आजचं मार्केट – २४ जानेवारी २०२२

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २४ जानेवारी २०२२

आज क्रूड US $ ८८.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७४.६० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९५.७४ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.७३ VIX २२.९१ PCR निफ्टी ०.५१ आणि PCR बँक निफ्टी ०.४९ होते. आज VIX २५% वाढले.
ज्या शेअर्समध्ये FII ची गुंतवणूक असते ते शेअर्स जास्त पडले.

२५-२६ जानेवारीला USA च्या फेडची मिटिंग आहे. या मीटिंगकडे जगातील सर्व मार्केट्स लक्ष ठेवून आहेत. या मीटिंगमध्ये फेड व्याज दर वाढवण्याचा निर्णय अलीकडे आणते काय या कडे सर्वांचे लक्ष आहे. या बरोबरच ओमिक्रोनचा वाढणारा प्रादुर्भाव आणि रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये वाढणारे ताणतणावही मार्केटला काळजीग्रस्त करत आहेत.
भारतामध्ये १ फेब्रुवारी २०२२ ला अंदाजपत्रक सादर केले जाईल. त्याच्यातील प्रस्ताव/ तरतुदी यांचाही विविध औद्योगिक क्षेत्रांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

या अंदाज पत्रकात लॉजिस्टिक आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्राला उत्तेजन देण्यासाठी सरकार ‘ ‘P M गतीशक्ती’ हा महत्तवाकांक्षी प्रकल्प सुरु करणार आहे. तसेच कोळश्यापासून गॅस बनवण्यासाठी ( कोल गॅसिफिकेशन) उत्तेजन देण्याची शक्यता आहे. या मध्ये १५ वर्षांचा टॅक्सहॉलीडे, कॅपिटल गुड्सवरील कस्टम ड्युटीमध्ये सूट आणि सबसिडीचा समावेश असण्याची शकते. ह्या योजनेनुसार १०० MT कोळशाचे गॅसिफिकेशन करण्याची योजना असेल.
या सगळ्याचा परिणाम म्हणजे भारतीय मार्केट दिवसभर कोसळत राहिले. जेमतेम शेवटचा अर्धा तास थोडे सावरले. सर्व क्षेत्रात आणि विशेषतः अलीकडे लिस्टिंग झालेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

HP ADHESIVES आणि सुप्रिया लाईफसायन्सेस या कंपन्यांच्या अँकर इन्व्हेस्टर्सचा लॉक-इन पिरियड आज संपत आहे.

CYIENT हे कंपनी ज्या युनिटमधून कमी प्रॉफिट होते अशा युनिट्समधील स्टेक २०२२ मध्ये विकणार आहे.

AGS ट्रांसक्टचा IPO ७.७९ पट भरला.

बंधन बँक, ICICI बँक ( PAT Rs ६१९४ कोटी, NII Rs १२३६ कोटी, GNPA ४.१३%, NNPA ०.८५%, CASA ४७.२४%, ऍडव्हान्स १८% वाढले. स्लीपेजिस कमी झाली.). JSW स्टील ( प्रॉफिट, उत्पन्न, वाढले पण मार्जिन कमी झाले), CSB बँक, GLAND फार्मा,सुप्रीम पेट्रो,सुप्रीम इंडस्ट्रीज,शारदा क्रॉपकेम, वर्धमान टेक्सटाईल्स, इनॉक्स लीजर, ग्रीन पॅनल, स्टील स्ट्रिप्स यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

येस बँक, L&T फायनान्सियल होल्डिंग, महिंद्रा EPC, जय भारत मारुती (उत्पन्न वाढले, प्रॉफिट कमी झाले) यांची निकाल कमजोर आले.

टिटाघर वॅगनच्या सबसिडीअरीला इटालीमधून Rs २३८० कोटींची ऑर्डर मिळाली.

NSE ने त्यांचे सिलेक्ट मिडकॅपचे डेरिव्हेटीव्ह लाँच केले. याचा ट्रेडिंग लॉट ७५ चा असेल.

वांडरेला पार्कचा बंगलोर पार्क उघडला.

गोवा कार्बनच्या छत्तीसगढमधील विलासपूरमधील प्लांटमध्ये कामकाज सुरु झाले.

ट्यूब इन्व्हेस्टमेंट्स क्लीन मोबिलिटी ऑपरेशनमध्ये Rs ३५० कोटी गुंतवणार आहे.. CELLESTIAL मध्ये ७० % स्टेक Rs १६० कोटींमध्ये खरेदी करणार.

Paytm ने छोट्या शहरात msme ला कर्ज देण्यासाठी ‘फुलरटन’ बरोबर करार केला.

NINL (नीलांचल इंस्पात निगम लिमिटेड) मधील सरकारचा स्टेक कोण विकत घेणार. हे CDG (कोअर ग्रुप ऑफ सेक्रेटरीज ऑन डायव्हरेस्टमेन्ट) ठरवेल. NINL मध्ये MMTC चा ४९.७% स्टेक आहे तर NMDC चा १०.१०% स्टेक आहे.
आज मार्केटमध्ये इंट्राडे निफ्टी १७००० च्या खाली गेले होते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५७४९१ NSE निर्देशांक निफ्टी १७१४९ आणि बँक निफ्टी ३६९४७ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.