Monthly Archives: May 2022

आजचं मार्केट – ३१ May २०२२

आज क्रूड US $ १२४.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७७.९० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०१.६९ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड २.८३ VIX २०.५४ होते.

युरोपमधील मार्केट्स तेजीत होती. क्रूड, बिडेन आणि पॉवेल यांच्यातील मीटिंग आणि रशियन ऑइल इंपोर्ट्सवर बॅन लावावा का ? या तीन गोष्टींवर मार्केट आपला रुख बदलेल. मार्गानी क्रूड दोन मार्गाने येते. समुद्र मार्गाने येणाऱ्या क्रूडवर सुरुवातीला बॅन लावण्यात येईल. आणि पाईपलाईन मधून. पाईप लाईन मधून येणाऱ्या क्रूडला काही काळ बॅनमधून वगळण्यात येईल . चीनचा PMI ४९.६ ( ४९) राहिला. चीन काही निवडक प्रवासी वाहनांवरील करात सूट देण्याची शक्यता आहे.
कॅम्पस ऍक्टिव्ह, DELHIVERY, संगम, टेक्नोइलेक्ट्रिक अरमान फायनान्सियलस, RVNL, जैन इरिगेशन, KNR कन्स्ट्रक्शन, मिर्झा, ऍक्यूरसी शिपिंग, मॉन्टेकार्लो, शारदा मोटर्स यांची निकाल चांगले आले.
IOL, दिलीप बिल्डकॉन, WOCKHARDT, रॅडिको खेतान, JSPL, G.E. पॉवर, यांचे निकाल कमजोर होते.
क्रूडच्या बाबतीत मागणी वाढण्याची शक्यता आहे. १ जून पासून चीन कोरोना संबंधित निर्बंध हटवणार आहे. पण पुरवठा वाढण्याची शक्यता नाही. रशियन ऑइलवर बॅन लावण्यावर २/३ युरोपियन देशांची संमती आहे.
US $ १०००० चे शैक्षणिक कर्ज माफ करणार असे बिडेनचे म्हणणे आहे. याचा परिणाम म्हणून महागाई पुन्हा वाढेल.
NCC ला एकूण Rs ६३८८ कोटींच्या ३ ऑर्डर्स मे २०२२ मध्ये मिळाल्या.
MSCI रीबॅलन्सिंगमुळे AU स्मॉल फायनान्स बँकेचे वेटेज ०.१५% वाढणार US $ ८७ मिलियन इनफ्लो येण्याची शक्यता आहे. अडानी पॉवर ०.३८% वेटेज वाढणार त्यामुळे US $ २२३ मिलियन इंफ्लो होण्याची शक्यता आहे. . टाटा एलेक्सि ०.४१% वेटेज वाढणार त्यामुळे US $ २३५ मिलियन इनफ्लो होण्याची शक्यता आहे. . JSPLचे वेटेज ०.२३% वाढणार त्यामुळे US $१३४ मिलियन इनफ्लो होण्याची शक्यता आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये वेटेज ०.६९% वाढणार त्यामुळे US $ ३९८ मिलियन एवढा इंफ्लो होण्याची शक्यता आहे. HDFC AMC या इंडेक्समधून बाहेर पडेल त्यामुळे US $ ८३ मिलियन एवढा आऊटफ्लो होण्याची शक्यता आहे.
संरक्षण मंत्रालयाने भारत डायनामिक्स बरोबर Rs २९७१ कोटींचा करार केला.
बँक, फार्मा, IT, एनर्जी मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले तर रिअल्टी, ऑटो, मेटल्स यामध्ये खरेदी झाली.
डिमॅट अकाउंट संबंधित CDSL, MCX, BSE, CAMS हे शेअर्स तेजीत होते.
कारट्रेड यांनी IDFC 1ST बँकेबरोबर जुन्या कार्ससाठी इझी आणि स्मार्ट फायनान्ससाठी करार केला.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ५५५६६ NSE निर्देशांक निफ्टी १६५८४ बँक निफ्टी ३५४८७ वर बंद झाले.
Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ३० May २०२२

आज क्रूड US $ १२०.०० प्रती बॅरल्सच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७७.५० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०१.४३ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड २.७४ आणि विक्स २१.४८ होते.

आज USA ची मार्केट्स मेमोरियल डे निमित्ताने बंद आहेत. जागतिक संकेत चांगले. PCE जे ट्रॅक करतात त्यांचे म्हणणे आहे की महागाई आता टोकाला पोहोचली आहे. त्यामुळे या नंतरच्या काळात महागाई कमी व्हायला सुरुवात होण्याची शक्यता आहे. किंवा महागाई वाढण्याचा वेग कमी होण्याची शक्यता आहे.
FII नी Rs १९४३ कोटींची विक्री केली तर DII नी Rs २७२७ कोटींची खरेदी केली,शॉर्ट्स कव्हर करायला सुरुवात केली आहे.

२० DMA आता बेस बनवा.

आज एथॉस या प्रीमियम घड्याळे बनवणार्या कंपनीच्या शेअर्सचे NSE वर Rs ८२५ तर BSE वर Rs ८३० वर लिस्टिंग झाले. हे शेअर्स IPO मध्ये Rs ८७८ ला दिले होते. शेवटपर्यंत शेअर पडत होता.
युनायटेड स्पिरिट्स या कंपनीने त्यांचे ३२ ब्रॅण्ड्स INBREW या कंपनीला Rs ८२० कोटींना विकले. INBREW बरोबर ११ ब्रॅण्डसाठी फ्रॅन्चायजी अग्रीमेंट करणार.

ONGC चे मार्जिन कमी झाले एक्स्प्लोरेशन कॉस्टस वाढली. प्रॉफिट आणि रेव्हेन्यू वाढले.

M & M चे मार्जिन कमी झाले. ट्रॅक्टर बिझिनेसमध्ये थोडे प्रेशर आले. Rs ११.२५ लाभांश जाहीरात केला.
JSW स्टील EBITDA प्रती टन कमी झाला. निकाल चांगले आले. JSPL बरोबर मर्जरची घोषणा केली .

ऑइल इंडियाचे निकाल चांगले आले. Rs ५ लाभांश जाहीर केला.

डिक्सन टेक्नॉलॉजी, टिमकीन,अलकार्गो, शारदा मोटर्स, AEGIS लॉजिस्टिक्स, एक्सेल (Rs २२ लाभांश), युफ्लेक्स, एवरेस्ट कांटो, फाईन ऑर्गनिक्स, टेक्नोक्राफ्ट, महाराष्ट्र सीमलेस, ज्युबिलण्ट फार्मोवा, टिमकीन, ३M इंडिया, गोवा कार्बन, ट्रायडंट यांचे निकाल चांगले आले.

ज्युबिलण्ट फुड्सचे निकाल चांगले आले. LIKE फॉर LIKE ग्रोथ ५.८% झाली. मार्जिन २५% राहिले. डॉमिनोसची नवीन ८० दुकाने उघडली. अमेझॉन मध्ये कॅटेगरी मॅनेजर म्हणून असलेले समीर खेतरपाल यांना CEO म्हणून नेमले.

माझगाव डॉक्स चे निकाल चांगले आले फायदा कमी झाला उत्पन्न आणि मार्जिन यांच्यात वाढ झाली.
PB फाइनटेकच्या निकालात सुधारणा झाली. रेव्हेन्यू वाढले तोटा कमी झाला.

