आजचं मार्केट – १२ November २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १२ November २०२१

आज क्रूड US $ ८३.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७४.२५ च्या आसपास होते . US $ निर्देशांक ९५.२५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.५७ VIX १५.३७ तर PCR १.०६ होते.US $ १६ महिन्यांच्या कमाल स्तरावर होते.

आज डिस्नी वर्ल्डचे निकाल कमजोर आले. TECH कंपन्यांचे शेअर्स वाढत होते. US मार्केटमध्ये चिनी कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती. रशिया युक्रेनवर हल्ला करण्याची शक्यता आहे.

आज NMDC, कोची शिपयार्ड (Rs ६ लाभांश), रेलटेल, PNB गिल्टस, फेडरल मुघल, हेल्थकेअर ग्लोबल, सनटेक रिअल्टी,पनामा पेट्रोकेमिकल्स, HBL पॉवर, INEOS, SMS फार्मा, मुर्डेश्वर सिरॅमिक्स( तोट्यातून फायद्यात), इन्सेक्टीसाईड इंडिया, SJVN ( उत्पन्न वाढले प्रॉफिट कमी झाले), वोडाफोन आयडिया ( तोटा कमी झाला, उत्पन्न वाढले), SML इसुझू ( तोटा कमी झाला, उत्पन्न वाढले) ABBOT इंडिया ( PIM वाढले), अलकेम लॅब ( प्रॉफिट, उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.), बजाज इलेक्ट्रिकल्स ( PI वाढले, मार्जिन कमी झाले) मॅक्स हेल्थकेअर ( प्रॉफिटमध्ये लक्षणीय वाढ, उत्पन्न वाढले) किरि इंडस्ट्रीज ( प्रॉफिट इन्कम वाढले), ऍकझो नोबल,रिट्स या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

ISGEC ( उत्पन्न वाढले, प्रॉफिट कमी) अवंती फीड्स ( उत्पन्न वाढले प्रॉफिट कमी झाले) , मदर्सन सुमी ( प्रॉफिट, इन्कम मार्जिन तिन्ही कमी झाले), ३M इंडिया (प्रॉफिट,मार्जिन कमी झाले, उत्पन्न वाढले), नोव्हार्टीस, JB केमिकल्स या कंपन्यांचे दुसर्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

टाटा स्टील या दिग्गज कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल लक्षणीयरीत्या चांगले आलं. उत्पन्न Rs ६०२८२ कोटी, प्रॉफिट १२५४७ कोटी ऑपरेटिंग मार्जिन २७.३% होते. कंपनीने सांगितले की आयर्न ओअरच्या किंमत कमी झाल्या आहेत पण कोकिंग कोलची किंमत मात्र वाढली आहे. कॉस्ट ऑफ प्रॉडक्शन वाढली आहे. भारतात सरकारचा इन्फ्रास्ट्रक्चर बांधणीवर जोर असल्याने स्टीलची मागणी वाढेल.

RBI ने रिटेल गुंतवणूकदारांसाठी थेट सरकारी कर्जरोखे खरेदी करण्यासाठी अकौंट उघडण्याच्या योजनेचे आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले. यामुळे फिक्स्ड इनकम आणि रिस्कफ्री गुंतवणुकीचा एक मार्ग किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला झाला.

‘स्मार्ट फ़ुड्झ’ हे टाटा कन्झ्युमर प्रोडक्टस टाटा इंडस्ट्रीजकडून Rs ३९५ कोटींना खरेदी करणार आहे.
‘गो फॅशन’ या कंपनीच्या IPO चा प्राईस बँड Rs ६५५ ते Rs ६९० आहे.मिनिमम लॉट २१ शेअर्सचा आहे.
लेटन्ट व्ह्यू अनॅलिटीक्स या कंपनीचा IPO ३२ वेळा भरला.

फिनो बँकेचे Rs ५४४ वर NSE वर तर BSE वर Rs ५४८ वर लिस्टिंग झाले.

आज मार्केट गॅपअप उघडले आणि निफ्टी १८००० चा टप्पा ओलांडून १८१०२ वर बंद झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६०६८६ NSE निर्देशांक निफ्टी १८१०२ बँक निफ्टी ३८७३३ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.