आजचं मार्केट – १० जानेवारी २०२२

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १० जानेवारी २०२२

आज क्रूड US $ ८१.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७४.०० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९५.७७ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.७६ VIX १७.७१ निफ्टी PCR १.६१ बँक निफ्टी PCR १.२६ होते. शुक्रवारी इंट्राडे USA १० वर्षे बॉण्डयिल्ड १.८०% पर्यंत गेले होते.

FII ने Rs ४९६ कोटींची खरेदी केली तर DII ने Rs ११६ कोटींची विक्री केली. USA मध्ये व्याजाचे दर मार्च २०२२ पासून वाढतील असे तज्ञाचे मत आहे.

रेलटेलने Rs १.७५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला .

TCS ने २०१७,२०१८, २०२० या वर्षी बायबॅक केला.CMP पेक्षा १८% ते १९% जास्त बायबॅक प्राईस होती. शुक्रवारची CMP Rs ३८५० होती. मार्केटचा अंदाज आहे त्यानुसार बायबॅकची प्राईस Rs ४५०० असण्याची शक्यता आहे.

LIC ने ल्युपिनमधील स्टेक ७.८६% वरून ८.३९% पर्यंत वाढवला.

भारत डायनामिक्समधील स्टेक LIC ने ८.७% वरून कमी करून ८% केला.

ग्रासिम ही कंपनी सर्वात मोठी VSF( VISCOSE STAPLE FIBRE) उत्पादक आहे. या विभागाची उत्पादन क्षमता ३७% ने वाढवण्याचा विचार करत आहे. केमिकल बिझिनेस वाढवण्याची शक्यता आहे. पेन्ट व्यवसायात कंपनी उतरली आहे. व्हाईट पेंट विभागात अल्ट्राटेक सिमेंटचे डिस्ट्रिब्युशन नेटवर्क आहे. USA मधील शिनजियांग प्रांतातून कापुस आयात बंदीचा फायदा ग्रासिमला मिळेल.

आनंद राठीमधील अँकर इन्व्हेस्टरचा लॉकइन पिरियड आज संपेल.

सेबीने NSE निफ्टी मिडकॅप निवडक इंडेक्सवर डेरिव्हेटीव्ह लाँच करायला परवानगी दिली NSE ७ नवीन इंडेक्स डेरीव्हेटीव्ह्ज २४ जानेवारी रोजी F & O मध्ये लाँच करेल. निफ्टी १५० इंडेक्समधील २५ शेअर्सचा समावेश असेल.
कोर्टाने महिंद्रा & महिंद्राच्या एडिसन मोटर्सबरोबरच्या ‘SSANG याँग मोटर्स’ संबंधित US $ २५५ मिलियनच्या डीलला कोर्टाने परवानगी दिली.

TCS,इन्फोसिस, विप्रो १२ जानेवारी रोजी तर AB मनी, CESC, MINDTREE, टाटा मेटलीक्स, १३ जानेवारी २०२२ तर HCL TECH १४ जानेवारी २०२२ रोजी त्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

टेक महिंद्राने कटिंग एज एंटरप्राइझ मॉडर्नायझेशन सोल्युशनसाठी ‘PYZE’ बरोबर करार करार केला.

डिक्सन टेकने BEETEL टेलीटेक बरोबर JV केले. यामध्ये डिक्शनचा स्टेक ५१% आणि BEETEL चा ४९% स्टेक असेल.

आज टेक्सटाईल सेक्टरमधील कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. टेक्सटाईल सेक्टरचा चेहेरा मोहरा बदलण्याची शक्यता दिसत आहे. आतापर्यंत पॉवर कॉस्ट जास्त होती. ऍपरल किंवा फॅब्रिक साठी फ्री किंवा प्रेफरंशियल ट्रेड अग्रीमेंट नव्हती.
टेक्सटाईल मशिनरीसाठी भारत आयातीवर अवलंबून होता. चीनचा उत्पादन करण्याचा वेग जास्त होता
फॅशन सेगमेंटमध्ये स्पर्धेला तोंड देता येत नव्हते.

बदललेली स्थिती – MITRA ( मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड ऍपरल्स) या योजनेखाली मेगा टेक्सटाईल पार्क बनवले जातील आणि त्यामध्ये टेक्सटाईलची पूर्ण व्हॅल्यू चेन म्हणजे स्पिनिंग, विव्हिन्ग प्रोसेसिंग, डाईंग आणि प्रिंटिंग या प्रोसेस एकत्र होतील., PLI, RODTEP (रेमिशन ऑफ ड्यूटीज अँड टॅक्सेस ऑन एक्स्पोर्ट प्रॉडक्ट्स) यामुळे ड्युटी कमी झाली. फ्री ट्रेड अग्रीमेंट झाली. GST वाढवण्याचा निर्णय स्थगित ठेवला. EU,UK, कॅनडा,USA ने चीनमधून आयातीवर बंधने घातली. ड्युटी वाढवली. त्यामुळे भारताची निर्यात वाढली. व्हिएतनाम, कंबोडिया,चीन, बांगला देश हे देश कॉटनच्या पुरवठ्यासाठी भारताकडे पाहू लागले. कॉटनची निर्यात वाढली. याचा फायदा अंबिका कॉटन, हिमतसिंगका सीईड, ट्रायडंट, नितीन स्पिनर्स, सतलज टेक्सटाईल्स, वर्धमान टेक्सटाईल्स, सेंच्युरी टेक्सटाईल्स, किटेक्स गारमेंट्स, KPR मिल्स, बॉम्बे डाईंग, गोकुळदास एक्स्पोर्ट, वेलस्पन, इंडोकाउन्ट इंडस्ट्रीज इत्यादी टेक्सटाईल क्षेत्रातील कंपन्यांना होईल.
‘ENOXAPARIN’ याच्या निर्यातीवर बंदी घातली. याचा परिणाम ग्लॅन्ड फार्मा आणि झायड्स वर होण्याचा संभव आहे.

यावर्षी उसाचे उत्पादन कमी झाल्यामुळे साखरेचे उत्पादन कमी होईल त्यामुळे साखरेला चांगला भाव मिळेल.
पब्लिक सेक्टर बँकात सध्या FDI सीमा २०% आहे आणि प्रायव्हेट बँकात ७४% आहे. पण बँकिंग रेग्युलेशन ऍक्टमध्ये बदल करून PSB मध्ये ही सीमा वाढवण्याचा विचार आहे. सरकारला डायव्हेस्टमेन्ट करायची आहे. याचा परिणाम सेंट्रल बँक, IOB, पंजाब& सिंध बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, UCO बँकेवर होईल.

आज रुपया ३१ पैसांनी मजबूत झाला. टेक्सटाईल, रिअल्टी खते आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी होती. फार्मा सेक्टरमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

वेदांता आणि ONGC आंध्र प्रदेश ब्लॉकमध्ये Rs १२०० कोटी गुंतवणुक करेल. १२ डेव्हलपमेंट विहिरी खोदणार आहे. या प्रोजेक्टमध्ये ५१% ONGC चा आणि ४९% स्टेक वेदांताचा असेल.

१० फेब्रुआरीपासून UP मध्ये मतदान चालू होईल. १० मार्चला मतदान होऊन निवडणुकांचे निकाल जाहीर केले जातील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६०३९५ NSE निर्देशांक निफ्टी १८००३ बँक निफ्टी ३८३४७ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – १० जानेवारी २०२२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.