NYKAA चे निकाल चांगले आले पण मार्केटिंग कॉस्ट, नव्या व्यवसायात केलेली गुंतवणूक यामुळे प्रॉफिट कमी झाले. ऑन लाईन प्लॅटफॉर्मवर स्पर्धा वाढत आहे.

मावाना शुगर, एडेलवाईज, ग्लेनमार्क फार्मा, हिकलचे निकाल कमजोर आले.

युनिकेम लॅब ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली.
सन फार्मा ही कंपनी फायद्यातून तोट्यात गेली. रेव्हेन्यू आणि मार्जिन वाढले. कंपनीला Rs ३९३५ कोटी वन टाइम लॉस झाला.

नाटको फार्मा ही कंपनी फायद्यातून तोट्यात गेली.
रॅडिको खेतान फायदा कमी झाला उत्पन्न वाढले.
चेन्नई मेट्रो रेल प्रोजेक्टसाठी L & T ला ऑर्डर मिळाली.

DOT ने जिओ आणि एअरटेल बरोबर ५ राज्यात 4G मोबाईल लावण्यासाठी करार केला. भारती एअरटेल Rs ८४३ कोटी खर्च करून महाराष्ट्र आणि झारखंड मध्ये १०८३ टॉवर उभारेल. जिओ ३६९६ टॉवर ( आंध्रा, छत्तीस गढ, ओरिसा मध्ये) लावणार. Rs २८३६ कोटी खर्च करणार.

IDBI बँकेच्या स्टेक विक्रीसाठी जूनअखेर EOI मागवले जातील. सरकार पूर्ण स्टेक विकणार नाही पण व्यवस्थापनाचे नियंत्रण सोपवले जाईल LIC कडे ४९.२४% स्टेक आहे.सरकारकडे ४५.४८% स्टेक आहे.

आज सर्व क्षेत्राच्या शेअर्समध्ये खरेदी झाली. जास्त खरेदी डिस्क्रिशनरी पेंडिंग आणि IT क्षेत्रातील शेअर्समध्ये झाली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५५९२५ NSE निर्देशांक निफ्टी १६६६१ बँक निफ्टी ३५८२६ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २७ May २०२२

आज क्रूड US $ ११८.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७७.६० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०१.५० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड २.७५ VIX २२.७० होते.

आज USA, युरोप, एशियातील मार्केट्स तेजीत होती. USA मध्ये कन्झ्युमर डिस्क्रीशनरी आणि मायक्रो चीप कंपन्यांचे निकाल चांगले आले.

MACY’s (१९.३%) डॉलर जनरल ( १३.७%) डॉलर ट्री ( २१.९%) अलीबाबा या शेअर्स मध्ये तेजी होती. रिटेल कंपन्यांनी सांगितले की एकूण विक्री वाढत असली तरी ग्राहक आता महागाईमुळे कमी किमतीच्या वस्तू खरेदी करत आहेत.

USA ची GDP ग्रोथ १.४% वरून १.५% झाली.
FII नी Rs १५९८ कोटींची विक्री तर DII नी Rs २९०६ कोटींची खरेदी केली.

सरकार आता BPCL च्या डायव्हेस्टमेन्ट प्रक्रियेची नव्याने सुरुवात करणार आहे.

पारादीप फॉस्फेट्स चे NSE वर Rs ४४ आणि BSE वर ४३.५५ वर लिस्टिंग झाले.

BEL ने ड्रोन डेक या USA मधील कंपनीबरोबर स्मार्ट ड्रोन बनवण्यासाठी करार केला.

टॉरंट फार्मा DR रेड्डीज कडून त्यांचे ४ ब्रँड Rs ३५ कोटींना खरेदी करणार आहे. STYPTROVIT-E, FINAST, FINAST-T, DYNAPRESS हे ते ब्रँड आहेत. ही खरेदीची प्रक्रिया जूनपर्यंत पुरी होईल.
JSW स्टीलचे आणि JSW इस्पात या कंपन्यांच्या मर्जरवर विचार चालू आहे.

सन फार्माने रोमानियाची कंपनी ‘FITERMAN फार्मा’ च्या . URACTIVTM पोर्टफोलिओ चे अधिग्रहण केले. या पोर्टफोलिओमध्ये मिनरल्स व्हिटामिन्स कॉस्मेटिक्स आणि मेडिकल डिव्हायसेस चा समावेश आहे.

ONGC ऑईलच्या ब्लॉक डेव्हलपमेंट साठी Rs ३१००० कोटी गुंतवणार आहे.

सरकार UK बरोबर FTA करण्यासाठी वाटाघाटी करणार आहे. याचा फायदा USL ला होईल.
हिंदाल्कोचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले प्रॉफिट आणि उत्पन्न यात लक्षणीय वाढ झाली. कंपनीने त्याच्यावर असलेले कर्जही कमी केले.
NMDC चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन कमी झाले. निकाल कमजोर आहेत.

बर्गर पेंट्स प्रॉफिट उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले. निकाल चांगले.

मदर्सन सुमीचे निकाल कमजोर आले.

पेज इंडस्ट्रीज चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले. निकाल चांगले आले. Rs ७० लाभांश जाहीर केला.
गुडइअर टायरचे निकाल जरी कमजोर असले तरी त्यांनी Rs २० फायनल आणि Rs ८० स्पेशल लाभांश जाहीर केला.

BDL चे नफा उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले निकाल चांगले.

अस्त्राझेनेकाचे नफा उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
हेल्थकेअर ग्लोबल ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली. उत्पन्न वाढले. निकाल चांगले आले.

मुथूट फायनान्सचे निकाल कमजोर आले.

पिरामल एंटरप्रायझेस ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली. प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.

झी एंटरप्रायझेसचे प्रॉफिट, मार्जिन कमी झाले उत्पन्न वाढले. निकाल सर्व साधारण

जॉन्सन हिताचीचे उत्पन्न वाढले प्रॉफिट आणि मार्जिन कमी झाले. निकाल कमजोर.

केमकॉन स्पेशालिटी चे निकाल चांगले.

रुची सोयाचे निकाल चांगले आले. प्रॉफिट, उत्पन्न, वाढले. कंपनीने Rs ५ लाभांश जाहीर केला.

भारतात तांदुळाचे पीक चांगले आले. तांदुळाचा साठा आणि किंमत समाधानकारक स्तरावर आहेत. त्यामुळे तांदुळाची निर्यात वाढत असली तरी सरकार नजीकच्या भविष्यात तांदुळाच्या निर्यातीवर निर्बंध लावेल अशी शक्यता वाटत नाही.

गोदरेज प्रॉपर्टीज तोट्यातून फायद्यात आली.

हिंदुस्थान कॉपर ही कंपनी खरेदी करण्यात हिंदाल्कोने स्वारस्य दाखवले.

BEML चे उत्पन्न फायदा कमी झाले मार्जिन वाढले.
PSP प्रोजेक्ट्स, अपार इंडस्ट्रीज, RCF ( प्रॉफिट उत्पन्न वाढले मार्जिन कमी Rs २.३७ लाभांश) यांचे निकाल चांगले आले.

