आजचं मार्केट – १० November २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १० November २०२१

आज क्रूड US $ ८५.२५ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७४.२५ च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९३.९८ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.४५ VIX १६.५५ आणि PCR ०.९८ होते. USA मधील महागाईचे आकडे आज येतील. टेसला या ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनीचा शेअर १२% पडला.प्रोड्युसर्स प्राईस इंडेक्स ०.६ ने वाढला. २०२२ -२०२३ या वित्तीय वर्षात दोन वेळा व्याजाच्या दरात वाढ केली जाईल अशी अपेक्षा आहे. सौदी अरेबियाने क्रूडच्या किमती वाढवल्या. प्रवासावरील निर्बंध उठवण्यात आले, इन्व्हेन्टरी कमी झाली आणि क्रूडसाठी मागणी मात्र ७ महिन्यांच्या कमाल स्तरावर आहे . त्यामुळे क्रूडचे दर अजून काही काळ तरी वाढत राहतील असा तद्न्यांचा अंदाज आहे.

सरकारची ‘हॉटेल अशोक’ ६० वर्षांसाठी लीजवर देण्याची योजना आहे. यातून सरकारला Rs ४०,००० कोटी मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

इंडियन टेरेन या कंपनीचा निकाल चांगला आला. (कंपनी तोट्यातून फायद्यात आली). माझगाव डॉक्स ( प्रॉफिट (p) उत्पन्न (I) मार्जिन (M) वाढले), NIIT (PIM वाढले), हॉकिन्स कुकर (PI वाढले M कमी) इमामी रिअल्टी ( I वाढले P,M कमी झाले.) अवध शुगर, फर्स्टसोर्स सोल्युशन्स ( I कमी P माफक वाढ , M वाढले), BOSCH, HEG, ट्रान्स्पेक, नहार पॉली, मनाली पेट्रो,शारदा मोटर, हिंदुस्थान कॉपर, टाटा इन्व्हेस्टमेंट, मिश्र धातू निगम, पेट्रोनेट LNG (Rs ७ अंतरिम लाभांश जाहीर केला),IGL (दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले.)गुजरात फ्लुओरो(PIM वाढले), कामधेनू,टाटा टेली, बर्गर पेंट्स, वान्ड्रेला हॉलिडेज, विनंती ऑर्गनिक्स यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. ‘BHEL’चे ऑर्डर बुक वाढले, तोटा कमी झाला म्हणून दुसऱ्या तिमाहीचे निकाल समाधानकारक म्हणता येतील.

बँक ऑफ बरोडाचे प्रॉफिट २०८७.९० कोटी, NII ७५६५.९० कोटी, इतर उत्पन्न ३५७९.२० कोटी,झाले GNPA, NNPA कमी झाले. निकाल चांगले लागले.

FACT(PIM कमी झाले), स्ट्राइड्स फार्मा ( फायद्यातून तोट्यात Rs ८४ कोटी तोटा I कमी झाली ),, क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण ( NPA वाढले), अस्त्राझेनेका, सोमाणी, एव्हरेड़ी, इक्विटास होल्डिंग या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

सरकारने आता धान्याचे १००% पॅकिंग ज्यूट मध्ये करणे अनिवार्य केले आहे सरकार शेतकऱयांकडून ज्यूट खरेदी करेल याचा ५० लाख शेतकऱ्याना फायदा होईल. या सरकारच्या निर्णयामुळे ग्लॉस्टर ,लुडलो ज्यूट CHEVIOT या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली.

सरकारने एथॅनॉलच्या किमती Rs १.०० ते Rs २.५०( नवीन किंमत Rs ६४ प्रती लिटर) वाढवायला मंजुरी दिली. नवीन किंमत १ डिसेम्बरपासून अमलात येइल. OMC ना एथॅनॉलच्या किमती ठरवण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. याचा फायदा इंडियन ग्लायकॉल,प्राज इंडस्ट्रीज, द्वारिकेश शुगर, त्रिवेणी, धामपूर शुगर या कंपन्यांना होईल. १०% इथेनॉल ब्लेंडींग २०२२ पासून सुरु होईल.

