आजचं मार्केट – ९ November २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ९ November २०२१

आज क्रूड US $ ८३.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७४.०० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९४.०४ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.४८ VIX १६.२२ PCR १.०८ होते.

USA च्या फेड ने फायनान्सियल स्टेबिलिटी रिपोर्ट सादर केला. काल बिटकॉइनचा भाव US $ ६७८०३ एवढा होता. रिलायन्सने नॉर्थ USA मधील शेल गॅस व्यवसायातून काढता पाय घेतला.

ऑरोबिंदो फार्मा, ३i इन्फो, EID पॅरी , MRF( उत्पन्न वाढले, प्रॉफिट आणि मार्जिन ५०% कमी झाले Rs ३ लाभांश जाहीर केला.), केसोराम, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक ( फायद्यातून तोट्यात) यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

J कुमार इन्फ्रा, सतलज टेक्सटाईल्स ( तोट्यातून नफ्यात, उत्पन्न वाढले), नितीन स्पिनर्स, किटेक्स गारमेंट्स, NCC, VST, ग्रीनप्लाय, IDFC ( तोट्यातून फायद्यात), ELGI इक्विपमेंट्स, FDC, शाम मेटॅलिक्स, HG इन्फ्रा, RSWM, शोभा, आंध्र पेपर, ACE या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

M & M +MVML या कंपनीचे उत्पन्न वाढले, प्रॉफिट वाढले मात्र ऑपरेशनल मार्जिन कमी झाले. कंपनीचा शेतकी क्षेत्रातील मार्केट शेअर १.९% ने वाढला.

थंगमायल ज्वेलरी या कंपनीने ५० नवीन स्टोर्स उघडली.

वेदांताने त्यांचे ADS आणि ADR डीलीस्ट केले.

आर्ट्सन इंजिनीअरिंग या कंपनीला टाटा ग्रुपकडून नियमित ऑर्डर्स मिळतात.

‘SAIL’ या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीकडे ७ कोटी टन आयर्न ओअरचा साठा आहे.

TVS मोटर्सने सांगितले की त्यांचे इलेक्ट्रिक मोबिलिटी सबसिडीअरीवर काम सुरु आहे पण त्यासाठी फंड उभारणीसाठी कोणाशीही वाटाघाटी चालू नाहीत.

OMC ( ऑइल मार्केटिंग कंपन्या) एकूण २२००० इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन्स उभारणार आहेत. (१) IOC -१०००० (२) BPCL -७००० (३) HPCL -५०००

भारत फोर्ज ही कंपनी १२ नोव्हेंबर २०२१ रोजी लाभांशावर विचार करेल.

IRCON या कंपनीला बरोडामध्ये Rs ५१८२ कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

आज ऑटो, IT सेक्टरमध्ये, तसेच ज्या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती.

आज sapphire फूड्स या कंपनीचा IPO ओपन झाला. याची माहिती या आधीच्या ब्लॉगमध्ये दिली आहे. PAYtm चा IPO ४८% सबस्क्राईब झाला रिटेल पोर्शन १.२२ पट सबस्क्राईब झाला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६०४६३ NSE निर्देशांक निफ्टी १८०५१ तर बँक निफ्टी ३९४०४ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.