इंडोनॅशनल ही कंपनी फायद्यातून तोट्यात गेली.
JB केमिकल्सने त्याचा नवीन लोगो लाँच केला. कंपनी ब्रॅण्डिंग इमेज मजबूत करू इच्छिते. भारतीय आर्मीने सॉफ्टवेअर डिफाइन्ड रेडिओ साठी EOL जारी केले. याचा फायदा डाटा पॅटर्न्स या कंपनीला होऊ शकतो.

कोल इंडियाला सरकारने कोळश्याची उत्पादनक्षमता वाढवायला सांगितले. कोळसा आयात करायलाही सांगितले.

सिंगटेल भारती एअरटेलचे २३ कोटी शेअर्स ब्लॉक डिलद्वारा विकून US $ २ बिलियन उभारणार आहे. सिंगटेलचा भारती एअरटेल मध्ये ३१.७२% स्टिक आहे.

जिंदाल पॉलीचे उत्पन्न प्रॉफिट वाढले. क्षमता विस्तारावर Rs ७० कोटी खर्च करेल.

BGR एनर्जीचा तोटा वाढला उत्पन्न कमी झाले.
झायडस लाईफच्या जरोड युनिटला USFDA कडून क्लीन चिट मिळाली.

अक्झॉ नोबेलच्या प्रॉफिट मध्ये मामुली वाढ उत्पन्न वाढले.

हेरिटेज फुड्सचे प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न वाढले.
DELHIVERY ला टेक्नॉलॉजी प्रोडक्ट ADDFIX याच्या साठी पेटंट मिळाले. हे प्रोडक्ट ऍड्रेस व्हेरिफिकेशन आणि लोकेशन मॅपिंग या संबंधातील आहे.

सीमेन्स LARGE DRIVES अप्लिकेशन Rs ४४० कोटींना विकणार आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५४८८४ NSE निर्देशांक निफ्टी १६३५२ बँक निफ्टी ३५६१३ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २६ May २०२२

आज क्रूड US $ ११४ .५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७७.६० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०२.०० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड २.७५ VIX २४.९५ होते.

US फेडच्या मिटींगच्या मिनट्समध्ये वेगळे काही नव्हते. व्याजदर वाढल्यामुळे ग्रोथरेट कमी होण्याची शक्यता आहे. USA मध्ये नैसर्गिक गॅसच्या किमती US $ ९.२ प्रती MMBTU एवढ्या झाला. आपण नैसर्गिक गॅस आयात करतो त्यामुळे गॅसच्या किमती वाढणे आपल्या दृष्टीने त्रासदायक आहे.

सोने चांदी आणि इतर बेस मेटल्समध्ये मंदी होती
फेड ०.५० बेसिस पाईंट एवढी वढ दरात दोन वेळा करेल.

FII नी Rs १८०३.०० कोटींची विक्री तर DII नी Rs २२३० कोटींची खरेदी केली.

कोल इंडियाचे निकाल चांगले आले. तर टॉरंट फार्मा फायद्यातून तोट्यात गेली (कंपनीने १:१ बोनस शेअर आणि Rs ८ फायनल लाभांश आणि Rs १५ स्पेशल लाभांश जाहीर केला) . INDIGO चा तोटा वाढला. बाटाचे निकाल चांगले आले. BPCL च्या प्रॉफीटमध्ये भारी घट झाली उत्पन्न वाढले. कंपनीने Rs ६ लाभांश जाहीर केला. अपोलो हॉस्पिटलचे निकाल सर्व साधारण, व्हर्लपूल LTD चा निकाल कमजोर.

ITI, ASAHEE, DEV IT, V मार्ट, HEG (तोट्यातून फायद्यात), पॉलिप्लेक्स ( प्रॉफिट वाढले),NALKO, इमामी, अशोका बिल्डकॉन, यांचे निकाल चांगले आले. नीटको टाइल्सचा तोटा कमी झाला उत्पन्न वाढले.

DFM (फायद्यातून तोट्यात), सुझलॉन, अस्त्र मायक्रो यांचे निकाल असमाधानकारक होते.
सरकारने २०१ प्रकारचे पेपर ग्लेज, वॉल पेपर टिशू पेपर, पेपर बोर्ड, यांच्या आयातीसाठी रजिस्ट्रेशन अनिवार्य केले. एकदा केलेलं रजिस्ट्रेशन ७५ दिवसांपर्यंत VALID असेल. आयात करण्यापूर्वी ५ दिवस आधी रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. सरकारने PIMS या नावाने पोर्टल चालू केले आहे. हे पोर्टल १ ऑक्टोबर २०२२ पासून चालू होईल. या सरकारच्या धोरणाचा फायदा ITC, पदमजी पल्प आणि पेपर क्षेत्रातील इतर शेअर्सना होईल.
सरकार IOB आणि सेंट्रल बँक यांचे खाजगीकरण करणार आहे.

सॅकसॉफ्ट टेक्नॉलॉजी ही कंपनी आपल्या एक शेअरचे १० शेअर्समध्ये विभाजन करणार आहे.
अडाणी ग्रुपची ओपन ऑफर ६ जुलै २०२२ ते १९ जुलै २०२२ दरम्यान ओपन राहील.

हिंदुस्थान झिंकचे प्रमोटर वेदांता यांने ५०.११ % स्टेक तारण म्हणून ठेवला.

सरकार ‘VI’ च्या कर्जाचे इक्विटीमध्ये रूपांतर करून ‘VI’ मध्ये ३३% स्टेक घेणार आहे. सेबीने सरकारला ओपन ऑफरमध्ये सूट दिल्यामुळे आता सरकार हा स्टेक घेऊ शकेल.

औरोबिंदो फार्माच्या कॅन्सरवरील औषधाला USFDA ची मंजुरी मिळाली.

L &T एडटेक ने AICTE बरोबर इंडस्ट्री आधारित कोर्सच्या डिलिव्हरीसाठी करार केला.

भारती एअरटेलमध्ये भारती आणि सिंगटेल या दोघान्चा स्टेक आहे. सिन्गटेल त्यांच्या स्टेक पैकी काही स्टेक विकणार आहे.

गाड्या खरेदी करणे महाग पडेल. कारण थर्ड पार्टी इन्शुअरन्स प्रीमियममध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. याचा फायदा ICICI लोम्बार्ड, न्यू इंडिया इंशुअरंस कंपनी यासारख्या कंपन्यांना होईल.

GMM फाऊडलर या कंपनीने तुमच्या जवळील १ शेअरच्या मागे २ बोनस शेअर्सची घोषणा केली. Rs ३ लाभांश जाहीर केला.

NBCC ऑगस्ट सिरीजपासून F & O मधून बाहेर पडेल.

HDFC ने HDFC कॅप ADV चे २.३५ लाख शेअर्स Rs १८४ कोटींना विकले.

कोल इंडियाला भारत कोकिंग कोल मधील त्यांचा २५% स्टेक विकण्यासाठी मंजुरी मिळाली.

मारुतीने ६ एअरबॅग्सच्या नियमपूर्तीसाठी मुदत मागितली.

ETG लॉजिस्टिक्स बरोबर अशोक लेलँड ने करार केला.

HCL टेकने VELUX ग्रुप बरोबर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन साठी करार केला.

मूडीजने भारताच्या GDP ग्रोथचे २०२२ वर्षाचे अनुमान ९.१% वरून ८.८% केले. २०२३ या वर्षांसाठी मात्र GDP ग्रोथचे अनुमान ५.४% कायम ठेवले.

