आजचं मार्केट – २३ November २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २३ November २०२१

आज क्रूड US $ ७९.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७४.५० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९६.४६ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.६३ VIX १९.३४ तर PCR ०.६७ होते.

आज NASHDAQ कमजोर तर डाऊ जोन्समध्ये मामुली तेजी होती. टेक शेअर्सच्या पुढाकाराने मंदीने मार्केटमध्ये प्रवेश केला. FII नी Rs ३४०० कोटींची विक्री भारतीय मार्केटमध्ये केली.USA चे अध्यक्ष बिडेन यांनी फेडचे अध्यक्ष JEROME POWEL यांची दुसऱ्या टर्मसाठी फेडचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केली.या बातमीने मार्केटमध्ये तेजी आली कारण मार्केटला स्थैर्य आवड़ते. पण टायटनिंग पॉलिसी अमलात आणण्याची त्वरा केली जाईल या बातमीने मार्केटमध्ये मंदी आली. युरोप आणि USA मध्ये कोरोना वाढतो आहे. ऑस्ट्रियाचे सरकार लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत आहे तर जर्मनीच्या चॅन्सेलरने जनतेला निर्वाणीचा इशारा दिला आहे. रशिया युक्रेनवर हल्ला करण्याच्या मनःस्थितीत आहे.

भारत सरकारने इमर्जन्सी स्टॉक मधून ५ मिलियन बॅरल प्रती दिवस क्रूड ऑइल बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच रोज ५० लाख बॅरल्स.! USA, रशिया या देशांनी या बाबतीत असेच धोरण राबवायचे ठरवण्याची शक्यता आहे.

वेदांताचे प्रमोटर्स १७ कोटी शेअर्स Rs ३५० प्रती शेअर या भावाने विकत घेऊन आपला स्टेक ४.४७% ने वाढवणार आहे.
भारती एअरटेलच्या सब्सक्राइबर्समध्ये २.७ लाखांची वाढ झाली तर ‘VI’ ने १०.८ लाख सब्सक्रायबर्स गमावले.

लॅटेन्ट व्हू ऍनालीटीक्स या कंपनीच्या शेअर्सचे NSE वर Rs ५१२.०० वर आणि BSE वर Rs ५३० वर लिस्टिंग झाले IPO मध्ये हा शेअर Rs १९७ ला दिला होता.

ASTRAL पॉलीच्या अहमदाबाद ऑफिसवर आयकर विभागाची धाड पडली.

रेमंड त्यांच्या व्यवसायाचे रिस्ट्रक्चरिंग करणार आहे.

IRCON ला रेल्वे सिग्नल प्रोजेक्टसाठी श्री लंका आणि बंगला देश येथून ऑर्डर मिळाली.

स्पाईसजेट त्यांचा कार्गो वाहतुकीचा बिझिनेस विकणार आहेत. त्यांना Rs १०००० कोटी मिळतील अशी शक्यता आहे. स्पाईस जेट या कंपनीची १३ बोईंग ७३७ मॅक्स विमाने १५ ते २० दिवसांत ऑपरेशनल होतील.

IPCA लॅब या कंपनीने लायका लॅब या कंपनीचे १० लाख शेअर्स खरेदी केले.

इंडियन मेटल ही कंपनी शुक्रवार तारीख २६ नोव्हेंबर २०२१ रोजी बोनस शेअर्स इशू करण्यावर विचार करेल.

IRCTC नववर्ष आणि नाताळसाठी स्पेशल ट्रेन्स चालवणार आहे. आता गाड्यांमध्ये गरमागरम जेवण आणि नाश्ता पुरवला जाईल. टुरिझम आणि भारत गौरव ट्रेन्स चालू केल्या जातील.

मारुती ही ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी बरीच ऑटो स्क्रॅपिंग युनिट्स लाँच करणार आहे. या संबंधात फिटनेस पॉलिसी महत्वाची आहे.

ग्रीव्हज कॉटन या कंपनीने तामिळनाडू या राज्यात राणीपेठ येथे इलेक्ट्रिकल व्हेईकल मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी सुरु केली.
CAMS या कंपनीच्या वेबसाईटवर रोज २१ लाख ग्राहकांना सेवा पुरवली जाते. SIP रजिस्ट्रेशन नवा स्तर गाठत आहे. NFO मधून Rs ३०००० कोटीं AUM चा टप्पा पार केला. ८५% ग्राहक ON लाईन सेवेचा फायदा घेतात.

TVS मोटर्स ४ वर्षात Rs १२०० कोटींची गुंतवणूक फ्युचर टेक क्षेत्रात इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी करेल. या साठी कंपनीने तामिळनाडू राज्य सरकार बरोबर MOU केले.

O टू C सेगमेंटसंबंधात घेतलेल्या निर्णयामुळे किंवा स्टेकच्या रिव्हॅल्युएशनमुळे रिलायन्स या कंपनीच्या क्रेडिट गुणवत्तेत काही फरक पडणार नाही.असे तद्न्यांचे मत आहे.

भारती एअरटेलने चेन्नई येथे डेटा सेंटर लाँच केले.

भारतीय रेल्वे ११ स्टेशनांचे वर्ल्ड क्लास नूतनीकरण करणार आहे . यात जम्मू, चंदिगढ ग्वालियर, सोमनाथ, फरिदाबाद इत्यादींचा समावेश आहे. या साठी Rs १२००० कोटीची EPC ( इंजिनीअरिंग प्रोक्युअरमेंट आणि कन्स्ट्रक्शन) योजनेअंतर्गत तरतूद केली आहे.

आज मार्केटमध्ये जबरदस्त वोलतालीटी होती. कालच्या मार्केट पडण्याएवढीच जबरदस्त उसळी आज मार्केटने मारली. आज मार्केटमध्ये सर्व क्षेत्रात खरेदी झाली. ऍडव्हान्स डिक्लाईन रेशियो ऍडव्हान्स होत असलेल्या शेअर्सच्या बाजूने निर्णायक रित्या गेला. त्यामुळे आज झालेल्या लिस्टिंगलाही गुंतवणूकदारांनी भरघोस पाठिंबा दिला. मार्केटमधील आजची उलाढाल ही दोन दिवसांवर आलेल्या F & O च्या एक्स्पायरीची जणू काही नांदी होती. आज टू व्हीलर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स पडले कारण नोव्हेम्बरमध्ये उत्पादनात ३५% कपात करावी लागणार आहे. कारण टू व्हिलर्ससाठी सणासुदीचा मोसम फारसा लाभदायक ठरला नाही त्यामुळे डीलर्स आणि उत्पादकांकडे इन्व्हेंटरी पडून आहे.
आज बँक निफ्टी मधील सर्व सरकारी बँका तसेच मेटलसंबंधीत शेअर्स तेजीत होते.

CCA ने मारुती या कंपनीला Rs २०० कोटींचा दंड केला होता. याला NCLAT या अपीलेट ऑथॉरिटीने स्टे दिला. पण NCLAT ने सांगितले की तीन आठवड्याच्या आत मारुतीने १०% रक्कम जमा केली पाहिजे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५८६६४ NSE निर्देशांक निफ्टी १७५०३ बँक निफ्टी ३७२७२ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.