आजचं मार्केट – 1 November २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – 1 November २०२१

आज क्रूड US $ ८४.०० प्रती बॅरेलच्या आसपास तर रुपया US $१= ७५ च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९४.२० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.५८ VIX १७.२५ आणि PCR १.१२ होते.

आज ऑक्टोबर महिन्याचे ऑटो विक्रीचे आकडे आले. बजाज ऑटोची विक्री १४% ने कमी झाली. कंपनीने ४.३९ लाख युनिट्सची विक्री केली. पण कंपनीच्या कमर्शियल वाहनांची विक्री मात्र वाढली. अशोक लेलँडची एकूण विक्री ११% ने वाढून ११०७९ युनिट्स झाली कंपनीने M & HCL ची ६९७८ युनिट्स ३२% वाढ तर LCV ची विक्री ५००१ युनिट्स एवढी झाली( ७% कमी) मारुतीची विक्री २४.२% ने कमी होऊन १.३८ लाख युनिट्स एवढी झाली. निर्यातीत मात्र सुधारणा झाली.
टाटा मोटर्सची एकूण विक्री ३०% ने वाढून ६७८२९ एवढी झाली. डोमेस्टिक विक्री ( पॅसेंजर व्हेइकल्स) ३३६७४ युनिट्स झाली. टाटा मोटर्सचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले. तोटा Rs ३०७ कोटींवरून ४४१५.५० कोटी एवढा झाला. उत्पन्न Rs ५३५३० कोटींवरून ६१३७८.८० कोटी एवढे झाले ऑपरेटिंग मार्जिन ६.७% एवढे राहिले. एस्कॉर्टसची विक्री १३५१४ युनिट्स, आयशर मोटर्स ४८६३ युनिट्स, SML ISUZU ७४३ युनिट्स एवढी झाली.

पंजाब & सिंध बँक तोट्यातून फायद्यात आली पण GNPA आणि NNPA त वाढ झाली.

ऑक्टोबर २०२१ महिन्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग PMI ५३.७% वरून वाढून ५५.९% एवढा झाला. ऑक्टोबर २०२१ या महिन्यासाठी GST कलेक्शन Rs १.३० लाख कोटी झाले. सप्टेंबर महिन्यात Rs १.१७ लाख कोटी एवढे होते.

IRCTC चे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. प्रॉफिट Rs १५८.६ कोटी, उत्पन्न Rs ४०५ कोटी तर ऑपरेटिंग मार्जिन ५२.२०% होते.

HDFC चे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.उत्पन्न Rs १२२२० कोटी प्रॉफिट ३१.७०% YOY वाढून Rs ३७८० कोटी झाले. AUM (ऍसेट अंडर मॅनेजमेंट) Rs ५.९७ लाख कोटी एवढे होते.

लक्स इंडिया, डॉलर इंडस्ट्रीज, कल्याणी स्टील्स, व्हर्लपूल, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट्स, देवयानी इंटरनॅशनल, आदित्य बिर्ला कॅपिटल यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. वेंकीज आणि स्टार सिमेंट यांचे निकाल सर्व साधारण होते.

आज पासून SJS इंटरप्रायझेस. PB फिनटेक आणि सिगाची इंडस्ट्रीज हे तीन IPO ओपन झाले.

SJS एंटरप्रायझेस ही कंपनी DESIGN टू डिलिव्हरी AESTHETICS सोल्युशन्स प्रोव्हायडर म्हणून टू व्हीलर, पॅसेंजर वेहिकल्स, कमर्शियल व्हेइकल्स, कन्झ्युमर अप्लायन्सेस, मेडिकल डिव्हायसेस, फार्म इक्विपमेंट्स अँड सॅनिटरीवेअर इंडस्ट्रीजसाठी काम करते. हा Rs ८०० कोटींचा IPO असून ही सर्व रक्कम Rs ७१० कोटी एव्हरग्राफ होल्डिंग Pte आणि Rs ९० कोटी KA जोसेफ OFS करत आहेत. याचा प्राईस बँड Rs ५३१ ते Rs ५४२ असून २७ शेअर्सचा लॉट सिगाची इंडस्ट्रीच्या IPO चा प्राईस बँड Rs १६१ ते Rs १६३ आहे. मिनिमम लॉट ९० शेअर्सचा आहे. हा Rs १२५ कोटींचा IPOअसून कंपनी ७७ लाख शेअर्सचा फ्रेश इशू ऑफर करत आहे. कंपनी ५९ वेगवेगळ्या ग्रेडस्चे MCC MICROCRYSTALLINE CELLULOSE चे उत्पादन करते. याचा उपयोग फार्मास्युटिकल आणि न्यूट्रास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये कच्चा माल म्हणून वापरले जाते. ह्या कंपनीचे हैदराबाद आणि गुजरात मध्ये युनिट्स आहेत.

वाढलेला मॅन्युफक्चरिंग PMI आणि वाढलेले GST कलेक्शन यामुळे आज मार्केटमध्ये थोडीशी तेजी दिसली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६०१३८ NSE निर्देशांक निफ्टी १७९२९ बँक निफ्टी ३९७६३ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.