मूडीजने भारती एअरटेलला अपग्रेड केले. सध्याच्या BA १ वरून BAA ३ असे ग्रेडिंग केल.

एशियन ग्रॅनीटोच्या २५ ते ३० ऑफिसवर आयकर विभागाने धाडी टाकल्या.

अपोलो हॉस्पिटलने सांगितले की फार्मसी डिस्ट्रिब्युशनच्या बिझिनेसचे रिऑर्गनायझेशनसाठी Rs ८८ कोटींची प्रोव्हिजन केली होती आता कंपनीने हे रिऑर्गनायझेशन रद्द केले. या बरोबर शेअर सुधारला.

आज रिअल्टी, FMCG ऑटो मध्ये विक्री झाली आणि उत्तरार्धात मेटल, बँकिंग, IT शेअर्स मध्ये खरेदी झाली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५४२५२ NSE निर्देशांक निफ्टी १६१७० बँक निफ्टी ३५०९४ वर बंद झाले. .

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २५ May २०२२

आज क्रूड US $ ११४.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७७.५० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०२.१९ US १० वर्षे बॉण्ड यिल्ड २.७३ VIX २५.४९ होते.

ट्विटर, आल्फाबेट, मेटा प्लॅटफॉर्म, पिंटरेस्ट या सर्व कंपन्या मोठ्या प्रमाणावर जाहिरातीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असतात. यांचे शेअर्स ३% ते २४% पर्यंत पडले. NASHDAQ चे जास्त पडले. कारण स्नॅपचॅटच्या व्यवस्थापनाने कमजोर गायडन्स दिला.

स्नॅपचॅट हा शेअर ४०% पडला. त्याबरोबर सोशल मेडिया आणि इंटरनेटसंबंधीत शेअर पडले.कम्युनिकेशन सेक्टरमधील शेअर पडले.

ABERCROMBIE & फिच चा शेअर २७.२% ने पडला कारण विक्री आणि मार्जिनचे अनुमान कमी केले.

USA मध्ये नवीन घरांची विक्री १६.४% ने कमी झाली. घरांच्या किमती वाढल्या. व्याजाचे दर वाढले
मॉर्गन स्टॅन्ली आणि नोमुरा यांनी IT सेक्टरमधील शेअर्स डाऊनग्रेड केले. यामुळे IT क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट बुकिंग झाले.
FII नी Rs २३९३ कोटींची विक्री तर DII ने Rs १९४८ कोटींची खरेदी केली.

कोरोनाचा BA.४ आणि BA .५ ही ओमिक्रोनचे सबव्हरायन्ट तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये मिळाले.
केंद्र सरकारने २० लाख ड्युटी फ्री MT क्रूड सोयाबीन ऑइल आणि क्रूड सन फ्लॉवर ऑइल आयात करायला २ वर्षांसाठी परवानगी दिली. कस्टम ड्युटी आणि ऍग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सेस आकारला जाणार नाही.

भारतात गव्हाचे उत्पादन ८% ने कमी होईल.

RBI ने सरकारला यावर्षी दिलेला Rs ३०३०७.०० कोटी डिव्हिडंड १० वर्षातील डिव्हिडंडची सर्वात कमी रक्कम आहे. Rs ९९१२६.०० कोटी पूर्वी दिला होता.

मींडा इंडस्ट्रीजने १:१ बोनस जाहीर केला.

टिटाघर वॅगनला २४१७७ वॅगन साठी Rs ७८३७ कोटीचे ३ वर्षे मुदतीचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

TCI एक्स्प्रेस २७ मे २०२२ रोजी शेअर बायबॅक आणि लाभांशावर विचार करेल.

ASTER DM, स्ट्राइड्स, बेयर क्रॉप, NFL ( तोट्यातून फायद्यात), S चांद , RITES, रेलटेल, अमृतांजन, रेणुका शुगर, तेगा इंडस्ट्रीज, दीपक फर्टिलायझर, शक्ती शुगर, नेस्को ( Rs ३ लाभांश), गार्डन रिच शिपबिल्डर्स, कोलते पाटील, PFC ( Rs १.२५ लाभांश) यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

AIA इंजिनीअर्सचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. कंपनीने सांगितले की ग्राइंडिंग क्षमता वाढवण्यासाठी Rs २०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. Rs ९ प्रति शेअर लाभांशाची घोषणा
दालमिया सिमेंट, आणि J M फायनान्सचे निकाल असमाधानकारक आले.

NTPC २०२४ च्या सुरुवातीला रिन्यूएबल एनर्जी आर्मचा IPO आणणार आहे.

रेल फ्रेट प्रोजेक्ट संबंधित केस मध्ये सुप्रीम कोर्टाने अल्ट्राटेक सिमेंटच्या बाजूने निर्णय दिला.

स्पाईस जेट आणि क्रेडिट SUISSE यांनी फायनल सेटलमेंट सुप्रीम कोर्टात फाईल केले. हनीवेलने नारायण हृदयालया बरोबर करार केला.

१ जून २०२२ पासून साखरेच्या निर्यातीवर लिमिट बसवणार आहे. साखर निर्यात करण्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागेल.

चीन आणि मलेशियातून आयात होणाऱ्या किचनवेअरवरील अँटीडम्पिंग ड्यूटीची मुदत वाढवली. याचा फायदा LA OPALA आणि बटरफ्लाय गांधीमती यांना होईल.

DGTR ने डेकोर पेपरवर अँटीडम्पिंग ड्युटी सुरु राहील असे सांगितले याचा फायदा ITC आणि पदमजी पल्प यांना होईल.

ग्रासिमने पेंट उद्योगात Rs १०००० कोटी गुंतवणार असे सांगितले. त्याचा परिणाम पेंट्स उद्योगातील एशियन पेंट्स आणि इतर कंपन्यांवर झाला.
साखरेच्या जागतिक मागणीमध्ये वाढ झाली आहे. सरकारने ६० लाख MT एवढा साखरेचा साठा ठेवण्याचा निर्णय झाला. एथॅनॉल उत्पादनासाठी ४५ लाख टन उपयोगात आणले जातील.

सरकारने हिंदुस्थान झिंक मधील त्यांचा २९.५% स्टेक पूर्णपणे विकण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. वेदांताने सांगितले की आम्ही जास्तीतजास्त ५% स्टेक विकत घेऊ.

सरकारने रेल्वेची जमीन अधिक वर्षांसाठी म्हणजे ३० ते ३५ वर्षांसाठी लीजवर द्यावी . लॅन्ड लायसेन्स फी त्या जमिनीच्या किमतीच्या २% असेल.

बँकिंग क्षेत्र सोडून इतर सर्व क्षेत्रामधे मंदी आली. इन्शुअरन्स क्षेत्रातील शेअर्स तेजीत होते. स्माल कॅप आणि मिड कॅप मध्ये मंदी आली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५३७४९ NSE निर्देशांक निफ्टी १६०२५ बँक निफ्टी ३४३३९ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २४ May २०२२

आज क्रूड US $ ११३.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७७.६० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०२.२९ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड २.८५ VIX २५.३६ होते.

कार उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना चीन टॅक्स इन्सेन्टिव्ह देणार आहे याचा फायदा टाटा मोटर्सला होण्याची शक्यता आहे. कार्स खरेदीवर असलेले निर्बंध चीनने उठवले.

