आजचं मार्केट – २९ November २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २९ November २०२१

आज क्रूड US $ ७६.२८ प्रती बॅरल तर रुपया US $१= Rs ७४.८० च्या आसपास होते.US $ निर्देशांक ९६.२७ US १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.५३ VIX २०.८७ PCR ०.७३ होती.

ओमिक्रोन हा कोरोनाचा नवा व्हरायन्ट हाँगकाँग,बेल्जीयम, UK, इटली, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया या देशात झपाट्याने पसरत आहे. याचा परिणाम ट्रॅव्हल पर्यटन हॉस्पिटॅलिटी आणि रिटेल या क्षेत्रावर होईल. फार्मा, IT या क्षेत्रांवर त्या प्रमाणात होणार नाही.

ओपेक+ने त्यांचे क्रूड उत्पादन वाढवण्याची योजना रद्द केली. त्यामुळे पुन्हा क्रूडमध्ये माफक तेजी आली.

सरकारने PLI योजनेअंतर्गत ५५ फार्मा कंपन्यांची निवड केली.

भारती एअरटेल आणि VI च्या पाठोपाठ जिओनेसुद्धा चार्जेस वाढवले. त्यामुळे टेलिकॉम सेक्टरमधील शेअर्स तेजीत होते.
एशियन पेंट्स त्यांच्या गुजरातमधील अंकलेश्वर येथील प्लांटची उत्पादनक्षमता वाढवणार आहे. यासाठी Rs ९६० कोटींची गुंतवणूक केली जाईल. रेझिन्स आणि इमल्शन्स यांची उत्पादनक्षमताही वाढवणार आहे यासाठी त्यांनी गुजरात सरकारबरोबर करार केला आहे.

शक्ती पंप्स आता इलेक्ट्रिक व्हेईकल उत्पादनक्षेत्रात उतरणार आहे. आणि त्यासाठी सबसिडीअरी स्थापन करायला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने परवानगी दिली.

गुजरात अल्कलीला ऑर्थोफॉस्फेरिक ऍसिडसाठी लायसेन्स मिळाले.

LIC आता त्यांचा कोटक महिंद्रा बँकेतील स्टेक ९.९९% पर्यंत वाढवणार आहे. हा स्टेक वाढवण्यासाठी त्यांना RBI कडून परवानगी मिळाली.

PNB हौसिंग फायनान्स मधील कार्लाईलचा स्टेक बेअरिंग एशिया विकत घेण्याची शक्यता आहे.

टाटा स्टील आपली झारखंडमधील नोआमुंडी तसेच ओडिशामधील काटमाटी, जोडा, खोंडबंद या खाणींची आयर्न ओअर उत्पादनक्षमता ३० MTPA वरून ४५ MTPA करणार आहे.

लालपाथ लॅब आणि इझ्रायलची IBEX ह्या दोन कंपन्या मिळून AI पॉवर्ड कॅन्सर डायग्नॉस्टिक्स सेवा पुरवणार आहेत. त्यामुळे लालपाथ लॅबचा शेअर तेजीत होता.

रेमंड त्यांच्या व्यवसायाचे ५ वेगवेगळ्या व्यवसायात विभाजन करणार आहे. त्यासाठी प्रोफेशनल बोर्ड ऑफ डायरेक्टर स्थापन करून ग्रोथ कॅपिटल उभारणार आहे.

आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. सरकार १७ कंपन्यांची डीसइन्व्हेस्टमेंट करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आज BEML या शेअरमध्ये तेजी होती.

RBI ने खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये प्रमोटर होल्डिंग २६% करायला परवानगी दिली याचा फायदा म्हणजे हिंदुजा ग्रुप इंडसइंड बँकेतील प्रमोटर होल्डिंग वाढवू शकेल.

CHEVIOT ही कंपनी ४ डिसेंबर २०२१ रोजी शेअरबायबॅक वर विचार करेल.

रिलायन्स कॅपिटल या कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स बरखास्त करून या कंपनीसाठी नागेश्वरराव यांची ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून नेमणूक झाली. आता IBC अंतर्गत इंसॉल्व्हंसी प्रोसिडिंग्स सुरु होतील.

आज IT आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्स तेजीत होते पण पॉवर क्षेत्रातील शेअर्स मंदीत होते

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५७२६० NSE निर्देशांक १७०५३ बँक निफ्टी ३५९७६ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.