आजचं मार्केट – ४ जानेवारी २०२२

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ४ जानेवारी २०२२

आज क्रूड US $ ७९.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७४.५० च्या आसपास होते. US $ निर्दशांक ९६.२९ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.६३ VIX १६.३७ निफ्टी PCR १.६४ बँक निफ्टी PCR १.१७ होते.

ओमिक्रोनचा प्रादुर्भाव वाढतोच आहे. विविध देशातील सरकार असा प्रयत्न करत आहेत की या प्रादुर्भावांपासून त्यांच्या देशवासियांचे रक्षणही व्हावे पण त्याचबरोबर अर्थव्यवस्थाही सुरळीत चालू राहावी.

किटेक्स गारमेंट्स चा रेव्हेन्यू Rs १२१ कोटींवरून Rs २०५ कोटी झाला (YOY)

IDFC Ist बँकेचा casa रेशियो ४८.३१ वरून ५१.८५ एवढा वाढला. हौसिंग लोन ग्रोथ ४४.२% झाली.

बँक महाराष्ट्र क्रेडिट २३% ने वाढून Rs १.३० लाख कोटी, डिपॉझिट १५% ने वाढून Rs १.९० लाख कोटी झाले. CASA रेशियो वाढून ५५.०५ झाला.

कोलगेट या FMCG क्षेत्रातील कंपनीने त्यांच्या महाराष्ट्रातील डिस्ट्रिब्युटर्सबरोबर त्यांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी वाटाघाटी केल्या.

ONGC Rs ६०० कोटी खर्च करून आसाममध्ये गोलाघाट येथे २२ तेल विहिरी खोदणार आहे.

डिजिटल कम्युनिकेशन कमिशनच्या बैठकीत सॅटेलाईट ब्रॉडबँड सेवा, व्हेरिएबल चार्ज वसुली प्रस्ताव, आणि अनबंडलिंग ऑफ लायसन्सेस या तीन प्रस्तावांना मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे. यामुळे भारतात 5G रोलआऊट होणे सोपे होईल.
टाटा कम्युनिकेशनला स्मार्ट सिटी सोल्युशनसाठी सौदी अरेबियाकडून ऑर्डर मिळाली.

चीनमध्ये सोडा ASH च्या भावात ६% घट झाली. याचा GHCL टाटा केमिकल यांच्यावर परिणाम होईल. .

एन्व्हायर्नमेंट इम्पॅक्ट ऍसेसमेंट यांच्या रिपोर्टनंतर युरोप न्यूक्लिअर पॉवर आणि नैसर्गिक गॅसला ग्रीन पॉवर आणि ग्रीन इन्व्हेस्टमेंटमध्ये समाविष्ट करेल.

UP ची विधानसभा २०१७मध्ये स्थापन झाली होती तिची मुदत मे २०२२ मध्ये संपणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी २०२२ ते मार्च २०२२ दरम्यान UP मध्ये निवडणुका होतील. या काळात साखर उत्पादक कंपन्या किंवा शेतकरी यांना काही अनुदान दिले जाईल या अपेक्षेने UP मधील तसेच अंदाजपत्रकात साखर/ऊस उत्पादकांना सवलती मिळतील या अपेक्षेने साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्स मध्ये खरेदी झाली. यामध्ये अवध शुगर, धारणी शुगर, त्रिवेणी शुगर, KCP शुगर, रेणुका शुगर, धामपूर शुगर, उत्तम शुगर, इंडिया ग्लायकॉल, आंध्र शुगर याचा समावेश होता. अंदाज पत्रकातील सवलतीच्या अपेक्षेने खत उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी झाली. उदा NFL कोरोमंडल, दीपक फर्टिलायझर्स

आलेम्बिक फार्माच्या DORYX या जनरिक औषधाला USFDA ची मंजुरी मिळाली.

लेमन ट्री या कंपनीचे Rs ४६.६० प्रती शेअर या भावाने गोल्डमन सॅक्सने ३० लाख शेअर्स खरेदी केले.

ओरिएंट ग्रीन पॉवरचे ६कोटी ६१ लाख एवढे शेअर्स ऍक्सिस बँकेने विकले.

हिंदुजा ग्लोबल या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बोनस इशू आणि लाभांशावर विचार करण्यासाठी ६ जानेवारी २०२२ रोजी बैठक आहे.

TCS, इन्फोसिस, विप्रो या IT क्षेत्रातील ३ दिग्गज कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल १२ जानेवारी २०२२ रोजी तर HCL

TECH या कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल १४ जानेवारी रोजी जाहीर होतील.नेहेमीच्या विश्लेषणाबरोबरच हायरिंग प्लॅन, ऍट्रिशन प्लॅन रिटर्न टू ऑफिस प्लॅन यांच्याकडेही लक्ष द्यावे लागेल.

अजमेरा कॉन्स्ट्रक्शनला जुहूमध्ये Rs १५० कोटींचे रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट मिळाले.

KARDA कॉन्स्ट्रक्शन चे नाव बदलून KBC ग्लोबल लिमिटेड असे ठेवले.

१० जानेवारी २०२२ रोजी रेलटेल या कंपनीची डिव्हिडंडवर विचार करण्यासाठी बैठक आहे.

किर्लोस्कर इलेक्ट्रिक ही कंपनी हुबळी येथील ३२ एकर जमीन Rs १०० कोटींना विकणार आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९८५५ NSE निर्देशांक निफ्टी १७८०५ बँक निफ्टी ३६८४० वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.