चीन मध्ये रिटेल सेल्स कमी झाले, औद्योगिक उत्पादन कमी झाले. त्यामुळे सर्व देश लिक्विडीटी कमी करत आहेत तर चीन अर्थव्यवस्थेत लिक्विडीटी इंजेक्ट करत आहे.

शक्ती पम्प या कंपनीची सोलर पम्प योजना विफल होण्याची शक्यता.

FII नी Rs १९५१ कोटीची विक्री आणि DII नी Rs १४४५.०० कोटींची खरेदी केली.

BEL, रामको, यांचे निकाल कमजोर आले. झोमॅटो ( तोटा तिप्पटीने वाढला, रेव्हेन्यू वाढला, ऑर्डरबुक आणि ऑर्डर व्हॅल्यू वाढली) चे निकाल असमाधानकारक होते.

SAIL, ग्राफाईट ( फायदा रेव्हेन्यू मार्जिन वाढले, Rs १० लाभांश जाहीर केला.), शिल्पा मेडिकेअर ( फायदा रेव्हेन्यू वाढले बल्क ड्रग आर्मचा IPO आणून मॉनेटाईझ करणार), बिर्ला सॉफ्ट (फायदा, रेव्हेन्यू वाढले, Rs ५०० प्रती शेअर दराने बायबॅकवर Rs ३९०.०० कोटी खर्च करणार, ७८ लाख शेअर्स बायबॅक करणार. ), C E इन्फो ( फायदा उत्पन्न वाढले) यांचे निकाल चांगले आले.

ONGC ने गॅस एक्स्चेंजवर ऑन लाईन गॅस ट्रेडिंग सुरु केले.

काल कल्याणी स्टील, स्टील एक्स्चेंज ऑफ इंडिया आणि SAIL चे शेअर पडले नव्हते. SAIL रेल्वेसाठी काम करते. कल्याणी स्टील आणि स्टील एक्सचेंज ला इंपोर्टसाठी दिलेल्या सवलतींचा फायदा मिळेल. ज्या कंपन्यांचे उत्पन्न निर्यातीवर अवलंबून नाही डोमेस्टिक बिझिनेस जास्त आहे ते शेअर्स जास्त पडले नाहीत.
मेरिकोने ‘ट्रू एलिमेंट्स’ मध्ये ५४% स्टेक घेतला.
सरकार SUUTI ( स्पेसिफाईड अंडरटेकिंग ऑफ युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया) अंतर्गत असलेला त्यांचा हिंदुस्थान झिंक( २९.५४% म्हणजेच Rs ३७०० कोटी ) आणि ITC मधील (७.९१% स्टेक Rs २७०० कोटी) स्टेक विकण्याची शक्यता आहे.

आज ‘DELHIVERY’ चा शेअर BSE वर Rs ४९३ आणि NSE वर ४९५.०० वर लिस्टिंग झाला. हा शेअर IPO मध्ये Rs ४८७.०० ला दिला होता.
व्हीनस पाईप्स चे BSE वर Rs ३३५ वर तर NSE वर Rs ३३७ वर लिस्टिंग झाले. IPO मध्ये हा शेअर Rs ३२६ ला दिला होता.

आलेम्बिक फार्माच्या ‘PIRFENIDONE’ या एपिलेप्सीवरील औषधाला USFDA ने मंजुरी दिली.
NBCC ला पुडुचेरी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट साठी प्रोजेक्ट कंसल्टंसीची Rs ३१४ कोटींची ऑर्डर मिळाली.

३० मे २०२२ रोजी LIC त्यांचे निकाल जाहीर करेल आणि लाभांशावर विचार करेल.

बँक ऑफ इंडियाचे निकाल चांगले आले. NPA कमी झाले. प्रोव्हिजनिंग कमी झाले. प्रॉफिट वाढले. Rs २ लाभांश जाहीर केला.

कोव्हॅक्सीन च्या क्लिनिकल ट्रायलवरील निर्बंध उठवल्यामुळ कोव्हॅक्सीन व्हॅक्सिनेशनसाठी USA मध्ये उपयोगात येईल.

IPCA लॅब चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.

NIIT चे उत्पन्न प्रॉफिट वाढले मार्जिन कमी झाले.
NMDC ने सांगितले की जून २०२२ मध्ये ते आयर्न ओअरच्या किमती Rs ५०० ते Rs ७०० प्रती टन एवढ्या कमी करण्याची शक्यता आहे.

इंडियन मेटल्सचे उत्पन्न वाढले प्रॉफिट वाढले मार्जिन वाढले. कंपनीने Rs ७.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

ज्योती लॅब फायदा उत्पन्न वाढले. Rs २.५० लाभांश जाहीर केला.

सरकार शुगर निर्यातीवर लिमिट लावणार आहे.
सुब्रोसचे उत्पन्न वाढले फायदा कमी झाला.

गुजरात अल्कलीज उत्पन्न आणि फायद्यात लक्षणीय वाढ.

DCW चे निकाल चांगले.

ग्रासिम चा फायदा वाढला उत्पन्न वाढले. वन टाइम लॉस Rs ६९.१० कोटी झाला. Rs ५ लाभांश जाहीर केला.

इक्विटास स्माल फायनान्स बँकेने युनिव्हर्सल बँकिंगच्या लायसेन्स साठी अर्ज करणे पुढच्या वर्षापर्यंत स्थगित केले.

रूपा कंपनीच्या CEO आणि CFO नी राजीनामा दिला. त्यामुळे शेअर पडला.

आज ऑटो, मेटल्स, IT मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ५४०८६ NSE निर्देशांक निफ्टी १६१२५ बँक निफ्टी ३४२९० वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २३ May २०२२

आज क्रूड US $ ११३.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७७.६१ च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०२.७२ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड २.८२ VIX २३.६१ होते.

डाऊ जोन्स आणि S&P तेजीत तर NASHDAQ थोड्या मंदीत होते. युरोपियन आणि एशियन मार्केट्स तेजीत होती. सोने आणि चांदी तेजीत होती. USA मध्ये एनर्जी बास्केटमध्ये तेजी होती.

ऑस्ट्रेलियामध्ये लेबर पार्टीचे अल्बानीज हे पंतप्रधान म्हणून सूत्रे स्वीकारतील. या सत्तापालटाचा भारतीय कंपन्या ज्या ऑस्ट्रेलिया बरोबर बिझिनेस करतात त्यांच्यावर परिणाम होण्याचा संभव आहे.

या आठवड्यात फेडच्या FOMC ची मिनिट्स येतील.
UK नॉनफेरस मेटल्स वर ऍन्टीडम्पिंग ड्युटी आणण्याची शक्यता आहे.

सरकारने स्टील आणि प्लास्टिक उद्योगात लागणाऱ्या कच्च्या मालावरील इम्पोर्ट ड्युटी कमी केली. याचा फायदा नीलकमल प्लास्टिक्स, सुप्रीम इंडस्ट्रीज, किंग्जफो सायन्स, टॉर्सन्स प्रॉडक्टस यांना होईल. तर एक्स्पोर्ट ड्युटी बसवली तर JSW स्टील, JSPL, टाटा स्टील यांच्या वर परिणाम होईल. सरकारने स्टीलच्या निर्यातीवर १५% एक्स्पोर्ट ड्युटी बसवली स्टील उद्योगाच्या फिनिश्ड प्रोडक्टसवर एक्स्पोर्ट ड्युटी बसवणार. सिमेंटवाहतुकीचा खर्च कमी करणार.स्टील उद्योगाच्या उत्पन्नात १५% ते २०% उत्पन्न निर्यातीद्वारा येते.

