आजचं मार्केट – १२ जानेवारी २०२२

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १२ जानेवारी २०२२

आज क्रूड US $ ८३.६० प्रती बॅरलच्या आसपास रुपया US $१= Rs ७३.८० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९५.६१ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.७४ VIX १७.७५ PCR निफ्टी १.६५ PCR बँक निफ्टी PCR १.१८ होते.

UP मधील १२ ग्राइंडिंग युनिटमध्ये लाईन २ चे काम अल्ट्राटेक सिमेंटने सुरु केले.

पेट्रोलसाठी मागणी ४% आणि डिझेल साठी मागणी १.६% ने वाढली याचा फायदा BPCL , IOC, HPCL या OMC ( ऑइल मार्केटिंग कंपन्या) ना होईल.

जेफरीजने टाटा स्टील, JSW स्टील, SAIL या कंपन्यांचे EPS चे अनुमान घटवले.

CLSA या रेटिंग एजन्सीने भारत फोर्जला डाऊनग्रेड केले.

हिंडाल्कोचे सबसिडीअरी नोवालिसने USA मध्ये एक अल्युमिनियम रिसायकलिंगचा प्लांट US $ ३६ कोटी गुंतवणूक करून लावला.

भारतातून ग्रॅफाइट इलेक्ट्रोडची निर्यात वाढली आहे याचा फायदा ग्राफाइट इंडिया आणि HEG या कंपन्यांना होईल.

HUL ने साबण आणि डिटर्जंट यांच्या किमती ३ % ते २०% ने वाढवल्या.

फेडरल बँक फायनान्सियल सर्व्हिसेसचा IPO आणून व्हॅल्यू अनलॉकिंग करणार आहे.

TTML या टेलिकॉम क्षेत्रातील कंपनीने ‘VI’ प्रमाणे AGR ड्यूजच्या व्याजाचे इक्विटीमध्ये रूपांतर करायचे ठरवले आहे. सरकारचे होल्डींग ९.५% च्या आसपास असेल . सरकारला Rs ४० ते Rs ४१ च्या किमतीवर हे शेअर्स अलॉट केले जातील.
‘VI’ ने काल AGR ड्यूजचे इक्विटीमध्ये रूपांतर करून सरकारला ३५.८% शेअर्स अलॉट करण्याचा निर्णय जाहीर केल्यावर कंपनीचा शेअर पडला. आज कंपनीने सांगितले की सरकारचा स्टेक ३५.८% असला तरी सरकार कंपनीची मॅनेजमेंट करणार नाही तसेच रेग्युलर ऑपरेशन्समध्ये हस्तक्षेप करणार नाही. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर नेमणुकीबाबतही सरकारने कोणत्याही अटी किंवा नियम केले नाहीत. त्यामुळे हा बदल सरकार आणि कंपनी दोघासाठी WINWIN परिस्थिती असेल. हे स्पष्टीकरण येताच ‘VI’ च्या शेअरमध्ये तेजी आली.’VI’ ने डायरेक्टर्सच्या नेमणुकीसंबंधातील नियमात बदल केला.

ईझी ट्रिप प्लानर्सने १:१ बोनस जाहीर केला.

इव्हान्स आणि इवानवेट मध्ये सीक्वेंट सायंटिफिकची ब्राझीलमधील सबसिडीअरी ३०% स्टेक Rs ४४.६ कोटींना खरेदी करणार आहे.

ग्रीव्हज कॉटन या कंपनीला दिलेले फंड बेस्ड आणि नॉन फंड बेस्ड वर्किंग कॅपिटॅल

लीमिटसाठी दिलेले रेटिंग इंडिया रेटिंग आणि रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड या क्रेडिट रेटिंग एजन्सीने कायम ठेवले. डिझेल ‘थ्री व्हीलर इंजिन्स’ची मागणी कमी होत आहे. CNG आणि इलेक्ट्रिक कडे शिफ्ट होत आहे म्हणून कंपनीने त्यांचे लक्ष नॉन ऑटो सेगमेंटकडे वळवले. उदा. २व्हीलर आणि ३ व्हीलर इलेक्ट्रिक इंजिन्स, डिझेल जनरेटर सेट्स, फार्म इक्विपमेंट्स आणि मरीन इंजिन्स. या नवीन व्यवसायापासून कंपनीला ४३% रेव्हेन्यू मिळाला.

आज IT क्षेत्रातील विप्रो या कंपनीने आपले तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीला तिसऱ्या तिमाहीत Rs २०४३२ कोटी उत्पन्न , EBIT Rs ३५५३ कोटी, प्रॉफिट Rs २९७० कोटी, EBIT मार्जिन १७.४% US $ उत्पन्न US $ २६३.८७ कोटी, चौथ्या तिमाहीत कॉन्स्टन्ट करन्सी ग्रोथ २% ते ४% राहील असे अनुमान कंपनीने केले आहे. कंपनीने तिसऱ्या तिमाहीत १०३०६ नवीन कर्मचाऱयांची नेमणूक केली. कंपनीने Rs १ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

इन्फोसिसने आपले तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीला उत्पन्न Rs ३१८७० कोटी, प्रॉफिट Rs ५८१० कोटी, EBIT Rs ७४८४ कोटी, EBIT मार्जिन २३.५%, US $ उत्पन्न US $ ४२५ कोटी,.कंपनीने चौथ्या तिमाहीतील रेव्हेन्यू ग्रोथ गायडन्स १९.५% ते २०% राहील असा अंदाज व्यक्त केला. कंपनीने US $ २५३ कोटींचे मोठे डील केले.
डेल्टा कॉर्प या कंपनीचे तिसऱ्या तिमाहीत उत्पन्न Rs २५२ कोटी आणि प्रॉफिट Rs ६१ कोटी झाले .

ITC गुंटूरमध्ये १०४ खोल्यांचे हॉटेल उघडणार आहे.

शरत इंडस्ट्रीज ही तामिळनाडूमधील कंपनी १८ जानेवारी २०२२ च्या बैठकीत राईट्स इशूवर विचार करणार आहे.
रेल्वेच्या जमिनीवर १०२ ठिकाणी रेलटेल EDGE DATA सेन्टर बनवणार आहे.

इन्शुअरन्स कंपन्यांनी प्रीमियम रेटमध्ये वाढ करण्यासाठी IRDAकडे मागणी केली आहे. गेल्या वेळेला हे दर २०१९ मध्ये ठरवण्यात आले आहेत. कोरोनाची पँडेमिक, तसेच ५ वर्षांसाठी ऑटो पॉलिसी, सरकार आणि कोर्टाचा क्लेम मंजूर करण्यासाठी आग्रह या सर्व कारणांमुळे या कंपन्यांची सॉल्वन्सी टिकवणे कठीण होत आहे.

LIC ने पॉवर ग्रीड मध्ये ७.५% स्टेक खरेदी केला.

डिसेंबर २०२१ या महिन्यासाठी CPI ( CONSUMER PRICE INDEX ) ५.५९% होता आणि नोव्हेंबर २०२१ या महिन्यांसाठी IIP १.४% होते.

आज रिअल्टी, केमिकल्स, मिडकॅप शेअरमध्ये तेजी होती.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६११५० NSE निर्देशांक निफ्टी १८२१२ बँक निफ्टी ३८७२७ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.