आजचं मार्केट – २६ November २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २६ November २०२१

आज क्रूड US $ ७९.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ७४.७५ च्या आसपास होते.US $ निर्देशांक ९६.७५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.६० VIX २०.२४ तर PCR १.३३ होते.

काल USA ची मार्केट्स थॅंक्सगिविंगच्या सुट्टीसाठी बंद होती. आणि आज अर्धा दिवस ओपन असतील.

युरोप आणि USA मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच आता इझरेल आणि दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोट्स्वाना या देशांमध्ये कोरोनाचा बी.१.१.५२९ हा नवा व्हरायन्ट आढळला आहे आणि तज्ञाचे मते हा व्हरायन्ट फार जलद गतीने संसर्ग पसरवत आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेशी इतर देशांनी संपर्क बंद केला गोल्डमन साखसचे म्हणणे आहे की USA मध्ये फेड लवकरच बॉण्ड खरेदीचे टेंपरिंग करेल आणि व्याजाचे दरसुद्धा वाढविण्याची शक्यता आहे.

जानेवारीपासून( ३१ डिसेंबर २०२१) AB कॅपिटल आणि हनीवेल ऑटोमेशन हे दोन शेअर्स F & O सेगमेंटमध्ये समाविष्ट केले जातील.

ओरियनप्रो या कंपनीला UPSRCT कडून मोठी ऑर्डर मिळाली. ही कंपनी TOSHI ऑटोमॅटिक सिस्टिम्स Rs १४ कोटींना खरेदी करेल.

थायलंडमध्ये तांदुळाच्या किमती कमाल स्तरावर आहेत. याचा फायदा तांदूळ निर्यात करणाऱ्या कंपन्यांना.होईल.

टारसन्स या कंपनीच्या शेअर्सचे आज BSE वर Rs ७०० आणि NSE Rs ६८२ वर लिस्टिंग झाले. IPO मध्ये हा शेअर Rs ६६२ ला दिला होता.

ग्रीनलॅम ह्या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची १३ डिसेम्बरला २०२१ रोजी शेअरस्प्लिट वर विचार करण्यासाठी बैठक आहे.

इंडियन मेटल अँड नॉनफेऱस मेटल्स या कंपनीने १:१ बोनस जाहीर केला या बोनस इशू साठी रेकॉर्ड डेट जानेवारी १० २०२२ निश्चित केली आहे.

किर्लोस्कर फेरस ISMT या कंपनीमध्ये ५१.२५% स्टेक घेणार आहे कंपनी प्रती शेअर Rs ३०.८४ भावाने ओपन ऑफर आणणार आहे. कंपनी ISMT मध्ये प्रेफरंशियल इशू रूटनेRs ४७६.६ कोटी गुंतवेल Rs १९४ कोटी अनसिक्युअर्ड लोन देणार आहे.

१ डिसेंबर २०२१ नंतर वेदांताचे प्रमोटर Rs ३३२.५६ प्रती शेअर्स या दराने ९% स्टेक खरेदी करतील.

व्हाइट गुड्ससाठी सरकार लवकरच DPIIT रूटने PLI स्कीम आणण्याची शक्यता आहे. याचा फायदा वोल्टास, व्हर्लपूल, IBF इंडस्ट्रीज, ब्ल्यू स्टार यांना होण्याची शक्यता आहे.

सॅनोफी या कंपनीने आपल्या सोफ्राडेक्स आणि सोफ्रामायसिन हे ब्रँड ‘ENCUBE’ या कंपनीला Rs १२५ कोटींना विकले. आता ‘ENCUBE’ ही कंपनी भारत आणि श्री लंकेमध्ये या ब्रॅण्ड्स ची विक्री करू शकेल.

ASTRAZENKA या कंपनीने सांगितले की ते लवकरच त्यांच्या कोविड अँटीबॉडी कॉकटेल साठी भारतीय ऑथॉरिटीजची मंजुरी घेऊन ही कॉकटेल भारतामध्ये लाँच करतील.

ITC लवकरच मदर्स स्पर्श मध्ये १६% स्टेक Rs २० कोटींना खरेदी करणार आहे.

तेग इंडस्ट्रीज या मायनिंग इक्विपमेंट बनवणाऱ्या कंपनीचा IPO १ डिसेंबर २०२१ ला ओपन होऊन ३ डिसेंबर २०२१ ला बंद होईल. ही पूर्णपणे OFS असेल. याचा प्राईस बँड Rs ४४३ ते Rs ४५३ असून मिनिमम लॉट ३३ शेअर्सचा आहे. शेअरची फेस व्हॅल्यू Rs १० आहे. कंपनीच्या ग्राहक यादीत हिंदुस्थान झिंक, हिंदुस्थान कॉपर, टाटा स्टील,वेदांता आणि पब्लिक सेक्टरमधील खनिज क्षेत्रात असणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपनीचे ६ प्लांट विविध देशात आहेत आणि भारतात ३ प्लांट्स आहेत .

आजची मार्केटमधील मंदी ही २९ जानेवारी २०२१ नंतरची सर्वात मोठी साप्ताहिक मंदी होती. तसेच १२ एप्रिल २०२१ नंतरची सर्वात मोठी इंट्राडे मंदी होती. आज फार्मा आणि डायग्नॉस्टिक/ हॉस्पिटल क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स सोडून सार्वत्रिक आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत मंदी होती. याचा सर्वात जास्त फटका बँक निफ्टीला बसला. मार्केटमध्ये तेजी आणण्याचे छोटे छोटे प्रयत्न विफल ठरले. कोरोनाच्या भीतीची दाट छाया मार्केटवर पसरली होती.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५७१०७ NSE निर्देशांक निफ्टी १७०२६ बँक निफ्टी ३६०२५ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.