Monthly Archives: June 2022

आजचं मार्केट – ३० June २०२२

आज क्रूड US $ ११५ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७९ च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.०८ VIX २१.८२ होते.

फेड, ECB, BOE या सर्वांनी वाढत्या महागाईवर चिंता व्यक्त केली. USA ची मार्केट्स मर्यादित रेंजमध्ये ट्रेड करत होती. सोने मंदीत तर चांदी माफक तेजीत होती. युरोपची मार्केट्स मंदीत होती
FII ने Rs ८५१ कोटींची विक्री तर DII ने Rs ८४८ कोटींची खरेदी केली.

मिंडा इंडस्ट्रीज ने जर्मन कंपनी ‘FRIWO’ मध्ये युरो १५ मिलियनला ५.२% स्टेक खरेदी केला.

MCX वर FPI ना नॉन ऍग्रीकल्चर कॉमोडिटीजच्या डेरिव्हेटिव्हमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी सेबीने परवानगी दिली. यामुळे MCX ची डेप्थ आणि लिक्विडिटी वाढेल.

टाटा मोटर्सला दिल्ली राज्य सरकारकडून १५०० इलेक्ट्रिक बससाठी ऑर्डर मिळाली.

KRSNAA डायग्नॉस्टिक्स यांनी प्रत्येक टेस्ट करण्यासाठी भरपूर डिस्काउंट देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या सेक्टरमध्ये प्राईसवॉर सुरू होण्याची शक्यता आहे.

वॉन्डरेला या कंपनीने ओडिशा सरकारकडून ५० एकर जमीन लीजवर घेतली आहे.

तेजस नेटवर्क्सने सेमीकंडक्टर सोल्युशनसाठी जपानीज कंपनी ‘RENAISANS’ बरोबर करार केला.

बायोकॉनने AMPYR रिन्यूएबल एनर्जी रिसोर्सेस इलेव्हनमध्ये २६% स्टेक सोलार पॉवरसाठी Rs ७.५० कोटींना घेतला.

GR इंफ्राने पूर्वाचंल एक्स्प्रेस वे मोजरापूरपासून UP मधील BIJAVRA पर्यंत पूर्ण केला.

मारुतीने ब्रेंझा गाडी लाँच केली.

बांगला देश आणि थायलंड क्लिअर फ्लोट ग्लास जे सोलर एनर्जी, रेफ्रिजरेशनसाठी वापरले जातात , त्याची बेंचमार्क प्राईस US $ ३०६.१०/MT ऍन्टीडम्पिंग ड्युटी लावण्यासाठी ठरवली. याचा फायदा सेंट गोबेन, असाही यांना होईल.

DR रेड्डीज चे ‘SUBOZONE’ संबंधात जे मामले US कोर्टात होते ते सर्व रद्द झाले.

UPL ने ‘BUNGE’ बरोबर ब्राझीलमध्ये ORGEO गठन करण्यासाठी करार केला. शेतकऱ्याचे उत्पन्न आणि उत्पादकता वाढवणे हा उद्देश आहे .

देवयानी INT ने १००० वे आउटलेट सुरु केले. २०२६ पर्यंत आणखी १००० आउटलेट सुरु करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

J. B. केमिकल्स आणि फार्मास्युटिकल्सने DR रेड्डीज लॅबकडून त्यांच्या ब्रँड्सच्या पोर्टफोलिओचा भारतात उपयोग आणि वापरण्यासाठी खरेदी करण्यासाठी २९ जूनच्या बैठकीत मंजुरी दिली.
जुलै सिरीजसाठी खालीलप्रमाणे रोलओव्हर झाले.
९५% रोलओव्हर : सीमेन्स
९४% JSW स्टील. पेज इंडस्ट्रीज
९३% : ग्रासिम
९२% : अडाणी एंटरप्रायझेस. MPHASIS
९१% मुथूट फायनान्स
९०% पीडिलाइट, MRF, हिरोमोटो, ICICI बँक, रामको सिमेंट
८९% कोलगेट, श्री सिमेंट,
८८% पॉलीकॅब, ज्युबिलण्ट फूड्स, अतुल लिमिटेड, मॅरिको

झायडस लाईफच्या लॅन्कोसामाईन या औषधाला USFDA कडून मंजुरी मिळाली.

SRF चे Rs ४०५ कोटींचे दाहेज येथे असलेले प्रोजेक्ट कमिशन झाले.

अहलुवालिया काँट्रॅक्टस यांना Rs २०९ कोटींचे प्रोजेक्ट मिळाले.

IT, ऑटो, मेटल्स, रिअल्टी आणि एनर्जी शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. इन्शुअरन्स आणि NBFC शेअर्समध्ये खरेदी दिसली.

उद्या जून २०२२ या महिन्यासाठी ऑटो विक्रीचे आकडे येतील.

जुलै महिन्यात पहिल्या तिमाहीचे कॉर्पोरेट निकाल जाहीर व्हायला सुरुवात होईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५३०१८ NSE निर्देशांक निफ्टी १५७८० बँक निफ्टी ३३४२५ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २९ June २०२२

आज क्रूड US $११८.०० प्रती बॅरल्सच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७९.०० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.३८ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.१६ VIX २२.०५ वर होते.

USA मध्ये कन्झ्युमर सेंटीमेंट निर्देशांक , कन्झ्युमर कॉन्फिडन्सनिर्देशांक अनुक्रमे ५८.४ वरून ५० आणि १०३.२ वरून ९८ झाले.हे १९५२ पेक्षाही खालच्या पातळीवर आहेत.

चीनने प्रवाशांसाठी क्वारंटाईनची मुदत कमी केली.
श्रीराम प्रोटीनने रशियात तम्बोव येथे सनफ्लॉवर ऑइल प्रोसेसिंग फॅक्टरी सुरु केली.

