Monthly Archives: December 2021

आजचं मार्केट – ३१ डिसेंबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ३१ डिसेंबर २०२१

आज क्रूड US $ ७९.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७४.२५ च्या आसपास होते US $ निर्देशांक ९६.०० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.५१ VIX १६.२० PCR निफ्टी १.५६ तर PCR बँक निफ्टी १.१२ होते.

ओमायक्रॉनच्या सावटाला भारतामधील मार्केटने मागे टाकले, त्यामुळे वर्ष २०२१ ला तेजीची सलामी देत आज मार्केट बंद झाले. IT, बँक, मेटल ,रिअल्टी फार्मा, ऑटो, FMCG क्षेत्रात तेजी होती.तसेच आज F & O सेगमेंटमध्ये समाविष्ट केलेल्या शेअर्समध्ये खरेदी केली. FII ने Rs ९८६ कोटींची विक्री केली तर DII ने Rs ५७८ कोटींची खरेदी केली.

PB फिनटेक ही कंपनी Rs ४०० कोटी पॉलिसी बझार आणि Rs ३०० कोटीची पैसा बाजार या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार आहे.

बायोकॉन बायालॉजीक्स पार्टनर VIATRIO यांची सनोफीबरोबर केस चालू होती. या केसमध्ये USA च्या फेडरल कोर्टाने बायोकॉनच्या बाजूने निर्णय दिला.

फोर्टिस या कंपनीच्या BIRDIE अँड BIRDIE या सबसिडीअरीने दिल्लीमधील बिल्डिंग आणि जमीन Rs १११ कोटींना विकली.

इंडिगोच्या A /A मधील ROFR क्लॉज हटवला. त्यामुळे प्रमोटरवरील त्यांचा स्टेक विकण्यावरील बंधने नाहीशी झाली. या कंपनीत एकूण प्रमोटर्सचा स्टेक ७४.४४% आहे त्यापैकी ३६.६१% गंगवाल यांचा तर ३७.८३% स्टेक भाटिया यांचा आहे. आता कोणताही प्रमोटर दुसऱ्या प्रमोटरच्या परवानगीशिवाय शेअर्स विकू शकेल.

JSW एनर्जी या कंपनीत LIC ने त्यांचा स्टेक २% ने वाढवून ७% वरून ९% केला.

KREBS मधील IPCA लॅबने गुंतवणूक केली.ही कंपनी कमर्शियल व्हायेबल बायोटेक प्रोसेस डिझाईन करते. ह्या प्रोसेसचे अप्लिकेशन मेडिसिन, शेती आणि उद्योगात करता येईल.

नजारा टेक ही कंपनी T टू T ग्रुपमधून बाहेर काढली.

आज CMS इन्फो या कंपनीचे BSE वर Rs २१८ वर तर NSE वर Rs २२० वर लिस्टिंग झाले. हा शेअर IPO मध्ये Rs २१६ ला दिला होता.

स्टेट बँक ऑफ इंडिया इंटरनॅशनल क्लिअरिंग कॉर्पोरेशनमधील १०% स्टेक घेणार आहे.

डिस्ट्रिब्युटर्सनी बोलावलेल्या प्राईस डिसपॅरिटी संदर्भात चर्चेत HUL ने भाग घेतला नाही म्हणून १ जानेवारी २०२२ पासून महाराष्ट्रातील डिस्टिब्युटर्स कंपनीची काही उत्पादने विकणार नाहीत.

पॉवरग्रीड ही कंपनी पॉवर ग्रीड टेलीकॉमचे डाटा सेंटरमध्ये रूपांतर करणार आहे. त्यासाठी Rs ३२२ कोटी मंजूर केले.
टेक महिंद्रा ही कंपनी ALLYIS इंडियामध्ये १००% स्टेक खरेदी करेल.

रिलायन्स इंडस्ट्रीजचा सोलर आर्म सोडियम आयन बॅटरी टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर ‘FARADION’ ही कंपनी GBP १०० मिलियन ला कर्जासकट विकत घेणार आहे.

चीनमध्ये इलेक्ट्रिक वाहनांवर दिली जाणारी सबसिडी कमी होईल त्यामुळे JLR आणि टाटा मोटर्सचा फायदा होईल कारण टाटा मोटर्सच्या EV विक्रिपैकी २५% ते ३०% विक्री चीनमध्ये होते. चीनमध्ये ही सबसिडी २०२२ मध्ये हळू हळू रद्द केली जाईल.

NTPC त्यांच्या मुझफरपूर थर्मल पॉवर चा कारभार बंद करेल.

IDFC I st बँक आणि IDFC यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने दोन्ही कंपन्यांच्या मर्जरला मंजूरी दिली. त्यामुळे आज दोन्ही कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.

GST कौन्सिलच्या आज झालेल्या मीटिंगमध्ये टेक्सटाईलवरील GST चा दर ५% वरून १२% इतका वाढवण्याचा प्रस्ताव अमान्य केला. आता यांच्यावर फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या GST कौन्सिलच्या मिटींगमध्ये विचार केला जाईल. या मुळे किटेक्स गारमेंट्स रेमंड बॉम्बे डायिंग अरविंद इत्यादी शेअर्समध्ये तेजी होती.

पण फूटवेअरवरील GST चा दर ५% वरून १२% एवढा वाढवण्यास GST कौन्सिलने मंजुरी दिली. त्यामुळे आता ही दरवाढ १ जानेवारी २०२२ पासून अमलात येईल.

ITC वनस्पतीजन्य मासांहारी उत्पादने लाँच करणार आहे. कारण भारतामध्ये मासांहारी आहाराच्या पर्यायांना मागणी आहे. VEGAN आहार घेणाऱ्यांना हा पर्याय सोयीचा पडेल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५८२५३ NSE निर्देशांक निफ्टी १७५३४ बँक निफ्टी ३५४८१ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ३० डिसेंबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ३० डिसेंबर २०२१

आज क्रूड US $ ७९.५० प्रती बॅरल्सच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७४.५० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक ९५.८७ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.५५ VIX १६.२४ PCR १.०८ होते.

USA आणि UK युरोपमध्ये कोरोनाचे रुग्ण ओमिक्रोनच्या जलद संसर्गामुळे झपाट्याने वाढत आहेत. भारतातही आता ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे निर्बंधाचे प्रमाण आणि त्याची अंमलबजावणी अधिक कडक होत जाण्याची शक्यता आहे. याचा परिणाम हळू हळू उद्योगांवर आणि अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे.

RBI च्या रिपोर्टनुसार NPA चे प्रमाण वाढेल. त्यामुळे बँका आणि NBFC चे शेअर्स पडत होते. वाढणाऱ्या शेअर्स मध्ये IT, फार्मा, ग्रॅफाइट आणि हिंदुस्थान ग्रॅफाइट आणि पडणाऱ्या शेअर्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती, बजाज फायनान्स, टाटा स्टील, SBI यांचा समावेश होता.

FII ने Rs ९७५ कोटींची विक्री केली DII ने Rs १००७ कोटींची खरेदी केली.

