आजचं मार्केट – १५ June २०२२

आज क्रूड US $ १२१.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७८.०० च्या आसपास होत. US $ निर्देशांक १०५.४९ तर USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.४४ VIX २२.०० होते.

आज आशियायी मार्केट्समध्ये किंचीत मंदी होती. डाऊ जोन्स आणि S&P मंदीत तर NASHDAQ तेजीत होते. युरोपियन मार्केट्स मंदीत होती. सोने, चांदी, बेस मेटल्स तेजीत होती.

फेड आपले दर ०.७५% वाढवेल असे बहुमताचे अनुमान आहे. एप्रिलमध्ये USA मध्ये WPI ०.८% होता. या आधी WPI ०.४% होता.USA मध्ये ऑइल सेक्टरमधील कंपन्यांवर कर लावण्याचा सरकार विचार करत आहे.

चीनमध्ये औद्योगिक उत्पादन ०.७% ने वाढले. रिटेल विक्री ६.७% ने कमी झाली.

अमेरिकेत नैसर्गीक गॅसच्या किमती कमी झाल्या आहेत. २०२० मध्ये टेक्सासच्या फ्री पोर्ट टर्मिनलमधे आग लागल्यामुळे प्लांट बंद होता. आता तो प्लांट १ जुलै २०२२ पासून सुरु होणार आहे त्यामुळे नैसर्गिक गॅसच्या किमती २०% ने कमी होण्याची शक्यता आहे.याचा परिणाम पेट्रोनेट LNG, GAIL वर होईल.

VIATRIS आणि बायोकॉन बायालॉजी यांच्यातील डीलला CCI ची मंजुरी मिळाली.

एशियन पेन्ट्सने ‘वेदरसील फेनेस्ट्रेशन’ मध्ये ५१% स्टेक Rs १८.८० कोटींना घेतला.

‘नेईवेली लिग्नाइट’ ने EIL ला प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्ट म्हणून नेमले. १२००TPD लिग्नाइटचे मिथेनॉलमध्ये रूपांतर करण्याच्या संबंधात हे प्रोजेक्ट आहे.

सिप्लाने दक्षिण आफ्रिकेत तरुण मुले जी HIV ने पीडित आहेत त्यांच्यासाठी ‘चाईल्ड फ्रेंडली ४ इन १ ऍन्टिरेट्रोव्हायरल ट्रीटमेंट लाँच केली.

LIC ने HUL मध्ये त्यांचा स्टेक .०९% वाढवून ४.९९% वरून ५.०८% केला. LIC ने हिरोमोटो मधील त्यांचा स्टेक ९.१६% वरून ११.२५% एवढा केला.

NTPC ने गुजरातमधील कवासमध्ये ५६ MV क्षमतेचा सोलर प्रोजेक्ट सुरु केला.

VIOCOM १८ ला IPL TV अँड डिजिटल राईट्स मिळाले. Rs ४४०७५ कोटींना मिळाले
अजंठा फार्माच्या TOPIROMATE या औषधाला ANDA ऍप्रूव्हल मिळाले.

ऑरोबिंदो फार्माच्या BRIVARACETAM ला USFDA कडून मंजुरी मिळाली.

साखर उत्पादकांनी निर्यातीचा कोटा वाढवून देण्याची सरकारकडे मागणी केली आहे. सरकारने आता १०० लाख टन एवढा साखरेच्या निर्यातीचा कोटा ठरवला आहे. आतापर्यंत ९० लाख टन एवढी साखरेची निर्यात झाली आहे. यावर्षी साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. खाद्य मंत्रालयाने साखर उत्पादक आणि साखर निर्यातदार यांची कोटा वाढवण्यावर विचार विनिमय करण्यासाठी बैठक बोलावली आहे.

आता जुलै २६ २०२२ पासून 5G स्पेक्ट्रम चा लिलाव सुरु होईल. कंपन्या यासाठी ८ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात. याचा परिणाम तेजस नेटवर्क ,भारती एअरटेल, रिलायन्स जिओ ITI यांच्यावर होईल.
सरकारने दिल्ली मध्ये ३३०० Mhz स्पेक्ट्रम साठी रिझर्व्ह प्राईस Rs ४०० कोटी /ब्लॉक तर ६०० Mhz स्पेक्ट्रमसाठी रिझर्व्ह प्राईस Rs २५४५ कोटी/ब्लॉक ठेवली आहेत. मुंबईमध्ये ३३०० MHZ स्पेक्ट्रमसाठी Rs ३५० कोटी/ ब्लॉक तर ६०० MHZ Rs २३५० कोटी/ब्लॉक ठेवली आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये 5G सेवा उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘प्रायव्हेट कॅप्टिव्ह नेटवर्क’ बनवण्यासाठी परवानगी मिळाली. यामुळे मशीन टू मशीन आर्टिफिशियल इंटेलिजन्सला उत्तेजन मिळेल. PCN चा फायदा ऑटो, हेल्थकेअर ऍग्री आणि एनर्जी सेक्टरला फायदा होईल. PCN साठी परवानगी द्यायला टेलिकॉम कंपन्यांनी विरोध केला होता.

स्टोव्हक्राफ्ट पुढील १७ ते १८ महिन्यात ३५ ते ४० स्टोर्स सुरु करणार आहेत.

लोन डिसबर्समेंटमध्ये ४७१% वाढ झाल्यामुळे PAYTM चा शेअर तेजीत होता.

मे २०२२ साठी JSW स्टीलच्या क्रूड स्टील उत्पादनात ३१% वाढ झाली. उत्पादन १७.८९ लाख टन एवढे झाले. फ्लॅट रोल्ड स्टीलमध्ये २९% तर लॉन्ग रोल्ड स्टीलमध्ये २५% वाढ झाली.

LIC ने सांगितले की ते जून ३० २०२२ आधी ‘एमबेडेड व्हॅल्यू’ ची घोषणा करतील. LIC च्या प्रीमियम मध्ये दरवर्षी १२% ते १५% वाढ अपेक्षित आहे. पुढील ५ वर्षे VNB मध्ये १५% वाढ अपेक्षित आहे. आज LIC चा शेअर तेजीत होता.

कृष्णा मेडिकल ही कंपनी महाराष्ट्रात नाशिक येथे ३२५ बेड्सचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरु करणार आहे.

आज ऑटो सेक्टरमधील कंपन्यांमध्ये खरेदी दिसली. आज मार्केट मर्यादित रेंज मध्ये राहिले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२५४१ NSE निर्देशांक निफ्टी १५६९२ बँक निफ्टी ३३३३९ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.