आजचं मार्केट – १४ June २०२२

आज क्रूड US $१२२.०० प्रती बॅरल्सच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७८.०० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०५.१६ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.३६ विक्स २१.९८ होते.

CPI ७.७९ वरून मे २०२२ साठी ७.०४ झाला.CPI कमी झाला असला तरी RBI च्या ६% अनुमानापेक्षा बराच जास्त आहे. बिटकॉइनमध्ये २१% मंदी आली.
FII नी Rs ४१६४ कोटींची विक्री तर DII नी Rs २८१४ कोटींची खरेदी केली.

झायडस लाईफ Rs ६५० प्रती शेअर या प्राईसने १.१५ कोटी शेअर्स बाय बॅक करण्यासाठी Rs ७५० कोटी खर्च करेल. २३ जूनला सुरू होऊन ६ जुलै २०२२ रोजी हा बायबॅक बंद होईल. या शेअर बायबॅक मध्ये प्रमोटर्स भाग घेऊ शकतील.

हिंदुस्थान मोटर्सची अँबेसेडर कार आता नवीन इंजिन नवीन डिझाईन मध्ये ‘AMBY’ च्या स्वरूपात येत आहे. यासाठी युरोपियन कंपनीबरोबर MOU साइन केले.

डायनामॅटिक टेक्नॉलॉजीला एअरबसच्या A २२० विमानांसाठी एस्केप हॅच डोअर बनवण्यासाठी स्टेलिया एअरोनॅटिक कॅनडाच्या सबसिडीअरीकडून ऑर्डर मिळाली.

SBI ने टर्म डिपॉझिटवरील व्याजाचे दर वाढवले.
आज सकाळी मार्केटने १५६५९.५० चा किमान स्तर गाठला.

अडाणी एंटरप्रायझेसने ग्रीन हायड्रोजन इको सिस्टीमसाठी टोटल एनर्जी बरोबर करार केला.
अडाणी न्यू इंडस्ट्रीजमध्ये टोटल एनर्जी २५% स्टेक घेणार आहे.

आज WPI मे २०२२ महिन्यासाठी १५.८८ आला. ( १५.०८ एप्रिल मध्ये होता.)

DR रेड्डीज लॅबोरेटरीने वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरच्या उपचारासाठी लागणाऱ्या SORAFENIB टॅब्लेट्स लाँच केल्या.

आज मंत्रिमंडळाने 5G लिलावाला मंजुरी दिली. डॉट आजपासूनच कंपन्यांकडून अर्ज मागवेल.

जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात हा लिलाव होण्याची शक्यता आहे. सरकार ९ MHZ ब्रॅण्डच्या स्पेक्ट्रमसाठी २० वर्षांसाठी लिलाव करेल. एकूण स्पेक्ट्रम ची किंमत Rs ५ लाख कोटी असेल.
GR इंफ्राच्या गौहत्त्ती शिलॉंग गुरुग्राम बंगलोर येथील ऑफिसेसवर CBI ने धाडी टाकल्या.
GR इंफ्राचा शेअर २३% पडला.

निर्मल बंगनी गव्हाच्या बाबतीत रिपोर्ट दिला. गव्हाच्या किंमती स्थिर असून गव्हाची उपलब्धता वाढली आहे. त्यामुळे आज ज्युबिलण्ट फूड्स, ब्रिटानिया, बेक्टर्स यासारखे शेअर्स तेजीत होते.

LIC ने धनसंचय पॉलिसी लाँच केली.

भारती एअरटेलने मेटाव्हर्स प्लॅटफॉर्मवर मल्टिप्लेक्स लाँच केला.

बजाज ऑटोने बायबॅकवरील निर्णय आम्हाला विचार करायला अजून वेळ पाहिजे म्हणून पुढे ढकलला. (कंपनीच्या बॅलन्स शीटवर Rs १९९०० कोटींची कॅश आहे). ही बातमी आल्यावर बजाज ऑटोचा शेअर पडला.

LIC ने CAPRI ग्लोबल कॅपिटलमध्ये Rs २२१ कोटींची गुंतवणूक करून फेब्रुवारी ते जून या कालावधीमध्ये २% स्टेक घेतला. आता त्यांचा स्टेक ७% झाला आहे.

ऑटो एनर्जी बँकिंग शेअर्समध्ये प्रॉफीटबुकिंग मेटल रिअल्टी फार्मा शेअर्समध्ये मामुली खरेदी झाली. मार्केटने आज पुन्हा उचल खाण्याचा प्रयत्न केला पण शेवटच्या एक तासात मार्केट पुन्हा पडले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२६९३ NSE निर्देशांकनिफ्टी १५७३२ बँक निफ्टी ३३३११ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – १४ June २०२२

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.