पुर्वणकारा, केपल पूर्वणकारा डेव्हलपमेंट मधील ४९% स्टेक Rs ११२ कोटींना केपल इन्व्हेस्टमेन्टला विकणार आहे.

वरूण बिव्हरेजीसनी कार्बोनेटेड आणि अनकॉर्बोनेटेड असे विभाग करून त्यासाठी वरुण बिव्हरेजीस RDC SAS या नावाची सबसिडीअरी काँगोमध्ये स्थापन केली.

PVR ला ५०% क्षमतेवर काम करणे अनिवार्य केल्यामुळे तेलंगणामध्ये त्यांनी तिकिटाचे दर Rs १५० वरून Rs २५० केले.

लंबोदर टेक्सटाईलने त्रिचीमध्ये Rs १५ कोटीची गुंतवणूक करून २.४ MW चा सोलर प्लांट लावला.

GSPCLNG ने गॅस कॉम्प्रेशन सर्व्हिससाठी ५ वर्षांसाठी दीप इंडस्ट्रीजला Rs ४४ कोटींची ऑर्डर दिली.

फूटवेअर आणि टेक्सटाईल वरील GSTच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे.

कल्पतरू पॉवर ट्रान्समिशनला Rs १५६० कोटींची ऑर्डर मिळाली. त्यामुळे शेअर तेजीत होता.

युनायटेड ड्रिलिंगच्या ३ प्रॉडक्टसाठी UK मध्ये पेटंट मिळाले.

आज राणे ग्रुपचे शेअर्स तेजीत होते. ZF या जपानच्या ऑटो कॉम्पोनंट उत्पादनं करणाऱ्या कंपनीने राणे TRW स्टिअरिंग सिस्टीममध्ये ५१% स्टेक घेतला.यामुळे राणे होल्डिंग, राणे मद्रास, राणे ब्रेक्स हे शेअर्स तेजीत होते.

NMDC ला रिजेक्टेड आयर्न ओअर निर्यात करण्यासाठी गोवा सरकारने परवानगी दिली.

LIC ने BPCL मधील ५.१% स्टेक २.०१९% वाढवून ७.०३% केला

SBI कार्ड्सने PAYTM बरोबर डिजिटल पेमेंट सोल्युशनसाठी करार केला. SBI कार्ड पोर्टफोलिओ एनेबल झाला.

IPCA LAB ला KREBS बायोकेमिकल्स Rs १०० कोटींचे रिडिमेबल प्रेफ शेअर्स अलॉट करेल. IPCA लॅब या कंपनीमध्ये Rs १०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. .

इंडिगोची आज EGM होती यामध्ये A /A ( आर्टिकल्स ऑफ असोशिएशन) मध्ये बदल करण्याचा प्रस्ताव होता.

टॉरंट फार्मा MOLNYUPIRAVIR ४ जानेवारीला भारतीय मार्केटमध्ये लाँच करणार आहे.

NSE ने सुप्रीम इंडस्त्रीला F & O मध्ये समावेश करण्याचा निर्णय रद्द केला आता F & O मध्ये उद्यापासून ८ शेअर्स समाविष्ट होतील. बलरामपूर चिनी, GNFC, हिंदुस्थान कॉपर, NBCC, RAIN इंडस्ट्रीज, टाटा कम्युनिकेशन, हनीवेल ऑटोमेशन, AB कॅपिटल

फर्स्ट सोर्स इन्फॉर्मेशन या कंपनीने USA च्या ARSI कंपनीचे १००% अधिग्रहण केले.

बँक ऑफ बरोडाने गायत्री प्रोजेक्टसच्या फॉरेन्सिक ऑडिटची मागणी केली.

HCL TECH ने ‘HCL टेक्नॉलॉजी SEP होल्डिंग’मध्ये १९.६% स्टेक US $ १०.२ कोटींना घेतला. HCL TECHचा या कंपनीत आधीपासून ८०.४% स्टेक होता. त्यामुळे ही कंपनी HCL TECH ची १००% सबसिडीअरी झाली.

आयशर मोटर्स,९१%, पॉवर ग्रीड ९०% TVS मोटर्स ९०% टॉरंट फार्मा ८८% JK सिमेंट ८८% JSW स्टील ८८% NALCO ८८% सन फार्मा ८८% सन टी व्ही ९०% HDFC बँक ८८% माइंडट्री ८८% ग्लेनमार्क फार्मा ८७% अशी काही कंपन्यांची F & O काँट्रॅक्टस रोल ओव्हर झाली

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५७७९४ NSE निर्देशांक निफ्टी १७२०३ आणि बँक निफ्टी ३५०६३वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २९ डिसेंबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २९ डिसेंबर २०२१

आज क्रूड US $ ७९ प्रति बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७४.७५ च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९६.१९ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.४८ VIX १६.४८ PCR १.३४ होते.

FII ची खरेदी सुरु झाली. Rs २०७ कोटींची खरेदी केली. सांता रॅली ओमिक्रोनच्या ढगाने झाकोळली.

चीनने त्यांच्या देशातील कंपन्यांना परदेशी स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होण्याला बंदी केली.

माझगाव डॉक्सनी Rs ७.१० चा अंतरिम लाभांश जाहीर केला. या अंतरिम लाभांशासाठी रेकॉर्ड डेट ७ जानेवारी २०२२ आहे.

रेमंड्स रिअल इस्टेट व्यवसायासाठी म्हणजे युनिट १०X रिअल्टीमध्ये Rs १५० कोटी गुंतवणार आहे.

PMC बँकेवरील निर्बंध ३ महिन्यासाठी वाढवले. युनिटी स्मॉल फायनान्स बँकेला PMC बँकेचे अधिग्रहण करायला तत्वतः मंजूरी दिली.

खेळाडूंचे फुटवेअर उत्पादन करणारी कंपनी ‘कॅम्पस ऍक्टिव्हवेअर’ IPO आणणार आहे.

JB केमिकल्स ही कंपनी भारताच्या मार्केटमध्ये MOLNUPIRAVIR लाँच करणार.

हॅवमोर आईस्क्रीम कार्ट्स आता ITC मास्टर CHEF फ्रोझन स्नॅक्सची विक्री करेल.

संरक्षण मंत्रालयाने एक यादी जाहीर केली. त्यानुसार

‘BEL’ ला १५३ डिफेन्स उपकरणे उत्पादन करण्याचे काम मिळाले. ‘BEML’ ला २६८ तर ‘BDL’ ला ४१ डिफेन्स उपकरणे उत्पादन करण्याचे काम मिळाले. यात व्हिजुअल डिव्हायसेस, ऑटोमॅटिक मशीन युनिट यांचा समावेश आहे. ‘HAL’ ला १८३६ उपकरणे उत्पादन करण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. या सर्व ऑर्डर्समुळे भारत आयातीवर कमी अवलंबून राहील.

BASF ने त्यांचे एक युनिट US $ ६ कोटींना विकण्यासाठी CLARIANT बरोबर करार केला

३१ डिसेंबर २०२१ पासून F & O सेगमेंटमध्ये NBCC, रेन इंडस्ट्रीज, सुप्रीम इंडस्ट्रीज, टाटा कम्युनिकेशन, बलरामपूर चीनी, AB कॅपिटल आणि हनीवेल ऑटोमेशन यांचा समावेश होईल.