केंद्र सरकारने पेट्रोलवरील करात Rs ८ ची आणि डिझेलवरील करात Rs ६ ची कपात केली. या करावरील सेस मिळून पेट्रोलच्या किमती Rs ९.५० आणि डिझेलच्या किमती Rs ७ ने कमी होतील. याचा फायदा लॉजिस्टिक कंपन्याना उदा. VRL लॉजिस्टिक्स, महिंद्रा लॉजिस्टिक्स, स्नोमॅन लॉजिस्टिक्स यांना होईल.

ग्लेनमार्क फार्माच्या गोवा युनिटच्या झालेल्या तपासणीत USFDA ने ५ त्रुटी तर नॉर्थ कॅरोलिना येथील प्लांटमध्ये १७ त्रुटी दाखवल्या. ही तपासणी ५ मे २०२२ ते १२ मे २०२२ दरम्यान झाली.

DCGA कडून जेट एअरवेजला रिव्हॅलिडेटेड एअर ऑपरेटर सर्टिफिकेट मिळाले. त्यामुळे आता जेट एअरवेज जुलै २०२२ – सप्टेंबर २०२२ दरम्यान उड्डाणे सुरु करू शकेल.

‘AETHER’ या फार्मासीयूटीकल क्षेत्रातील सुरत बेस्ड कंपनीचा IPO २४ मे २०२२ रोजी ओपन होऊन २६ मे २०२२ रोजी बंद होईल. ही कंपनी हार्टअटॅक आणि हायपरटेन्शन साठी औषधांना लागणारा कच्चा माल ( केमिकल्स ) आणि हायएंड फोटोग्राफी आणि हाय एन्ड कार्सच्या कोटिंगसाठी लागणारी केमिकल्स बनवते. वेगळी आणि नवी प्रोडक्टस बनवण्यावर कंपनीचा भर आहे. या Rs ८०८ कोटींच्या IPO चा प्राईस बँड Rs ६१० ते Rs ६४२ चा असून मिनिमम लॉट २३ शेअर्सचा आहे.

ZF कमर्शियलचा नफा वाढला, उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.

कोची शिपयार्ड उत्पन्न नफा वाढले Rs ३.७५ लाभांश जाहीर केला.

G E T & D ही कंपनी फायद्यातून तोट्यात गेली.
शोभा LTD चे उत्पन्न मार्जिन वाढले. तोट्यातून फायद्यात आली.

Paytm चे उत्पन्न वाढले पण तोटाही वाढला,. कंपनी जनरल इन्शुअरन्स मध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे. निकाल असमाधान कारक.

मेट्रो ब्रॅण्ड्स चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले. निकाल चांगले.

JK सिमेंट प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले.
फायझरचे उत्पन्न नफा वाढले .

धानुका एग्रीटेक प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले निकाल चांगले.

डिव्हीज लॅबचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. उत्पन्न Rs २५८८ कोटी, प्रॉफिट Rs ८९४ कोटी मार्जिन ४३.८६% होते. अन्य आय Rs ५०.५० कोटी होती. कंपनीने Rs ३० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

टॉरंट फार्मा २५ मे २०२२ रोजी बोनस शेअर्स इशू करण्यावर विचार करेल.

टाटा पॉवर आणि टाटा मोटर्स यांच्यात टाटा मोटर्सने त्यांच्या चिखली येथील प्लान्टवर ७ MV क्षमतेचा रुफटॉप सोलर प्रोजेक्टसाठी JV केले.

पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी UPL ने नवीन प्रॉडक्ट लाँच केले.

डिव्हीज लॅब आज अचानक, चांगले निकाल येऊनही पडला. कारण त्यांच्या काकीनाडा प्लाण्टला लवकर मंजुरी मिळत नाही. व्यवस्थापनाने फ्युचर गायडन्स देण्यास नकार दिला. या तिमाहीत मोलन्यूपिरावीर या कोविड संबंधित औषधापासून मिळणारे उत्पन्न भविष्यात असणार नाही/ कमी असेल कारण कोविडचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.

आज पुन्हा एकदा मार्केटने सकाळपासून असलेली तेजी शेवटच्या एक तासात गमावली. मेटल क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. लॉजिस्टिक ऑटो आणि रिअल्टी क्षेत्रातील शेअर्स मध्ये तेजी होती.
श्री सिमेंटच्या व्यवस्थापनाने सांगितले की सरकारने ज्या सवलती जाहीर केल्या आहेत त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. सिमेंटच्या किमती बॅगमागे Rs ५ ते Rs १० ने कमी करू. त्यासरशी सिमेंट क्षेत्रातील शेअर्स पडले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५४२८८ NSE निर्देशांक निफ्टी १६२१४ बँक निफ्टी ३४२४७ वर बंद झाले..

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २० May २०२२

आज क्रूड US $ १११.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७७.५५ च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०३.०० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड २.८६ VIX २३.१० होते. USA चा हौसिंग मार्केट डेटा आला. घरांच्या विक्रीत घट झाली.

चीन त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये US $ ५.३ ट्रिलियन इन्फ्युज करणार आहे. ह्यामुळे मेटल्स, केमिकल क्ष्रेत्रामध्ये तेजी येण्याची शक्यता आहे. चीनच्या सेंट्रल बँकेने सांगितले की LPR ( लोन प्राईम रेट) कमी करणार. हा रेट ४.६ % वरून ४.४५% एवढा कमी करणार. हा ५ वर्षांचा LPR असेल.

जपानची महागाई गेल्या सात वर्षांच्या कमाल स्तरावर आहे कोअर इन्फ्लेशन निर्देशांक २.१% ने वाढला (YOY)

आज FII नी Rs ९२१ कोटींची विक्री केली तर DII नी Rs ३२२९ कोटींची खरेदी केली. सरकारने ज्यूटच्या कमाल किमतीवरील नियंत्रणे हटवली.

नोव्हार्टीस, एन्ड्युअरन्स टेक, चंबळ फर्टिलायझर्स,सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, ग्रॅव्हीटा, बजाज हिंदुस्थान, टेक्समॅको रेल यांचे निकाल कमजोर आले.

मान इन्फ्रा, काँकॉर्ड, NR अग्रवाल ( मार्जिन वाढले) KIMS ( मार्जिन वाढले) TGV SRAAC, अरविंद स्मार्ट स्पेसेस या कंपन्यांचे निकाल चांगले आले.

SML ISUZU चा तोटा कमी झाला उत्पन्न वाढले.निकाल चांगले.

राणे मद्रास ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली. उत्पन्न वाढले.

हायडलबर्ग सिमेंटचा फायदा कमी झाला उत्पन्न वाढले.

ज्युबिलांत फूड्सनी पराठा पिझ्झा ची ३ नवी कॅटेगरीज. चिकन खिमा पराठा पिझ्झा, आणि कॉर्न पिझ्झा लाँच केला.