MOIL ३,३८,४२,६६८ शेअर्स Rs २०५ प्रती शेअर्स या भावाने टेंडर ऑफर रूटने बायबॅक करेल . या साठी कंपनी Rs ६९३,७७,४६.९४० (Rs ६९३.७८ कोटी) खर्च करेल.

DOT ने 5G ट्रायल्स घेण्यासाठीची मुदत मे २०२२ पर्यंत वाढवली.

रेलटेल या कंपनीला Rs २२.३९ कोटींची ऑर्डर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम कडून मिळाली डिक्सन टेक्नॉलॉजी या कंपनीने ‘BEETEL’ बरोबर टेलिकॉम नेटवर्किंगसाठी करार केला.

इंडियन हॉटेल्स ही कंपनी Rs १९८२.१० कोटींचा राईट्स इशू Rs १५० प्रती शेअर या भावाने आणणार आहे. हा इशू नोव्हेंबर २४, २०२१ ला ओपन होऊन ८ डिसेंबर २०२१ ला बंद होईल. आपल्याकडे ९ शेअर्स असतील तर १ राईट्स ऑफर केला जाईल. या इशूसाठी रेकॉर्ड डेट १३ नोव्हेंबर २०२१ असेल.

आज ‘NYAAKA’ या कंपनीचे BSE वर Rs २००१ तर NSE वर Rs २०१८ वर लिस्टिंग झाले. IPO मध्ये Rs ११२५ ला शेअर दिला असल्यामुळे ज्यांना शेअर्स अलॉट झाले त्यांना चांगले लिस्टिंग गेन झाले.
PEtm चा IPO पूर्णपणे भरला.

लेटेन्ट VIEW ANALYTICS या कंपनीचा Rs ६०० कोटींचा IPO १० नोव्हेम्बरला ओपन होऊन १२ नोव्हेम्बरला बंद होईल. याचा प्राईस बँड Rs १९० ते Rs १९७ असून ७६ शेअर्सचा मिनिमम लॉट आहे. ही कंपनी डेटा ऍनॅलिटीक्स कन्सल्टिंग, बिझिनेस अनॅलिटीक्स, ऍडवान्सड प्रेडिक्टिव्ह ऍनालिसिस, डेटा इंजिनीअरिंग, डिजिटल सोल्युशन्स या क्षेत्रात कार्यरत आहे. या कंपनीचा EPS ४.६० असून PE रेशियो ४२ आहे.

TARSONS प्रॉडक्टस या कंपनीचा IPO १५ नोव्हेम्बरला ओपन होऊन १७ नोव्हेम्बरला बंद होईल. प्राईस बँड Rs ६३५ ते Rs ६६२ असून मिनिमम लॉट २२ शेअर्सचा आहे. Rs १५० कोटींचा फ्रेश इशू असून या १.३२ कोटीं शेअर्सची OFS असेल. ही कंपनी लॅबवेअर प्रोडक्टसचे डिझाईनिंग, डेव्हलपमेंट, मॅन्युफॅक्चर, आणि सप्लाय करते. ही प्रॉडक्टस रिसर्च ऑर्गनायझेशन्स, ऍकेडमीक इन्स्टिट्यूट्स, फार्मास्युटिकल फर्म्स आणि डायग्नॉस्टिक कंपन्या आणि हॉस्पिटल्समध्ये वापरतात.

आलेम्बिक फार्मच्या USFDA ने काराखडी युनिटच्या तपासणीत १० त्रुटी दाखवल्या.

सेन्सेक्स ४०० पाईण्टपेक्षाही जास्त पडले होते. तेथून मार्केट सावरले आणि निफ्टी १८००० ची पातळी होल्ड केली.ऑटो, आणि फार्मा हे दोन सेक्टर वगळले तर बँक अँड फायनान्सियल, मेटल, रिअल्टी , FMCG यामध्ये काही अपवाद वगळता सामान्यतः माफक मंदी होती

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६०३५२ NSE निर्देशांक निफ्टी १८०१७ बँक निफ्टी ३९०२३ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

2 thoughts on “आजचं मार्केट – १० November २०२१

 1. Pallavi Vaval

  Hello Ma’am
  Good Evening
  I am Pallavi Vaval from Pune.

  I am totally new I share market.

  Are taking classes for it. Can you please share your mobile number. Please reply to me..

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.