महिंद्रा सुबाकी मधील ४९% स्टेक Rs ५८.९ कोटींना विकला.

आज फार्मा सेक्टर आणि F & O सेक्टरमध्ये समाविष्ट होत असलेले आणि शुगर क्षेत्रातील शेअर्स तेजीत होते. आज मार्केट नॅरो रेंजमध्ये फिरत होती आणि शेवटच्या तासात २०० पाईंट पडली यात बँकांचे शेअर जास्त पडले. पण निफ्टीने १७२०० च्यावर क्लोज दिला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५७८०६ NSE निर्देशांक निफ्टी १७२१३ बँक निफ्टी ३५०४५ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २८ डिसेंबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २८ डिसेंबर २०२१

आज क्रूड US $ ७९.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७४.९० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९६.०८ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.४७ VIX १६.०० तर PCR १.३ होते.

USA , UK, आणि युरोप बरोबर आता भारतातही ओमिक्रोनचा प्रादुर्भाव सुरु झाला आहे. आज भारत सरकारने ‘COVOVAX’ आणि ‘CORBAVAX’ इमर्जन्सी वापरासाठी या व्हॅक्सिनला मान्यता दिली.तसेच भारत सरकारने ‘MOLNUPIRAVEER’ या ओमायक्रॉनसाठी असलेल्या औषधाला इमर्जन्सी वापरासाठी मंजुरी दिली. भारतात हे औषध फार्मा क्षेत्रातील १३ कंपन्या बनवतील. त्यात टॉरंट फार्मा, सन फार्मा, DR रेड्डीज, सिप्ला, नाटको फार्मा यांचा समावेश आहे.
या उपायांबरोबरच काही निर्बंध वेगवेगळ्या राज्यांनी लागू केले आहेत.

बँक ऑफ महाराष्ट्राने MSME ना लोन ऑफर करण्यासाठी MAS फायनान्सियल या कंपनीबरोबर करार केला.
अजंता फार्मा ही कंपनी Rs २५५० प्रती शेअर भावाने टेंडर रूटने शेअर बायबॅक करेल. यासाठी कंपनी Rs २८६ कोटी खर्च करेल.

जागतिक मार्केटमध्ये साखरेच्या किमती वाढत आहेत. ब्राझील या मोठ्या साखर उत्पादक देशामध्ये साखरेचे उत्पादन कमी होईल असा तद्न्यांचा अंदाज आहे.त्यामुळे २०२२ या वर्षात साखरेचे किरकोळ भाव Rs ३७ ते Rs ३९ या दरम्यान राहील असे तज्ञाचे मत आहे.

टेलिकॉम आणि इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना लागणाऱ्या लायसेन्सच्या अटी आता सरकार सोप्या करणार आहे. या कंपन्यांना या सेवांसाठी सिंगल विंडो अप्रूव्हल तसेच ऑटोमॅटिक अप्रूव्हलची तरतूद असेल. कंपन्यांना काही कारणासाठी पेनल्टी लावावी लागली तर त्याची रक्कम कमी केली. आता लायसेन्ससाठी परफॉर्मन्स फायनान्सियल गॅरंटी देणे अनिवार्य असणार नाही.

SKM एग्स ही कंपनी २०२२ या वर्षात रशियाला १२७५ मेट्रिक टन एवढी एग योक पावडर निर्यात करेल. ही ऑर्डर भारताच्या निर्यातीचा २५% असेल.

सन फार्माच्या CMD ने आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्या बरोबर फार्मा प्लांट लावण्याविषयी चर्चा केली.

NMDC ने लम्प आयर्न वरच्या किंमत Rs ४९०० प्रती टन निश्चित केली.

ITC ने सांगितले की त्यांनी त्यांचा तामिळनाडूतील दिंडीगुल येथे पहिला सोलर प्लांट कमिशन केला कंपनी यासाठी Rs ७६ कोटी गुंतवणार आहे. सरकारने डेकॉर पेपरवर अँटी डम्पिंग ड्युटी बसवली.

UAE मध्ये भारतातून पोल्ट्री प्रोडक्टस आयात करण्यावर घातलेली बंदी उठवण्यात आली. याचा फायदा वेंकीज, SKM एग्स, गोदरेज अग्रोव्हेट यांना होईल.

भारती एअरटेल आणि TCS यांनी एकमेकांच्या सहकार्याने 5G रिमोट वर्किंग टेक्नॉलॉजीच्या डेव्हलपमेंटमध्ये रोबोटिक्सचे तंत्रज्ञान वापरायचे ठरवले आहे.

GR इन्फ्राला Rs १४३७ कोटींची मोठी ऑर्डर मिळाली.

पारस डिफेन्स या कंपनीला DRDO कडून सिस्टीम टेक्नॉलॉजीसाठी ऑर्डर मिळाली.

महाराष्ट्र सीमलेस या कंपनीला Rs १५१ कोटींची ऑर्डर मिळाली.

BSE ८ फेब्रुआरी २०२२ रोजी तिसऱ्या तिमाहीचे निकाल आणि बोनस शेअर्स इशू करण्यावर विचार करेल.

टाटा आणि सिमेन्स यांच्या JV ला पुणे मेट्रो ३ चे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

गोकुळदास एक्स्पोर्टचे रेटिंग ICRA ने अपग्रेड केले.

श्याम मेटॅलिक्स या कंपनीने स्पॉन्ज आयर्नची उत्पादन क्षमता १.३९ MTPA ( मिलियन टन प्रती वर्ष) वरून १.६७ MTPA एवढी वाढवली.

सुप्रिया लाईफसायन्सेस या कंपनीचे NSE वर Rs ४२१ वर तर BSE वर Rs ४२५ वर लिस्टिंग झाले. हा शेअर IPO मध्ये Rs २७४ ला दिला होता.

स्नो फ्लॉवर प्रॉपर्टिजमध्ये UK च्या कंपनीबरोबर Rs ७५ कोटींची गुंतवणूक कोलते पाटील ही रिअल्टी क्षेत्रातील कंपनी करेल.

सरकारने ट्रस्टेड टेलिकॉम पोर्टल जून २०२१ लाँच केले. HFCL या टेलिकॉम उपकरणे बनवणाऱ्या कंपनीला नॅशनल सेक्युरिटी कौन्सिलने ‘ट्रस्टेड सोर्स’ म्हणून मान्यता दिली. त्यामुळे आता भारतामधील टेलिकॉम सेवा पुरवणाऱ्या सर्व कंपन्यांसाठी टेलिकॉम ऍक्टिव्ह नेटवर्स प्रॉडक्ट आणि इन्फ्रा साठी HFCL ही एक ‘ट्रस्टेड सोर्स’ झाली.

