आजचं मार्केट – ८ November २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ८ November २०२१

आज क्रूड US $ ८३.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७४.०० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९४.३० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.४७ तर VIX १६.३६ आणि PCR १.०८ होते.

सोने आज दोन महिन्यांच्या कमाल स्तरावर होते.यामुळे मुथूट मन्नापुरं फेडरल बँक या शेअर्समध्ये तेजी होती. चांदीतही माफक तेजी होती. पण बेस मेटल्समध्ये मात्र प्रॉफिट बुकिंग झाले.

USA, युरोप, आणि एशियन मार्केट्समध्ये तेजी होती. USA मधील बेरोजगारी ४.६% पर्यंत कमी झाली. ५.३१ लाख नवीन जॉब निर्माण झाले. USA च्या दोन्ही सदनांनी US $ १.०० ट्रिलियन इन्फ्रा प्रोजेक्ट बिलासाठी मजुरी दिली.त्यात US $ ५५० बिलियन चे ट्रान्सपोर्टेशन ब्रॉडबँड प्रोजेक्ट मंजूर केले.

बँक ऑफ इंग्लंडने व्याजाचे दर ०.१% ठेवले.

फायझरने कोरोनावरच्या गोळ्या काढल्या आहेत. यामुळे हॉस्पिटलायझेशनच्या धोक्यामध्ये ८९% फरक पडेल.
भारतात या सणासुदीच्या काळात म्हणजे गेल्या १५ दिवसात १.२५ लाख कोटींची खरेदी झाली.यात प्रामुख्याने भारतीय मालाची खरेदी झाली. म्हणून आज कन्झ्युमर ड्युरेबल्सचे शेअर्स तेजीत होते.उदा :- हॅवेल्स, टायटन, WHIRLPOOL, वोल्टस, ब्ल्यू स्टार,

२३ जानेवारी २०२१ पासून टाटा एअर इंडिया सुरु करणार.

सेबीने भारतीय स्टॉक एक्स्चेंजमध्ये T +1 सेटलमेंटचा रोडमॅप तयार केला. टप्प्याटप्प्याने T +१ सेटलमेंट २५ फेब्रुवारी २०२२ पासून अमलात आणण्यात येईल.

GSPL, सुवेन फार्मा, विष्णू केमिकल्स, आंध्र पेट्रोकेमिकल्स, अम्बिका कॉटन, सह्याद्री, शंकरा, ऑटोमोटिव्ह ऍक्सल्स यांचे निकाल चांगले आले. तर सुंदरम फायनान्स या कंपनीचे निकाल असमाधानकारक आहेत.

करूर वैश्य बँकेचा दुसऱ्या तिमाहीचा निकाल चांगला आला. NII, प्रॉफिट वाढले तर GNPA आणि NNPA कमी झाले. क्रेडिट ग्रोथ ७.४% होती.

११ नोव्हेंबर २०२१ रोजी NYAKAA चे लिस्टिंग होईल. १२ नोव्हेंबर २०२१ रोजी ONGC लाभांशावर विचार करेल.

PAYTM चा IPO आतापर्यंत १८% भरला.

हॅपीएस्ट माईंड ही कंपनी आता रेव्हेन्यूसाठी USA वर अवलंबून राहणार नाही.

केर्न एनर्जीचे नाव आता ‘CAPRICORN एनर्जी’ असे असेल.

फ्री रेशन स्कीम ३० नोव्हेम्बर २०२१ ला संपत आहे.

NCLT ने IL &FS चा ONGC त्रिपुरा पॉवर कंपनीमधील २६% स्टेक अकवायर करण्यासाठी ‘GAIL’ ला मंजुरी दिली.
इंडसइंड बँकेची सबसिडीअरी भारत फायनान्सियल इन्क्ल्युजनच्या काही सिनियर कर्मचाऱ्यानी इंडसइंड बँकेला गव्हर्नन्समधील काही त्रुटींविषयी सावध करण्यासाठी WHISTLEब्लोअर पत्र पाठवले आहे. इंडसइंड बँकेने असे सांगितलं की काही तांत्रिक चुकींमुळे मे २०२१ या महिन्यात कर्ज घेणाऱ्यांच्या पूर्व संमतीशिवाय ८४००० कर्ज दिली गेली.
परंतु आता अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याने यामधील ‘रिस्क’ कमी झाला आहे. या प्रकारे दिलेल्या कर्जानपैकी Rs ३४ कोटींची २६०७३ कर्ज ऍक्टिव्ह आहेत. ही एकूण MFI च्या ०.१२% आहेत. बँकेने या कर्जानसाठी प्रोव्हिजन केली आहे. आणि SOP मध्ये आता अनिवार्य BIOMETRIC ऑथोरायझेशनची तरतूद केली आहे.या स्पष्टीकरणानंतरही शेअर Rs १०० पडला.

ब्रिटानिया या कंपनीचा रेव्हेन्यू वाढला पण प्रॉफिट कमी झाले

गहू आणि खाद्य तेलाचे भाव वाढल्यामुळे ब्रिटानियाच्या उत्पादन खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

आज लॉजिस्टिक, सिमेंट क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी होती उदा :- VRL लॉजिस्टिक्स, स्नोमॅन लॉजिस्टिक्स, गती, महिंद्रा लॉजिस्टिक्स ब्ल्यू डार्ट ACC अंबुजा अल्ट्राटेक सिमेंट, सागर सिमेंट, रामको सिमेंट, इंडिया सिमेंट

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६०५४५ NSE निर्देशांक निफ्टी १८०६८ बँक निफ्टी ३९४३८ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.