आज क्रूड US $ १०९.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७५.७५ च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९७.९९ US १० वर्षे बॉण्ड यिल्ड २.३३ VIX २०.६१ होते.
आज USA, यूरोपमधील मार्केट्स मंदीत होती आशियातील मार्केट्स किंचित तेजीत होती. सोने आणि चांदी मंदीत होती. आजपासून पेट्रोल आणि डिझेल चे भाव Rs ०.८० ने वाढवले.
रशियाने कीव्ह आणि आसपासच्या प्रदेशात हल्ले चालू ठेवले आहेत. USA ने युक्रेनला US $ ५०० मिलियनची अतिरिक्त मदत आणि ड्रोन किल्ररब्लेडची मदत करणार आहे.
मॅक्स हेल्थकेअर मध्ये ब्लॉक डील द्वारा KKRने Rs २८०० कोटींचे शेअर ५% डिस्काउंटवर Rs ३४० ते Rs ३६१ या दरम्यान विकले.
सरकार HAL कडून १५ लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्स Rs ३८९० कोटींना खरेदी करेल.
गोदरेज प्रॉपर्टिजने पुण्यामध्ये ९ एकर जमीन डेव्हलपमेंट साठी घेतली.
टाटा स्टीलने स्टोर्क फेरो ऑलॉयज चे ऍसेट Rs १५५ कोटींना विकत घेतले . आयर्न ओअर आणि स्टीलच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
टाटा मोटर्सला ‘TPG’ कडून गुंतवणुकीचा पहिला हपता Rs ३७५० कोटींचा मिळाला.
१ एप्रिल २०२२ पासून IOC निफ्टीमधून बाहेर पडेल आणि अपोलो हॉस्पिटल्स चा निफ्टीमध्ये समावेश होईल.
तेजस नेटवर्कने संख्या लॅब मधील ६४.४% स्टेक Rs २८० कोटींना खरेदी केला. यामुळे तेजस नेटवर्कचा 5G पोर्ट फोलिओ चांगला होईल. गेले दोन दिवस तेजस नेटवर्कला वरचे सर्किट लागत आहे
आज OPEC + ची बैठक आहे. मे २०२२ पासून उत्पादनात काही बदल करण्यावर विचार होईल. रशियाने भारताला ३५% डिस्काउंट वर क्रूडचा पुरवठा करण्यासाठी ऑफर केली आहे. USA आपल्या रिझर्व्ह कोट्यातून क्रूड रिलीज करणार आहे
एक्सिस बँकेने सिटी बँकेचा रिटेल बीझिनेस Rs १२३२५ कोटींना विकत घेतला हे डील जानेवारी -जून २०२३ पर्यंत सर्व आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर पुरे होईल. ३६०० कर्मचारी आणि २५ लाख क्रेडिट कार्ड टेकओव्हर होतील. डिपॉझिट्स मध्ये Rs ५०२०० कोटींची वाढ होईल. क्रेडिट कार्ड बॅलन्सशीट मध्ये ५७% वाढ होईल.
गेल ही कंपनी Rs १९० प्रती शेअर या भावाने ५.६९ कोटी शेअर्स टेंडर रूटने बायबॅक करण्यासाठी Rs १०८० कोटी खर्च करेल. या शेअर बायबॅकसाठी रेकॉर्ड डेट २२ एप्रिल असेल.
रुची सोया त्यांच्या FPO ची इशू प्राईस आज ठरवेल.
BAIN कॅपिटल ‘IIFL वेल्थ’ मधील २४.८% स्टेक Rs ३६८० कोटींना खरेदी करणार आहे.
MSTC ची सबसिडीअरी असलेल्या फेरो स्क्रॅप निगमसाठी सरकारने बोली मागवल्या.
नैसर्गिक गॅसचे रेट १ एप्रिल २०२२ पासून US $ २.९ /MMBTU वरून US $ ५.९३/MMBTU एवढे वाढणार आहेत याचा फायदा ONGC ला होईल. ONGC च्या OFS चा NON रिटेल कोटा ३.५७ पट भरला.
RBI FY २२-२३ मध्ये ६एप्रिल ते ८ एप्रिल, ६ जून ते ८ जून, २ ऑगस्ट ते ४ ऑगस्ट, २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर, ५ डिसेंबर ते ७ डिसेंबर, ६ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी २०२३ या दरम्यान वित्तीय धोरणावर विचार करण्यासाठी बैठक आयोजित करेल.
सरकार IRCON मधील १५% स्टेक OFS च्या माध्यमातून विकणार आहे. सध्या सरकारचा स्टेक ७३% आहे तो या OFS नंतर ५८% ते ६०% राहील.
कॉस्मो फिल्म त्यांची औरंगाबाद येथील CPP फिल्म उत्पादन क्षमता वाढवणार आहे.
धनलक्ष्मी बँकेला नवीन शाखा उघडायला RBI कडून परवानगी मिळाली.
HUL ने साबण आणि डिटर्जन्टस्च्या किमती ३% ते ५% ने वाढवल्या. सर्फ एक्सेल चे भाव Rs ४/KG तर सर्फ एक्सेल क्विक वॉशचे भाव Rs ११ /KG आणि व्हील पॉवडरचे भाव Rs ६२/KG तर पिअर्स साबणाची किंमत Rs १३५ केली.
रेमंडने त्यांच्या दोन ब्रँडमधील ‘कलर प्लस आणि पार्क अव्हेन्यू’ या ब्रँडमध्ये डायव्हेस्टमेन्ट करणार आहे.
सिमेंट कंपन्यांने सिमेंटच्या दरात Rs ४० प्रती बॅग एवढी वाढ केली.
मेट डिपार्टमेंटने सांगितले की एप्रिल महिन्यामध्ये नेहेमीपेक्षा तपमान जास्त राहील त्यामुळे वोल्टस, हॅवेल्स, ब्ल्यू स्टार आणि सिम्फनी या शेअर्समध्ये तेजी होती.
एप्रिल एक्स्पायरीसाठी खालीलप्रमाणे रोल ओव्हर झाले. ९१% एस्कॉर्टस, IRCTC, ९०% गोदरेज कंझ्युमर्स, ABB लिमिटेड, VOLTAS, M&M फायनान्सियल्स, ८९% HDFC AMC, MRF
८८% टाटा कम्युनिकेशन, अडाणी पोर्ट,
८७% ACC, अडाणी एंटरप्रायझेस, अशोक लेलँड, ASTRAL पॉली, NIPON लाईफ
८६% श्रीराम ट्रान्सपोर्ट, डेल्टा कॉर्प, JSPL, NMDC, अतुल लिमिटेड
आज FMCG. ऑइल आणि गॅस सेक्टर मधील शेअर्स तेजीत होते
BSE निर्देशांक सेन्सेक्स ५८५६८ NSE निर्देशांक निफ्टी १७४६४ बँक निफ्टी ३६३७३ वर बंद झाले.
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!