FII ने Rs १२४४ कोटीची विक्री तर DII ने Rs १२०६ कोटीची खरेदी केली.

रूट मोबाईल Rs १७०० प्रती शेअर या भावाने मार्केट रुटने शेअर्स बायबॅकवर Rs १२० कोटी खर्च करेल.
१ जुलै २०२२ ही IOC च्या बोनस इशूसाठी रेकॉर्ड डेट तर बजाज ऑटोचा डिव्हिडंड, स्वराज इंजिनचा डिव्हिडंड साठी एक्स डेट आणि EKI एनर्जीच्या बोनस इशूची रेकॉर्ड डेट असेल.

LED वरील GST १२% वरून १८% केला याचा परिणाम हॅवेल्स वर होईल.

हॉस्पिटलचा रूम चार्ज Rs ५००० पेक्षा जास्त असेल तर ५% GST लागेल. याचा परिणाम अपोलो हॉस्पिटल्सवर होईल.

सोलर वॉटर सिस्टीम आणि सोलर वॉटर हिटर वरील GST ५% वरून १२% केला. याचा परिणाम टाटा पॉवरवर होईल.

लेदरवरील GST ५% वरून १२% केला.
हॉटेल रूमचे भाडे Rs १००० पेक्षा कमी असेल तर त्यावर १२% GST लागेल.

कॅसिनो, ऑनलाईन गेमिंग, आणि हॉर्स रेस यांच्यावर २८% GST चा प्रस्ताव ग्रुप ऑफ मिनिस्टर्सकडे पाठवला त्यामुळे आजचा निर्णय पुढे ढकलला गेला.
शक्ती पंप या कंपनीचे प्रमोटर्स शेअर्स खरेदी करत आहेत.

आलेम्बिक फार्मा NIPON इंडिया ग्रनुअल्स, सुप्रिया लाईफ सप्टेंबर पासून F & O सेगमेंटमधून बाहेर पडतील.

SIS लिमिटेड ही कंपनी Rs ५५० प्रती शेअर या भावाने टेंडर रूट ऑफरने शेअर्स बायबॅकवर Rs ८० कोटी खर्च करणार.

सौदी अरेबिया आणि UAE ने सांगितले की क्रूड उत्पादन पूर्ण क्षमतेने चालू आहे. इक्वाड़ोर आणि लिबिया मध्ये राजकीय संकट आहे. तसेच USA मध्येही उत्पादन कमी झाले आहे.

त्यामुळे क्रूडचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
भारतात RAW शुगर वापरत नसल्यामुळे RAW शुगर निर्यात करण्याची परवानगी द्यावी अशी साखर उत्पादकांनी सरकारला विनंती केली आहे.

जपानीज चिपमेकर रेनेसान्स आणि टाटा मोटर्स यांनी सेमी कंडक्टर सोल्युशन्स डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंग, डेव्हलपमेंट साठी करार केला.

सरकार क्रूडच्या डोमेस्टिक उत्पादन वाढण्यावर भर देणार आहे. त्यासाठी उत्पादनाच्या अटीत काही सवलत देण्याचा विचार चालू आहे.

नेटस्कोप या कंपनीबरोबर मास्टेकने क्लाउड सेक्युरिटी ट्रान्सफॉर्मेशन साठी करार केला.

युनिफाईड लाइटिंग च्या व्यवसायात बजाज इलेक्ट्रिकल्स उतरणार आहे.

अलाइड डिजिटल सर्व्हिसेसला सोलापूर प्रोजेक्टसाठी Rs ४९ कोटींचे LOI मिळाले. .
सरकारने क्रूड ऑईलची विक्री डिरेग्युलराइझ केली. आता क्रूड उत्पादक कंपन्या खुल्या बाजारात क्रूड विकू शकतील. मात्र क्रूड निर्यात करायला परवानगी दिली नाही. सरकारने हे उपाय डोमेस्टिक उत्पादन वाढवण्यासाठी केले.

६३००० PACS (प्रायमरी ऍग्रीकल्चर क्रेडिट सोसायटी) चे संगणकीकरण करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली.

अलाइड ब्लेंडर्स आणि डिस्टीलरीज या कंपनीचा IPO लवकरच येण्याची शक्यता आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५३०२६ NSE निर्देशांक निफ्टी १५७९९ बँक निफ्टी ३३२६९ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २८ June २०२२

आज क्रूड US $ ११६.०० प्रती बॅरल्सच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७८.८० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०३.८६ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.१९ तर VIX २१.२० होते.

USA मध्ये घरांची विक्री चांगली झाली.

G 7देश रशियाच्या ऑइलच्या किमती कॅप करायला भाग पडतील.

नेदरलँड, पोलंड, जर्मनी, बल्गेरिया या देशाना रशियाने नैसर्गिक गॅसचा पुरवठा कमी केला.

US आणि इराणच्या चर्चेत EU मध्यस्थाची भूमिका बजावणार.

इक्वाड़ोर आणि लीबियात राजनैतिक संकट वाढले.

उद्यापासून निफ्टी बँक निफ्टी आणि CPSE यांच्या इंडेक्स मध्ये बदल होणार आहे. ONGC वेटेज ३.२% नी वाढणार NTPC -१.५२% पॉवर ग्रीड – ०.८७% हे बदल CPSE इंडेक्स मध्ये होतील ऍक्सिस बँक +१.०४,% SBI +०.३%इंडसइंड बँक +०.१५% HDFC बँक -०.७९% ICICI बँक – ०.६८% कोटक बँक -०.३४% हे बदल बँक निफ्टी मध्ये होतील.

निफ्टी ५० मध्ये ONGC +.०५%, भारती एअरटेल +०.०५%, सिप्ला +०.०३% आणि SBI लाईफ ०.०१% रिलायन्स -०.०२% इन्फोसिस -०.०१% UPL -०.०१% TCS -०.०१%

या प्रमाणे वेटेज वाढेल /कमी होईल.