IDBI बँकेने AGEAS फेडरल लाईफ इन्शुअरन्स मधील २५% स्टेक Rs ५८० कोटींना विकला. आता IDBI बँक JV मधून बाहेर पडली.

हिंदुस्थान झिंक मधील २९,५% स्टेक सरकारला डायव्हेस्टमेन्ट करण्यासाठी मंजुरी मिळाली.

झायडस लाईफचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले. कंपनीने Rs २.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला. कंपनी Rs ६५० प्रती शेअर या भावाने टेंडर ऑफर रूटने शेअर बायबॅक करणार आहे. ११५३८४६१ शेअर्स म्हणजेच १.१३% शेअर कॅपिटल बायबॅक केले जातील. २ जून २०२२ ही रेकॉर्ड डेट असेल. या बायबॅक मध्ये प्रमोटरही भाग घेऊ शकतील. कंपनी Rs ७५० कोटी शेअर बायबॅक साठी खर्च करेल.

करूर व्यास बँकेचे NII वाढले प्रॉफिट वाढले NPA कमी झाले. निकाल चांगले.

व्हील्स इंडियाचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले.

इंडिगो पेन्ट्स प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले Rs ३ प्रति शेअर लाभांश

थरमॅक्स चा फायदा कमी झाला उत्पन्न वाढले. Rs ९ लाभांश जाहीर केला

बायकॉनने कॅन्सर ट्रीटमेंट ड्रग ABEVMY लाँच केले.

NTPC चे ग्रोस जनरेशन २.९% वाढून ७९९० कोटी युनिट झाले. कोळशाचे उत्पादन १७% ने वाढून ४.३६ MT झाले. NTPC चा फायदा उत्पन्न वाढले. NTPC Rs ३ लाभांश दिला. निकाल चांगले.

IDFC तोट्यातून फायद्यात आली.

MSTC ची सबसिडीअरी FSNL ( फेरो स्क्रॅप निगम लिमिटेड) च्या डायव्हेस्टमेन्ट साठी EOI चे नियम सोपे केले. पण FSNL चे स्टील आणि इतर कंपन्यांबरोबरचे करार मात्र चालू ठेवावे लागतील.

एप्रिलमध्ये सरकारने १०७ उपकरणांची यादी जाहीर केली. हि लाईन रिप्लेसमेंट युनिट्सची ऑर्डर भारतीय कंपन्यांना दिली जाणार आहे.Rs ८४६०० कोटींची उपकरणे २०२३मध्ये खरेदी होतील.

BEML च्या डायव्हेस्टमेन्टचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले.

आज रिअल्टी ऑटो मेटल्स सरकारी बँकाच्या शेअर्समध्ये खरेदी झाली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५४३२६ NSE निर्देशांक निफ्टी १६२६६ बँक निफ्टी ३४२७६ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १९ May २०२२

आज क्रूड US $ १०६.०० प्रती बॅरल्सच्या आसपास तर रुपया US $१= ७७.७५ च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०३.७८ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड २.९० VIX २४.१० होते.

वॉलमार्टचे निकाल खराब आले त्यामुळे शेअर सपाटून पडला. जागतिक अर्थव्यवस्थेचे कर्ज US $ ३०५ ट्रिलियन वर पोहोचले यात मोठ्या प्रमाणावर USA आणि चीनच्या कर्जाचा समावेश आहे. इमर्जिंग इकॉनॉमीजचे कर्ज US $ ८९ ट्रिलियनवरून US $ १०० ट्रिलियनवर पोहोचले.

UK मध्ये महागाईचा आकडा ९% वर पोहोचला. ही महागाई गेल्या ४० वर्षांच्या कमाल स्तरावर होते. एनर्जी आणि अन्नधान्यांच्या किमतीत झालेली वाढ यामुळे महागाई या स्तरावर पोहोचली.

चीनच्या GDP ग्रोथचे अनुमान ५.१% वरून ४.२% एवढे केले.

फेडचे अध्यक्ष पॉवेल यांनी पुन्हा एकदा सांगितले की महागाई २% पर्यंत आल्याशिवाय रेट वाढवणे थांबणार नाही. आज आशिया, युरोप, USA मधील मार्केट्समध्ये मंदी होती. FII नी Rs १२५४ कोटींची विक्री तर DII नी Rs ३७५ कोटींची खरेदी केली.
इंडोनेशियाने सांगितले की पाम तेलाच्या निर्यातीवर घातलेली बंदी सोमवारपासून उठवली जाईल.याचा परिणाम अडाणी विल्मर आणि रुची सोया यांच्यावर होईल.

एन्ड्युअरन्स टेक्नॉलॉजी ‘मॅक्सवेल एनर्जी’ सिस्टीमचे Rs ३०८ कोटींमध्ये अधिग्रहण करेल.

बिर्ला सॉफ्ट ही कंपनी २३ मे २०२२ रोजी शेअर बायबॅकवर विचार करेल.

फिनोलेक्स, गुजरात पिपावाव, तामिळनाडू न्यूज प्रिंट, उकल फ्युएल, अलाइड डिजिटल, पीडिलाइट, IGL, मद्रास फर्टिलायझर्स, पंजाब अँड सिंध बँक, टुरिझम फायनान्स, धनलक्ष्मी बँक या कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

ल्युपिन चे निकाल कमजोर आले. कंपनी फायद्यातून तोट्यात गेली.

ग्रॅन्युअल्स, सोमाणी सिरॅमिक्स चे निकाल कमजोर आले.

कामत हॉटेल्सचे उत्पन्न वाढले तोटा कमी झाला.
JK लक्ष्मी सिमेंटचे निकाल चांगले आले. प्रॉफिट, व्हॉल्युम, मार्जिन वाढले कंपनीने कर्जफेड केली.
‘MYTRAH एनर्जी’ ऍसेट्स साठी JSW ग्रुपने US $ १.६ बिलियन ते १.७ बिलियन एवढ्या रकमेवर करार केला. १.७ GW क्षमतेचे विंड आणि एनर्जी ऍसेट घेणार.

आता अडाणी ग्रुप हेल्थकेअर क्षेत्रात पदार्पण करणार आहे. या साठी वेगळी सबसिडीअरी स्थापन केली.

रत्नमणी मेटल्सने तुमच्याजवळ २ शेअर्स असतील तर १ बोनस शेअरची घोषणा केली आहे. कंपनीने Rs १४ लाभांश जाहीर केला. यासाठी १ जुलै ही रेकॉर्ड डेट असेल.

ITC चे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. कंपनीने Rs ६.२५ लाभांश जाहीर केला. त्यांच्या FMCG बिझिनेसमध्ये १२% सिगारेट बिझिनेसमध्ये १०% आणि ऍग्री बिझिनेस १०% ने वाढले. हॉटेलचे उत्पन्न Rs ४०७ कोटी झाले. ऍग्री बिझिनेसमध्ये गहू तांदूळ लीफ टोबॅको यांच्या निर्यातीचा समावेश आहे.
सेरम इन्स्टिट्यूट ची सबसिडीअरी आणि बायोकॉन बायालॉजीक्सच्या मर्जरला मंजुरी मिळाली.

बॉशचा फायदा कमी झाला उत्पन्न वाढले. कंपनीने Rs ११०.०० फायनल आणि Rs १०० स्पेशल लाभांश दिला.

V-GUARD इंडस्ट्रीज चा फायदा वाढला, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले. निकाल चांगले.

