आजचं मार्केट – १६ November २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १६ November २०२१

आज क्रूड US $ ८२.४० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७४.३५ च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९५.५२ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.६१ VIX १५.४४ आणि PCR ०.९७ होते.

आज US $ निर्देशांक १६ महिन्याच्या कमाल स्तरावर होते. मार्केट सेंटीमेंट चांगले होते पण त्याला साजेसा डेटा नव्हता. FII ने Rs ४०० ते ४५० कोटींची तर डोमेस्टिक संस्थागत गुंतवणूकदारांनी Rs १५००- Rs १५२५ कोटीची खरेदी केली.

एस्कॉर्टस २१ नोव्हेंबर २०२१ पासून सर्व ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याच्या व्हरायंट्सच्या किमती वाढवणार आहेत. अशियन पेंट्स ५ डिसेंबर २०२१ पासून पेन्ट्सच्या किमती ४%-६% किमती वाढवणार आहे. १२ नोव्हेम्बरपासून कंपनीने ८% ते ९% ने किमती वाढवल्या होत्या. म्हणजे एकूण आतापर्यंत कंपनीने १२% ते १५% किमती वाढवल्या.

इंडियन हॉटेल्स( पर्यंटन क्षेत्र), इंडिगो ( हवाई वाहतूक क्षेत्र) या दोन क्षेत्रांमध्ये तेजी होती. भारताने ९९ देशातील लोकांसाठी व्हिसाचे नियम सोपे केले. क्वारंटाईनची तरतूद काढून टाकली.

डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी निर्देशांकात सिप्ला या कंपनीचा समावेश करण्यात आला.

UK मध्ये साखरेच्या किमती ४ वर्षांच्या कमाल स्तरावर आहेत.

AMFI च्या (असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया)PI इंडस्ट्रीज SRF, झोमॅटो आणि IRCTC, NYAKAA आणि पॉलिसी बाजार या कंपन्यांचा लार्ज कॅप मध्ये अर्धवार्षिक रिव्ह्यू मध्ये समावेश होण्याची शक्यता आहे.

युरोप आणि एशियामध्ये बर्ड फ्लूची साथ आली आहे. हेस्टर बायोटेक ही कंपनी या रोगावर व्हॅक्सिन बनवते.

EPL आता विकोसाठी सस्टेनेबल प्लॅटिना ट्यूब (रिसायक्लेबल) पॅकेजिंग बनवणार आहे.

कोफोर्ज ही कंपनी ADR ( अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट) रुटने USA मध्ये लिस्टिंग करणार आहे.बेअरिंग PE आशिया त्यांचा काही स्टेक विकणार आहे. पण इन्फोसिस आणि ICICI याच मार्गाने लिस्ट झाले. वेदान्त आणि व्हिडिओकॉन डीलीस्ट झाले.

PVR या कंपनीची सिनेमागृहे ५०% राज्यांमध्ये १००% क्षमतेने सुरु झाली आहेत.

प्रेस्टिज, MARRIOT, आणि DB रिअल्टी ह्या तीन कंपन्या मिळून दिल्लीमध्ये २ हॉटेल्स लाँच करणार आहेत.

आज अशी बातमी आली की सेमी कंडक्टर चिपची टंचाई आता हळूहळू कमी होत आहे. या बातमीनंतर ऑटो आणि ऑटो अँसिलिअरी क्षेत्रामधील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली. यामध्ये लुमॅक्स ऑटो, VARROC इंजिनीअरिंग, भारत गिअर्स, NRB बेअरिंग्स, ईगारशी मोटर्स, मदर्सन सुमी, भारत फोर्ज, BOSCH, महिंद्रा CIE, सोना BLW, ओमॅक्स ऑटो, राणे इंजिन, ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग, गॅब्रिएल, तालब्रोस यांचा समावेश आहे.

टिनप्लेट, आणि व्हा टेक व्हा बाग, रुची सोया यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

व्हाईट पिगमेंट टिटॅनियम डायॉकसाईडच्या नवीन प्रकारात मेघमनी ऑर्गनिक्स उतरत आहे. गुजरातमधील दहेज या केमिकल हबमध्ये Rs ४०० कोटी खर्च करून ३३००० मेट्रिक टन क्षमतेचा प्लान्ट उभारणार आहेत.

Paytm च्या शेअरचे लिस्टिंग १८ नोव्हेंबर २०२१ रोजी होईल.

आज बँकिंग, फार्मा, सिमेंट सेक्टरमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. एव्हिएशन, पर्यटन, मेडिया, ऑटो आणि ऑटो अँसिलिअरीज आणि व्हाईट गुड्स बनवणार्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६०३२२ NSE निर्देशांक निफ्टी १७९९९ आणि बँक निफ्टी ३८३०७ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.