आजचं मार्केट – २२ November २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २२ November २०२१

आज क्रूड US $ ७८.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US #१= Rs ७४.२५ च्या आसपास होते. US $ इंडेक्स ९६.१३ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.५७ VIX १६.५०च्या आसपास तर PCR ०.५० होते.

गो फॅशनचा IPO आतापर्यंत १३५ वेळाओव्हरसब्सक्राइबड झाला.

आज USA मधील मार्केटमध्ये.मंदी होती यूरोपमधील काही देशात कोरोना पुम्हा डोके वर काढीत आहे . त्यामुळे ऑस्ट्रियासारखे काही देश लॉकडाऊन जाहीर करण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारने इंपोर्टेड मद्यार्कावरील एकसाईज ड्युटी ५०% ने कमी केली. यामुळे युनायटेड स्पिरिट्स, राडिको खेतान या शेअर्समध्ये तेजी येण्याचा संभव आहे.

सरकारने सांगितले की गारमेंट्स, फूटवेअर यावरील GST चा दर १ जानेवारी २०२२ पासून ५% वरून १२ % केला जाईल. २७ नोव्हेम्बर २०२१ ला होणाऱ्या GST कॉऊन्सिलच्या मीटिंग मध्ये १२% आणि १८% या दोन दराऐवजी १६% हा एकच दर ठेवण्याच्या शक्यतेवर विचार केला जाईल. तसेच आणखी काही वस्तू सेवा GST अंतर्गत आणता येतील का ही शक्यता अजमावली जाईल. पण मार्केटने असा कयास बांधला की बहुतेक वस्तू आणि सेवांवरही GST च्या दरात वाढ होईल.

MTNL आणि BSNL च्या प्रत्येकी ६ मालमत्तासाठी ( नॉन कोअर ऍसेट्स) सरकारने बीड्स मागवल्या आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या O2C( ‘ऑइल टू केमिकल्स’) बिझिनेसमध्ये आरामको २०% स्टेक खरेदी करणार होती. पण दोन्ही कंपन्यांनी हा करार रद्द केला. त्यामुळे रिलायन्सच्या बॅलन्सशीटवर परिणाम होणार नाही. NCLT मध्ये O2C बिझिनेस वेगळा करण्यासाठी जो अर्ज रिलायन्सने दिला होता तो मागे घेतला.

भारती एअरटेलने त्यांचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला. कंपनीने ARPUJ Rs २०० करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामुळे भारती एअरटेल, VI या शेअर्समध्ये तेजी होती.

१७ डिसेम्बरपासून FTSE इंडिया निर्देशांकात मॅक्रोटेक डेव्हलपर्स ( लोढा), झोमॅटो, सोना BLW, यांचा समावेश होईल. यामुळे झोमॅटोमध्ये US $६५ मिलियन, लोढामध्ये US $ १९ मिलियन ,आणि सोना BLW मध्ये US $ २३ मिलियनची गुंतवणूक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

PAYtm चे MTU ( मंथली ट्रान्झॅक्टिंग यूजर्स) ऑक्टोबरमध्ये ६३ मिलियन होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ही संख्या ४७ मिलियन होती.

GMV ( ग्रॉस मर्चन्डाईझ व्हॅल्यू) म्हणजेच कंपनी प्लॅटफॉर्मवरून मर्चंटस्ना केलेल्या पेमेंट्सची रक्कम. ही रक्कम १३१%ने वाढली.

BEL या कंपनीला AIRBUS या कंपनीकडून त्यांच्या C -२९५ या विमानांसाठी डिफेन्स इन्स्ट्रुमेंट्स पुरवण्यासाठी मोठी ऑर्डर मिळाली.

आज जागतिक मार्केट्समधील ट्रेंडचा प्रभाव भारतीय मार्केट्सवर पडला. USA मध्ये वाढनारी महागाई, यूरोपमध्ये पुन्हा डोके वर काढत असलेला कोरोना, GST रॅशनलायझेशनमध्ये दरवाढ होईल आणि आणखी काही वस्तू सेवा GST अंतर्गत आणल्या जातील ही शक्यता, आणि PAYtm चे निराशादायी लिस्टिंग या सगळ्याचा मार्केटमधील सेंटीमेंट्वर प्रतिकूल परिणाम झाला आणि त्यामुळे आज सर्व क्षेत्रात, सर्व प्रकारच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. मार्केट सुरुवातीपासून शेवटपर्यंत पडतच राहिले. त्यात बँक निफ्टीचा मोठा वाटा होता. क्रूडचे दर कमी झाल्यामुळे पेंट्स उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती. स्पेशालिटी केमिकल्सचे उत्पादन करणाऱ्या शेअर्समध्ये मंदी होती. थरमॅक्स या कंपनीच्या शेअरमध्येही दुसऱ्या तिमाहीच्या चांगल्या निकालामुळे तेजी होती.

आज सेन्सेक्स इंट्राडे लो ५८०११ होते आणि इंट्राडे हाय ५९७७८ होते.निफ्टी इंट्राडे हाय १७८०५ आणि इंट्राडे लो १७२८० होता

आज BSE निर्देशांक सेन्सेक्स ५८४६५ NSE निर्देशांक निफ्टी १७४१६ बँक निफ्टी ३७१२८ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.