आज क्रूड US $ १२२.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७७.८८ च्या आसपास होते.US $ निर्देशांक १०३.२६ USA बॉण्ड यिल्ड ३.०५ VIX १९.५७ होते.
ECB ( युरोपियन सेंट्रल बँक) ने सांगितले की जुलैमध्ये आम्ही रेट वाढवू. महागाईचे अनुमान ५.१% वरून ६.८% केले तर ग्रोथचे अनुमान ३.७% वरून २.८% केले. एनर्जीसाठी मागणी खूप वाढेल असा अंदाज व्यक्त केला. हॉंगकॉंग आणि शांघाई मध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर केला. चीनमध्ये कंझ्युमर प्राइसेसमध्ये २.१% वाढ तर प्रोड्युसर्स प्राइसेसमध्ये ६.४% वाढ झाली.
बजाज ऑटो शेअर्स बायबॅकवर १४ जूनला विचार करेल. बजाज ऑटो EV प्रॉडक्शन लाईन लाँच करणार आहे. बजाज होल्डिंग आणि महा स्कुटर यांचा बजाज ऑटोमध्ये स्टेक आहे त्यामुळे या दोन्हीही शेअर्सवर परिणाम होईल.
JIO BP ने OMAXE बरोबर १२ शहरात EV चार्जिंग स्टेशन्स आणि स्वपिंग स्टेशन्स तयार करण्यासाठी करार केला.
IIFL मध्ये ADIA (अबुधाबी इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटी) ने २०% स्टेक Rs २२००/- कोटींमध्ये खरेदी केला.
ऑरोबिंदो फार्म तेवा बरोबरचा पेटंट वाद सोडवणार आहे.
वेलस्पन एंटरप्रायझेस ६ हायवे ऍसेट्सचा बिझिनेस विकणार आहे. ह्या ऍसेटची व्हॅल्यू Rs ६००० कोटी असेल.
US $ मजबूत होत आहे. याचा फायदा IT कंपन्यांना होईल.
DR रेड्डीजने AURIGENE बरोबर कँसर थेरपी ट्रेटमेन्ट पॅक्ट केला. ओलेमा फार्मा बरोबर कॅन्सर थेरपी शोधणार.
हिंदुस्थान झिंकची विनिवेशाची प्रक्रिया लवकरच सुरु होईल.यात वेदांताचा स्टेक ६४.९२% तर सरकारचा स्टेक २९.५% आहे. मर्चंट बँकरची लवकरच नेमणूक केली जाईल.
LIC चा शेअर लिस्टिंगपासून १९% पडला. १३ जून २०२२ ला लॉकइन पिरियड संपेल. त्यामुळे या शेअरमध्ये अधिक मंदी येईल.
सिंगापूर GRM US $ २५ आहे. याचा फायदा रिलायन्स इंडस्ट्रीज, चेन्नई पेट्रो यांना होईल.
ट्रान्सफॉर्मर आणि रेक्टिफायर्सला सरकारकडून Rs १८६ कोटींची ऑर्डर मिळाली.
आलेम्बिक फार्माला USA मार्केटमध्ये ‘BASATINIB’ या टॅब्लेट्सचे मार्केटींग करायला US हेल्थ ऑथॉरिटीकडून मंजुरी मिळाली.
एस्कॉर्ट चे नाव बदलून एस्कॉर्ट कुबोटा असे झाले.
टाटा ग्रुपच्या कन्झ्युमर साईडच्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते . ट्रेंट, टाटा कन्झ्युमर,
संरक्षणाशी संबंधित शेअर्स उदा BEL, BEML, BDL, HAL चे शेअर्स तेजीत होते.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ५४३०३ NSE निर्देशांक निफ्टी १६२०१ बँक निफ्टी ३४४८३ वर बंद झाले
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!