आजचं मार्केट – १५ November २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १५ November २०२१

आज क्रूड US $ ८१.७५ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७४.५० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९५.१० USA बॉण्ड यिल्ड १.५६ VIX १५.४४ आणि PCR १.१६ होते.

USA आणि यूरोपमधील मार्केट तेजीत होती. सोने आणि चांदी माफक मंदीत होती

जॉन्सन & जॉन्सन चे निकाल चांगले आले. शुक्रवारी निकाल चांगले आलेल्या कंपन्यांनी चांगला गायडन्स दिला. USA मध्ये तपमान वाढले तसेच USA ने आणलेल्या दबावामुळे क्रूडचा भाव कमी झाला. जपानचा GDP ग्रोथचा रेट ३% राहिला. FII नी ५११ कोटींची खरेदी केली DII नी सुद्धा खरेदी केलेली आढळून आली.

हिरो मोटोचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले. कंपनीला कॉस्टमधील वाढ पास ऑन करता आली.
ग्रासिम, भारत फोर्ज, अपोलो हॉस्पिटल्स, फोर्टीज हेल्थ केअर, थायरोकेअर, डॉनिअर, ONGC (निकाल चांगले Rs ५.५ प्रती शेअर अंतरिम लाभांश), नाल्को ( निकाल चांगले Rs २ प्रती शेअर अंतरिम लाभांश), Seamac, हिंदाल्को ( निकाल चांगले, सेमी कंडक्टरची टंचाई कमी झाली नॉवेलीसने क्षमता विस्तार केला), CCL, टाटा कॉफी यांचे निकाल (कॉफीच्या किमती ७ वर्षांच्या कमाल स्तरावर असल्यामुळे )चांगले आले. पित्ती इंजिनीअरिंग, TARC या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. प्रेस्टिजने फ्युचर गायडन्स चांगला दिला.

मन्नापुरम फायनान्स, कोल इंडिया, अशोक लेलँड, ग्रॅनुअल्स, विविमेड लॅब्स यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

IGL ने CNG ची किंमत Rs २.२८ प्रती किलोग्रॅम वाढवली.

मॅक्स व्हेंचरने स्पेशालिटी फिल्म मधील ५१% स्टेक Rs ६०० ते Rs ६५० कोटींना विकला. HCC या कंपनीला Rs १३१० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

आजपासून टॉर्सन्स प्रॉडक्टस चा IPO ओपन झाला. आज तीन शेअर्सचे लिस्टिंग झाले. पॉलिसी बाजार IPO किंमत Rs ९८० ह्या शेअरचे BSE आणि NSE दोन्हींवर Rs ११५० ला लिस्टिंग झाले. सिगाची इंडस्ट्रीज IPO प्राईस Rs १६३ ह्या कंपनीचे BSE वर Rs ५७५ तर NSE वर Rs ५७० वर लिस्टिंग झाले. SJS या कंपनीच्या IPO प्राईस Rs ५४२ होती, लिस्टिंग BSE वर Rs ५४० तर NSE Rs ५४२ वर लिस्टिंग झाले.

IRCTC १७०० गाड्या सुरु होतील. स्पेशल गाड्या ज्या कोरोनासाठी सुरु केल्या होत्या त्या बंद होतील.
आज ऑक्टोबर २०२१ महिन्यासाठी CPI ( CONSUMER प्राईस इंडेक्स) ४.४८ होता. हा सप्टेंबरपेक्षा जास्त असला तरी RBI च्या मर्यादेत असल्यामूळे RBI ला आपली पॉलिसी चालू ठेवता येईल.

सप्टेंबर २०२१ या महिन्यासाठी IIP ३.१ होते ( ऑगस्टमध्ये ११.९६ होते.). अवकाळी पावसामुळे आलेले पूर तसेच ऑटो इंडस्ट्रीला भेडसावणारी सेमी कंडक्टर चिपची टंचाई अशी काही कारणे आहेत.

मिर्झा इंटरनॅशनल चा डोमेस्टिक बिझिनेस वेगळा काढून त्यांची एक नवीन कंपनी फॉर्म केली जाईल. शेअरहोल्डर्सना या नवीन कंपनीचा १ शेअर त्यांच्याकडे असलेल्या १ शेअर्ससाठी दिला जाईल.

ऑक्टोबर २०२१ या महिन्यासाठी होलसेल प्राईस इंडेक्स १२.८४ होते.

आज मार्केटमध्ये ऑटो मेटल क्षेत्रात प्रॉफिट बुकिंग झाले. एक्स्चेंज संबंधित शेअर्स म्हणजे CDSL, MCX, BSE, IEX यांचे शेअर्स तेजीत होते. आज गुंतवणूकदारांनी संरक्षणात्मक पवित्रा घेतल्यामुळे फार्मा आणि हॉस्पिटल्स चे शेअर्स तेजीत होते. ( बायोकॉन, सिंजीन, अपोलो हॉस्पिटल्स, इंद्रप्रस्थ मेडिकल्स, फोर्टीज हेल्थकेअर, नारायण हृदयालय, थायरोकेअर, मॅक्स हेल्थ, इत्यादी

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६०७१८ NSE निर्देशांक निफ्टी १८१०९ बँक निफ्टी ३८७०२ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.