ऍसेटचे डिमॉनेटायझेशन करायला सोपे जाईल.

प्रायमरी मार्केटमधील गुंतवणूक करण्यासाठी सेकंडरी मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

सन फार्मा या कंपनीने सोरायसिसवरील औषध कॅनडा मध्ये लाँच केले.

उद्यापासून नोव्हेंबर सिरीजपासून ८ नव्या कंपन्या F & O सेगमेंटमध्ये सामील होतील या कम्पन्याची नावे पूर्वी सांगितलेली आहेत.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९९८४ NSE निर्देशांक निफ्टी १७८५७ बँक निफ्टी ३९५०८ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.