आजचं मार्केट – १४ जानेवारी २०२२

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १४ जानेवारी २०२२

क्रूड US $ ८४.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७४.१० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९४.७७ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.७२ VIX १६.७६ PCR निफ्टी १.६१ बँक निफ्टी PCR १.०५ होते.

USA मध्ये महागाई ४० वर्षातील कमाल स्तरावर आहे. आहे. मार्च २०२२ पासून फेड दरवाढ सुरु करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.ऍपल, अमेझॉन या कंपन्यांचे शेअर्स मंदीत होते ज्युबिलण्ट फूड्स या कंपनीची शेअर स्प्लिटवर विचार करण्यासाठी २ फेब्रुवारी २०२२ रोजी बैठक आहे.

रेटगेन ट्रॅव्हल्स चा लॉकइन पिरियड आज संपत आहे.

टाटा मेटॅलिक्सचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल कमजोर आले.

USFDA ने त्यांनी केलेल्या ऑगस्ट २०२१ मधील ऑरोबिंदो फार्माच्या हैदराबाद युनिटच्या इन्स्पेक्शन नंतर वॉर्निंग लेटर दिले.

नेल्कोला ३ महिन्यासाठी सॅटलाईट ब्रॉडबँड एक्स्पेरिमेंटसाठी ISRO बरोबर लायसेन्स दिले.

AB फॅशन आणि रिटेल लिमिटेड हाऊस ऑफ मसाबा लाइफस्टाइल मध्ये ५१% स्टेक Rs ९० कोटींना खरेदी करणार आहे

डिसेंबर २०२१ साठी WPI १३.५६% ( १४.२३ ) झाला.

संसदेचे पहिले अंदाजपत्रक सत्र ३१ जानेवारी २०२२ पासून ११ फेब्रुवारी २०२२ पर्यंत तर दुसरे सत्र १४ मार्च २०२२ पासून ८ एप्रिल २०२२ पर्यंत असेल.

हिरो मोटो न सॅन साल्वाडोरमध्ये नवीन रिटेल स्टोर्स उघडले. हिरो मोटोची विक्री डिसेंबर महिन्यात ७.२६लाख युनिट झाली. टाटा मोटर्सची विक्री डिसेंबर महिन्यात २.१९ लाख युनिट एवढी झाली. मारुतीची पॅसेंजर कार विक्री डिसेंबर २०२१ मध्ये १.१२ लाख युनिट झाली. SML इसुझू ची युटिलिटी व्हेईकल विक्री डिसेंबर २०२१ महिन्यात ९७१३७ युनिट झाली.

अशोका बिल्डकॉनने Rs ८३० कोटींच्या प्रोजेक्टसाठी सगळ्यात कमी बोली लावली.

कोळश्याच्या आंतरराष्ट्रीय किमतीत वाढ होत आहे. इंडोनेशियातून ४ ते ५ टन प्रती महिना पुरवठ्यात सुधारणा दिसेल. आज झिंक आणि निकेल तेजीत होते.

PSI सर्व्हिसेसबरोबर डाटामॅटीक्सने लॉंगटर्म कॉन्ट्रॅक्ट केले.

CPC च्या किमती वाढल्यामुळे रेन इंडस्ट्रीजला फायदा होईल.

PVC च्या किंमत कमी झाल्यामुळे प्रिन्स पाईप ला फायदा होईल.

हिंदुजा ग्लोबल ह्या कंपनीची बायबॅक, अक्विझिशन मर्जर च्या संधीवर विचार करण्यासाठी १४ जानेवारी २०२२ रोजी बैठक आहे. या कंपनीच्या लाभांशासाठी १८ जानेवारी ही रिकॉर्ड डेट निश्चित केली आहे.

मदर्सन सुमीने वायरिंग हार्नेस अंडरटेकिंगच्या डीमर्जर साठी १७ जानेवारी २०२२ ही रेकॉर्ड डेट ठरवली आहे.

ग्लेनमार्क स्पेशालिटी SA या कंपनीला USFDA कडून ‘RYALTIR नसाल स्प्रे साठी मंजुरी मिळाली.

AGS Transact टेक्नॉलॉजी या कंपनीचा IPO १९ जानेवारी २०२२ ला ओपन होऊन २१ जानेवारी २०२२ला बंद होईल. प्राईस बँड Rs १६६ ते Rs १७५, मिनिमम लॉट ८५ शेअरचा आहे IPO पूर्णपणे OFS असेल. OMNICHANEL पेमेंट सोल्युशन प्रोवाइडर, बँकिंग ऑटोमेशन सोल्युशन प्रोवाइडर, इतर ऑटोमेशन सोल्युशन प्रोवाइडर या क्षेत्रात कंपनी कार्यरत आहे. ATM मॅनेजमेंट सेगमेंटमध्ये सेकंड लार्जेस्ट कंपनी. लार्जेस्ट डिप्लॉयर ऑफ POS टर्मिनल्स आहे.

बायोकॉन MYLAN चा बायोसिमिलर बिझिनेस अंशतः कॅश अंशतः इक्विटी मर्जर रूटने खरेदी करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. बायोकॉन बायालॉजीक्स आणि MYLAN बायोसिमिलर्स यांच्या मर्जरनंतर US $ १० बिलियन इक्विटी ची मोठी कंपनी फॉर्म होई. बायोकॉन ह्या नवीन कंपनीत मेजॉरिटी स्टेक होल्डर असेल यासाठी बायोकॉन MYLAN कडून US $ १.५ बिलियनचे शेअर्स खरेदी करेल.

टेक्सटाईल, शुगर, ऑटो अँसिलिअरी,क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६१२२३ NSE निर्देशांक निफ्टी १८२५५ बँक निफ्टी ३८३७० वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

2 thoughts on “आजचं मार्केट – १४ जानेवारी २०२२

  1. उद्धव बाबुराव तिरुखे

    अतिशय सोप्या सुरेख आणि सुटसुटीत भाषेत मॅडमनी शेअर मार्केट बद्दल एक प्रकारची जागृती सर्वसामान्य जनतेत केले मॅडमचे धन्यवाद

    Reply
  2. उद्धव बाबुराव तिरुखे

    अतिशय साध्या भाषेमध्ये शेअर मार्केटबद्दल माहिती

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.