ज्या निफ्टीच्या / CPSE/ बँक निफ्टीच्या शेअरच्या वेटेजमध्ये वाढ होणार आहे त्यात गुंतवणूक येण्याची शक्यता आहे.ज्या निफ्टी/ CPSE/बँक निफ्टीच्या शेअरच्या वेटेज मध्ये घट होणार आहे त्यामध्ये गुंतवणूक कमी होईल.

महिंद्राने काल स्कॉर्पिओ-N लाँच केली. पाच प्रकारांमध्ये Rs ११.९९ लाखापासून Rs १९.४९ लाखापर्यंत मिळेल.

१५ कंपन्या व्हाइट गुड्सच्या PLI च्या दुसऱ्या चरणात Rs १३६८ कोटीची गुंतवणूक करणार.

या १५ कंपन्यात अडानी कॉपर ट्यूब, LG इलेक्ट्रॉनिक्स, विप्रो एंटरप्रायझेस,जिंदाल पॉली हॅवेल्स, सिस्का या कंपन्यांचा समावेश आहे.

यातील ६ कंपन्या AC वाल्या तर ९ कंपन्या LED वाल्या आहेत.

१ जुलै २०२२ पासून टाटा मोटर्स CV च्या किमतीत १.५% ते २.५% वाढ करणार आहे.

पारस डिफेन्स ने ऑप्टिकल इमेजिंग सिस्टीम टेक्नॉलॉजी साठी न्यू स्पेस इंडियाबरोबर करार केला.

२४ जूनपासून रुची सोयाचे नाव बदलून पतंजली फूड प्रॉडक्टस असे झाले.

IOC च्या बोनस इशूची १ जुलै २०२२ शुक्रवार ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५३१७७ NSE निर्देशांक निफ्टी १५८५० बँक निफ्टी ३३६४२ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २७ June २०२२

आज क्रूड US $ ११३.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७८.३०च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.०० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.१६ VIX २१.०६ होते.

रशियाने US $ १०० मिलियनच्या बॉण्ड्सचे पेमेंट केले नाही. G ७ च्या बैठकीमध्ये UK USA कॅनडा, जपान आणि इतर सदस्यांनी रशियातून सोने आयात करायला बंदी घातली.

चीनला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले त्यामुळे आता चीनमधील निर्बंध कमी होण्याची शक्यता आहे. चीनने बँकांना युआन ट्रेडिंग अवर्स वाढवायला सांगितले.

युरोपियन युनियन बरोबर FTA करार करण्याबाबत बोलणी सुरु झाली आहेत.

टाटा पॉवरने केरळ बॅकवॉटर्सवर १०१.६ MW चा फ्लोटिंग सोलर प्लांट सुरु केला. ही प्रोजेक्ट केरळमध्ये कायाकुलमच्या ३५० एकर वॉटर बॉडीवर तयार केली आहे.

GHCL ने तामिळनाडूमध्येमदुराई मनापराई येथे स्पिनिंग युनिट सुरु केले.

नजारा टेक ‘अबसोल्यूट स्पोर्ट्स’ मध्ये स्टेक घेण्याची शक्यता आहे.

द्वारकेश शुगरने UP मधील फरीदपूर येथे डिस्टिलरी प्लांट सुरु केला.

TTK प्रेस्टिजने मोड्युलर किचन सोल्युशन प्रोव्हायडर ‘ULTRAFRESH’ मध्ये ४०% स्टेक घेतला.

DR रेड्डीज नी ब्रँडेड इंजेक्टेबल पोर्टफोलिओ US $ ५० मिलियनला खरेदी केला.

रेड्डीजनी ‘THERAPEUTIC ड्रग पेटंट लिटिगेशन सेटल केले. त्यांना US $ ७२ मिलियन ३१ मार्च २०२४ पर्यंत मिळतील.

कॉपरचा भाव १६ महिन्यांच्या किमान स्तरावर आला. याचा फायदा पॉलीकॅब, फिनोलेक्स, KEI, हॅवेल्स यांना होईल.

SIS २९ जूनच्या बैठकीत शेअर बायबॅकवर विचार करेल.

कॅसिनो आणि गेमिंग कंपन्यांवर २८% GST लावायचा प्रस्ताव आहे.

‘ACRYSIL’ ने QUARTZ किचन सिंक्स ‘IKEA’ ला सप्लाय करायला सुरुवात केली. पूर्वीपेक्षा दुप्पट सप्लाय करण्याची शक्यता आहे.

कार्ड टोकनायझेशनची मुदत ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत वाढवली. याचा फायदा SBI कार्ड्स ला होईल.

यावेळेला डेटा पाहिला तर कार्ड स्पेंडिंग वाढले आहे.
वेलस्पन कॉर्पला भारत, USA , ऑस्ट्रेलिया येथून Rs ६०० कोटींची ऑर्डर मिळाली.

BIS ने EV बॅटरीसाठी परफॉर्मन्स स्टँडर्ड्स सेट केले.
USFDA ने सिप्लाच्या पीठमपुर युनिटची तपासणी सुरु केली. या प्लांटमध्ये फॉर्म्युलेशनचे उत्पादन होते. ड्राय पॉवडर इनहेलरची तपासणी सुरु केली.

हिकलच्या तळोजा प्लॅन्टचे उत्पादन पुन्हा सुरु झाले . हायकोर्टाने पर्यावरण विभागाला हा प्लांट सुरु करायची मंजुरी द्यायला सांगितले. या शेअरमध्ये तेजी आली.