हा आठवडा मासिक तसेच वर्षातील शेवटच्या F & O एक्स्पायरीचा आठवडा आहे. त्यामुळे सर्व ट्रेडर्सविशेषतः F & O सेगमेंटमधील ट्रेडर्सची पोझिशन स्क्वेअर ऑफ करण्याची सुरुवात झाली. त्यामुळे आज मार्केटमध्ये सर्व दूर तेजी होती. IT, टायर, एनर्जी, सिमेंट रिअल्टी इत्यादी सर्व क्षेत्रात तेजी होती.

आज सेबीच्या बैठकीत मार्केटशी संबंधित काही महत्वाचे निर्णय घेतले. त्यात IPO च्या प्राईसबँड मध्ये ५% चे अंतर असणे अनिवार्य केले. तसेच अँकर इन्व्हेस्टरच्या लॉकइन ची मुदत एक महिन्यावरून ३ महिने केली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५७८९७ NSE निर्देशांक निफ्टी १७२३३ बँक निफ्टी ३५१८३ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २७ डिसेंबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २७ डिसेंबर २०२१

आज क्रूड US $ ७६.२५ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७५.०० च्या आसपास US $ निर्देशांक ९६.०६ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.४८ VIX १६.५० तर PCR १.१६ होते.

आज USA ,UK, हॉन्गकॉन्ग,कॅनडा, ऑस्ट्रेलिया येथील मार्केट्स बंद होती.

USA UK युरोप मध्ये ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूर्णपणे लॉक डाऊन तर काही ठिकाणी कडक निर्बंध लागू केले आहेत. चीनने सांगितले की अर्थव्यवस्थेला वेळोवेळी लिक्विडिटीचा पुरवठा करू . USA मध्ये २४०० उड्डाणे रद्द केली भारतातही काही राज्यात निर्बंध लागू केले आहेत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ते १८ या वयातील मुलांसाठी व्हॅक्सिनेशन तर हेल्थ वर्कर्स आणि मॉर्बिडिटीज असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी तिसरा व्हॅक्सिनचा डोज देण्याची घोषणा केली.

RBL बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर RBI ने योगेश दयाळ यांची २ वर्षांकरता अतिरिक्त डायरेक्टर म्हणून नेमणूक केली. बँकेचे वर्तमान CMD विश्वेश्वर अहुजा दीर्घ मुदतीच्या सुट्टीवर गेले. त्यांच्या जागी राजीव अहुजा यांना CMD म्हणून नेमण्यात आले.

RBI ने केलेल्या या नेमणुकीमुळे RBL चा शेअर खूपच पडला. त्याचा परिणाम इतर बँकांच्या शेअर्सवर होऊन एकूण बँक निफ्टी मंदीत गेला. मार्केटच्या मध्यावर RBI ने सांगितले की RBL बँक चांगल्याप्रकारे कॅपिटलाईझ्ड आहे त्याचा PCR ही चांगल्या स्तरावर आहे. ३० सप्टेंबर २०२१ रोजी बँकेच्या आर्थीक परिस्थिती सर्वसामान्य म्हणता येईल.त्यामुळे RBL बँकेच्या स्टेकहोल्डर किंवा डिपॉझिटर्सनी घाबरून जाण्याचे कारण नाही. RBI च्या या स्टेटमेंटनंतर मात्र RBL बँकेचा शेअर सावरला.RBL बँकेमध्ये HDFC ची १.५% हिस्सेदारी आहे.

अजमेरांनी टाटा कम्युनिकेशन बरोबर त्यांची घाटकोपर आणि इतर प्रॉपर्टीजचा विस्तार करण्याकरता करार केला.
HP ADHESIVचे आज NSE वर Rs ३१५ आणि BSE वर Rs ३१९ वर लिस्टिंग झाले.

गो फॅशनच्या अँकर इन्व्हेस्टर्स चा लॉकइन पिरियड आज संपला.

FII ने Rs ७१५ कोटींची विक्री केली आज DII नी सुद्धा विक्री केली. मार्केटमध्ये व्हॉल्युम खूपच कमी होते.
इंडिया बुल्सची १२ फेब्रुवारी २०२२ रोजी एम्बसीबरोबरचे डील पूर्ण करण्यावर विचार करण्यासाठी बैठक आहे.

HDFC लाईफने साऊथ इंडियन बँकेबरोबर BANCASSURANCE डील केले.

हेस्टर बायोने भारत बायोटेक बरोबर कोव्हॅक्सिन साठी करार केला.

रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेन्टरी संपली आहे. जवळ जवळ १ लाखाचे रजिस्ट्रेशन झाले आहे. ज्यांच्याजवळ लँड पार्सल आहे त्यांना फायदा होत आहे.उदा सनटेक रिअल्टी, मॅक्रोटेक डेव्हलपर्स.

अल्युमिनियम फ्लॅट रोल्ड उत्पादनांवर ५ वर्षांसाठी अँटी डम्पिंग ड्युटी लावली. याचा फायदा नाल्कोला होईल.
टायमेक्सला पुष्कळ ब्रॅंड्सचे लायसेन्सिंगचे राईट्स मिळाले.

अशोक बिल्डकॉन त्यांचे रोड प्रोजेक्ट गॅलॅक्सि इन्व्हेस्टमेन्टला विकणार आहेत.

निर्यात दारांच्या असोसिएशनने सरकारला विनंती केली आहे की कोरोनाचा परिणाम म्हणून आम्ही ज्या देशांमधील व्यापाऱ्यांना निर्यात केली होती त्यापैकी बहुतांश इंसॉल्व्हंट झाले आहेत त्यामुळे या निर्यात केलेल्या मालाचे पैसे येणे जवळजवळ अशक्य आहे . नियमाप्रमाणे जर निर्यात केलेल्या मालाची प्रोसिड्स मिळाली नाहीत तर निर्यातदाराने ड्युटी ड्रॉ बॅक आणि रिबेट ऑफ स्टेट अँड सेंट्रल लेव्हीज अँड टॅक्सेस योजनेखाली मिळालेली सूट सरकारला रिफंड करावी लागते. वरील परिस्थिती लक्षात घेऊ सरकारने ही सूट रिफंड करण्यास सांगू नये अशी विनंती केली. त्याप्रमाणे ज्या परदेशातील व्यापाऱ्यानी त्यांच्या ऑडर्स रद्द केल्या त्या ऑर्डर्ससाठी तयार केलेला माल आमच्याकडेच पडून आहे अशा तऱ्हेने आम्ही खूपच अडचणीत आहोत. सरकारने सांगितले की कोरोनाच्या प्रादुर्भावाचा ज्या निर्यात उद्योगांवर जास्त आणि थेट परिणाम झाला आहे त्यांच्या बाबतीत आम्ही विचार करू. यामध्ये APAREL उद्योग आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने ऑनकॉलॉजी फोकस्ड हेल्थकेअर प्लॅटफॉर्म ‘KARKAINOS हेल्थकेअर’ मध्ये त्यांच्या रिलायन्स डिजिटल हेल्थतर्फे गुंतवणूक केली.

इमामी रिअल्टीचे रेटिंग वाढवल्यामुळे शेअर १० % तेजीत होता. कंपनीने २ पोजेक्ट लाँच केली.

