आजचं मार्केट – १३ June २०२२

आज क्रूड US $ १२०.०८ प्रती बॅरल्सच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७८.२५ च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.५७ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.१७ VIX २२.६५ होते.

आज USA मधील महागाईचा निर्देशांक ८.६ एवढा आला हा महागाई निर्देशांक ४० वर्षांच्या उच्च स्तरावर होता. USA ची मार्केट्स मंदीत होती.USA चा VIX २७.७५ एवढा होता. एशियन मार्केट्स मंदीत, सोने चांदी मंदीत होते.युरोपियन मार्केट्सही मंदीत उघडली इतर बेस मेटल्सही मंदीत होते.

आज USA चे अध्यक्ष बिडेन हे सौदी अरेबियाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात क्रूडचे उत्पादन वाढवण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

आज जीनिव्हामध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये होणारी चर्चा भारताच्या दृष्टीने महत्वाची ठरेल. हाँगकाँग, शांघाईची मार्केट्स बंद होती.

आज बँक ऑफ इंग्लंड आपले दर जाहीर करेल.

आज FII नी Rs ३९७३.९५ कोटींची विक्री केली तर DII नी Rs २८३१ कोटींची खरेदी केली
जर बँकांच्या टर्म डिपॉझिट्सचे दर वाढायला सुरवात झाली तर रिटेल /DII म्युच्युअल फंडातून पैसे काढून बँकेत डिपॉझिट ठेवतील. त्यामुळे मार्केट आणखी पडेल.

भारतातील एप्रिल २०२२ साठी IIP ७.१% झाली. ही IIP मध्ये चांगली प्रगती आहे. हे IIP चे आकडे ८ महिन्यांच्या उच्च स्तरावर आहे.

IDBI बँकेतील स्टेक विकण्यासाठी रोड शोज चालू झाले आहेत.

हिंदुस्थान झिंकमधील विनिवेशही प्रगती पथावर आहे.

ऍस्टर DM गल्फ आणि भारतीय बिझिनेस डीमर्ज करण्याची शक्यता आहे.

स्ट्राइड्स फार्माने USA मधून LOSARTAN पोटॅशियम या रक्तदाबावरील औषधाच्या ६ लाख बाटल्या USFDA ने रिमार्क केल्याने परत मागवल्या आहेत.

१६ जुलै २०२२ ला HDFC बँक लाभांशावर आणि ऑडिटवर विचार करेल.

SAIL आणि इतर स्टील उत्पादकांनी सरकारला कोकिंग कोलच्या किमती नियंत्रित करण्याची विनंती केली आहे.

वेदांताने पश्चिम अफ्रिकेतील लायबेरिया येथे आयर्न ओअर मायनिंगसाठी JV केले. बोमी, BEA, MANO येथे या खाणी आहेत. पण EBOLA च्या साथीमुळे कामकाज सुरु झाले नाही.

लेमन ट्री हॉटेलने GAJUWAKA, विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे ४४ खोल्यांच्या हॉटेलसाठी लायसेन्स ऍग्रीमेंट केले. हा बिझिनेस मार्च २०२३ पासून सुरु होईल

रत्नमणी मेटल्सने १ जुलै २०२२ ही रेकॉर्ड डेट जाहीर केली. ८ सप्टेंबरला लाभांश Rs १४ क्रेडिट होईल.

१० जूनला मारुती ब्रेंझा लाँच केली. जेव्हा US $ च्या तुलनेत जापनीज येन घसरतो तेव्हा मारुतीचे मार्जिन वाढते. आज येनचा दर US $१= Rs १३४.९० होता.
इंडोनेशियाने ११.६ लाख टन पाम ऑइल निर्यातीला परवानगी दिली. याचा परिणाम अडाणी वूल्मर आणि रुची सोयावर होईल. एक्स्पोर्ट ऍक्सलरेशन योजनेखाली एक्स्पोर्ट ड्युटी १५% ने कमी केली.
ग्लेनमार्क फार्माच्या बद्दि प्लांटमध्ये USFDA ची तपासणी सुरु झाली. या प्लाण्टला OCT २०१९ मध्ये वॉर्निंग लेटर मिळाले होते. या प्लांटमध्ये सॉलिड आणि LIQUID ORAL ड्रग्स चे उत्पादन होते.
फेडची मीटिंग आज सुरु होईल. या मीटिंगमध्ये काय निर्णय झाला हे बुधवारी रात्री किंवा गुरुवारी सकाळी समजेल. फेड ०.७५% एवढी दरवाढ करू शकतो असा एक अंदाज व्यक्त केला जात आहे.

राजेश एक्स्पोर्ट US $३ बिलियन तेलंगणा राज्यात इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले प्लांटसाठी गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे शेअर तेजीत होता.

या दरम्यान भारतातील CPI चे आकडे येतील. त्याचा प्रभाव मंगळवार बुधवारी मार्केटमध्ये दिसेल.

फेडची मीटिंग आणि CPI चे आकडे येण्याच्या आधी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रॉफीटबुकिंग झाले. IT, मेटल्स, बँकिंग, रिअल्टी ऑटो, आणि फार्मा क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री झाली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२८४६ NSE निर्देशांक निफ्टी १५७७४ बँक निफ्टी ३३४०५ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.