आजचं मार्केट – २४ November २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २४ November २०२१

आज क्रूड US $ ८२.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ७४.५० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९६.६० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.६७ VIX १६.७० आणि PCR ०.५९ होते.

ओपेक+ची २ डिसेंबर २०२१ रोजी बैठक आहे. USA, चीन आणि जपान हे SPR मधून क्रूडचा पुरवठा करेल. SPV मध्ये ९० दिवसांसाठी लागणाऱ्या क्रूडचा साठा केलेला असतो. USA ची फेड लवकरच आणि बँक ऑफ इंग्लंड डिसेम्बरमध्ये व्याजाचे दर वाढवण्याची शक्यता आहे.

आज सोने आणि चांदीमध्ये माफक तेजी होती. US $ १८००च्या खाली किमती आल्या. भारतामध्ये सोन्यावर GST लावण्याचा विचार चालू आहे.

गुजरात सिद्धी सिमेंट आणि सौराष्ट्र सिमेंट यांचे मर्जर होण्याची शक्यता आहे.

सोडा ASH च्या किमती वाढल्या आहेत. GHCL त्यांचा टेक्सटाईल विभाग वेगळा काढणार आहे.

TVS श्रीचक्र चा दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

अलीकडे नव्याने लिस्ट झालेले शेअर्स तेजीत होते. उदा NYAKAA, Paytm, फिनो बँक सिगाची इंडस्ट्री P.B. फिनटेक इत्यादी.

कोल इंडिया या कंपनीची अंतरिम लाभांशावर विचार करण्यासाठी २९ नोव्हेंबर २०२१ रोजी बैठक आहे.

AGR संबंधित मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यासाठी सरकारने एका IMG ( इंटर मिनिस्टरीयल ग्रुप) ची स्थापना केली आहे. ही कमिटी १५ डिसेंबरपर्यंत त्यांचा रिपोर्ट सादर करणार आहे. हाथवे केबलकडे डॉटने Rs ६००० कोटींची मागणी केली. केबल टी व्ही आणि MSO ऑपरेटर्ससाठी काही सवलती मिळण्याची शक्यता आहे.

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत २ बँकांचे खाजगीकरण, बँकिंग कंपनीज ऍक्ट १९७० आणि १९८० यात बदल करण्यासाठी बिल आणण्यावर विचार होण्याची शक्यता आहे. IOB आणि सेंट्रल बँक या दोन बँकात सर्वप्रथम खाजगीकरण केले जाईल.

सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवली.

सरकारने ३०३ मेट्रिक टन साखरेच्या निर्यातीला परवानगी दिली म्हणून साखरेचे शेअर्स वर होते

सरकार ‘उडान’ योजनेअंतर्गत ५० नवीन रूट सुरु करणार आहे. असे स्पाईस जेट या कंपनीने सांगितले.

घरेलू गॅसच्या किमती ऑक्टोबर २०२२ पर्यंत US $ १० ONGC करेल आणि ऑइल इंडिया एप्रिल २०२२ पर्यंत US $ ७ एवढी करेल.

हिवाळी अधिवेशनात ऑफिशियल क्रेप्टो करन्सी CBCC ( सेंट्रल बँक क्रेप्टो करन्सी) आणि क्रेप्टो करंसीच्या रेग्युलेशन साठी बिल आणले जाईल.

अडाणी विल्मर या कंपनीचा IPO लवकरच मार्केटमध्ये येईल. ही अडाणी ग्रुपची लिस्टिंग होणारी ७ वी कंपनी आहे. हा IPO Rs ४५०० कोटींचा असेल. ही FMCG कंपनी आहे. ‘FORTUNE’ या नावाने तिचा लोकप्रिय ब्रँड आहे. या कंपनीचा मार्केट शेअर २०% आहे. या कंपनीची ४० मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स असून रिफायनिंग क्षमता १६००० टन एवढी आहे. कॅस्टर ऑइल, ओलेओकेमिकल्स, चे उत्पादन करते. सर्वप्रकारची ऑईल्स म्हणजे सोयाबीन, ऑइल, पाम ऑइल, सनफ्लॉवर ऑइल, राईस ब्रॅन ऑइल, मस्टर्ड ऑइल, ग्राउंडनट ऑइल, कॉटनसीड ऑइल, ब्लेंडेड ऑइल आणि वनस्पतीचे उत्पादन करतात. अडाणी वूल्मर हे एक जानेवारी १९९९ मध्ये स्थापन झालेले JV आहे. अडाणी ग्रुप आणि विल्मर इंटरनॅशनल सिंगापूर (ऍग्री बिझिनेस ग्रुप) यांचे JV आहे. चीन इंडिया इंडोनेशिया अशा ३० देशात डिस्ट्रिब्युशन नेटवर्क आहे.
बासमती तांदूळ, पल्सेस, सोया चंक, बेसन, फॉर्च्युन चक्की फ्रेश आटा, फॉर्च्युन, किंग’स, बुलेट, राग, अवसर, पिलाफ, ज्युबिली, फ्रयोला, अल्फा, आधार या ब्रॅंडनेमखाली काम करतात.

लवकरच स्टार हेल्थ इन्शुअरन्स कंपनी या खासगी क्षेत्रातील हेल्थ इन्शुअरन्स क्षेत्रातील पहिल्या नंबरच्या कंपनीचा IPO येत आहे. ही कंपनी रिटेल हेल्थ इन्शुअरन्सवर लक्ष केंद्रित करते.आणि तिचा ३०% मार्केट शेअर आहे. या कंपनीचे ११००० हॉस्पिटल्सबरोबर टायअप आहेत. ५ लाख एजंट्सचे नेटवर्क या कंपनीसाठी काम करतात.कंपनीचा एजन्सी मॉडेलवर भर आहे. कंपनीने काही मोठ्या बँकांबरोबर त्यांच्या ग्राहक आणि कर्मचाऱ्यांसाठी टायअप केले आहे. ६४० शाखा आणि १२८०० कर्मचारी या कंपनीचे आहेत. कंपनीने आतापर्यंत ४३ लाख पॉलिसीज दिल्या आहेतकंपनीने रिटेल कस्टमर्सच्या गरजा लक्षात घेऊन विविध मेडिकल हेल्थ इन्शुअरन्स प्लान्स तयार केले आहेत. तसेच मोबाईल ऍप लाँच केले आहे या मोबाईल ऍप वरून ग्राहकांना पॉलिसीची निवड, एजंटशी संपर्क तसेच क्लेमसाठी अर्ज करणे सोपे जाते. या कंपनीचा
बीझीनेस आता मेट्रो, अर्बन आणि सेमी अर्बन क्षेत्रात आहे. आता कंपनी ग्रामीण क्षेत्रात आपल्या बिझिनेसचा विस्तार करत आहे. हा IPO ३० नोव्हेम्बर २०२१ ला ओपन होऊन २ डिसेम्बर २०२१ ला बंद होईल. शेअरची दर्शनी किंमत Rs १० आहे. प्राईस बँड Rs ८७० ते Rs ९०० असेल. मिनिमम लॉट १६ शेअर्सचा असेल. या IPO मध्ये फ्रेश इशू Rs २००० कोटींचा आणि ५८.३२ मिलियन शेअर्सची ओपन ऑफर असेल. हा शेअर १० डिसेंबर २०२१ रोजी लिस्ट होण्याची शक्यता आहे.

आज पॉवर आणि बँकिंग क्षेत्रातीलआणि अलीकडे नवीन लिस्टिंग झालेले शेअर्स तेजीत होते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५८३४० NSE निर्देशांक निफ्टी १७४१५ बँक निफ्टी ३७४४१ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.