अडाणी ट्रान्स्मिशनला खावडा -भुज ट्रान्समिशन लिमिटेड अंतर्गत रिन्यूएबल एनर्जी EVACUATION सिस्टीम अकवायर करण्यासाठी लेटर ऑफ इन्टेन्ट मिळाली. हे Rs १४०० कोटींचे प्रोजेक्ट असून Rs १२०० कोटींची भांडवली गुंतवणूक अपेक्षित आहे.

ल्युपिनला किडनीच्या आजारात डायलिसिससाठी वापरल्या जाणार्या सेवेलमेर CARBONATE साठी USFDA ची मंजुरी मिळाली.

आज रिअल्टी फार्मा IT मेटल आणि फायनान्स कॉफी चहा क्षेत्रात तेजी होती. तर मेडिया आणि FMCG क्षेत्रात मंदी होती.
आज अडाणी ग्रुप ऑस्ट्रेलियातील कारमायकेल कोळश्याच्या खाणीमधून पहिली शिपमेंट करण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनीने CLIMATE ऍक्टिविस्ट आणि फॉसिल इंधनावर टाकलेला जागतिक बहिष्कार यांच्याशी सात वर्ष लढा दिला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५७४२० NSE निर्देशांक निफ्टी १७०८६ आणि बँक निफ्टी ३५०५७ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २४ डिसेंबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २४ डिसेंबर २०२१

आज क्रूड US $७६.२५ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७५.१० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९६.१० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.४९ VIX १६.४४ PCR ०.९७ होते.

युरोप, USA, UK मध्ये ओमायक्रोनचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पुन्हा निर्बंध आणण्याचा विचार सुरु झाला आहे. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवरील बंदी ३१जानेवारी २०२२ नंतरही चालू राहील अशी शक्यता वर्तवली जात आहे. भारतातही राज्य सरकारे प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही निर्बंध लावण्याचा विचार करत आहेत.

२८ डिसेंबर २०२१ रोजी शेअर बायबॅकवर विचार करण्यासाठी अजंता फार्माच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे.

अपोलो मायक्रोला DRDO कडून Rs ५७२ कोटींची ऑर्डर मिळाली.

L & T फिनान्सियल होल्डिंग या कंपनीने त्यांचा म्युच्युअल फंड बिझिनेस HSBC AMC ला US $ ४२५ मिलियनला ( Rs ३२०० कोटी) विकला.

MRALD या कंपनीत MPHASIS ने ५१% स्टेक घेतला.

डेटा पॅटर्न्स या कंपनीच्या शेअर्सचे आज NSE वर Rs ८५६ वर तर BSE वर Rs ८६४ वर लिस्टिंग झाले. हा शेअर IPO मध्ये Rs ५८५ ला दिला होता.

IHB कडून सूर्या रोशनी या कंपनीला Rs १२४ कोटींची ऑर्डर मिळाली.

UPL चा GDR लंडन स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होणार आहे.

ISGEC कंपनीने त्यांच्या यमुनानगर प्लांटमध्ये एथॅनॉलचे उत्पादन सुरु केले.

डिक्शनच्या तिरुपती प्लांटचा कस्टम विभागाने सर्व्हे केला. .

स्टील एक्स्चेंज ऑफ इंडिया ही कंपनी त्यांचा इन्फ्रा, लॉजिस्टिक, आणि वेअरहॉऊसींग बिझिनेस वेगळा करणार आहे. कंपनीची आंध्र प्रदेशात लॅण्डबॅन्क आहे . त्यांच्या वेअरहाऊस बिझिनेसचे व्हॅल्युएशन Rs ५००० कोटी आहे.

LA MOBILIERE या स्वीस खाजगी नॉन- लाईफ इन्शुअरन्स कंपनीने डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अजेंडा वेगाने अमलात आणण्यासाठी स्ट्रॅटेजिक पार्टनर म्हणून TCS ची निवड केली.

आज बजाज कंझ्युमरने हेअर केअर डोमेस्टिक मार्केटमध्ये सरसो आमला ऑइल लाँच केले. इन्फोसिस ची मार्केट कॅप Rs ८लाख कोटी झाली.

इप्काने त्यांच्या शेअरस्प्लिटसाठी ११ जानेवारी ही रेकॉर्ड डेट ठरवली आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५७१२४ NSE निर्देशांक निफ्टी १७००३ बँक निफ्टी ३४८५७ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २३ डिसेंबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २३ डिसेंबर २०२१

आज क्रूड US $ ७५.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७५.२५ च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९६.०७ USA १० वर्षे बॉण्ड्स यिल्ड १.४७ VIX १५.८४ PCR ०.९८ होते.

USA, UK ,युरोप, इझरेल या देशांमध्ये इतर देशांपेक्षा ओमायक्रॉनचा प्रसार जास्त आहे. भारतातही त्याचा प्रवेश झाला आहे. यामुळे काही निर्बंध लागण्याची शक्यता आहे.

भारतात प्रिसिजन मशीन शॉप लावण्यासाठी जिंदाल SAW आणि हंटिंग एनर्जी सिंगापूर यांनी जॉईंट व्हेंचर केले. यात जिंदाल SAWचा स्टेक ५१% आणि हंटिंग एनर्जीचा ४९% स्टेक असेल.

२१ जानेवारी २०२२ पासून ३ मार्च २०२२ पर्यंत नवी विकली कॉन्ट्रॅक्ट एक्स्पायरी नाही.२१ जानेवारी २०२२ पासून ७ ऐवजी ४ विकली कॉन्ट्रॅक्ट असतील. ४ मार्च २०२२ पासून ४ विकली काँट्रॅक्टस चालू राहतील.

हॅवेल्स ही कंपनी मेक इन इंडिया योजनेअंतर्गत दर वर्षी ३ लाख रोबोटिक वाशिंग मशीन उत्पादन क्षमतेचा प्लांट GHILOTH येथे २०२२ पासून सुरु करेल. कंपनी वॉशिंग मशीनची २० नवीन मॉडेल्स आणि AC ची ५० नवीन मॉडेल बनवणार आहे.

GAIL ने Rs ४ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला. रेकॉर्ड डेट ३१डिसेंबर २०२१ आहे.

G. E. शिपिंगने २७ डिसेंबर २०२१ रोजी शेअर बायबॅकवर विचार करण्यासाठी बैठक आहे.

MOIL या कंपनीच्या शेअर बायबॅकसाठी ३१ डिसेंबर २०२१ ही रेकॉर्ड डेट ठरवली.

ITC ने डिलेक्टेबल टेक्नॉलॉजी मधील स्टेक वाढवून २७.३४% केला. ही कंपनी AZGO APP आणि व्हेंडिंग मशीन ऑपरेट करते.

HFC ( हायड्रो फ्लोरो कार्बन) या रेफ्रीजरेटर मध्ये उपयोगी असणाऱ्या घटकावर सरकारने अँटी डम्पिंग ड्युटी लावली. .US $ ११७१.७८ ते US $ १३९४.९६ प्रती टन एवढी ड्युटी लावली. याचा फायदा गुजरात फ्लुरो आणि SRF या कंपन्यांना होईल.
मेडप्लस या कंपनीचे आज BSE वर Rs १०१५ आणि NSE वर Rs १०४० ला लिस्टिंग झाले. हा शेअर IPO मध्ये Rs ७९६ ला दिला होता.

