आजचं मार्केट – ७ जानेवारी २०२२

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ७ जानेवारी २०२२

आज क्रूड US $ ८२.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७४.२५ च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९६.२२ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.७१ VIX १७.६४ PCR निफ्टी १.५९ PCR बँक निफ्टी १.२२ होते.

USA मधील मार्केट्स डाऊ जोन्स S & P विशेषतः NASHDAQ मध्ये मंदी होती. एशियन आणि युरोपियन मार्केट्स तेजीत होती.USA मधील नॉन फार्म पे रोल आकडे आज येतील. सोने आणि चांदीमध्ये मंदी होती.

कझाकिस्तान आणि लिबिया मध्ये उत्पादनात अडचणी येत आहे त्यामुळे उत्पादन कमी होत आहे. त्यामुळे क्रुडमध्ये तेजी होत आहे.

FII ने Rs १९२६.७७ कोटींची विक्री केली तर DII ने Rs ८०१.०० कोटींची खरेदी केली.

रिलायन्स रिटेलने QUICK कॉमर्स फर्म ‘DUNZO’ मध्ये US $ २४० मिलियनची गुंतवणूक करून २५.८% स्टेक घेतला. ही कंपनी किराणा आणि इतर आवश्यक गोष्टीची डिलिव्हरी २० मिनिटात करते असा दावा करते. यामुळे रिलायन्सचा QUICK कॉमर्स मार्केट क्षेत्रात प्रवेश झाला.रिलायन्स इंडस्ट्रीने स्टर्लिंग आणि विल्सनचे १.८४ लाख शेअर्स घेतले .

टायटनने सांगितले की तिसऱ्या तिमाहीत त्यांची ज्वेलरीची विक्री ३७% ने वाढली. आणि विक्रीची तिकीट साईझ वाढली.
हिंदुजा ग्लोबल यांनी त्यांची हेल्थकेअर सर्व्हिस BARING ला Rs ८९४० कोटींना विकली. या कंपनीने १:१ बोनस आणि Rs १५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.हिंदुजा ग्लोबलला US $ १.०९ बिलियन हेल्थकेअर बिझिनेस विकून मिळाले आहेत. म्हणून Rs १५० प्रती शेअरपेक्षा जास्त लाभांश जाहीर होईल अशी गुंतवणूकदारांची अपेक्षा होती. ही अपेक्षा पूर्ण झाली नाही. त्यामुळे शेअर पडला.

उज्जीवन स्माल फायनान्स बँकेची डिसबर्समेंट १२०%, कलेक्शन कार्यक्षमता ११२% तर CASA रेशियो १८% वरून २०% झाला.

GM ब्रुअरीजचे तिसऱ्या तिमाहीत उत्पन्न वाढले प्रॉफिट कमी झाले त्याचप्रमाणे प्रॉफिट मार्जिन २४.८% वरून २०.६% झाले
आनंद राठी ने Rs ५ लाभांश जाहीर केला. रेकॉर्ड डेट २० जानेवारी २०२२ आहे.

स्टार हेल्थ इन्शुअरन्स आणि तेगा इंडस्ट्रीज या कंपन्यांमधील अँकर इन्व्हेस्टरचा लॉकइन पिरियड आज संपत आहे.
मॅक्रोटेक डेव्हलपर्सची विक्री वाढली आणि कर्ज कमी झाले.

जर्मनीच्या GBS कंपनीत HCL TECH ५१% स्टेक घेणार आहे.

ग्रीन एनर्जी कॉरिडॉर फेज २ (II) साठी Rs १२००० कोटी योजनेला मंजुरी मिळाली. याचा फायदा CESC , JSW एनर्जी, अडाणी ग्रीन यांना होईल.

आलेम्बिक फार्माच्या मेटासापोन या टॅब्लेट्सना USFDA ची मंजुरी मिळाली.

GE शिपिंग ही कंपनी ७ जानेवारी २०२२ ते ६ जुलै २०२२ दरम्यान मार्केट रूटने Rs ३३३ प्रती शेअर या भावाने शेअर बायबॅकवर Rs २२५ कोटी खर्च करेल.

आज ऑइल & गॅस, जेम्स आणि ज्वेलरी, रिअल्टी , बँका, स्टील, FMGC, QSR या क्षेत्रात तेजी होती.फार्मा मीडिया ऑटो यात काहीशी मंदी होती.

इझी ट्रिप प्लानर्स १२ जानेवारी २०२२ रोजी बोनस इशू करण्यावर विचार करतील.

D-मार्ट उद्या आपले तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करेल

LIC ने त्यांचा कमिन्समधील स्टेक १% ने कमी केला.

पासपोर्टच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सरकारने TCS बरोबर ९.५० वर्षांसाठी कॉन्ट्रॅक्ट केले.

कोळसा मंत्रालयाने १० कोळसा खाणींचा E-AUCTION रद्द केले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९७४४ NSE निर्देशांक निफ्टी १७८१२ आणि बँक निफ्टी ३७७३९ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.