आजचं मार्केट – २५ जानेवारी २०२२

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २५ जानेवारी २०२२

आज क्रूड US $ ८७.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७४.७० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९५.९१ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.७७ VIX २३.०० PCR निफ्टी ०.७१ PCR बँक निफ्टी १.१० होते.

आज USA ची मार्केट्स तेजीत होती. युरोप आणि आशियातील मार्केट्स मंदीत होती. सोने आणि चांदी मंदीत होती. फेडची दोन दिवसांची मीटिंग आज सुरु होऊन उद्या संपेल.

युक्रेन आणि रशिया यांच्यातील वादात आता नाटोने आपले सैन्य स्टॅन्ड बाय म्हणून पाठवली आहे. जगाच्या या भागातील ताणतणाव वाढतच आहे. ओमिक्रोन बरोबरच आणखी व्हरायन्टच्या बातम्या येत आहेत.

आज ऍक्सिस बँकेचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. बँकेला Rs ३६१४ कोटी प्रॉफिट तर NII Rs ८६५३.०० कोटी झाले. ऍसेट गुणवत्तेत सुधारणा दिसली.

मारुतीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. कंपनीचे उत्पन्न Rs २३२४६ कोटी तर इतर उत्पन्न Rs ३२८ कोटी झाले. प्रॉफिट Rs १०११ कोटी झाले. मार्जिन ६.७% होते. मारुतीने सांगितले की सेमी कंडक्टर चिपच्या पुरवठ्यात सुधारणा होत आहे. पण अजून अनिश्चितता आहे.

फेडरल बँकेचे प्रॉफिट Rs ५२० कोटी झाले. NII १५३९.०० कोटी झाले. NPA मध्ये घट झाली.
रामको सिमेंट ( प्रॉफिट कमी झाले.) , श्रीराम ट्रान्सपोर्ट , दीपक फर्टिलायझर यांचे मार्जिन कमी झाले. त्यामुळे हे निकाल कमजोर म्हणावे लागतील.
SBI कार्ड्सचे NIM कमी झाले कॉस्ट ऑफ क्रेडिट वाढली. आणि SBI कार्ड्सचा मार्केटशेअर कमी होत आहे.निकाल चांगले होते

IEX, मोतीलाल ओसवाल,बर्गर किंग (उत्पन्न वाढले तोटा कमी झाला). स्टार सिमेंट (कंपनी तोट्यातून फायद्यात आली), आदित्य बिर्ला सन लाईफ, SRF ( Rs ४.७५ लाभांश दिला.), युनायटेड स्पिरिट्स, सिप्ला, टॉरंट फार्मा ( Rs २५ लाभांश) या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

कार ट्रेड टेक,( तोटा वाढला, उत्पन्न वाढले), राणे इंजिन ( उत्पन्न वाढले पण कंपनी फायद्यातून तोट्यात आली.) इंडिया मार्ट ( प्रॉफिट कमी झाले), सिम्फनी यांचे निकाल असमाधानकारक होते.

भारती एअरटेलने कार्बन फूटप्रिंट कमी करण्याच्या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात २१ MW सोलरपॉवर स्टेशन सुरु केले.

विप्रोनी ENCORE THEME टेकनॉलॉजिमध्ये ८३.४% स्टेक घेतला होता काल कंपनिने आणखी १३.३ % स्टेक घेतला त्यामुळे आता विप्रोचा या कंपनीत ९६.७% स्टेक झाला.

पीडिलाइट आणी APL अपोलो यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल ठीक होते.

HAL ला FM ७ साठी Rs १०० कोटी टॅक्स रिफंड मिळाला. Rs २२० कोटी कॉर्पोरेट टॅक्स क्रेडिट मिळाले.

IFCI सरकारला Rs १०० कोटींचे शेअर जारी करेल. त्याच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने यासाठी मंजुरी दिली.
क्राफ्ट्समन ऑटोमेशनचे प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न वाढले.

BPCL ने सिटी गॅस डिस्ट्रिब्युशनसाठी बोली जिंकली.

TCS ने रिटेलर्सना मायक्रोसॉफ्ट क्लाऊडची सुविधा देण्यासाठी करार केला.

आज मार्केटने सकाळी आपला मंदीचा ट्रेंड सुरु ठेवला. निफ्टी इंट्राडे लो १६८५० पर्यंत गेला होता.पण एकापाठोपाठ चांगले कॉर्पोरेट रिझल्ट्स यायला लागले. तसेच आज USAच्या मार्केट्समध्येही मूड सुधारला.बँक निफ्टी मध्ये खालच्या स्तरापासून १२९० बेसिस पाईंट्सची रिकव्हरी आली. आज ५ दिवसांच्या मंदीला लगाम लागला.

वेदांत फॅशन्स लिमिटेड या टेक्सटाईल क्षेत्रातील कंपनीचा ( मान्यवर ब्रँड) IPO ४ फेब्रुवारी ला ओपन होऊन ८ फेब्रुवारीला बंद होईल. हा IPO पूर्णपणे OFS असेल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५७८५८ NSE निर्देशांक निफ्टी १७२७७ बँक निफ्टी ३७७०६ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

2 thoughts on “आजचं मार्केट – २५ जानेवारी २०२२

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.