आजचं मार्केट – १९ जानेवारी २०२२

आज क्रूड US $ ८९.०० प्रती बॅरलच्या आसपास रुपया US $१= ७४.७५ च्या आसपास US $ निर्देशांक ९५.७६ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.८८ ( दोन वर्षाच्या कमाल स्तरावर) VIX १८ PCR निफ्टी १.१९ PCR बँक निफ्टी ०.९७ होते.
सध्या ओपेक ठरलेल्या टार्गटप्रमाणे उत्पादन करत नाहीत. लिबिया आणि UAE या देशांमध्ये क्रूडचे उत्पादन कमी होत आहे. कझाकस्थान आणि नॉर्थ डाकोटा मधील उत्पादनही कमी झाले. रशिया आणि मिडलईस्ट मध्ये जिओपॉलिटिकल टेन्शन आहेत. इराक आणि तुर्कस्तानमध्ये स्फोट झाले. इराकमधून तुर्कस्तानात जाणाऱ्या पाइपलाइनमध्ये स्फोट झाले.

चीन त्यांच्या अर्थव्यवस्थेत लिक्विडीटी इंजेक्ट करत आहे तर फेड आता लिक्विडिटी कमी करण्यासाठी उपाय योजेल.

USA मध्ये काल गोल्डमन साक्सचे निकाल कमजोर आले. फायनान्सियल आणि TECH शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. त्यामुळे USA मधील डाऊ जोन्स, S&P आणि NASHADAQ हे तिन्ही निर्देशांक मंदीत होते. त्यामुळे USA ची मार्केट्स कॉन्सॉलिडेशनमध्ये होती. USA होम सेल्सचे आकडे खराब आले. २६ जानेवारी २०२२ रोजी USA फेड ची बैठक आहे. वाढती महागाई, क्रूडचे वाढते दर, वाढते बॉण्ड यिल्ड लक्षात घेऊन फेड एका मजबूत दर वाढीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. युरोपियन मार्केट्स मंदीत होती. तर आशियायी मार्केट्सही माफक मंदीत होती.

बजाज फायनान्स चे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले. NII मध्ये ४०% वाढ होऊन Rs ६००० कोटी झाले. NIM १३.२४% होते. प्रॉफिट Rs २१२५ कोटी होते. AUM ( ऍसेट अंडर मॅनेजमेंट) मध्ये २६.३% ग्रोथ झाली. ऍसेट गुणवत्तेतही सुधारणा झाली.

टाटा एलेक्सि, L&T टेक्नॉलॉजी, ICICI पृ, सारेगमचे, JSW एनर्जी निकाल चांगले आले.स्टरलाईट टेक्नॉलॉजी ही कंपनी फायद्यातून तोट्यात आली. कंपनीकडे Rs ११७०० कोटींचे ऑर्डरबुक आहे.

मेडप्लसहेल्थच्या अँकर इन्व्हेस्टर्सचा लॉकइन पिरिड संपला.

ज्युबिलण्ट फुड्सने भारतात बंगलोर येथे पहिले ‘POPEYES’ रेस्टारंट सुरु केले. POPEYES हा USA मधील चिकनचा प्रसिद्ध ब्रँड आहे.

जिओ ने २० लाख स्बस्क्राइबर, भारती एअरटेलने १३ लाख सब्सक्राइबर्स जोडले तर ‘VI’ ने १९ लाख सब्सक्राइबर्स गमावले.

आज वेदांतामध्ये ३.०८ कोटी शेअर्सचे CMP वर ४% डिस्काउंटने ब्लॉक डील झाले .

आज बजाज ऑटो, OFSS, ICICI लोंबार्ड,CEAT, JSW एनर्जी, तेजस नेटवर्क्स हे त्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

टाटा मोटर्स CNG कार्सचे उत्पादन चालू करेल.

BHEL ने T -९१ ग्रेड सीमलेस स्टील ट्यूबचे यशस्वी उत्पादन सुरु केले.

JK पेपरने गुजरातप्लान्ट मध्ये पॅकेजिंग पेपरचे उत्पादन सुरु केले.

M & M ने हिरो इलेक्ट्रिक बरोबर करार केला.

IOC ने IGL बरोबर गॅस बेस्ड अर्थव्यवस्था बनवण्यासाठी स्ट्रॅटेजिक करार केला.IOC IEX कडून ४.९३% शेअर्स खरेदी करेल.

टाटा मोटर्स येत्या ५ वर्षात EV ची १० मॉडेल्स लाँच करेल. टाटा मोटर्सने टिआगो आणि टिगॊर याची CNG मॉडेल्स अनुक्रमे Rs ६.०९ लाख आणि Rs. ७.०९ लाख किमतीला लाँच केली. नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदीची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवली. एअर बबल रूटने मात्र आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालू राहतील.

ल्युपिनने शेनझेन फोंकू फार्माबरोबर चीनमध्ये औषध विक्रीसाठी करार केला.

JSW एनर्जी मधील स्टेक LIC ने ७.४७% वरून ९.०१% केला तर एशियन पेन्ट्स मधील स्टेक १.४९% वरून १.८५% केला

अंदाजपत्रकात स्पेशल इकॉनॉमिक झोन ACT मध्ये सुधारणा करून SEZ ला इंफ्राचा दर्जा दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

FY २२ मध्ये पब्लिक सेक्टर बँकांमध्ये सरकारने Rs २०००० कोटी भांडवल घालण्याचे लक्ष्य ठेवले आहे. FY २३ साठी PSB कडून रिकॅपिटलायझेशनसाठी मागणी नाही.

सरकार पुन्हा प्रायव्हेट ट्रेन सुरु करण्यासाठी पुन्हा बोली मागवण्याची शक्यता आहे. यामध्ये HAULEGE चार्जेस आणि रेव्हेन्यू शेअरिंग अग्रीमेंट मध्ये दिलासा देण्याची शक्यता आहे.

कोल इंडिया ने सांगितले की E-ऑक्शन सप्लाय ३१% ने वाढला.

एनर्जी, मेटल, मेडिया, बँका या क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी होती.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६०११७ NSE निर्देशांक निफ्टी १७९४३ बँक निफ्टी ३८०६६ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.