आजचं मार्केट – १२ May २०२२

आज क्रूड US $ १०८.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ७७.६० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.२० तर USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड २.८७ VIX २५.१० होते.

USA मधील महागाईचा निर्देशांक ८.३० एवढा आला. पण कोअर महागाईचा निर्देशांक ६ वरून ६.२ झाला त्यामुळे USA ची मार्केट्स मंदीत होती आशियाई मार्केट्स मंदीत तर युरोपियन मार्केट्स तेजीत होती. USA मध्ये फूड आणि ट्रान्स्पोर्टचे दर वाढले आहेत. महागाई ४० वर्षांच्या कमाल स्तरावर आहे. सोने तेजीत तर चांदी मंदीत होती. क्रिप्टो करन्सीमध्ये भारी घट झाली

FII ने Rs ३९०९ कोटींची विक्री केली. तर DII ने Rs ४१३१ कोटींची खरेदी केली.

LIC ने फायझर मधील स्टेक ४.०२% वरून ६.०५% पर्यंत वाढवला.

औरोबिंदो फार्माने चीनमधून आयात होणाऱ्या ‘AMOXYCILIN TRIHYDRATE’ वरील अँटी डम्पिंग ड्यूटीची मुदत वाढवण्याची विनंती केली होते. सरकारने ही ऍन्टीडम्पिंग ड्युटी रद्द केली.त्यामुळे ऑरोबिंदो फार्माचा शेअर पडला.

IOC च्या १९ मे रोजी होणाऱ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बैठकीत बोनस इशूवर विचार होण्याची शक्यता आहे.

रत्नमणी मेटल्स १८ मे २०२२ रोजी बोनस इशूवर विचार करेल.

PNB ने सांगितले की त्यांचा PNB हाऊसिंग मधील स्टेक विकण्याचा कोणताही विचार नाही. PNB ची FY २०२२-२३ मध्ये क्रेडिट ग्रोथ १०% असेल.
PSU कंपन्या येत्या तीन महिन्यात २० कोळशाच्या खाणी परत करू शकतात. पुन्हा त्या खाणींसाठी बीड मागवली जातील.

पेट्रोनेट LNG चे उत्पन्न प्रॉफिट मार्जिन कमी झाले. निकाल असमाधानकारक होते.

PNB चे प्रॉफिट, NIM ( नेट इंटरेस्ट मार्जिन) कमी झाले , NPA किंचित कमी झाले. NII वाढले निकाल असमाधानकारक

सागर सिमेंट ही कंपनी फायद्यातून तोट्यात आली. उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.

बिर्ला कॉर्प चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले.

इंडियन बँकेचे प्रॉफिट, NPA, NIM कमी झाले. कमजोर निकाल

COFORG चे निकाल चांगले आले. US $ रेव्हेन्यू वाढले, प्रॉफिट उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले. रेव्हेन्यू गायडन्स २०% दिला. ऍट्रिशनरेट १७.७% होता. कंपनीने Rs १३ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

बटरफ्लाय गांधीमतीचे उत्पन्न कमी झाले कंपनी फायद्यातून तोट्यात आली निकाल असमाधानकारक.
SKF चे प्रॉफिट वाढले.

NCC चे प्रॉफिट उत्पन्न वाढले. निकाल चांगले आले.NCC ने त्यांची NCC VIZAG अर्बन इन्फ्रा ही सबसिडीअरी GRPL HSG ला Rs ५०० कोटींना विकली.

स्किपर या कंपनीचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन ऑर्डरबुक वाढले. निकाल चांगले आले.

लक्ष्मी मशीन वर्क्स चे उत्पन्न प्रॉफिट मार्जिन वाढले.
MRPL चे रेव्हेन्यू वाढले मार्जिन वाढले. निकाल चांगले आले.

शीला फोम फायदा कमी झाला उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.

TV टुडे प्रॉफिट कमी उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले Rs ३ लाभांश

कल्याणी स्टील प्रॉफिट कमी उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले. Rs १० लाभांश जाहीर.

नितीन स्पिंनर्स प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले. Rs २.५० लाभांश

अवंती फीड्स फायदा उत्पन्न वाढले Rs ६.२५ लाभांश.

KSB पंप्स फायदा कमी आय वाढली.

सरकार स्ट्रेस्स्ड पॉवर प्लांट्सना रिव्हाइव्ह करणार आहे. यासाठी कर्ज दिले जातील.

KRBL ला दिलेली Rs ११७० कोटीची आयकर डिमांड रद्द झाली. त्यामुळे KRBL च्या शेअरमध्ये तेजी होती. बासमतीचे उत्पादन वाढत आहे. KRBL ही व्हॅल्यू चेन च्या प्रत्येक विभागात काम करते सीड डेव्हलपमेंट, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, प्रोक्युअरमेंट ऑफ पॅडी स्टोअरेज प्रोसेसिंग, पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग या प्रत्येक विभागात कार्यरत आहे.

GRAVITA पश्चिम आफ्रिकेतील घानामध्ये नवीन रिसायकलिंग युनिट सुरु करणार आहे.

वेदान्ताने OPPO आणि VIVO या लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादकांबरोबर सेमीकंडक्टर चिप उत्पादनासंबंधीत बोलणी चालू केली आहेत.

आज मार्केटमध्ये सर्व क्षेत्रात विशेषतः FMCG, OIL& GAS, ऑटो, रिअल्टी, मेटल्स या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रॉफीटबुकिंग झाले. आज येणारे भारतातील CPI चे म्हणजे महागाईचे आकडे आणि IIP चे आकडे कसे येतील आणि USA मधील ४० वर्षांच्या कमाल स्तरावरील महागाई, RBI ची २ जूनला असलेल्या पॉलिसीमध्ये होणारी दरवाढ यामुळे गुंतवणूकदारांनी आणि ट्रेडर्सनी प्रॉफिट बुकिंग केले.

‘ETHOS या प्रीमियम आणि LUXURY वॉच रिटेलरचा IPO मे १८ २०२२ ला ओपन होऊन २० मे २०२२ रोजी बंद होईल.याचा प्राईस बँड Rs ८३६ ते Rs ८७८ असून मिनिमम लॉट १७ शेअर्सचा आहे. Rs ३७५ कोटीचा फ्रेश इशू असून १.१ मिलियन शेअर्सची ओपन ऑफर असेल. एकूण IPO Rs ४७२ कोटीचा असेल. ही KDDL या कंपनीची सबसिडीअरी आहे.
खत उत्पादक कंपनी पारादीप फॉस्फेट्सचा IPO १७ मे २०२२ रोजी ओपन होऊन १९ मे २०२२ रोजी बंद होईल. याचा प्राईस बँड Rs ३९ ते Rs ४२ आहे. या IPO द्वारे सरकार त्यांचा कंपनीतील १९.५५% स्टेक विकणार आहे. IPO मध्ये Rs १००४ कोटींचा फ्रेश इशू असून ११.८५ कोटी शेअर्सचा OFS असेल.
टाटा मोटर्सचे निकाल आले. तोटा Rs १०३३ कोटी झाला. उत्पन्न Rs ७८४३९ कोटी झाले.

L &T ने Rs २२ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. कंपनीचे प्रॉफिट Rs ३२९३ कोटींवरून वाढून Rs ३६२० कोटी झाले. कंपनीला उत्पन्न Rs ५२८५० कोटी झाले. मार्जिन १२.३% होते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२९३० NSE निर्देशांक निफ्टी १५८०८ बँक निफ्टी ३३५७२ वर बंद झाले

Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.