आजचं मार्केट – ११ November २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ११ November २०२१

आज क्रूड US $ ८२.७५ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७४.५० च्या आसपास होते US $ निर्देशांक ९४.८८ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.५७ VIX १६.८४ PCR ०.९४ होते.

आज USA मधील मार्केट मंदीत होती. महागाई निर्देशांक (CPI) ६.२% म्हणजे ३१ वर्षांच्या कमाल स्तरावर होते. त्यामुळे आता बॉण्ड खरेदीचे प्रमाण कमी होईल तसेच व्याजाचे दर वाढवण्याची तारीख अलीकडे आणण्यात येईल अशा भीतीने मार्केटला ग्रासले. क्रूडचे साठे वाढले म्हणून क्रूडचा भाव कमी झाला. कोअर महागाई ४.६% झाली. ऑगस्ट १९९१च्या पेक्षा जास्त आहे. म्युच्युअल फंडांचा इंफ्लो Rs ४७००० कोटींवरून Rs ३८००० कोटी झाला.

नारायणा हृदयालय, AFFLE, पीडिलाइट, जमना ऑटो, मिंडा इंडस्ट्रीज, RVNL, टिमकीन, मॉन्टेकार्लो, थरमॅक्स, संसेरा इंडस्ट्रीज, क्रिसिल ( Rs ९ लाभांश), सुंदरम फासनर्स, BF युटिलिटीज ( तोट्यातून फायद्यात), HOEC, श्रेयस शिपिंग, PFC (Rs २.५० प्रती शेअर लाभांश,) लिंकन फार्मा, मोरेपन लॅब (PIM वाढले), JTEKT (PI वाढले मार्जिन कमी), पेज इंडस्ट्रीज ( प्रॉफिट Rs १६०.५० कोटी, उत्पन्न Rs १०८४ कोटी लाभांश Rs १५० प्रती शेअर ) CESC, V-२ रिटेल ट्रेड (तोटा कमी झाला उत्पन्न वाढले.) लुमॅक्स ऑटो, भारत डायनामिक्स, गोदरेज कंझ्युमर्स ( PI वाढले मार्जिन कमी झाले), हिंदुस्थान एअरोनाटिक्स ( PIM वाढले, Rs १४ प्रती लाभांश), पॉवर मेक ( तोट्यातून फायद्यात आली) मॅट्रिमोनी.कॉम्,NHPC, सॅकसॉफ्ट, बाळकृष्ण इंडस्ट्रीज ( Rs ४ लाभांश), झी एंटरटेनमेंट या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
क्लीन सायन्स, आणि टी व्ही एस श्रीचक्र या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल ठीक होते. इंजिनीअर्स इंडिया, नाटको फार्मा, पिरामल एंटरप्राईस (Rs १५० कोटी वन टाइम लॉस), यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.
काही शेअर्स १ डिसेम्बरपासून MSCI निर्देशांकात समाविष्ट केले जातील. त्यात गोदरेज प्रॉपर्टीज,(Rs २०.१ कोटी) टाटा पॉवर( Rs २४ कोटी), SRF( Rs २३.१ कोटी), माइंडट्री( Rs २० कोटी), IRCTC( Rs १७.१ कोटी) , Mphasis( Rs २०.८ कोटी), झोमॅटो( Rs १५.३ कोटी) यांचा समावेश असेल तर IPCA लॅब( Rs १०.९ कोटी) आणि REC ( Rs १०.१कोटी) यांना वगळण्याची शक्यता आहे. ज्या शेअर्सचा समावेश होणार आहे त्यात इंफ्लो ऑफ फंड्स( कंसात दिल्याप्रमाणे ) होईल तर ज्यांना वगळण्यात येणार आहे त्यांच्यात (कंसात दिल्याप्रमाणे) ऑऊटफ्लो ऑफ फंड्स होईल.

API मन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये ब्रेकडाऊन झाला आहे. उदा नाटको फार्मा, लौरस लॅब.
सरकारने PLI योजनेत CNG आणि PNG उपकरणांचा समावेश केला. इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन फ्युएलवर भर दिला आहे. या स्कीममध्ये अंतर्भूत होण्यासाठी ६० दिवसांच्या आत फॉर्म भरणे आवश्यक आहे.

फिनोलेक्स केबल्स ही कंपनी रूम हिटरच्या व्यवसायात पदार्पण करत आहे.

‘GO फॅशन’ या कंपनीचा Rs ८०० कोटींचा IPO १७ नोव्हेम्बर २०२१ रोजी ओपन होऊन २२ नोव्हेम्बर २०२१ ला बंद होईल. ही कंपनी ‘गो कलर्स’ या ब्रॅण्डान्तर्गत वूमनवेअर बनवते. यात Rs १२५ कोटींचा फ्रेश इशू असून १,२८,७८,३८९ शेअर्सची OFS असेल. ह्याचा उपयोग १२० नवीन ब्रँड आउटलेट काढण्यासाठी होईल. ही कंपनी WOMAN’S बॉटमवेअर प्रॉडक्टस बनवते आणि या क्षेत्रात कॅटॅगरी क्रिएटर म्हणून नावाजली जाते.

आज हॉस्पिटल्ससंबंधीत शेअर्स तेजीत होते. उदा नारायण हृदयालय, लोटस, अपोलो, ऍस्टर DM हेल्थ.

रूट मोबाईल ही कंपनी MASAVIANS AS या कंपनीमध्ये १००% स्टेक खरेदी करणार आहे..

TRAIने केलेल्या नवीन नियमांची अंमलबजावणी ३१ डिसेंबर २०२१ वरून १ एप्रिल २०२२ पर्यंत पुढे ढकलली आहे. याचा फायदा सोनी, स्टार, झी , टी व्ही १८ ब्रॉडकास्टींग, टी व्ही टुडे, सन टीव्ही, डेन नेटवर्क्स, हाथवे या कंपन्यांना होईल.
IDFC च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ने कंपनीच्या IDFC अल्टर्नेटीव्ह्ज, IDFC ट्रस्टीज, आणि IDFC प्रोजेक्ट्स या तीन सबसिडीअरीजचे कंपनीत मर्जर करायसाठी मंजुरी दिली.

जुलै-सप्टेंबर या तिमाहीत सुझुकीची विक्री ४०३४० कोटी येन एवढी झाली. कंपनीने ऑपरेटिंग प्रॉफिटचे अनुमान कायम ठेवले आहे पण वार्षिक विक्रीच्या अनुमानात ६% कपात केली आहे.

आज मेटल्स आणि IT सोडून सर्व सेक्टर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९९१९ NSE निर्देशांक निफ्टी १७८७३ बँक निफ्टी ३८५६० वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.