आजचं मार्केट – ११ जानेवारी २०२२

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ११ जानेवारी २०२२

आज क्रूड US $ ८१.२५ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७४ च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९५.८४ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.७६ VIX १७.८३ निफ्टी PCR १.६० तर बँक निफ्टी PCR १.२० होते

औरोबिंदो फार्मा त्यांच्या इंजेक्टिबल बिझिनेसमधील ३०% ते ३५% स्टेक Rs ४५०० कोटी ते Rs ५२५० कोटींना विकणार आहेत

इंडोनेशियाने कोळशाच्या निर्यातीवरील निर्बंध उठवले याचा फायदा आयात कोळसा वापरणाऱ्या टाटा पॉवरला होईल.

‘VI’ ने मोरॅटोरियम (AGR ड्यूजच्या बाकीसाठी) स्वीकारले. कंपनी सरकारला Rs १० च्या किमतीवर ३५.८% भांडवल इशू करेल. आता ‘VI’ मध्ये सरकार ३५.८% वोडाफोन २८.५% आणि A BIRLA१७.८% असेल. याचा परिणाम SBI, ICICI ऍक्सिस बँक यांच्यावर होईल. मोरॅटोरियमचे व्याज Rs १६००० कोटी असेल.

L & T ने हज़िरा येथील २ इथिलिन ऑक्साइड रिऍक्टर्स विदेशातील युनिटमध्ये पाठवली.

L & T इन्फोटेकने ‘SEARONIX’ आणि ‘SNOWFLAKES बरोबर सायबर सिक्युरिटीसाठी करार केला.

येत्या अंदाजपत्रकात नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनचा रोडमॅप सादर केला जाईल. याचा फायदा खते विशेषतः युरिया आणि DAP ही खते उत्पादन करणाऱयांना होईल. व्हायाबिलिटी गॅप फंडिंग संबंधित विचार केला जाईल.

LIC ने त्यांचा रामको सिमेंटमधील स्टेक ५.३५% वरून ६.३८% केला.

UFO मुव्हीजला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे सर्व्हिस टॅक्समध्ये सूट मिळाली .

Petm च्या कर्जाच्या डिसबर्समेंटमध्ये ४०१% वाढ झाली.

ऑरोबिंदो फार्माने ‘ORION’ बरोबर यूरोपमध्ये BIOSIMILAR डिस्टिब्युशनसाठी लायसेन्सिंग करार केला.
अहमदाबाद मुंबई तेजस एक्स्प्रेस आता रोजच्या ऐवजी आठवड्यातून ३ दिवस धावेल. याचा परिणाम IRCTC वर होईल.
१२ जानेवारी २०२२ पासून कॉटनच्या काँट्रॅक्टसवर ३% जादा मार्जिन द्यावे लागेल. नवीन किंवा वर्तमान काँट्रॅक्टसवर तसेच लॉन्ग किंवा शॉर्ट पोझिशनवर हे ३% जादा मार्जिन द्यावे लागेल. कॉटन साठी मार्केट ओव्हरबॉट आहे. त्यामुळे करेक्शन अपेक्षीत आहे. या वर्षी कॉटनची आवक चांगली होईल. जानेवारी अखेर एकूण उत्पादनाचा अंदाज येईल. भारतातून निर्यात होणाऱ्या कॉटनच्या किमती वाढल्यामुळे कॉटनची निर्यात कमी होईल.

काँट्रॅक्टस्मध्ये वापरल्या जाणार्या आयात मालाच्या गुणवत्ता आणि पुरवठ्याचा आढावा घेतला जाईल. आणि उपयोगितेची समीक्षा केली जाईल. शक्य असेल तेथे अशा प्रकारचा माल भारतीय कंपन्यांकडून खरेदी केला जाईल.

आज FII ने Rs १२४.२३ कोटींची विक्री केली तर DII नी Rs ४८१.५५ कोटींची खरेदी केली

आज चहा, रेल्वेसंबंधीत कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६०६१६ NSE निर्देशांक निफ्टी १८०५५ बँक निफ्टी ३८४४२ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.