आजचं मार्केट – २५ November २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २५ November २०२१

आज क्रूड US $ ८२.२५ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७४.५० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९६.८४ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.६४ VIX १६.६० तर PCR ०.७९ होते.

USA मध्ये जॉबलेस क्लेम्स ७१००० ने कमी झाले गुणवत्ता सुधारली.

डिक्सन या कंपनीने तैवान मधील IT हार्डवेअर उत्पादक ACER बरोबर ५ लाख लॅपटॉप उत्पादनासाठी करार केला
INS वेला ही सबमरीन नेव्हीमध्ये समाविष्ट केली जाईल. याचा फायदा माझगाव डॉकला होईल.

KPR मिल्स ने तामिळनाडूमध्ये चेंगापल्ली येथे फॅक्टरी सुरू केली.

ICRA ने होम फर्स्ट फायनान्स कंपनीचे लॉन्ग टर्म आऊटलूक ICRAA + स्टेबल वरून ICRA A +पॉझिटिव्ह केला.
वेदांताच्या प्रमोटर्सनी ६५.१८% स्टेक तारण म्हणून ठेवला.

कोळशाची आयात १२.६% ने वाढली १०७३.४० कोटी टन एवढी झाली. याचा फायदा कोळसा आयातक्षेत्रात काम करणाऱ्या अनमोल या कंपनीला होईल.

IPCA लॅब लायका लॅबमध्ये २६.५% स्टेक खरेदी करेल.

सीमेन्स या कंपनीचा वार्षिक निकाल चांगला आला. उत्पन्न वाढले पण कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे प्रॉफिट आणि मार्जिन कमी झाले. कंपनीने Rs ८ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

LIC ने ग्रासिममधील स्टेक २.०२% ने कमी केला. आता LIC चा ग्रासिममध्ये स्टेक ९.८३% असेल.

टाटा स्टीलने खोंडबंद या ओडिशातील ठिकाणी मँगेनीज आणि आयर्न ओअर क्रशिंग आणि वॉशिंग प्लांट सुरु केले.

रिलायन्स त्यांचा गॅसिफिकेशन प्लांट डीमर्ज करून त्याची वेगळी सबसिडीअरी बनवणार. या सबसिडीअरीमध्ये गुंतवणूक घेतली जाईल

TTK प्रेस्टिज ही कंपनी अल्ट्राफ्रेश मॉड्युलर सोल्युशन्समध्ये ५१% स्टेक घेणार आहे.

ITC ने सांगितले की कोविड प्रतिबंधक NASAL स्प्रे च्या क्लिनिकल ट्रायल्स सुरु असून लवकरच मार्केटमध्ये लाँच करू.
IOC ने सरकारला Rs २४२४ कोटी एवढा लाभांश दिला.

HUL आणि ITC या दोन कंपन्यांनी साबण आणि डिटर्जन्टसच्या किमतीत ५% ते १०% वाढ केली. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आम्हाला किमती वाढवाव्या लागत आहेत असे सांगितले.

इन्फो एज या कंपनीने ग्रे टीप सॉफ्टवेअर या कंपनीमध्ये Rs ३० कोटींची गुंतवणूक केली.

आज डिसेंबर महिन्यासाठी काँट्रॅक्टस खालीलप्रमाणे रोलओव्हर झाली

ग्रासिम ९१% अडाणी पोर्ट ९०% सन फार्मा ८९% JSW स्टील ८८% नेस्ले ८७% टाटा मोटर्स, UPL ८४% अशियन पेंट्स आणि मारुती ८३% ब्रिटानिया ८२%

आज एकहाती रिलायन्सने मार्केट सावरले आणि त्यामुळे पूर्ण दिवस मार्केट तेजीत राहिले.

आज फार्मा क्षेत्रातल्या कंपन्यांचे शेअर्स विशेषतः GSK फार्मा आणि टॉरंट फार्मा तेजीत होते.

सेंट्रल बँक ३१ डिसेंबर २०२१ नंतर PCA मधून बाहेर येईल अशी शक्यता आहे.

मुक्ता आर्ट्स ९ नवे स्क्रीन ओपन करणार आहे.

साऊथ ३२ या कंपनीने टी सी एस ची IT ऑपरेटिंग मॉडेल वाढवण्यासाठी आणि त्यांच्या जागतिक ऑपरेशनसाठी आवश्यक असलेल्या अप्लिकेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेवा पुरवण्यासाठी करार केला.

JSW एनर्जी ग्रीन( रिन्यूएबल एनर्जी) आणि ग्रे (थर्मल) बिझिनेसेसचे रिऑर्गनायझेशन करणार आहे. रिन्यूएबल एनर्जी बिझिनेस JSW एनर्जी निओ लिमिटेड पाहिल.

सरकारने गोल्ड ज्युवेलरीवरील GST ३% वरून ५% करण्याचा प्रस्ताव केला आहे.

गोल्डीयम इंटरनॅशनलचा टेंडर ऑफर रूटने Rs १२०० प्रती शेअर या भावाने बायबॅक २६ नोव्हेम्बरला ओपन होऊन ९ डिसेंबर २०२१ ला बंद होईल

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५८७९५ NSE निर्देशांक निफ्टी १७५३६ बँक निफ्टी ३७३६४ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.