आजचं मार्केट – ६ जानेवारी २०२२

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ६ जानेवारी २०२२

आज क्रूड US $ ८०.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७४.५० च्या आसपास तर US $ निर्देशांक ९६.२४ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.६९ VIX १८.२३ आणि NIFTY PCR १.६६ बँक निफ्टी PCR १.२६ होते.

काल फेडच्या मिनिट्स मध्ये वाढत्या महागाईबद्दल चिंता व्यक्त केली. ठरलेला कार्यक्रम अलीकडे आणण्याची शक्यता व्यक्त केली मार्च २०२२ पर्यंत बॉण्ड टेपरींग संपवून व्याजाचे दर वाढवण्याचा विचार करू असे नमूद केल्यामुळे USA तसेच आशियातील मार्केट्समध्ये मंदी होती. युरोपियन मार्केट्स मध्ये मात्र तेजी होती. USA चा प्रायव्हेट जॉब डेटा चांगला आला. सोने आणि चांदी मध्ये मंदी होती.

झोमॅटो, न्यायका, Paytm, आणि PB इन्फ्रा ( पॉलिसी बाजार) या शेअर्सना AMFI ( असोसिएशन ऑफ म्युच्यअल फंड्स इन इंडिया) ने लार्ज कॅप मध्ये घातले .

फ्युचर ग्रुप आणि अमेझॉन यांच्यातील खटल्याची सुनावणी १ फेब्रुआरी २०२२ पर्यंत पुढे ढकलली. दिल्ली हायकोर्टाने सिंगापूर आर्बिट्रेशन ऑथॉरिटीने दिलेल्या निर्णयावर स्टे दिला.

कोल इंडियाचे उत्पादन ६.७४% ने वाढून ७४.७८ MT एवढे झाले. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कोळशाच्या किमती वाढत आहेत. इंडोनेशिया आणि ऑस्ट्रीलिया या देशात कोळशाच्या उत्पादनात अडचणी येत आहेत. अडानी इंटरप्रायझेसला आयात केलेला कोळसा NTPC ला पुरवण्यासाठी ऑर्डर मिळाली.

वर्ष २०२२ मध्ये सरकार IDBI बँकेतील त्यांचा स्टेक कमी करू शकेल

NHPC ने ५०० MV च्या फ्लोटिंग सोलर प्रोजेक्टसाठी JV केले.

दीप पॉलीमर्सची बोनस शेअर्सवर विचार करण्यासाठी १५ जानेवारी २०२२ रोजी मीटिंग आहे.

भारती एअरटेलला त्यांच्या टांझानियामधील टॉवर ऍसेट्स विक्रीचे US $ १५.९ कोटी मिळाले.

LIC ने MGL मधील त्यांचा स्टेक ७% केला.

मदर्सनसुमी या कंपनीने त्यांच्या वायरिंग बीझिनेसच्या डीमर्जर साठी १७ जानेवारी २०२२ ही रेकॉर्ड डेट ठरवली. मदर्सन सुमीच्या शेअरहोल्डर्सना मदर्सन सुमी वायरिंग इंडियाचा एक शेअर मिळेल.

आता मिड रेंज कार्समध्ये ६ एअरबॅग्स अनिवार्य असतील या सरकारच्या निर्णयाचा फायदा राणे मद्रास, मिंडा इंडस्ट्रीज यांना होईल.

UP तील विधानसभा निवडणुका आणि अंदाजपत्रकात एथॅनॉल आणि साखर उत्पादकांना काही फायदा होईल या अपेक्षेने आज साखर उत्पादक शेअर्स मध्ये तेजी होती. उदा :- उगार शुगर, धामापूर शुगर मावाना शुगर, श्री रेणुका शुगर, दालमिया भारत शुगर, प्राज इंडस्ट्रीज, इंडिया ग्लायकॉल ही शेअर्स तेजीत होते.

आज ऑटो अँसिलिअरीज कंपन्यांच्या शेअर्समध्ये होती. उदा WABCO इंडिया, भारत गिअर्स, राणे एंजिन,प्रीकॉल, राणे ब्रेक्स, उकल फ्युएल, ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंगस , शांती गिअर्स.

मारुतीने जुना स्टॉक क्लिअर करण्यासाठी ऑफर आणली आहे.कंपनी विविध मॉडेल्सवर Rs ३३००० ( स्विफ्ट) ते Rs ४३००० पर्यंत( एक्सप्रेसो) वर डिस्काउंट देणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने १०, ३०, ४० वर्षे मुदतीच्या US $ ४०० कोटी डिनॉमिनेटेड नोट्स जारी केल्या. इशूला ३ वेळा प्रतिसाद मिळाला. रिलायन्स इंडस्ट्री हा पैसा वर्तमान लोन रिफायनान्सिंग करण्यासाठी वापरेल.

USA मध्ये क्लास ८ ट्रक्सची विक्री वाढली याचा फायदा रामकृष्ण फोर्जिंग्स आणि भारत फोर्जला होईल.

आलेम्बिक फार्माच्या ‘CONTANT’ टॅब्लेट च्या जनरिकला USFDA कडून मंजुरी मिळाली.

WOCKHARDT Rs १००० कोटींचा राईट्स इशू आणण्याची शक्यता आहे.

अबन ऑफशोअरला RTG डीप ड्रिलर १ च्या विक्रीला परवानगी मिळाली.

UK JLR ची विक्री ७६३४ युनिट वरून ४००२ युनिट झाली. म्हणजे YOY विक्री ४९% ने कमी झाली.

बीजू ही झी लर्न मध्ये ५१% स्टेक घेण्याचा विचार करत आहे.

इंडिगो ही कंपनी दिल्ली ते पोर्ट ब्लेअर ही सेवा Rs ८५२२/- या दराने ९ जानेवारीपासून सुरु करेल.

ADF फूड ला PLI स्कीम अंतर्गत फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री म्हणून मान्यता मिळाली.

GM ब्रूवरीज चे तिसऱ्या तिमाहीचे निकाल उद्या जाहीर होतील .

LIC ने ACC सिमेंटमधील स्टेक ६.१४% वरून ५.६६% केला.

इन्फोएज या कंपनीची अंतरिम लाभांशावर विचार करण्यासाठी १८ जानेवारी २०२२ रोजी बैठक आहे.

आज साखर उत्पादक कंपन्या,ऑटो आणि ऑटो अँसिलिआरि मध्ये तेजी होती. फेडच्या मिनिट्स मधील एकंदर मूडमुळे सुरुवातीला जगातली सर्व मार्केट्स पडली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९६०१ NSE निर्देशांक निफ्टी १७७४५ बँक निफ्टी ३७४९० वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.