इंटरग्लोब एव्हिएशन ने एअर फ्रान्स बरोबर कोड शेअरिंग अग्रीमेंट केले. एअर फ्रान्स आणि KLM भारतात सर्व रेग्युलेटरी मंजुरी मिळाल्यानंतर फेब्रुवारी २०२२ पासून २५ ठिकाणी सेवा सुरु करेल.

हिरो मोटो कॉर्प त्यांच्या उत्पादनांच्या किमती ४ जानेवारी २०२२ पासून सुमारे Rs २००० ने वाढवणार आहे.

REC KFW डेव्हलपमेंट बँकेकडून सोलर प्रोजेक्टचा विस्तार करण्यासाठी US $ १६.९५ कोटींचे कर्ज घेणार आहे.
बायोकॉन आणि मायलॉन दोघेही त्यांचे बायोसिमिलर बिझिनेस एकत्र करून एक मोठी एंटीटी बनवण्याच्या विचारात आहेत. यामध्ये मेजॉरिटी स्टेक बायोकॉन कडे राहील. म्हणून बायोकॉनचा शेअर आज तेजीत होता.

मान इंडस्ट्रीला Rs २२५ कोटींच्या नवीन ऑर्डर्स मिळाल्या त्यामुळे एकंदर ऑर्डर्स Rs ९०० कोटींच्या झाल्या.

मॅक्रोटेक डेव्हलपर्सनी मॉर्गन स्टॅन्ले रिअल इस्टेट इन्व्हेस्टिंग या कंपनीबरोबर मुंबईमध्ये एक प्रीमियम वेअरहौसिंग प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी करार केला आणि Rs ६०० कोटींची गुंतवणूक केली. म्हणून आज हा शेअर तेजीत होता.

CEINSYS या कंपनीने AALYGROW टेक्नॉलॉजी ही प्रोडक्ट डिझाईन आणि रोबोटिक ऑटोमेशन सर्व्हिसेस पुरवणारी कंपनी अकवायर केली. म्हणून CEINSYS या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी होती.

अडाणी टोटल आणि IOC या दोघानी CNG लायसेन्स मिळवण्यासाठी बीड केली. म्हणून दोन्हीही शेअर्स तेजीत होते.

कोटक महिंद्रा बँकेने फोर्ड चा लोन पोर्टफोलिओ Rs ४२५ कोटींना घेतला. फोर्डच्या या पोर्टफोलिओमध्ये १६००० ग्राहक आहेत.

GMR इंफ्राच्या नॉनएअरपोर्ट बिझिनेस डीमर्ज करायला NCLT कडून मंजुरी मिळाली.

गेल्या ६ दिवसात प्रथमच निफ्टी १७००० च्या वर क्लोज झाला. लोकांच्या जेव्हा लक्षात आले की ओमायक्रॉनचे परिणाम डेल्टा एवढे गंभीर नाहीत तेव्हा मार्केट स्थिरावलं त्याचवेळी ICRA ने सांगितले की साखर खते आणि दुग्ध उत्पादन आणि संबंधित सेक्टर मधील प्रॉफिटॅबिलिटी २०२२ मध्ये ही चांगली राहील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५७३१५ NSE निर्देशांक निफ्टी १७०७२ बँक निफ्टी ३५१९१ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २२ डिसेंबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २२ डिसेंबर २०२१

आज क्रूड US $ ७४ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७५.५० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९६.३५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.४८, विक्स १७.१० तर PCR १.४८ होते.

ओमायक्रॉन आणि त्याचे व्हेरियंट यामळे कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने जगात होत आहे. UK, USA ,युरोपमध्ये प्रादुर्भाव जोरात आहे तर भारतातही नुकताच त्याचा प्रवेश झालेला आहे. USA चे अध्यक्ष जो बिडेन यांनी सांगितले ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा कडक लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारणार नाही. व्हॅक्सिन न घेतलेल्यांना धोका आहे. ज्यांनी व्हॅक्सिन घेतले नाही त्यांना व्हॅक्सिन घेण्यासाठी US $ १०० इन्सेन्टिव्ह जाहीर केला. फायझर आणि मर्क या कंपन्यांनी ज्या गोळ्या काढल्या आहेत त्यांना या आठवड्यात USFDA कडून मान्यता मिळेल.

FII सतत विक्री करत असल्यामुळे रुपया US $१= Rs ७६.०० च्या ही खाली घसरला होता, १८ महिन्याच्या किमान स्तराला पोहोचला होता. यासाठी RBI ने US $ ४ ते ५ बिलियनची विक्री केली. तसेच US $ निर्देशांक कमजोर झाला. त्यामुळे रुपया सावरला

LIC ने युनियन बँकेचे १३.७३ कोटी शेअर्स विकत घेतले.

दमाणी यांनी इंडिया सिमेंटमध्ये त्यांचा स्टेक २१.१४% वरून २२.७६% केला.

डिक्सन या कंपनीने सेट टॉप बॉक्सचे उत्पादन सुरु केले.

CSB बँक आता सेंट्रल आणि राज्य सरकार यांच्यांशी संबंधित कारभार करू शकेल.

MK एक्सिमने २:१ या प्रमाणात बोनस दिला.

IOC च्या हल्दिया रेफायनरीत स्फोट झाला.

झी इंटरटेन्मेण्टच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने सोनी पिक्चर्स बरोबर होणाऱ्या मर्जरला मंजुरी दिली. आता शेअरहोल्डर्सची मंजूरी जरुरी आहे. झी एंटरटेनमेंट आणि सोनी पिक्चर्स चे मर्जर मंजूर झाले. झी एंटरटेनमेंटच्या १०० शेअर्सला मर्ज्ड एंटिटीचे ८५ शेअर्स मिळतील. झी इंटरप्रायझेस ही राईट्स इशुच्या मार्गाने Rs ७९४८ कोटींचे २६.५ कोटी शेअर्स जारी करेल. BEPL( बांगला एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड) च्या १० शेअर्सच्या ऐवजी १३३ शेअर्स मिळतील. पुनीत गोएंका ५ वर्षांसाठी मर्ज्ड एंटिटीचे MD आणि CEO राहतील.
या मर्जरनंतर मर्ज्ड कंपनीमध्ये ४५.१५% पब्लिक शेअरहोल्डिंग असेल. एस्सेलचा स्टेक ३.९९% आणि सोनी पिक्चर्सचा स्टेक ५०.८६% असेल. मर्ज्ड एंटिटीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये ९ सदस्य असतील त्यातील ५ सदस्य सोनीचे असतील. मर्ज्ड एंटिटीचे व्हॅल्युएशन Rs ५२००० कोटी असेल. मर्ज्ड एंटिटीचा मार्केटशेअर ३३% असेल.

खोबऱ्याची MSP Rs २५५ ने वाढवून Rs १०५९० करणार आहे. त्यामुळे मॅरिको आणि खोबर्याचा वापर करणाऱ्या इतर कंपन्यांवर परिणाम होईल. पण ह्या कंपन्यानी ही वाढ ग्राहकांकडे पास ऑन केल्यामुळे शेवटी हा भार ग्राहकांवर पडणार आहे.

