आजचं मार्केट – १८ November २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १८ November २०२१

आज क्रूड US $ ८०.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७४.०० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९५.७८ USA १० वर्ष बॉण्ड यिल्ड १.५९ VIX १४.८५ आणि PCR ०.६५ होते.

USA मधील मार्केट्स मध्ये दबाव होता. युरोप आणि चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव आढळल्याने क्रूडसाठी मागणी कमी झाली. त्यामुळे क्रूडचा दर प्रती बॅरल US $ ८० च्या जवळपास आला. यूरोपमधील मार्केट्स तेजीत होती.
‘BHEL’ ने युक्रेनच्या कंपनीबरोबर मरीन इक्विपमेंट पुरवण्यासाठी करार केला.

बाल्टिक ड्राय इंडेक्स कमी होऊ लागले आहे. मेटलला मागणी कमी झाली याचा फायदा आणि क्रूड स्वस्त झालेल्याचा फायदा ऑईलपेंट कंपन्यांना होईल.

आज Paytm च्या शेअर्सचे लिस्टिंग NSE वर Rs १९५० आणि BSE वर Rs १९५५ वर झाले. IPO मध्ये हा शेअर Rs २१५० ला दिला असल्यामुळे ज्यांना शेअर अलॉट झाले त्यांना ते आज फायद्यात विकता आले नाहीत.

सफायर रेस्टारंट या कंपनीचे शेअर्स NSE वर Rs १३५० तर BSE वर Rs १३११ वर लिस्ट झाले.( IPO मध्ये Rs ११५० या भावाने शेअर दिले होते.) ज्यांना शेअर्स अलॉट झाले त्यांना माफक लिस्टिंग गेन झाला.

सिमेंट आणि बिल्डिंग मटेरियल्स, स्टील यासाठीची मागणी हिमवर्षाव होत असलेल्या ठिकाणी बांधकाम होत नसल्यामुळे कमी झाली.

हिंदुस्थान झिंक या कंपनीने ‘हिंदुस्थान झिंक अलॉईज’ या नावाने राजस्थानमध्ये सबसिडीअरी लाँच केली.

सुप्रीम कोर्टाने सरकारला त्यांचा हिंदुस्थान झिंक या कंपनीतील स्टेक विकण्यासाठी परवानगी दिली.

वेदांताने त्यांच्या आयर्न & स्टील, ऑइल&गॅस ,आणि अल्युमिनियम या प्रॉडक्टस डिव्हिजन वेगळ्या काढून त्या कंपन्यांचे लिस्टिंग करण्याची योजना जाहीर केली. कंपनीचे म्हणणे असे की यामुळे व्हॅल्यू अनलॉकिंग होऊन शेअरहोल्डर्सचा फायदा होईल.आणि कॉर्पोरेट स्ट्रक्चर सोपे आणि सरळ होईल. ओरिजिनल कंपनीकडे कॉपर स्मेल्टिंग, पॉवर आणि झिंक हे बिझिनेस राहतील. शेअरहोल्डिंगच्या प्रमाणात काही बदल होणार नाही. पण मार्केटने मात्र या त्यांच्या योजनेत जास्त स्वारस्य दाखवले नाही. त्यामुळे आज हा शेअर पडला.

जपानची ट्रॅक्टर्स बनवणारी कंपनी ‘कुबोटा’ ही एस्कॉर्टसमध्ये कंट्रोलिंग स्टेक घेणार आहे. कुबोटाचा आता एस्कॉर्टसमध्ये ९% स्टेक आहे आणि नंदा फॅमिलीचा ३६% स्टेक सप्टेंबर २०२१ च्या रेकॉर्ड प्रमाणे आहे. हा स्टेक ५३.५% पर्यंत वाढवण्याचा कुबोटाचा विचार आहे. कुबोटा Rs १८७० कोटींची गुंतवणूक करेल आणि एस्कॉर्टस Rs २००० प्रती शेअर या दराने कुबोटाला प्रेफरन्स शेअर्स इशू करेल त्यानंतर कुबोटा Rs २००० प्रती शेअर या भावाने २६% साठी ओपन ऑफर आणेल. यामुळे त्यांचा स्टेक ४४.८०% एवढा होईल. नंदा फॅमिलीकडे ११.६% एवढा स्टेक राहील. मार्च २०२२ पर्यंत ही प्रक्रिया पुरी होईल. नंतर एस्कॉर्टसचे नाव एस्कॉर्टस कुबोटा लिमिटेड असे होईल.अशा पद्धतीने इंडोजपान ऍग्रिकल्चरल कोलॅबोरेशन होईल.

गो फॅशनचा IPO एकूण ३ वेळेला ( रिटेल गुंतवणूकदारांसाठी कोटा १५ वेळेला) ओव्हरसबस्क्राईब झाला

झोमॅटो US $ ५०० मिलियनची ग्रोफर्स मध्ये गुंतवणूक करणार आहे.

टाटा मोटर्स व्हेईकल स्क्रॅपेज सेंटर स्थापन करणार आहे.

RBL बँकेला डायरेक्ट टॅक्स कलेक्शनसाठी RBI ने मंजुरी दिली.

कॅडिलाची सबसिडीअरी झायडस कॅडिलाला कँसरसंबंधी ‘Nelarabine’ इंजेक्शनच्या USA मध्ये मार्केटिंगचे एक्स्ल्युझिव्ह राईट्स १८० दिवसांकरता मिळाले.

GMR इंफ्राच्या सब्सिडिअरीला इंडोनेशियातील KUALANAMU आंतरराष्ट्रीय विमानतळ डेव्हलप आणि ऑपरेट करण्याचे हक्क मिळाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९६३६ NSE निर्देशांक निफ्टी १७७६४ बँक निफ्टी ३७९७६ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.