Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.
आजचं मार्केट – ३१ जानेवारी २०२२
आज क्रूड ९१.२५ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७५.०० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९७.२२ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.७९ VIX २२.१० होते, PCR निफ्टी १.५१ तर PCR बँक निफ्टी १.०१ होते. सोने आणि चांदी मंदीत होती. युरोपिअन मार्केट्स मंदीत होती. USA चे तिन्हीही निर्देशांक तेजीत होते. तज्ञाच्या अंदाजाप्रमाणे फेड मार्चमध्ये ०.५०% दरवाढ करेल आणि येत्या वर्षात ५ वेळा दरवाढ करेल. या आठवड्यात ECB, बँक ऑफ ईंग्लंडच्या ही बैठका आहेत. रशिया युक्रेन ताणतणाव दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करत आहे. आशियायी मार्केट्स नववर्षाच्या सुरुवातीमुळे बंद होते किंवा अर्धवेळ ओपन होती. शांघायचे मार्केट बंद राहील.
OPEC + त्यांच्या २ फेब्रुवारी २०२२ रोजी होणाऱ्या बैठकीत मार्च २०२२ या महिन्यात उत्पादन वाढवण्यावर विचार करेल.
आज पासून संसदेचे अंदाजपत्रकीय अधिवेशन सुरु झाले. उद्या माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्पीय प्रस्ताव मांडतील.
उद्या ऑटोविक्रीचे जानेवारी २०२२ महिन्यासाठी आकडे येतील.
AGS ट्रॅन्झॅक्शन चे BSE वर Rs १७६ तर NSE वर Rs १७५ ला लिस्टिंग झाले.
आज अडानी विल्मरच्या IPO चा शेवटचा दिवस आहे. हा इशू ३ वेळा ओव्हरसब्सक्राइब झाला.
अपोलो फार्मसीनी अमेझॉनवर त्यांची प्रॉडक्टस ३ वर्षांसाठी लाँच केली.
या आठवड्यात वेदांत फॅशनचा IPO ओपन होईल. हा IPO ४ फेब्रुवारी २०२२ ला ओपन होऊन ८ फेब्रुवारीला बंद होईल. कंपनी मान्यवर आणि MOHEY, त्वमेव, मंथन, MEBAZ या ब्रॅण्ड अंतर्गत विवाहासाठी आणि इतर समारंभाला साजेशे कपडे बनवते या IPO चा प्राईस बँड Rs ८२४ ते Rs ८६६ असून मिनिमम लॉट १७ शेअर्सचा आहे. ही पूर्णपणे OFS आहे. या कंपनीची ५४६ ब्रँड आउटलेट असून काही शॉप्स परदेशातही आहेत
८ फेब्रुवारी २०२२ रोजी मयूर UNIQUOTE RS शेअर बायबॅक वर विचार करेल.
NMDC ने आयर्न ओअर लम्पच्या किमती Rs ३०० ने तर फाईनच्या किमती Rs २०० ने वाढवल्या.
श्री राम सिटी युनियन, APTUS होम फायनान्स, नव भारत व्हेंचर्स, BEL ( IPM वाढले,), UPL,ताज GVK, इमामी पेपर IPM वाढली, करूर वैश्य बँक प्रॉफिट, NII वाढले NPA कमी झाले.अजंता फार्मा, कर्नाटक बँक, ब्ल्यू डार्ट, इंडस इंड बँक, हॅपीएस्ट माइंड्स, NTPC (इन्कम प्रॉफिट वाढले) , MCX ( इनकम प्रॉफिट वाढले) , AU स्मॉल फायनान्स बँक, GSFC ( इन्कम प्रॉफिट मार्जिन वाढले) ब्रिटानिया ( रेव्हेन्यू वाढला प्रॉफिट मार्जिन कमी झाली. कंपनीने सांगितले की ग्रामीण मागणी कमी झाली) या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, UBL, IDFC Ist बँक, आरती ड्रग्ज, यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल ठीक होते.
UTI AMC, हेस्टर बायोटेक चे निकाल असमाधानकारक होते.
भारती एअरटेलने LAVELLE नेटवर्क या स्टार्ट अप मध्ये २५% स्टेक घेतला.
आज इकॉनॉमिक सर्वे सादर केला. त्यात २०२१-२२ साठी रिअल GDP ग्रोथ ९.२% राहिली.सेवा क्षेत्राची ग्रोथ ८.२% राहील. NOV २१ पर्यंत IPO च्या माध्यमातून Rs ८९००० कोटी उभारले गेले. बँकांमध्ये पुरेसे भांडवल उपलब्ध आहे NPA चि स्थिती तुलनात्मदृष्टया सुधारली..कृषी क्षेत्राची ग्रोथ ३.९% राहील. औद्योगिक ग्रोथ ११.८% राहील.
फॉरीन एक्सचेन्ज रिझर्व्हज US $ ६३४ बिलियन म्हणजे १३ महिन्यांच्या आयातीला पुरतील एवढे आहेत. भारताची आयात निर्यात प्रिकोविड स्तरावर पोहोचले आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अनिश्चितता असली तरी सप्लाय चेनमधील अडथळे कमी होत आहेत. महागाई चांगल्या प्रकारे नियंत्रणात राहील असा अंदाज आहे. २०२१-२०२२ मध्ये ६० लाख टन साखरेची निर्यात केली.
वर्ष २०२२-२०२३ साठी रिअल GDP ग्रोथचे अनुमान ८% ते ८.५% ठेवण्यात आले आहे. हे सर्व कॅल्क्युलेशन करताना क्रूडचा दर US $ ७० ते US $ ७५ प्रती बॅरलचा गृहीत धरला आहे. त्यामुळे २०२१-२०२२ च्या उत्तरार्धात CAD ( करंट अकाउंट डेफिसिट) वाढण्याची शक्यता आहे.
SUUMAYA इंडस्ट्री २१ फेब्रुवारी २०२२ रोजी बोनस शेअर्स इशूवर विचार करील.
नीलांचल इस्पात निगम लिमिटेड ह्या कंपनीतील पूर्ण स्टेक Rs १२००० कोटींना टाटा स्टील लॉन्ग प्रॉडक्टस या कंपनीने विकत घेतल्यामुळे ही कंपनी टाटा स्टील लॉन्ग प्रॉडक्टस या कंपनीच्या मालकीची झाली.
इमामी ३ फेब्रुवारी २०२२ रोजी तिसऱ्या तिमाहीच्या निकालांबरोबर शेअर बायबॅकवर विचार करेल.
HCL टेकने ‘HUSQVARNA’ बरोबर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी भागीदारी वाढवली. अल्केम लॅबने ‘जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीबरोबर ‘ COLORECTAL कॅन्सर ट्रीटमेंट ‘ संबंधात करार केला.
आज रिअल्टी, ऑटो, PSU बँकांमध्ये तेजी होती.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ५८०१४ NSE निर्देशांक निफ्टी १७३३९ बँक निफ्टी ३७९७५ वर बंद झाले.
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!