आज क्रूड US $ १०३ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs७५.७५ च्या आसपास होते. US$ निर्देशांक ९७.२० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.९२ VIX ३२.५८ PCR निफ्टी १.८६ PCR बँक निफ्टी १.०७ होते. ( एक्स्पायरी डेट ३१/०३/२०२२)
आज USA मधील, युरोपमधील आणि एशियातली मार्केट्स तेजीत होती.सोने आणि चांदी तेजीत होते. तसेच इतर मेटल्स निकेल अल्युमिनियम झिंक कॉपर ही तेजीत होते.
USA च्या अध्यक्षांनी युक्रेन आणि रशिया युद्धात हस्तक्षेप करू असे सांगितल्यावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी रशियाच्या अण्वस्त्र फौजांना तयार राहायला सांगितले.दरम्यान युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरूच आहे. युरोपियन युनियननी रशियन बँकांना स्विफ्ट ( सोसायटी फॉर वर्ल्डवाईड इंटरबॅन्क फायनान्सियल कम्युनिकेशन ) मधून बाहेर काढले. परंतु ऑइल आणि गॅस यांच्यासाठी असलेल्या पेमेन्टसाठी सूट दिली गेली.बँक ऑफ रशियाने व्याजाचे दर ९.५% वरून २०% केला. रुबलचा US $१ = १०६ रुबल्स एवढं खाली गेला.
ब्रिटिश पेट्रोलियम या कंपनीने त्यांचा ROSENEFT मधील २०% स्टेक विकला.
EID पॅरी या कंपनीने Rs ५.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
रेन इंडस्ट्रीजचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल खराब आले. कंपनी फायद्यातून तोट्यात गेली.
SJVN ला ४०० MW चा सोलर प्रोजेक्ट बनवण्यासाठी ऑर्डर मिळाली.
रशियन सिक्युरिटीज फॉरिनर्सनी विकण्यावर बंदी घातली.
BEL ला ८९५ T-90च्या ९५७ रणगाड्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी ऑर्डर मिळाली.
रशिया मेटल्स, रफ डायमंड्स ( २१% पुरवठा ) ऑइल आणि गॅस यांचा मोठा निर्यातदार आहे. युक्रेन आणि रशियातील युद्धामुळे रशियातून आयात बंद / कमी होईल त्यामुळे आयात करणारे देश इतर पर्यायाचा विचार करू लागतील. त्यामुळे हे युद्ध संपेपर्यंत मेटल्स मध्ये तेजी राहील असा तद्न्यांचा अंदाज आहे.
सर्व फ्युचर ग्रुपचे शेअर्स तेजीत होते कारण रिलायन्स इंडस्ट्रीजने २५० स्टोर्सचे व्यवहार चालू केले.
बायोकॉन बायालॉजीक्सने VIATRIS INC चा बायोसिमिलर बिझिनेस US $ ३३३५ बिलियनला घेण्याचा करार केला.
झीपझाप लॉजिस्टिक्स मध्ये महिंद्रा लॉजिस्टिक्स ६०% स्टेक घेणार आहे.
बेलारूस सीमेजवळ युक्रेन आणि रशिया यांच्यात वाटाघाटी सुरु होणार हे समजताच मार्केट सुधारले. सकाळी मार्केट उघडले त्यावेळेला ९०० पाईंट सेन्सेक्स घसरले होते. एवढी सगळी घसरण भरून काढून मार्केट ३८८ पाईंट तेजीत राहिले. आणि १६८०० हा निफ्टीचा टप्पा मार्केटने गाठला. बँक निफ्टीने ३६२०० चा टप्पा गाठला
आज IT मेटल्समधील शेअर्स तेजीत होते.आज दिवसाच्या लोपाईण्ट पासून १४१४ पाईंट मार्केट सुधारले.
बर्मन ग्रुप एव्हरेडी इंडस्ट्रीजमधील ३१.३% स्टेक Rs ३२० प्रती शेअर या भावाने Rs ७३० कोटींना घेणार आहे. मार्केटमध्ये खरेदी करून आणि ओपन ऑफर आणून हा स्टेक घेणार आहेत.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ५६२४७ NSE निर्देशांक १६७९३ बँक निफ्टी ३६२०५ वर बंद झाले.
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!