आजचं मार्केट – १३ May २०२२

आज क्रूड US $ १०९.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७७.४० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.८१ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड २.८८ VIX २३.५१ होते. सोने आणि चांदी तेजीत होती.FII नी Rs ५२५६.०० कोटींची विक्री तर DII नी Rs ४८१६.०० कोटींची खरेदी केली.

काल एप्रिलचे CPI (कन्झ्युमर प्राईस इंडेक्स) ७.७९ आले. तसेच मार्च २०२२ साठी IIP १.९ आले.
CPI प्रमाणे महागाई वाढली आणि IIP च्या आकड्यांप्रमाणे औद्योगिक उत्पादन वाढले.

LDL कोलेस्टेरॉल चे ‘BEMDAC’ही औषध झायडस लाईफने भारतात लाँच केले.

स्पाईस जेटने कोब्रांडेड क्रेडीट कार्ड साठी एक्सिस बँकेबरोबर करार केला.

मॅट्रिमोनी ही कंपनी Rs ११५० प्रती शेअर या भावाने टेंडर रूटने बायबॅक करणार. यासाठी Rs ७५ कोटी खर्च करेल.

MSCI इंडेक्स मधून HDFC AMC बाहेर पडेल.
MSCI स्मॉल कॅप निर्देशांकात १ जून २०२२ पासून ४४ शेअर्स समाविष्ट केले जातील तर १४ शेअर बाहेर जातील. समाविष्ट होणाऱ्या शेअर्स मध्ये महिंद्रा हॉलिडेज, महिंद्रा लाईफ, ग्रीव्हज कॉटन, गो फॅशन, भारत डायनामिक्स, REC, गुजरात अंबुजा,जमना ऑटो, JK पेपर, लेमन ट्री, मिंडा, नेटवर्क १८, अडाणी पॉवर, AU स्मॉल फायनान्स बँक, JSPL, टाटा एलेक्सि, GMDC, हिंदुस्थान कॉपर,
अनुपम रसायन, AB कॅपिटल, उज्जीवन स्माल, क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण, पुनावाला फिनकॉर्प, ICRA, RBL बँक, J & K बँक, ग्रीव्हज कॉटन, गुजरात फ्लोरो यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
अपोलो टायर्स आणि हनीवेल ऑटोमेशन यांचे निकाल असमाधानकारक होते.
DB कॉर्पने Rs ३ लाभांश जाहीर केला.
युनियन बँकेचा नफा, NII ( नेट इंटरेस्ट इन्कम), प्रोव्हिजन वाढली. ग्रॉस आणि नेट NPA कमी झाले. बँकेने Rs १.९० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रॉफिट Rs ९११३.४० कोटी NII Rs ३११९८.०० कोटी झाले. NPA कमी झाले. बँकेने Rs ७.१० प्रती शेअर लाभांश जाहीर केला. लोन ग्रोथ QOQ ६% तर YOY ११.३% झाली.
टेक महिंद्राचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. प्रॉफिट उत्पन्न वाढले कंपनीने Rs १५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

बंधन बँकेचे प्रॉफिट Rs १९०२.०० कोटी NII Rs २५४० कोटी झाले. NPA कमी झाले.निकाल चांगले आले.

अल्केम लॅबचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले. Rs ४ लाभांश जाहीर केला.
इमामीचे प्रॉफिट उत्पन्न वाढले. कंपनीला Rs ५.१८ कोटींचा वन टाइम लॉस झाला.

एस्कॉर्टस फायदा अपेक्षेनुसार पण YOY कमी झाला. कंपनीने Rs ७ लाभांश जाहीर केला.

HAL ला Rs ३१०५ कोटी एवढा फायदा झाला तर उत्पन्न Rs ११५६१ कोटी झाले. दोन्हीतही चांगली वाढ झाली.

बँक ऑफ बरोडाचे निकाल चांगले आले. बँकेने Rs १.२० लाभांश जाहीर केले.

APL अपोलो चा फायदा उत्पन्न वाढले. कंपनीने Rs ३.५० लाभांश जाहीर केला.

आज मार्केट गॅप अप उघडले. ऑटो, FMCG, फार्मा यांच्या मध्ये खरेदी झाली आणि मेटल बँका, एनर्जी क्षेत्रात प्रॉफिट बुकिंग झाले. शेवटच्या तासात मार्केटने सर्व तेजी गमावली.

आज LIC ची अलॉटमेंट झाली रिटेल अर्जदारांसाठी त्यांनी एक लॉट साठी अर्ज केला असेल तर त्यांना एक लॉट (१५ शेअर्स) अलॉट होईल.Rs २००००(२१० शेअर्स) साठी ज्यांनी अप्लिकेशन केले असेल त्यांना ७७ शेअर्सची अलॉटमेंट झाली. पॉलिसी होल्डरमधील १ लॉट च्या अर्जदाराला १ लॉट मिळेल अशी शाश्वती नाही. ज्यांनी Rs २०००००/- साठी( २१० शेअर्स) अर्ज केला होता त्यांना ४८ शेअर्स मिळतील.

व्हिनस पाइप्सचा IPO १० वेळा ओव्हरसब्सक्राइब झाला.

मारुती हरयाणामधील सोनेपत येथील ८०० एकर जमिनीत नवीन प्लांटमध्ये Rs ११००० कोटींची गुंतवणूक करणार आहे. या प्लांटची उत्पादन क्षमता २.५० लाख युनिट प्रती वर्ष असून हा प्लांट २०२५ मध्ये सुरु होईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२७९३ NSE निर्देशांक निफ्टी १५७८२ बँक निफ्टी ३३१२१ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.