उद्या मेड प्लस या कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग आहे.

पैसालो डिजिटलने PNB बरोबर कोलेन्डिंग करार केला.

कॅडीलाच्या ‘PIMAVANSERIN ‘ या टॅब्लेट्सना USFDA ने मंजुरी दिली.

ABB टर्बो कारभारासाठी वेगळी सबसिडीअरी स्थापन करून त्या सबसिडीअरीला Rs ३१० कोटींना टर्बो कारभार विकणार आहे.

गुजरात फ्लुओरोने इलेक्ट्रिकल व्हेईकल बिझिनेससाठी वेगळी सबसिडीअरी स्थापन केली.

PNC इंफ्राटेक या कंपनीला NHI कडून Rs ३६९ कोटींच्या प्रोजेक्टसाठी LOA मिळाले.

वेदांता मॉरिशसने ‘FINSIDEV इंटरनॅशनल’ या कंपनीमध्ये १.८२% स्टेक घेतला.

बँक ऑफ इंडिया AXA मधील AXA IM चा ४७.७% स्टेक शेअर पर्चेस अग्रीमेंट दवारा खरेदी करणार आहे.

AB मनी ने AB कॅपिटलला Rs ८० कोटींचा प्रेफरंशियल इशू करेल.

आज मेट्रो ब्रॅण्ड्स या कंपनीच्या शेअर्सचे NSE वर Rs ४३७ तर BSE वर Rs ४३६ वर लिस्टिंग झाले. हा शेअर IPO मध्ये Rs ५०० ला दिला होता. लिस्टिंग नंतर हा शेअर Rs ४९०.०० पर्यंत वाढला होता.

HDFC MF ने डेल्टा कॉर्पचे ९.९९ लाख शेअर्स खरेदी केले.

आज रिअल्टी, PSU बँका, मेटल्स, फार्मा आणि IT या क्षेत्रांमधील शेअर्समध्ये तेजी होती आज मार्केट एकाच दिशेने वाढत होते. त्यामुळे मार्केटला स्थैर्य आले. रुपयांची घसरण थांबवण्यासाठी RBIने केलेले उपाय लागू पडले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५६९३० NSE निर्देशांक निफ्टी १६९५५ बँक निफ्टी ३५०२९ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २१ डिसेंबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २१ डिसेंबर २०२१

आज क्रूड US $ ७२.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७५.७५ च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९६.४८ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.४२ VIX १८ PCR १.११ होते.

जगात सर्वत्र ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पुन्हा पहिल्यासारखे निर्बंध लावावेत का ? हा विचार सर्वच देशात जोर करू लागला. विशेषतः UK, युरोप, आणि USA येथील परिस्थिती गंभीर आहे. महागाई वाढतेच आहे. त्यासाठीही महागाई कमी करण्यासाठी बॉण्ड टेंपरिंग आणि व्याजाचे दर वाढवण्याचा निर्णय थोडा अलीकडे घ्यावा. असा विचार चालू आहे. त्यातच USA चे अध्यक्ष जो बिडेन यांचा US $ १.७५ ट्रिलियनच्या स्पेंडिंग प्लानमध्ये अडथळे आले त्यामुळे वर्ष २०२२ चे ग्रोथ फोरकास्ट कमी केले.

काल आपले मार्केट खूपच पडले. त्यामुळे आज थोडेफार शॉर्ट कव्हरिंग होईल असा अंदाज होता तो बरोबर ठरला. मार्केट गॅप अप उघडले आणि कालच्या क्लोज लेव्हलपेक्षा वरच्या लेव्हलवर बंद झाले पुश आणि पूल म्हणजेच बुल्स आणि बेअर्समध्ये रस्सीखेच सुरु आहे असे दिसते. ६ दिवसांच्या मंदी नंतर बँक निफ्टीमध्ये तेजी आली.

जीओ ने १७.६ लाख ग्राहक जोडले तर VI चे ९.६४ लाख ग्राहक आणि भारती एअरटेलने ४.८९ लाख ग्राहक गमावले.
अडाणीला Rs १७०९० कोटींची गंगा एक्स्प्रेस वे साठी ऑर्डर मिळाली.

श्री सिमेंट आंध्र प्रदेशमधील गुंटूर येथे Rs १५०० कोटी गुंतवणूक करून प्लांट उभारणार आहे.

सुप्रिया लाईफसायन्सेसचा IPO ७१ वेळा भरला.

‘मॅप माय इंडिया’ चे BSE वर Rs १५८१ वर तर NSE वर Rs १५६५ वर ५३% प्रीमियमवर लिस्टिंग झाले. IPO मध्ये हा शेअर Rs १०३३ ला दिला होता.

अशोक लेलँड लवकरच CNG वाहन आणेल.

महाराष्ट्र स्कुटर्स या कंपनीने बजाज ऑटोमध्ये १ लाख शेअर्स घेतले.

रेलटेल या कंपनीला Rs ६८.३१ कोटींची ऑर्डर मिळाली.

हटसन ऍग्रो लवकरच तेलंगणामध्ये आईस्क्रीम उत्पादन करणारा प्लांट लावणार आहे.

विप्रो Rs १७५० कोटींना ‘EDGILE’ या कंपनीचे अधिग्रहण करेल.

स्ट्राइड्स फार्माने बेंगलोरमध्ये व्हॅक्सिन उत्पादन करण्यासाठी प्लांट चालू केला.

गेमिंग उद्योगासाठी हे वर्ष चांगले गेले. US $ १३८.४ बिलियन रेव्हेन्यू होईलसा अंदाज होता पण सप्टेंबर २०२१ पर्यंत US $ १५६ बिलियन एवढा रेव्हेन्यू झाला.

रिफाईंड पाम ऑइल वरील इम्पोर्ट ड्युटी १७.५% वरून १२.५% एवढी कमी केली याचा फायदा इमामी, मॅरिको, रुची सोया यांना होईल. तूर, मूग, उडीद या डाळींची ड्युटी फ्री आयात ३१ मार्च २०२१ पर्यंत जारी राहील.

ग्लोबल स्पिरिट्सने आपल्या फॅक्टरीची उत्पादन क्षमता १२० मिलियन किलोलिटर वरून २६० मिलियन किलोलिटर एवढी वाढवली.

वेदांताने प्रेस रिलिजमध्ये सांगितले की ‘NICOMET’ ही निकेल आणि कोबाल्टचे उत्पादन करणारी कंपनी त्यांनी अकवायर केली.भारत निकेलची आयात करतो .. ही कंपनी ७.५ किलो टन प्रती वर्षी उत्पादन करते. भारत ४५ किलोटन प्रतिवर्षी आयात करतो. वेदांता या कंपनीची उत्पादन क्षमता वाढवेल. निकेल हे स्टेनलेस स्टील, EV बॅटरीजच्या उत्पादनासाठी, एनर्जी स्टोअर सिस्टीमसाठी, स्टील ऑलॉयजच्या उत्पादनात वापरले जाते.

