Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.
आजचं मार्केट – ३० November २०२१
आज क्रूड US $ ७४.०० प्रती बॅरलच्या ( दिवस अखेरीस US $७१प्रती बॅरल) तर रुपया US $१=Rs ७५.०० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९५.७५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.४५ VIX २०.२१ तर PCR १.२८ होते.
आज USA च्या मार्केट्समध्ये तेजी होती. गुरुवार २ डिसेंबर २०२१ रोजी ओपेक+ ची बैठक आहे.
तत्व चिंतन फार्मा या कंपनीने गुजरात येथे दाहेजमधे ५०३९९ स्क्वेअर मीटर जमीन खरेदी केली.
DAP खतांच्या किमती खूपच वाढल्या आहेत मार्केटमध्ये टंचाई जाणवत आहे.
कोल इंडियाने Rs ९ प्रती शेअर इंटरीम लाभांश जाहीर केला. या लाभांशासाठी रेकॉर्ड डेट ७ डिसेंबर २०२१ आहे.
१ डिसेंबर २०२१ पासून गोल्ड ज्वेलरीवर हॉलमार्किंग अनिवार्य असेल. त्यामुळे थंगमाईल ज्वेलरी, टायटन, राजेश एक्स्पोर्ट हे आणि इतर ब्रांडेड ज्वेलरी उत्पादन करणारे शेअर्स तेजीत होते.
आज गो फॅशन या कंपनीच्या शेअर्सचे छान लिस्टिंग झाले. हा शेअर BSE वर Rs १३१६.००वर तर NSE वर Rs १३१०.०० वर लिस्ट झाला . IPO मध्ये हा शेअर Rs ६९० वर दिला असल्याने ज्यांना शेअर्स अलॉट झाले त्यांना चांगला लिस्टिंग गेन झाला.
ऑन लाईन बस टिकेटिंग प्लॅटफॉर्म ‘रेडबस’ ने IRCTC च्या सहकार्याने ‘रेडरेल’ या प्लॅटफॉर्मवर रेल्वेचे बुकिंग सुरु केले.
आज मारुतीने EECO ही सोय त्यांच्या पॅसेंजर व्हेइकल्स मध्ये केल्यामुळे कार्सच्या किमती Rs ८००० ने वाढवल्या.
सन फार्माने ‘BIOFRONTERA’ यांच्या बरोबरची केस US $ २२.५ मिलियनमध्ये सेटल केली.
माननीय अर्थमंत्र्यानी सांगितले की क्रिप्टो करंसीवर पूर्णपणे बंदी आणण्याचा सरकारचा सध्यातरी कोणताही विचार नाही.
आज IT क्षेत्रातील शेअर्स तेजीत होते तर मेटलसंबंधीत क्षेत्रातील कंपन्यांमध्ये आणि ऑटो आणि बँकिंग क्षेत्रात मंदी आली. .
GST कलेक्शनचे विक्रमी आकडे येतील असे वाटल्यामुळे आज मार्केटमध्ये सुरुवातीला तेजी होती पण MODERNA चे ओमिक्रोन विषयी निवेदन आल्यावर मात्र मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.( MODERNA ने सांगितले की सध्या उपलब्ध असलेली व्हॅक्सिन ओमिक्रोनवर परिणामकारक ठरल्याचे आढळत नाही )
आजचा इंट्राडे हाय निफ्टी १७३२४ आणि इंट्राडे लो निफ्टी १६९३१ म्हणजे जवळ जवळ निफ्टी मध्ये ४०० पाईंट्सची हालचाल झाली.
सेन्सेक्स इंट्राडे हाय ५८१८३ आणि इंट्राडे लो ५६८६७ होते. म्हणजे सेन्सेक्समध्ये १७०० पाईंट्सची हालचाल होती.
मार्केट सुरुवातीची तेजी गमावून ३०० पाईंट मंदीत गेले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ५७०६४ NSE निर्देशांक निफ्टी १६९८३ बँक निफ्टी ३५६९५ वर बंद झाले.
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!