आजचं मार्केट – १६ May २०२२

आज क्रूड US $१११.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७७.५० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.५० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड २.९५ VIX २४.३ होते.

सोने आणि चांदीमध्ये तेजी होती. आशियायी, USA ची मार्केट्स तेजीत होती. युरोपियन मार्केट्सही तेजीत होती. पण हळू हळू ही तेजी कमी झाली. सिंगापूरची मार्केट्स बंद होती.करन्सी मार्केट बंद होते.

फिनलँड आणि स्वीडन हे देश नाटो मध्ये सामील होणार आहेत.रशियाने या देशांना याबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

PBOC ने व्याजाचे दर ४.६% वरून ४.४% केले. चीनच्या इंडस्ट्रियल आउटपुट मध्ये २.९% ची घट झाली.

USA अर्थव्यवस्थेचा ग्रोथरेट २.६% वरून २.४% एवढा होण्याची शक्यता आहे. आज USA च्या वॉलमार्ट, होम डेपो आणि JD.कॉम चे निकाल येतील.
FII नी Rs ३७८०/- कोटींची विक्री केली. DII नी Rs ३१७० कोटींची खरेदी केली.

होलसिमचा ACC आणि अंबुजा सिमेंट मधील स्टेक अडाणी ग्रुप US $ १०५० कोटींना खरेदी करणार आहे. हा स्टेक अंबुजामध्ये Rs ३८५ प्रती शेअर आणि ACC मधील स्टेक Rs २३०० प्रती शेअर या भावाने खरेदी केले जातील. अंबुजा मधील ६३,१९ % स्टेक विकत घेणार. या अक्विझिशननंतर अडाणी ग्रुप सिमेंट उद्योगात नंबर २ ची कंपनी होईल.

सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली. फक्त GOVT टू GOVT आणि आजपर्यंत पूर्ण झालेले काँट्रॅक्टस पूर्ण करता येतील. याचा फायदा ब्रिटानिया, MRS बेक्टर फूड्स, जुबिलण्ट फूड्स आणि ऑल ब्रँड रेस्टारंटसला फायदा होईल.

फेडरल बँकेने MCLR मध्ये ०.२०% ची वाढ केली.
Ptm ला जनरल इन्शुरन्सचे नवीन लायसेन्स मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंपनी या साठी नवीन अर्ज करेल.

NSE च्या इंटरनॅशनल एक्स्चेंजवर जुलै २०२२ पासून ट्रेडिंग सुरु होईल.

VIP तोट्यातून फायद्यात आली.

सेंच्युरी प्लायवूडचे, नवभारत व्हेंचर्सचे (Rs ६ लाभांश), भारत फोर्ज ( Rs ५.५० लाभांश), GSK फार्मा ( Rs ९० लाभांश ) आयशर मोटर्सचे ( Rs २१ लाभांश) , D’ MART, REC( Rs ४.८० लाभांश), CESC ( प्रॉफिट सेम, रेव्हेन्यू वाढले), ELGI EQIPMENTS, यूको बँक, विनती ऑर्गनिक्स ( प्रॉफिट रेव्हेन्यू वाढले मार्जिन कमी झाले ), ऑल सॅक टेक्नॉलॉजी, ग्रीन प्लाय इंडस्ट्रीज( प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढले, मार्जिन कमी झाले.) निकाल चांगले आले.

नजाराचे निकाल कमजोर आले. कंपनीने १:१ बोनस इशू जाहीर केले.अंबर एंटरप्रायझेसचे निकाल कमजोर आले.

आज मेटल, ऑटो, एनर्जी, फायनान्सियलस मध्ये थोडी खरेदी झाली तर IT आणि FMCG मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

उद्या LIC च्या शेअरचे BSE आणि NSE वर लिस्टिंग होणार आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२९७३ NSE निर्देशांक निफ्टी १५८४२ आणि बँक निफ्टी ३३५९७ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.