आज क्रूड US $ १०८ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७६.७५ च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०३.६८ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड २.८२ VIX १८.८४ होते.
USA च्या तिन्ही निर्देशांकात डाऊ जोन्स NASHDAQ आणि S&P मध्ये तेजी होती.
जपानची मार्केट्स आज बंद होती. अमेझॉन ऍपल, आणि इंटेलचे निकाल कमजोर आले. अमेझॉन आणि ऍपलने तर गायडन्सही चांगला दिला नाही.सप्लाय चेन मध्ये अडचणी, चिप शॉर्टेज, ही कारणे होती. ट्विटरचा रेव्हेन्यू कमी झाला.
USA GDP ग्रोथ रेट १.४% पर्यंत कमी झाला. ट्रेड डेफिसिट रेकॉर्ड लेव्हलवर आले. GOVT स्पेंडिंग वाढले., निर्यात कमी झाली.
१५ सत्रानंतर आज FII ने Rs ७४३.२२ कोटींची खरेदी केली तर DII ने Rs ७८०.९४ कोटींची खरेदी केली.
ऍक्सेस ग्रामीण प्रॉफिट वाढले लोन वाढली. CASA रेशियोत सुधारणा झाली. NPA कमी झाले. NIM कमी झाले.
अंबुजा फायदा कमी झाला, उत्पन्न वाढले.
वेदांता फायदा कमी उत्पन्न वाढले कंपनीने त्यांच्यावरील कर्ज कमी केले. Rs ३१.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
श्रीराम ट्रान्सपोर्टचे डिसबरसल वाढले. निकाल चांगले आले .
बायोकॉनचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
GNA AXLE चे उत्पन्न प्रॉफिट आणि मार्जिन कमी झाले.
GILLETT चे उत्पन्न वाढले प्रॉफिट आणि मार्जिन कमी झाले.
इन्शुअरन्स कंपन्यांना इन्शुअरन्स आणि फायनान्स कंपन्यांमधील गुंतवणूक ची मर्यादा २५% वरून ३०% पर्यंत वाढवली.
इंडिया मार्ट ने Rs ६२५० प्रती शेअर या भावाने १.६० कोटी शेअर्सचा बायबॅक जाहीर केला.
कंपनी या बायबॅकवर Rs १०० कोटी खर्च करेल. या बायबॅकमध्ये प्रमोटर्सही भाग घेऊ शकतील.
टाटा पॉवर ५००० चार्जिंग पाईंट्स महाराष्ट्रात लावणार आहे. NAREDCO बरोबर करार केला.
टाटा मोटर्स ७ सीटर इलेक्ट्रिक SUV लाँच करेल.
कोलगेटचे निकाल चांगले आले कंपनीने Rs २१ लाभांश जाहीर केला.
PNB हौसिंगचे चौथ्या तिमाहीचे निकाल कमजोर आले.
बायोकॉन चे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
अल्ट्राटेक सिमेंटचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. उत्पन्न Rs १५७६७ कोटी, प्रॉफिट Rs २६१३.०० झाले या दोन्हीतही चांगली वाढ झाली. पण मार्जिन मात्र कमी झाले.
सुप्रीम इंडस्ट्रीज चे उत्पन्न वाढले प्रॉफिट कमी झाले, मार्जिन कमी झाले. कंपनीने Rs १८ अंतिम लाभांश जाहीर केला.
मारुतीचे प्रॉफिट वाढून Rs १८७५ कोटी झाले उत्पन्न वाढून Rs २६७४९ कोटी तर मार्जिनमध्ये सुधारणा होऊन ९.१% झाले.
विप्रो Rs ५४८० कोटी फायदा झाला Rs २०९६७ कोटी उत्पन्न मार्जिन १६.७४%
हुतामाकी PPL ची अंबरनाथला MIDC एरियात असलेली जमीन मोनेटाईझ करायला मंजुरी मिळाली.
VARROC ENGG त्यांचा USA आणि युरोप मध्ये ४ व्हीलर लाइटिंग सिस्टीम व्यवसाय विकणार आहे.
चीनमधून आयात होणाऱ्या N.N DICYCLOHEXYL CARBODIIMIDE वर ५ वर्षांसाठी अँटी डम्पिंग ड्युटी लावली.
प्रीमियर एक्सप्लोजीवज या कंपनीला रॉकेट इंजिनसाठी Rs १०० कोटींची ऑर्डर मिळाली .
LIC च्या IPO ला २७ एप्रिल २०२२ ला ग्रे मार्केट प्रीमियम Rs २५ होता तो आता Rs ४५ झाला आहे.
सोमवारी HDFC आणि ब्रिटानिया त्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ५७०६० NSE निर्देशांक निफ्टी १७१०२ बँक निफ्टी ३६०८८ वर बंद झाले.
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!