पिरामल इंटरप्रायझेसने ‘YAPAN BIO’ मध्ये २७.८% स्टेक Rs १०० कोटींना घेतला.

रोलेक्सरिंग्स या कंपनीने गुजरात राज्य सरकार बरोबर MOU केले. गोंडल जिह्यामध्ये टॉय पार्क, IT पार्क आणि टेक्सटाईल एपरल पार्कचा विकास करण्यासाठी हे MOU केले.

स्टेट बँक ऑफ इंडिया JSW सिमेंट मध्ये Rs १०० कोटींची गुंतवणूक करणार आहे.

शिल्पा मेडिकेअरने कॉन्स्टिपेशनसाठी औषध लाँच केले. कंपनीचा गॅस्ट्रो पोर्टफोलिओच्या प्रकारात आणखी काही औषधे लाँच करण्याचा विचार आहे.

EXIDE या कंपनीने PLI योजनेअंतर्गत नवीन बॅटरी युनिट सुरु केले. LI- ION सेल या मार्केटमध्ये कंपनी उतरणार आहे.
झी एंटरटेनमेंट आणि सोनी यांच्यात २२ सप्टेंबर २०२१ ला करार केला होता. ह्या कराराचा ड्यू डिलिजन्सचा पिरियड आज संपतो आहे. त्यामुळे या बाबतीत आज निर्णय अपेक्षित आहे.

IOC IGX मध्ये ४.९३% स्टेक खरेदी करणार आहे. मुंद्रा ते पानिपत पर्यंत नवीन क्रूड लाईनमध्ये Rs ९०३० कोटी गुंतवणूक करणार आहे. हे ३६ महिन्यांचे प्रोजेक्ट आहे.

आज एशियन ग्रॅनाईट, ला ओपाला, MTNL, VIP, फिलॅटेक्स हे शेअर्स तेजीत होते.

आज मेटल्स, बँका, आणि IT क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी होती.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५६३१९ NSE निर्देशांक निफ्टी १६७७० बँक निफ्टी ३४६०७ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २० डिसेंबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २० डिसेंबर २०२१

आज क्रूड US $ ७१.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७६.०० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९६.६२ तर USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.३८ VIX २०.०० आणि PCR १.१० होते.

जगभर ओमायक्रोन आणि त्याच्यातून निर्माण झालेल्या नवीन जिवाणूंचे संकट पसरत आहे. वाढती महागाई ही एक कायम राहणारा घटक आहे हे लक्षात घेऊन USA ,UK आणि यूरोपातील बँकांनी आणि सरकारांनी अर्थव्यवस्थेतून लिक्विडिटी काढून घेण्यासाठी व्याजाचे दर, बॉण्ड खरेदी आदी आयुधे वापरायला सुरुवात केली. सेबीने ७ कमोडिटीजच्या वायदेबाजारावर बंदी घातली.या सर्वाचा परिपाक म्हणजे आज मार्केट खूपच पडले. खूपच कमी शेअर्समध्ये खरेदी झाली अन्यथा सर्व शेअर्समध्ये जमून विक्री झाली.रिअल्टी, मेटल, PSU बँका, पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी, ज्या कंपन्यांचा व्यापार उद्योग यूरोपशी संबंधित आहे अशा कंपन्यांचे शेअर्स पडले. हाताच्या बोटावर मोजता येणारे सिप्ला ग्लेनमार्क, DR रेड्डीज बेयर क्रॉप सायन्स, असे शेअर्स तेजीत होते.

सिप्लाला ‘LANREOTIDE’ या इंजेक्शनला USFDA ची परवानगी मिळाली. आता अमेरिकन मार्केटमध्ये मार्केटिंग करता येईल.

रेग्युलेटरी प्रोसेसला वेळ लागणार असल्यामुळे LIC चा IPO मार्च २०२२ पूर्वी येण्याची शक्यता नाही.

CCI ( कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया) ने अमेझॉन आणि फ्युचर ग्रुपच्या डीलला स्थगिती दिली.त्यामुळे फ्युचर कन्झ्युमर, फ्युचर रिटेल, फ्युचर एंटरप्रायझेस हे शेअर्स तेजीत होते.

सेबीने १ वर्षापर्यंत ७ कमोडिटीजमधील वायदे बाजारात ट्रेडिंगवर बंदी घातली. ह्या कमोडिटी म्हणजे पॅडी (नॉन बासमती), गहू, चणे, मस्टर सीड्स, सोयाबीन, क्रूड पाम ऑइल, मूग होत.

GAIL ने गुजरात अल्कलीबरोबर ५०० किलो लिटर/डे बायो इथेनॉल उत्पादन क्षमतेचा Rs १००० कोटींची गुंतवणूक असलेला प्लांट गुजरातमध्ये लावण्यासाठी करार केला.

श्रीराम प्रॉपर्टीजचे आज NSE वर Rs ९० वर तर BSE वर Rs ९४ वर लिस्टिंग झाले. IPO मध्ये हा शेअर Rs ११८ ला दिला होता.

आयशर मोटर्सने क्लासिक ३५० मॉडेल्सच्या आणि १ सप्टेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान उत्पादन केलेल्या २६३०० रॉयल एन्फिल्ड मोटार सायकल्स ब्रेक बकेट मध्ये खराबी असल्यामुळे रिकॉल केल्या.

तामिळनाडू सरकारकडून ITI ला Rs ४३३ कोटींची ऑर्डर मिळाली.

आंध्रप्रदेशने लिकर वरील कर १५ % ते २०% कमी केले. पूर्वी ब्रँडेड लीकरच्या विक्रीवर बंदी होती ती ही उठवली. आता सर्व प्रकारची ब्रँडेड लिकर आंध्र परदेशात विकता येईल.

M & M ने महाराष्ट्र सरकारबरोबर वेहिकल स्क्रॅपेज युनिटसाठी करार केला.

लायका लॅब्सने Rs ६४.७ कोटींच्या टर्म लोनचे प्रीपेमेन्ट केले.

BEML ची दक्षिण भारतातील ५२४ एकर अतिरीक्त जमीन मॉनेटायझेशनसाठी निवडली.

ऑक्टोबर १ २०२१ ते डिसेंबर १५ २०२१ दरम्यान साखरेचे उत्पादन ७७.९ लाख टन झाले.

सरकारने ADB बरोबर स्किल प्रोजेक्ट अर्बन एरियासाठी US $ ४६.२ कोटी कर्ज घेण्यासाठी करार केला.

अडाणी ट्रान्स्मिशनने ८९७ सर्किट किलोमीटर्सची इन्ट्रास्टेट ट्रांसमिशनच्या सर्वात लांब लाईनचे बांधकाम पुरे केले.

ITC ने ‘मदर स्पर्श बेबी केअर’ मध्ये ८.७०% स्टेक घेतला.

निफ्टीने १६७००- १६८०० हा सपोर्ट तोडल्यानंतर मार्केट जोरात पडले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५५८२२ NSE चा निर्देशांक निफ्टी १६६१४ बँक निफ्टी ३४४३९ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!