बजाज ऑटो सेमीकंडक्टर्सच्या टंचाईमुळे आणि उत्पादनखर्च वाढल्यामुळे १ जुलै २०२२ पासून Rs २००० एवढी किमतीत वाढ करणार आहे. बजाज ऑटोने कमाल Rs ४६०० प्रती शेअर या भावाने ओपन मार्केट रुटने Rs २५०० कोटींचा शेअर बायबॅक जाहीर केला.

सरकार MSIPS ( मॉडिफाइड स्पेशल इन्सेन्टिव्ह पॅकेज स्कीम) अंतर्गत ११४ कंपन्यांना Rs १७७२ कोटी सबसिडी दिली. इलेक्टॉनिक मॅन्युफॅक्चरिंगला उत्तेजन देण्यासाठी ही सबसिडी देण्यात येईल.
इंडियन कार्ड क्लोदिंग ने Rs २५ प्रती शेअर स्पेशल लाभांश जाहीर केला. UK बेस्ड JV मध्ये ४०% स्टेक घेणार आहे.

SME, MSME ना GST मध्ये बरीच सवलत मिळण्याची शक्यता आहे. सिटी युनियन बँक यांना मोठ्या प्रमाणावर कर्ज देते म्हणून सिटी युनियन बँकेचा शेअर तेजीत होता.

ऑरोबिंदो फार्माला सेबीकडून डिस्क्लोजर नियमांचे उल्लंघन केले म्हणून वॉर्निंग लेटर मिळाले.

ग्रीन लॅमने एक अधिग्रहण केले . क्षमता वाढवण्यासाठी लॅमिनेट मॅन्युफॅक्चरिंग प्लांट Rs ३६ कोटींना घेतला.

IT आणि मेटल्स क्षेत्रात खरेदी झाली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५३१६१ NSE निर्देशांक निफ्टी १५८३२ बँक निफ्टी ३३८११ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २४ June २०२२

आज क्रूड US $ ११०.७० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७८.३० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.०२ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.१० VIX २१.०० होते.

USA ची मार्केट्स, एशियन मार्केट्स तेजीत होती. युरोपियन मार्केट्स मंदीत होती. सोने आणि चांदी मंदीत होती. कॉपर १७ महिन्याच्या किमान स्तरावर म्हणजे US $ ३.७३९ पर्यंत घसरले.याचा परिणाम हिंदुस्थान कॉपरवर होईल. निकेल आणि अल्युमिनियममध्येही मंदी होती. सामान्यतः औद्योगिक मेटल्समध्ये मंदी होती.

ऍक्सेंच्युअरचे निकाल चांगले आले. Q३ मध्ये US $ रेव्हेन्यू ७.४%, नवीन ऑर्डर्स १५%ने वाढून US $ १७ बिलियन झाल्या. गायडन्स २५.५% ते २६.५% दिला. अक्सेंच्युअरच्या चांगल्या निकालांमुळे IT सेक्टरमधील शेअर्समध्ये तेजी येण्याचा संभव आहे.
झोमॅटोच्या बोर्ड मीटिंग मध्ये ‘BLINKIT’ च्या अधिग्रहणाला मंजुरी मिळणे शक्य. प्रेफरन्स शेअर्स इशू करून डील पूर्ण करण्याची शक्यता.

USA मध्ये गव्हाचा भाव US $ ९४६ पेक्षा कमी म्हणजे एका वर्षात २५% कमी झाला. ह्याचा फायदा ब्रिटानिया, ज्युबिलण्ट, मेरिको( पाम ऑईलचे भाव कमी झाले. ) , MRS बेक्टर फूड्स यांना फायदा होईल.

टाटा NEXON EV मध्ये वसई येथे आग लागली.
हिरो मोटो कॉर्पने गाड्यांच्या किमती Rs ३०००/- ने वाढवल्या. याचा फायदा मुंजाल शॉवर आणि मुंजाल ऑटो यांनाही होईल.

ONGC चा फॉरीन आर्म OVL ला कोलंबियामध्ये नवीन तेलविहीर मिळाली.

जपानमध्ये रबराचा भाव २६० येन पेक्षा कमी झाला. याचा फायदा टाटा मोटर्स, अशोक लेलँड यांना होईल.
ICICI बँकांचा ADR १.५०% वाढला. त्यामुळे ICICI बँकेच्या शेअरमध्ये तेजी होती.

थरमॅक्स ने २ रिन्यूएबल एनर्जी कंपन्या खरेदी केल्या.
रबर केमिकल्सवर अँटी डम्पिंग ड्युटी बसवण्याची मागणी फेटाळली.

टोयोटा आणि मारुती १ ऑगस्ट २०२२ पासून नवीन SUV चे उत्पादन सुरु करेल.

SMS लाईफसायन्सेसच्या तेलंगणा युनिटला USFDA ने क्लीन चिट दिली.

V -२ रिटेलने शिलॉंग मध्ये त्यांचे स्टोअर उघडले.

HCL टेक ने VANCOUVER येथे न्यू ग्लोबल डिलिव्हरी सेंटर सुरु केले.

कॅनरा बँकेला Rs ९००० कोटी उभारायला मंजुरी मिळाली.

सुवेंन लाईफसायन्सेस राईट्स इशू द्वारा Rs ४०० कोटी उभारेल.

हेल्थकोअर ग्लोबल बँगलोर येथे २५ बेड्सचे कॅन्सर केअर सेंटर सुरु करणार.

१ जुलै २०२२पासून सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर सरकारने बंदी घातली. प्लास्टिक स्ट्रॉवर बंदी घातली. UFLEX ६०० कोटी U आकाराच्या पेपर स्ट्रॉचे त्यांच्या सानंद येथील प्लांटमध्ये उत्पादन करणार आहे.

टाटा केमिकल्स युरोप यांनी UK मधील सर्वात मोठा कार्बन कॅप्चर प्लॅन सुरु केला.