DR रेड्डीज उत्पन्न Rs ५४३७.०० कोटी, फायदा कमी होऊन Rs ८८ कोटी आणि मार्जिन २३.९% राहिले. युरोप बिझिनेस १२% वाढला तर रशियातील बिझिनेस ७०% वाढला. Rs ३० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

थंगमाईल ज्वेलरीचे निकाल असमाधानकारक होते.
ALKYL अमाईन्स प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले. Rs १० लाभांश जाहीर केला.

सुप्रीम कोर्टाने सांगितले की GST कॉऊन्सिल फक्त शिफारस करू शकते. तिने केलेल्या शिफारशी सरकारवर बंधनकारक असणार नाहीत.

टेक महिंद्राने पेगा सिस्टिम्स बरोबर केलेल्या कराराची मुदत ५ वर्षांनी वाढवली.

आज सर्व दूर मंदी होती. पण ITC चा शेअर मात्र तेजीत होता. सेन्सेक्स मध्ये टाटा मोटर्स आणि टाटा मोटर्स DVR समाविष्ट होण्याची शक्यता आहे. DR रेड्डीज सेन्सेक्समधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२७९२ NSE निर्देशांक निफ्टी १५८०९ बँक निफ्टी ३३३१५ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १८ May २०२२

आज क्रूड US $ ११२.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ७७.५६ च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०३.०० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड २.९९ VIX २२.३६ होते.

USA भारताला US $ ५० कोटींची मदत करणार आहे, शस्त्रास्त्रे सुद्धा पुरवणार. रशियाच्या कडे असलेला भारताचा कल कमी करण्यासाठी फ्रान्सनेही ह्या प्रकारची मदत करावी असे सुचवले जात आहे. USA मधील रिटेलसेल्सचे आकडे चांगले आले. त्यामुळे आर्थीक प्रगतीबद्दल जी शंका व्यक्त केली जात होती त्याला काही काळ तरी विराम मिळाला. पॉवेलनी सांगितले की महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. ऍपल टेसला सारखे शेअर्स वाढले. मार्केट तेजीत होते.

न्यायमेक्स क्रूडच्या भावापेक्षा ब्रेंट क्रूडचा भाव जास्त असतो. पण आज ब्रेंट क्रूडचा भाव न्यायमेक्स क्रूड पेक्षा कमी झाला. USAने व्हेनिझुएला सरकारवर घातलेले निर्बंध सौम्य करणार आहे यामुळे क्रूडच्या पुरवठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

जपानमध्ये सुद्धा ‘TEPID GROWTH’ आणि वाढती महागाईची स्थिती आहे. युक्रेन रशियातील युद्ध, कोविड यांचे परिणामस्वरूप ही स्थिती दिसत आहे.

सरकार BPCL मधील त्यांचा स्टेक पूर्णपणे डायव्हेस्ट करणार होते त्या प्रस्तावाला लोकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे आता सरकार २०% ते २५% एवढा स्टेक डायव्हेस्ट करण्याचा विचार करत आहे. सरकारचा BPCL मध्ये ५२.९८% स्टेक आहे.

TVS मोटर्स ही ‘INTELLICAR TELEMATICS’ Rs ४५ कोटींना ‘FABRIC IOT’ ला विकणार आहे.

IOC चे चौथ्या तिमाहीचे निकाल कमजोर आले. फायदा कमी झाला उत्पन्न वाढले. GRM ( ग्रॉस रिफायनिंग मार्जिन) १८.७ होते. कंपनीने २ शेअरमागे १ बोनस शेअर इशू करण्याची घोषणा केली.

IRB इन्फ्रा चे निकाल चांगले आले. फायदा ८०% ने वाढला

DLF चा फायदा कमी झाला. उत्पन्न कमी झाले.
राणे ब्रेक्सचे प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न वाढले
IOB चे GNPA कमी झाले NNPA मध्ये किंचित घट झाली. NII वाढले. प्रॉफिट वाढले.

अरविंद’ चे प्रॉफिट उत्पन्न वाढले. निकाल ठीक.
AB फॅशन आणि रिटेल तोट्यातून फायद्यात आली.
टीम लीजचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
मोतीलाल ओसवाल १.४६ मिलियन शेअर्सचा बायबॅक Rs ११०० प्रती शेअर या भावाने टेंडरऑफर रूटने करणार. या बायबॅकसाठी २७ मे २०२२ ही रेकॉर्ड डेट असेल.

कॅसिनो, ऑन लाईन गेमिंग, आणि हॉर्स रेसिंगवर GST १८% वरून २८% केला जाईल. संपूर्ण रकमेवर GST लावला जाण्याबाबतीत खूप विरोध आहे त्यामुळे फक्त एंट्री फीवर GST लावावा असे म्हणणे आहे.

PI इंडस्ट्री, मिंडा कॉर्प, गॅलॅक्सी सर्फेक्टंट, नोसिल, EID पॅरी यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

स्पिनिंग सेक्टरला इम्पोर्ट ड्युटी मध्ये काही सवलत मिळण्याची शक्यता आहे. ही सवलत ३० सप्टेंबर २०२२ च्या नंतरही चालू राहील. याचा फायदा वर्धमान टेक्सटाईल, नितीन स्पिंनर्स, ट्रेंट, सतलज टेक्सटाईल्स.

रुची सोया पतंजली आयुर्वेद या कंपनीकडून त्यांचा फूड बिझिनेसचे Rs ६९० कोटींना १५ जुलैपर्यंत पूर्णपणे अधिग्रहण करेल. रुची सोया चे नाव पतंजली फूड्स असे बदलले जाई.

बायोफ्युएल पॉलिसी मध्ये सुधारणा करायला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. इथेनॉलचे उत्पादन वाढवले जाईल. पेट्रोलमध्ये २०% एथॅनॉलच्या ब्लेंडींग २०२५ पर्यंत करण्यासाठी मंजूरी मिळाली. सरकारने २०३० चे लक्ष्य बदलून ५ वर्षे अलीकडे आणले.

TVS मोटर्सने अपग्रेडेड IQUAD E- स्कुटर्सची तीन व्हरायन्ट लाँच केली. यांची किंमत Rs ९८५६४/- पासून सुरु आहे.

नवनीतचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.

PANACEA बायोटेक ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली. शेअर वरच्या सर्किटला लागला.

सन फर्माने लिपिड- लोअरिंग ड्रग BRILLO लाँच केले.

BARBEQ नेशन फायद्यातून तोट्यात गेली.
टाटा कन्झ्युमर प्रॉडक्टसने US $ १०३ बिलियनची अक्विझिशनची योजना आखली आहे. ५ ब्रँड खरेदी करणे हे त्यांचे लक्ष्य असेल.

e-MUDHRA चा Rs ४१३ कोटींचा (यात फ्रेश इशू Rs २०० कोटींचा आणि Rs २१३ कोटींची OFS) असेल. हा IPO २० मे २०२२ ते २४ मे २०२२ दरम्यान ओपन राहील. याचा प्राईस बँड Rs २४३ ते Rs २५६ असेल.

मन्नापुरम फायनान्सचे चौथ्या तिमाहीचे निकाल कमजोर आले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५४२०८ NSE निर्देशांक निफ्टी १६२४० आणि बँक निफ्टी ३४१६३ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!