आजचं मार्केट – १३ जानेवारी २०२२

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १३ जानेवारी २०२२

आज क्रूड US $ ८४.९४ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७४ च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९४.९७ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.७५ VIX १७ PCR निफ्टी १.६५ PCR बँक निफ्टी १.१४ होते.

USA, युरोपमध्ये तेजी होती आशियायी मार्केट्समध्ये माफक मंदी होती प्रोड्युसर्स प्राईस इंडेक्स, तसेच जॉबलेस डाटा येणार आहे. FII ने Rs १००१ कोटींची विक्री केली तर DII ने Rs १३३२ कोटींची खरेदी केली.

JLR ची विक्री ८०१२६ युनिट ( ३७% ने कमी) झाली.

कोटक महिंद्रा बँकेतील प्रमोटर्स होल्डिंग २६% पर्यंत मर्यादित करणार.

लुमॅक्सने EV कॉम्पोनंटचे उत्पादन सुरु केले.

येझदी ब्रँड मोटारसायकल भारतात पुन्हा लाँच होत आहे.

HKG या कंपनीने तुमच्याजवळ २ शेअर्स असतील तर तुम्हाला १ बोनस शेअर मिळेल असे जाहीर केले.

LIC ने तिसऱ्या तिमाहीत टाटा एलेक्सि मध्ये १.०४% स्टेक ( ६४९७८६ शेअर्स) घेतला.

मारुती लिमिटेडने सांगितले की सध्या सेमी कंडक्टर चिपची टंचाई हा प्रॉब्लेम आहे पण हळूहळू ही टंचाई दूर होण्याच्या मार्गावर आहे. EV साठी लागणाऱ्या बॅटरीची कॉस्ट सध्या खूप आहे तीही हळूहळू कमी होईल.कंपनी २०२५ पर्यंत EV लाँच करेल.

ITD सिमेंटेशन ला Rs ४६०० कोटींची ऑर्डर मिळाली.

TVS मोटर्सने स्वीगी बरोबर MOU केले. स्वीगी फूड डिलिव्हरी साठी TVS मोटर्सची EV वापरेल.

रामकृष्ण फोर्जिंगला स्पिंडल पुरवण्यासाठी Rs ५७.५ कोटीची ऑर्डर मिळाली.

पॉस्को या दक्षिण कोरियातील कंपनी आणि अडाणी ग्रुपने गुजराथमध्ये स्टील प्लांट लावण्यासाठी MOU केले. या प्रोजेक्टमध्ये US $५ बिलियन एवढी गुंतवणूक केली जाईल.

आज माईंड ट्री या IT क्षेत्रातील कंपनीने तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. उत्पन्न Rs २७५० कोटी, प्रॉफिट Rs ४३७.५० कोटी US $ उत्पन्न US $ ३६.६ कोटी, कॉन्स्टन्ट करन्सी ग्रोथ ४.७% EBIT मार्जिन १९.२% ATTRITION रेट २१.९%

AB मनी या कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. उत्पन्न आणि प्रॉफिट दोन्ही वाढले.

Paytm चा शेअर दिवसेंदिवस मंदीत जात आहेत. त्याची पुढील कारणे दिसतात – कंपनीने IPO मध्ये शेअर्सची किंमत खूप ठेवली. कंपनी ज्या क्षेत्रात काम करते त्या क्षेत्रात खूप स्पर्धा आहे. कंपनी कोठल्याही सेगमेंटमध्ये मार्केटलीडर नाही. USA फेड व्याजाचे दर वाढवणार असल्यामुळे जगातील सर्व न्यू एज /टेक कंपन्यांवर प्रतिकूल परिणाम होईल. वॉलेट हा कंपनीचा ७०% उत्पनाचा स्रोत आहे RBI ने वॉलेट चार्जेसवर मर्यादा घातली. तसेच IRDA ने त्यांचा इन्शुअरन्स बिझिनेस चालू करण्याचा प्रस्ताव रद्द केला. टॉप मॅनेजमेंट मधील तीन एक्झ्युटिव्ह्ज कंपनी सोडून गेले. MACQUAIRE, आणि JM फायनान्सियल यांनी कंपनीच्या शेअरला डाऊनग्रेड केले.

TORUS कलिंग BLOCKCHAIN IFSC ने BSE च्या आंतरराष्ट्रीय आर्म इंडिया INX बरोबर देशातली पहिल्या क्रिप्टो फ्युचर्स ETF गिफ्ट सिटी मध्ये लाँच करण्यासाठी कॉलॅबोरेशन केले. हे प्रॉडक्ट या वर्षअखेर IFSCA ( इंटरनॅशनल फायनान्सियल सर्व्हिसेस सेंटर्स ऑथॉरिटी) आणि इतर मंजुरी मिळाल्यावर लाँच केले जाईल.

बिटकॉइन आणि ETHEREUM फ्युचर्स ETF आणि METAVERSE लिस्टेड लार्जकॅप डिस्काउंट सर्टिफिकेट्स लाँच करण्यासाठी TORUS क्लिंग ने MOU केले. TORUS क्लिंग इंडिया INXला डीप लिक्विडीटी स्मार्ट ऑर्डर रुटिंग द्वारे पुरवेल. हे ETF आणि आशियाई डिस्काउंट सर्टिफिकेट्स USA बाहेरचा पहिला प्रयत्न आहे. TORUS कलिंगने US $ १ बिलियन AUM चे लक्ष्य निश्चित केले आहे.

GTPL हाथवेचे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले EBIT मार्जिन वाढले.

नजारा टेक्नॉलॉजीज ची सबसिडीअरी NODWIN गेमिंगने Rs ४.९ कोटींना प्लॅनेट सुपरहिरोजचे मर्चन्डाईझ रिटेलरचे अक्विझिशन केले .

CESC चे प्रॉफिट २५% ने वाढून Rs ३२८ कोटी, उत्पन्न Rs २८२६ कोटी, कंपनीने Rs ४.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला रेकॉर्ड डेट २५ जानेवारी २०२२ आहे. इतर उत्पन्न Rs ४९ कोटींवरून Rs १३० कोटी झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६१२३५ NSE निर्देशांक निफ्टी १८२५७ बँक निफ्टी ३८४६९ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.