हिरो मोटो कॉर्पने PASSION XTECही नवीन बाईक ऍडव्हान्स फिचर्स सकट लाँच केली.
DR रेड्डीजने ‘INDIVIOR’ बरोबरचा पेटंट वाद सेटल केला.

रेमंडचे कर्ज ३१ मार्च २०२२ अखेर Rs १०८८ कोटी होते. हे कर्ज २०२१ मध्ये Rs १४१६ कोटी तर २०२० मध्ये Rs १८९५ कोटी होते.

आज साखर उत्पादक कंपन्या, मेटल, FMCG, ऑटो क्षेत्रातील कंपन्यामध्ये खरेदी तर IT क्षेत्रातील कंपन्या मंदीत होत्या.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२७२७ NSE निर्देशांक निफ्टी १५६९९ बँक निफ्टी ३३६२७ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २३ June २०२२

आज क्रूड US $ १०९ प्रती बॅरल्सच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७८.३० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.१२ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.१७ आणि VIX २०.८८ होते.

चीनमध्ये वाहनविकी १३ जून ते १९ जून दरम्यान पॅसेंजर कार्स विक्री ३९% वाढून ४.१६लाख झाली तर रिटेल विक्री ५५% ने वाढली.चीनने टॅक्स मध्ये सवलत आणि उत्पादकांना इन्सेंटिव्हज दिल्या होत्या.
FII ने Rs २९२० कोटींची विक्री तर DII ने Rs १८५९ कोटींची खरेदी केली.

नजारा टेकची २४ जूनला EX-बोनस डेट निश्चित केली आहे.

ग्लेनमार्क फार्माच्या बद्दी युनिटच्या तपासणीत ६ त्रुटी दाखवून USFDA ने फॉर्म नो. ४८३ इशू केला.
QUESS कॉर्प आणि ऑल सॅक टेक्नॉलॉजीच्या मर्जरला मंजुरी मिळाली. ऑल सॅक च्या १०० शेअर्सला QUESS कॉर्पचे ७४ शेअर्स मिळतील.
IRB इन्फ्राला NHAI कडून Rs ३१८ कोटी आर्बिट्रेशन अवॉर्ड मिळाले.

मोतीलाल ओस्वालचा Rs ११०० प्रती शेअरचा शेअर बायबॅक २४ जून २०२२ ला ओपन होऊन ७ जूलै २०२२ ला बंद होईल. कंपनी या बायबॅक साठी Rs १६० कोटी खर्च करेल.

BELला इंडियन आर्मिकडू मोठी ऑर्डर मिळाली.
स्पंदन स्फूर्तीने माजी MD पद्मजा यांच्याबरोबर सेटलमेंट केल्यामुळे या शेअरमध्ये तेजी होती.

AURION प्रो या कंपनीने कॅलिफोर्निया ट्रॅव्हल प्रोजेक्टअंतर्गत बरीच डील साइन केली.

आशियाना हौसिंग पुण्यातील रिअल्टी मार्केटमध्ये Rs ३५० कोटी गुंतवून पदार्पण करणार आहे.

रूट मोबाईल २८ जूनला शेअर्स बायबॅकवर विचार करणार आहे.

टायटन चा वूमेन एथनिक ब्रँड ‘TANEIRA’ ची दुप्पट वाढ होईल. यावर्षी Rs ३०० कोटी तर २०२७ पर्यंत Rs १००० कोटी होईल.

आज ऑटो,कॅपिटल गुड्स, टेलिकॉम, बँकिंग आणि फायनान्सियल सेक्टरमधील कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२२६५ NSE निर्देशांक निफ्टी १५५५६ बँक निफ्टी ३३१३५ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २२ June २०२२

आज क्रूड US $ ११०.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७८.२० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.४८ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.२७ VIX २१.२३ होते.

आज USA मधील मार्केट्स, युरोपियन मार्केट्स तेजीत होती. सोने आणि चांदी मंदीत होती
उद्या USA चा बँक स्ट्रेस टेस्ट रिपोर्ट येणार आहे.
USA च्या अध्यक्षांनी ७ मोठ्या ऑइल उत्पादन कंपन्यांबरोबर बैठक करून उत्पादन वाढवण्याचे आणि दर कमी करण्याचे आवाहन केले. USA गॅसोलीन वरील कर कमी करण्याची शक्यता आहे. चीनमध्ये कोरोनामुळे क्रूडसाठी मागणी कमी होत आहे.

FII ने Rs २७०१.०० कोटींची विक्री तर DII नी Rs ३०६६ कोटीची खरेदी केली.

जैन इरिगेशन त्यांचा आंतरराष्ट्रीय बिझिनेस ‘RIVULIS’ या सिंगापूरमधील कंपनीला विकणार आहेत. यामुळे जैन इरिगेशनचे कर्ज ४५% कमी होईल. या मर्ज्ड एंटिटीमध्ये जैन इरिगेशनचा २२% आणि TAMASEKचा ७८% स्टेक असेल.

TAMASEK ही RIVULIS ची कंपनी आहे. हे Rs ४२०० कोटीचे डील असून यातून जैन इरिगेशनला Rs २७०० कोटी कॅश मिळेल. याचा उपयोग कर्ज फेडण्यासाठी केला जाईल

HDFC बँक येत्या दोन वर्षात १५०० ते २००० शाखा उघडेल. वेल्थ आणि पेमेंट प्लॅटफॉर्म लाँच करेल.

DR रेड्डीजने सांगितले की त्यांच्या नॉर्थ USA मधील विक्रीमध्ये डबल डिजिट वाढ होईल. त्यांची १७५ उत्पादने पाइपलाइनमध्ये आहेत. ते लवकरच चीनमध्ये उत्पादने लाँच करतील. ब्राझीलमध्ये विक्रीमध्ये ४ पट वाढ झाली आहे. चीनमध्ये येत्या ५ वर्षात दुप्पट ते तिप्पट विक्री मध्ये वाढ होईल. कंपनी कॅन्सर आणि रोगप्रतिबंधक औषधावर लक्ष केंद्रित करणार आहे.कंपनीने ९० उत्पादनांसाठी अर्ज केले.

