आजचं मार्केट – ५ जानेवारी २०२२

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ५ जानेवारी २०२२

आज क्रूड US $ ८०.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७४.२५ च्या आसपास होते.US $ निर्देशांक ९६.२५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.६५ VIX १६.४० निफ्टी PCR १.६९ तर बँक निफ्टी PCR १.२७ होते.

कोरोनाचा विषाणू नवीन म्युटेशनच्या रूपात समोर येत आहे. आता फ्रान्समध्ये ‘IHU’ हा कोरोनाचा नवा विषाणू मिळाला असून हा विषाणू लस विरोधी आणि संक्रमक असू शकतो. फ्रान्समधील मार्से येथे हा विषाणू मिळाला आहे याचे १२ रुग्ण मिळाले. हे लोक आफ्रिकी देश कॅमेरूनहुन परतले होते.

क्रूडचे उत्पादन ओपेक+ ने ठरल्याप्रमाणे वाढवण्याचे ठरवली आहे. . पण लिबियामध्ये उत्पादन वाढवणं कठीण आहे. रशिया युक्रेनसंबंधीत समस्येमुळे उत्पादन वाढवायला तयार नाही इराणवर घातलेल्या निर्बंधांमुळे तेही उत्पादन वाढवण्यास तयार नाही. ओमिक्रोन आणि डेल्टा यामुळे उत्पादन आणि पुरवठात यात अडचणी येत आहेत. मागणीही कमी आहे.
चीनमध्ये चांदीची मागणी कमी, बॉण्ड यिल्ड वाढल्यामुळे सोन्याला सपोर्ट मिळत आहे तसेच ओमिक्रोनच्या भीतीमुळे सोन्याला सपोर्ट मिळत आहे.

पनामा पेट्रो मध्ये रमेश दमाणी यांनी १.२६% स्टेक घेतला त्यामुळे शेअरमध्ये तेजी आली.

ABB ने फ्लेमप्रूफ VOLTAGE मोटर लाँच केली.

GAIL ने ONGC त्रिपुरा मधील २६% स्टेक घेतला. हा स्टेक IL &FS एनर्जी डेव्हलपमेंट कंपनी आणि IL & FS फायनान्सियल सर्व्हिसेसकडं होता.

सिंजीन १९ जानेवारी २०२२ रोजी आपले तिमाही निकाल जाहीर करेल.

आज ज्या बँकांचे तिमाही अपडेट आले त्यामध्ये बंधन बँक, AU स्मॉल फायनान्स बँक, इंडसइंड बँक या बँकांचे कॅपिटल ADEQUACY, CASA रेशियो, क्रेडिट ग्रोथ, डिपॉझिट ग्रोथ ऍसेट गुणवत्ता यात सुधारणा दिसून आल्यामुळे एकूणच बँकांचे शेअर्स वाढत होते. त्यात बजाज फायनान्सचे अपडेट चांगले आल्यामुळे NBFC ही तेजीत होते. त्यामुळे आज बँक निफ्टीमध्ये तेजी होती. आज १८ नोव्हेम्बरनंतर प्रथमच सेन्सेक्स आणि निफ्टीने उच्चांक गाठला.

भारती एअरटेलने कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंगची योजना रद्द केली.

ICICI प्रुडेन्शिअल सिल्वर ETF या भारतातील पहिला सिव्हर ETF चा NFO आजपासून सुरु झाला. या ETF साठी सब्स्क्रिप्शन ५ जानेवारी ते १९ जानेवारी २०२२ दरम्यान ओपन राहील.

गो फॅशनमध्ये SBI म्युच्युअल फंडाने स्टेक वाढवला.

DR रेड्डीजनी कोविडसाठी MOLNUPIRAVIR च्या कॅप्सूल्स ‘MOLFLU’ या ब्रॅण्ड अन्तर्गत लाँच केल्या. एका कॅप्सुलची किंमत Rs ३५ प्रमाणे १० कॅप्सुलची स्ट्रीप लाँच केली. ५ दिवसांच्या ४० कॅप्सूलचा कोर्सची किंमत Rs १४०० असेल.
MANKIND फार्मा MOLULIFE या नावाने याच दराने कॅपसुल्स देते.

GMR इंफ्राच्या योजनेनुसार १२ जानेवारी २०२२ रोजी ज्यांच्या डिमॅट अकाउंटवर GMR इन्फ्राचे शेअर असतील त्यांना त्यांच्या १० शेअर्समागे १ शेअर GMR पॉवर आणि अर्बन इन्फ्राचा मिळेल.

अशोक बिल्डकॉन काही BOT ( बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर ) ऍसेट्स Rs १३३७ कोटींना विकणार आहे. यापैकी Rs १२०० कोटी SBI MACQUIRE कन्सॉरशियम ला EXIT साठी दिले जातील भारतीने सॅटेलाईट ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी ‘HUGHES’ बरोबर करार केला.

२२ जानेवारी २०२२ रोजी वर्धमान टेक्सटाईल्सचे बोर्ड ऑफ डायरेक्टर स्टॉक स्प्लिटवर विचार करेल.

आज FII नी Rs. १२७३.८६ कोटींची तर DII नी Rs ५३२.९७ कोटींची खरेदी केली.

NYKAA ने त्रिवेंद्रम येथे पहिलेवहिले १००० SQUARE फीट लक्झरी स्टोर्स उघडले.

हिरो ब्रँड इलेक्ट्रिक व्हीकल साठी वापरण्या बाबतीत मतभेद कोर्टात पोहोचले.

थरमॅक्स ह्या कंपनीने Rs ५४५.६० कोटींची ऑर्डर पूर्ण केली.

आज खत, पेपर उत्पादक करणाऱ्या कंपन्यांमध्ये, फायनान्सियल क्षेत्रामध्ये तेजी होती तर फार्मा आणि IT क्षेत्रांमधील शेअर्समध्ये प्रॉफीट बुकिंग झाले.

डिसेंबर २०२१ साठी सर्व्हिसेस PMI ५५.५० ( ५८.१०) होता. कॉम्पोझिट PMI ५६.४ ( ५९.२०) होता

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६०२२३ NSE निर्देशांक निफ्टी १७९२५ बँक निफ्टी ३७६९५ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.