आजचं मार्केट – ३ जानेवारी २०२२

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ३ जानेवारी २०२२

आज क्रूड US $ ७८.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७४.४० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९५.७८ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.५१ VIX १६.४० निफ्टी PCR १.६१ आणि बँक निफ्टी PCR १.२१ होते.

आज चीन जपान आणि ऑस्ट्रेलियाची मार्केट्स बंद होती. DII ने Rs ११६५ कोटी आणि FII ने Rs ५७५.३९ कोटींची खरेदी केली.

आज नववर्षाचा मार्केटचा पहिला दिवस मार्केटने सर्वप्रकारचे ताणतणाव विसरून तेजीने साजरे केले. ओमायक्रॉन, कोरोनाच्या सर्व चिंता बाजूला ठेवून दिमाखात साजरा केला. जगात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत आहे. ह्यावेळी अर्थव्यवस्थेवर निर्बंधांचा कमीतकमी परिणाम होईल हा सर्व देशांचा दृष्टिकोन आहे. ४००० पेक्षा उड्डाणे रद्द करण्यात आली.
सोन्याचे भाव वाढत आहे तर चांदीमध्ये माफक मंदी दिसून येते. चीन अल्युमिनियम आणि स्टील यांचे उत्पादन कमी करणार असल्यामुळे या धातूंमध्ये तेजी होती. निकेल आणि झिंक या धातूंमध्ये तेजी होती.

ओपेक+ची ४ जानेवारी २०२२ रोजी बैठक आहे. प्रती महिना ४००००० MBPD उत्पादन वाढवण्याचा त्यांचा निर्णय कायम ठेवण्याची शक्यता आहे. लिबियाचे क्रूड उत्पादन कमी झाले आहे. पण कोरोनाच्या संकटामुळे मागणीही मर्यादित राहील.
मान इन्फ्रा तसेच कोलते पाटील ह्यांना महाराष्ट्र सरकारनी जी ५०० SQUARE फुटाच्या पेक्षा कमी घरांसाठी टॅक्समध्ये सवलत दिली आहे त्याचा फायदा होईल.

विश्वराज शुगर ने ज्यूस साठवण्यासंबंधात नवे तंत्रज्ञान शोधले.

EV विक्री गेल्या वर्षभरात वाढली म्हणून ग्रीव्हज कॉटनमध्ये तेजी होती.

झोमॅटोने सांगितले की ३१ डिसेंबर २०२१ रोजी २५ लाख ऑर्डर्स मिळाल्या.

कोल इंडियाचे डिसेम्बरमध्ये उत्पादन ६०.२ MT झाले म्हणजे ३.३% वाढले. NMDC चे उत्पादन वाढले पण विक्री कमी झाली.

D-मार्ट च्या नवीन स्टोर्स उघडण्याची गती कमी झाली आहे. कंपनीची विक्री वाढली. १७ नवीन स्टोर्स उघडली. आता एकूण २६३ स्टोर्स झाली. रेकॉर्ड रिव्हेन्यू झाला.

नाटको फार्माने डॅश फार्मासीयूटिकल्स LLC चे अधिग्रहण केले.

स्टोव्ह क्राफ्ट ही कंपनी SKAVA इलेक्ट्रिक प्रायव्हेट लिमिटेड चे अधिग्रहण करेल. या अधिग्रहणानंतर स्टोव्ह क्राफ्ट इलेक्ट्रिक स्विच सेगमेंटमध्ये पदार्पण करेल.

NTPC च्या फतेहगड येथे उत्पादन सुरु झाले.

टाटा मोटर्सची EV विक्री ४३९% वाढली. आयशर मोटर्सची रॉयल एन्फिल्डचे विक्री वाढली. M & M ची एकूण विक्री वाढली पण ट्रॅक्टर विक्री कमी झाली. मारुतीची विक्री कमी झाली. हिरोमोटो,एस्कॉर्टस APL अपोलो, अतुल ऑटो, अशोक लेलँडची विक्री कमी झाली. SML इसुझू (३८%) आणि VST ट्रॅक्टर आणि टिलर्सची विक्री वाढली. ग्रामीण भागात विक्री कमी झाली.

डिसेंबर २०२१ साठी मॅन्युफॅक्चरिंग PMI ५५.५ ( ५७.६) होता.

बजाज ऑटो एक आठवड्याच्या आत उत्पादनखर्च वाढल्यामुळे किमती २.५% पर्यंत वाढवण्याची घोषणा करेल. कंपनी जून २०२२ मध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल लाँच करेल.

HDFC लाइफने ८.७ कोटी शेअर्स प्रती शेअर Rs ६८५ या भावाने एक्झाईडला अलॉट केले. आता एक्झाईड लाईफ ही कंपनी HDFC लाईफची १००% सबसिडीअरी झाली. या अधिग्रहणानंतर HDFC लाईफचा दक्षिण भारतातील कारभार वाढेल.

NTPC ही सरकारी कंपनी पॉवर एक्स्चेंज ऑफ इंडिया मध्ये ५ % इक्विटी घेण्याचा विचार करत आहे.पॉवर एक्सचेन्ज हे इन्स्टिट्यूशनलाइझ्ड एक्स्चेंज इलेक्ट्रिसिटी ट्रेडिंग ऑप्शन्स प्रोवाइड करते खरेदीदार आणि विक्रेता यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करते.

फिनो पेमेंट बँकेला परदेशात मनी ट्रान्स्फर सर्व्हिस सुरु करायला RBI ने मंजुरी दिली.

ओलेक्टरा ग्रीनटेकला ५० इलेक्ट्रिक बसेस साठी Rs १२५ कोटींची ऑर्डर मिळाली

सिमेंट उत्पादक कंपन्यांनी Rs ५० प्रती बॅग एवढी सिमेंटची किंमत वाढवली.

आज मार्केटमध्ये फार्मास्युटिकल क्षेत्र सोडून सर्व क्षेत्रात तेजी होती. DII आणि FII दोन्हींनी खरेदी केली. १५ ते १८ या वयोगटातील व्यक्तींसाठी व्हॅक्सिन ड्राइव्ह सुरु झाल्यामुळेहि मार्केट थोडे स्वस्थ झाले. आज बँक निफ्टी २०० DMA च्या वर ट्रेड करू लागला.

करूर वैश्य बँकेची डिपॉझिट्स आणि ऍडव्हान्सेस यामध्ये चांगली वाढ झाली. CASA रेशियो वाढला.
ATF चे दर वाढल्यामुळे इंडिगो आणि स्पाईसजेटचे शेअर ३% ने पडले.

NCC ला एकूण Rs १९०० कोटींच्या ५ ऑर्डर मिळाल्या.

फेडरल बँकेची डिपॉझिट्स वाढली, ऍडव्हान्सेस मध्ये वाढ झाली. CASA रेशियो ही वाढला.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची १००% सबसिडीअरी रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड ही आता स्टर्लिंग आणि विल्सनमध्ये ४०% स्टेक घेतल्यामुळे प्रमोटर झाली.

BSE निर्देशांक सेंसेक्स ५९१८३ NSE निर्देशांक निफ्टी १७६२५ बँक निफ्टी ३६४२१ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.