‘KELLOG’ या कंपनीचे ३ कंपन्यांमध्ये विभाजन होईल.

तुर्कीयेमध्ये हिरो मोटो ३ EURO-S मॉडेल्स लाँच करणार आहे.

M & M च्या रिन्यूएबल एनर्जीमध्ये एक पेंशन फंड गुंतवणूक करेल.

NSDL Rs ४५०० कोटींचा IPO आणणार आहे. NSDL मध्ये IDBI चा २६% तर NSE चा २४% तर स्टेटबँकेचा ५% युनियन बँकेचा २.८१% आणि कॅनरा बँकेचा २.३०% स्टेक आहे.

या खेपेला स्पेक्ट्रमच्या लिलावात ज्या कंपन्यांना स्पेक्ट्रम अलॉट होईल त्यांना स्पेक्ट्रम युसेज चार्जेस लागणार नाहीत. 5G सेवा देण्यासाठी टेलिकॉम ऑपरेटरकडे किमान १०० Mhz स्पेक्ट्रम असणे अनिवार्य आहे.

मॅट्रीमनी.कॉम ही कंपनी Rs ११५० प्रती शेअर या भावाने ६.५२ लाख शेअर्स बायबॅक करण्यासाठी Rs ७५ कोटी खर्च करेल. या बायबॅकमध्ये प्रमोटर्स भाग घेणार नाहीत. या बायबॅक साठी ४ जुलै ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.

TCS ने त्यांचा लेन्डिंग आणि सिक्युटरायझेशन प्लॅटफॉर्म आधार हौसिंग फायनान्सला वापरायला देण्यासाठी करार केला.

मॅक्रोटेक डेव्हलपर्स ‘SKECHER’ बरोबर ११ लाख SQ FT ची गोडाउन तयार करणार. मॅक्रोटेकने ‘SKECHER’ बरोबर लीज डील साइन केले.
JMC प्रोजेक्ट ला Rs ८७४ कोटींची काँट्रॅक्टस मिळाली.

DELHIVERY वेलस्पन बरोबर कोलॅबोरेशनमध्ये ग्रेटर मुंबईमध्ये ७ लाख SQ FT मेगागेटवे आणि बंगलोरमध्ये GMR बरोबर १ मिलियन SQ FT चे मेगागेटवे बनवणार आहे यामध्ये गोडाऊनचा समावेश असेल.

M & M फायनान्सने ‘BIGHAAT’ बरोबर करार केला.

वरूण बिव्हरेजीसने इन्सायडर ट्रेडिंग संबंधीत नियमांचा भंग केल्यामुळे सेबीकडे Rs ५६ लाख सेटलमेंट चार्जेस भरले.

ग्रीन लॅम ‘ब्लूम डेकॉरचा’ लॅमिनेट मॅन्युफॅक्चरिंग प्लांट Rs ३६ कोटींना खरेदी करणार आहे.

इंडिगो डोमेस्टिक हवाई प्रवाशांची ट्राफिक ११% ने वाढून १.२ कोटी झाली. मार्केट शेअर ५८.३वरून ५७.९ झाला. स्पाईस चा पॅसेंजर ट्राफिक ८५.९ %वरून ८९.१% झाला.

गेल ही कंपनी LNG उत्पादनाच्या क्षेत्रात उतरणार आहे.

बायोकॉन बायोलॉजीक्ससंबंधित केसमध्ये सेंट्रल ड्रग कंट्रोलर ऑफ सेंट्रल ड्रग्स स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन आणि एका दिल्लीच्या एजन्सीच्या एक्झिक्युटिव्हजना Rs ४ लाखाची लाच घेताना पकडले. या बातमीनंतर बायोकॉन चा शेअर पडला.
आज मेटल्स, रिअल्टी, फार्मा, IT, FMCG, ऑटो, बँकिंग क्षेत्रात प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५१८२२ NSE निर्देशांक निफ्टी १५४१३ बँक निफ्टी ३२८४५ वर बंद झाले..

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २१ June २०२२

आज क्रूड US $ ११५.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७८.०० च्या आसपास होते.US $ निर्देशांक १०४.३० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.२८ VIX २१.८२ होते.

पेट्रोलवरील टॅक्स काढून टाकू यासाठी ऑइल कंपन्यांशी बोलून उपाय काढू असे सांगितल्यामुळे क्रूड पुन्हा US $ ११५ वर पोहोचले.

टेलिकॉम PLI स्कीम १ वर्षांसाठी वाढवली आहे. या योजनेअंतर्गत २० जुलैपर्यंत अर्ज करता येईल. Rs ४००० कोटींची तरतूद केली आहे. इन्सेंटिव्हमध्ये ९% वाढ केली. याचा फायदा स्मार्ट लिंक, D-लिंक, तेजस नेटवर्क्स, स्टरलाईट टेक्नॉलॉजि, ITI यांना होईल.

KEC इंटरनॅशनलला T&D आणि रेल्वेकडून Rs १०९२ कोटींची ऑर्डर मिळाली.

अजंता फार्माच्या बोनस इशूची २२ जून २०२२ ही EX-डेट आहे.

सुवेन लाईफ सायन्स २४ जूनला राईट्स इशूवर विचार करणार आहे.

अशोक लेलँडने ‘ECOMET STAR १११५’ हा ११.४४ टन GVW ( ग्रॉस व्हॅल्यू वेट ) चा ट्रक लाँच केला.

बंधन बँकेच्या लोन बुकमध्ये ६% हिस्सा आसाममधील आहे. तेथे पूर आला आहे . बँकेच्या ऍसेट गुणवत्तेवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

निर्यातदारांना उत्तेजन देण्यासाठी ‘RosctL ‘ ( REBATE ऑफ स्टेट अँड सेंट्रल टॅक्सेस अँड लेव्हीज स्कीम ) ही योजना ७ मार्च २०१९ रोजी जाहीर झाली. पण USA ने WTO मध्ये तक्रार केली. भारतीय सरकार निर्यातदारांना UNDUE बेनिफिट देत आहे या योजनेचा फायदा टेक्सटाईल निर्यातदारांना होत होता. त्यांना ड्युटी क्रेडिट स्क्रिप्स दिल्या जात होत्या MEIS आणि Rosctl स्क्रिप्स दिल्या जात होत्या. या पूर्णपणे ट्रान्सफरेबल होत्या आणि ओपन मार्केटमध्ये चढ्या भावाने विकता येत होत्या.पण आता या स्क्रिप्स २०% पर्यंत डिस्काउंटवर विकल्या जात असल्यामुळे पहिल्यासारखा या योजनेचा फायदा टेक्सटाईल आणि गारमेंट निर्यातदारांना होणार नाही. याचा परिणाम गोकुळदास एक्स्पोर्ट्स, रेमंड्स, मॉन्टेकार्लो, अरविंद यांच्यावर होईल.

सरकार नवीन साखर निर्यात धोरण जुलै- ऑगस्ट २०२२ मध्ये जाहीर करण्याची शक्यता आहे.

निर्यातीची मंजुरी उत्पादनाशी निगडीत असेल. २०२२ -२०२३ चे स्टॉक लिमिट उत्पादनावर अवलंबून असेल. सरकार साखर उत्पादकांकडून प्रस्ताव मागवत आहे.

HAL २८ जूनच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बैठकीत अंतिम लाभांशावर विचार करेल.

मार्कसन फार्माने १२ लॉटमधील २.०९ लाख युनिट्स ( KROJER BR, ऍस्पिरिन, IBUPROFEN या औषधांची ) लेबर पॅकेजींग इशुमुळे रिकॉल केली.
सविता ऑइल टेक्नॉलॉजी या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने कंपनीच्या १ शेअरचे ५ शेअर्समध्ये स्प्लिट करण्यासाठी मंजुरी दिली.

ऑस्ट्रेलियामध्ये कोळशाच्या उत्पादनावर ४०% रॉयल्टी द्यावी लागते. ऑस्ट्रेलियातून आयात करणे महाग पडते. याचा कोल इंडियाला फायदा तर JSW स्टील सारख्या कंपन्या ज्या कोळशा आयात करतात त्यांना तोटा होईल.

आज मार्केटमध्ये तेजी होती. IT, रिअल्टी, मेटल्समध्ये खरेदी झाली.

BSE निर्देशांक सेंसेक्स ५२५३२ NSE निर्देशांक निफ्टी १५६३८ बँक निफ्टी ३३१९१ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २० June २०२२

आज क्रूड US $ ११३.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७८.०० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.४० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.२३ VIX २३.५४ होते. आज USA ची मार्केट्स बंद होती..

चीनने व्याजदरात बदल केला नाही. चीनने व्याज दर एक वर्षासाठी ३.७०% ठेवले.

अल्केम लॅबच्या ST. लुइस प्लांटच्या USFDA ने ६ जून २०२२ ते १७ जून २०२२ दरम्यान केलेल्या तपासणीत तीन त्रुटी दाखवून फॉर्म नंबर ४८३ इशू केला .

मॅक्स व्हेंचर्सने ‘अकार्ड हॉटेल & रिसॉर्ट्स मध्ये १००% स्टेक घेतला.

आज CHEVIOT चे NSE वर लिस्टिंग झाले

ICRA ने आवास हौसिंगचे रेटिंग -AA वरून +AA असे सुधारले.

शॉपर्स स्टॉप, ट्रेंट, सारख्या दुकानात २०% ते २५% विक्री वाढत आहे. ऑन लाईन विक्री कमी होत आहे. त्यामुळे या प्रकारच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी झाली आहे.

मंदीच्या भीतीमुळे सर्व कमोडिटीजच्या किमतीवर दबाव आहे. वाढलेली कॉस्ट आणि त्यामुळे कमी झालेला फायदा यांचा परिणाम DELHIVERY आणि कार ट्रेड यावर परिणाम होईल.

सिप्लाने ACHIRA लॅब्समध्ये २१.०५% स्टेक खरेदी केला.

जल जीवन मिशनकडून इंडियन ह्यूम पाईपला Rs १५० कोटींची ऑर्डर मिळाली.

औरोबिंदो फार्माच्या GLS फार्ममध्ये ५१% स्टेक घेण्याला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मंजुरी मिळाली.

कोफोर्जने ‘ESTES एक्स्प्रेस लाईन्स’ बरोबर लॉजिस्टिक आणि ट्रांसपोर्टेशनसाठी डिजिटल सेवा पुरवण्यासाठी करार केला.

मारुतीच्या नवीन ब्रेझा चे बुकिंग Rs ११००० पासून सुरु झाले.

पेज इंडस्ट्रीजच्या प्रमोटर्सनी त्यांचा २.४५% स्टेक विकला.

बिर्ला सॉफ्टने गूगल क्लाउडबरोबर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी करार केला.

चीनमध्ये हौसिंग सेक्टरमध्ये मंदी आहे यामुळे मेटल्सला मागणी नाही.लिक्विडीटी अर्थव्यवस्थेमधून काढून घेतली जात आहे. तेव्हा मेटल्सवर परिणाम होतो. खरे पाहता अल्युमिनियमचा पुरवठा रशियातून होतो तो बंद आहे. पण मागणीच नाही.पावसाळ्यात बांधकाम बंद असते त्यामुळे सर्व धातू ५० आठवड्याच्या किमान स्तरावर आहेत.

वेदांता त्यांचा तामिळनाडूमधील तुतिकोरिन प्लांट विकणार आहे.

टिळकनगर इंडस्ट्रीने प्रीमियम फ्लेवर्ड ब्रँडी लाँच केली .

NIIT ने स्विस मल्टिनॅशनल बरोबर मल्टीइअर ट्रेनिंगसाठी करार केला.

आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस यांनी Rs ७४३ कोटींच्या IPO साठी DRHP फाईल केले.

आज मेटल्स, PSE, रिअल्टी, ऑटो, एनर्जी क्षेत्रात प्रॉफिट बुकिंग झाले तर FMCG, IT बँका आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्स मध्ये आणि एशियन पेंट्स, बर्गर पेंट्स, कन्साई नेरोलॅक, आणि इंडिगो पेन्ट्स या ऑइल पेंट्स बनवणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये (क्रूडचा दर कमी झाल्यामुळे) माफक खरेदी झाली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५१५९७ NSE निर्देशांक निफ्टी १५३५० बँक निफ्टी ३२६८४ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १७ June २०२२

आज क्रूड US $ ११८.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ७८.१० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.२३ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.२४ तर VIX २३.३८ होते.

सोने आणि चांदी मंदीत होती. USA ची मार्केट्स मंदीत होती. युरोपियन मार्केट्स, एशियन मार्केट्स मंदीत होती.

FII ने Rs ३२५८ कोटींची विक्री तर DII ने Rs १९२९ कोटींची खरेदी केली.

आज GST काउन्सिलची बैठक आहे.

बँक ऑफ जपान आज त्यांचे वित्तीय धोरण जाहीर करेल.

युरोपियन काउंसिलबरोबर फ्री ट्रेड ऍग्रीमेंटवर विचार करण्यासाठी बैठक आहे.

२७ जून २०२२ रोजी बजाज ऑटो शेअर बायबॅक वर विचार करेल.

मॅट्रिमोनी.कॉम २२ जूनला शेअर बायबॅकवर विचार करणार आहे.

बँक ऑफ इंग्लंडने ०.२५% एवढे रेट वाढवले. १.२५% केले.

भारती एअरटेलने ८.६ लाख ग्राहक तर रिलायन्स जिओने १६.८ लाख ग्राहक जोडले तर ‘VI’ नी १५.६ लाख ग्राहक गमावले.

LIC ने DR. रेड्डीजमध्ये स्टेक ३.६४% वरून ५.६४% एवढा केला.

मास्टर कार्ड एशियावर जे निर्बंध होते ते RBI ने उठवले. आता त्यांना नवीन कार्ड इशू होतील. याचा फायदा SBI कार्ड्सला होईल.

राईट्स ला Rs ३६४.५६ कोटींची ऑर्डर कंटेनर कॉर्पोरेशनकडून मिळाली.

व्याज दर वाढल्यामुळे कारट्रेड, झोमॅटो, PB फिनटेक, DELHIVERY या कंपन्यांवर प्रतिकूल परिणाम होईल.

HDFC ने ANSAL हौसिंगचे ५० लाख शेअर्स इनव्होक केले.

बाटा ने Rs ५०.५० स्पेशल लाभांश आणि Rs ४ फायनल लाभांश जाहीर केला. या लाभांशासाठी रेकॉर्ड डेट ६ ऑगस्ट २०२२ आहे.

आता टाटा पॉवर यावर्षी इंडोनेशियन मायनर कडून Rs १२००० कोटींचा कोळसा खरेदी करणार आहे.त्यामुळे कोणताही अडथळा न येता कोळसा मिळेल. या माईन मध्ये टाटा पॉवरचा ३०% स्टेक आहे.

एव्हरेड़ीमध्ये बर्मन फॅमिलीने ओपन ऑफर द्वारे १४.३% स्टेक घेतला. त्यामुळे आता त्यांचा स्टेक ३८.३% झाला आहे.

टाटा मोटर्सने असे सांगितले की चीनमधील लॉकडाऊन, सप्लायचेन इशू, युक्रेन वॉर या कारणांमुळे काही प्लान्टमधील उत्पादन बंद करावे लागेल.

डेल्टा कॉर्पने ‘डेल्टाटेक गेमिंग’ च्या IPO साठी पेपर्स फाईल केले

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लहान मुलांसाठी ENJOI A/C लाँच करणार आहे.

HDFC त्यांचे खालील ४ NPA विकण्याच्या फायनल स्टेज मध्ये आहे. ‘SITI नेटवर्क’, ‘MEP इन्फ्रा’, ‘हॉटेल होरायझन’ आणि स्टर्लिंग अर्बन डेव्हलपमेंट.

गोवा इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाकडून डेल्टा कॉर्पला गोव्यामधील PERNEM येथे रिसॉर्ट डेव्हलप करण्यासाठी मंजुरी मिळाली.

L & T मेट्रो रेलने हैदराबाद मेट्रोचे कामकाज पुढील सूचना मिळेपर्यंत थांबवले.

PVR ने पतियाळाच्या VRC सिटी मॉल मध्ये ४ स्क्रीन मल्टिप्लेक्स सुरु केले.

अजंठा फार्माच्या बोनस इशूची रेकॉर्ड डेट २३ जून २०२२ निश्चित केली आहे तसेच हा शेअर २२ जून २०२२ ला EX-बोनस होईल.

आज पुन्हा एकदा मार्केटमध्ये प्रॉफीटबुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५१३६० NSE निर्देशांक निफ्टी १५२९३ बँक निफ्टी ३२७४३ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!