आजचं मार्केट – १६ June २०२२

आज क्रूड US $ ११८.०० प्रति बॅरल्सच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७८.१० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०५.३९ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.३५ VIX २२.७६ होते.

आज फेडने दरांमध्ये ०.७५% ची वाढ केली. आता व्याजाचे दर १.५% ते १.७५% असतील. फेडने सांगितले की जुलै २०२२ मध्ये फेड आणखी ०.५०% किंवा ०.७५% वाढ करेल. फेडने ग्रोथ आऊटलूक २.८% वरून १.७% केले. महागाई २% वर आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

आज बँक ऑफ इंग्लंड आपले रेट संध्याकाळी ४-३० वाजण्याच्या सुमारास जाहीर करेल.

स्विस नॅशनल बँकेने ०.५०% एवढे रेट वाढवले.

SBI ने होमलोनवरील व्याजाचे दर ७.०५% वरून ७.५५% एवढे केले.

आज सुरुवातीला USA मधील मार्केट्स तेजीत होती, एशियामधील मार्केट्स, यूरोपमधील मार्केट्स तेजीत होती. बेस मेटल्स मंदीत होती.

FII ने Rs ३५३१ कोटींची विक्री केली तर DII ने Rs २५८८ कोटींची खरेदी केली.

वोल्टम्प ट्रान्सफॉर्मरमध्ये HDFC म्युच्युअल फंडाने ०.३५% एवढा स्टेक घेतला.

BP-JIO झोमॅटोला EV मोबिलिटी प्रोवाइड करेल.

ATF च्या किमती १६.३% ने वाढल्या. ATF ची किंमत Rs १.४१ लाख /KL एवढी झाली. याचा परिणाम इंडिगो, स्पाईस जेट यांच्यावर होईल. ATF च्या किमती ६ महिन्यात ९१% वाढल्या.

टाटा स्टील सबसिडीअरीच्या माध्यमातून रोहित फेरोमध्ये १०% स्टेक Rs २०.१० कोटींमध्ये घेणार आहे.

ल्युपिन झारखंड आणि ओडिशात रेफरन्स लॅब सुरु करणार आहे.

UPL ने ‘कुडोस केमी’ ही कंपनी खरेदी केली.

FTSE च्या GEIS मध्ये पुढील शेअर्स समाविष्ट केले जातील. त्यामुळे या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक येण्याची शक्यता आहे.

पॉलिसी बाजार US $ ४.१ कोटी

स्टार हेल्थ US $ १.९ कोटी

NYKAA US $ ३.०० कोटी

PAYtm US $ १.८ कोटी

अडाणी विल्मर US $ ३.८ कोटी .

TCS ने ‘QIAGEN’ बरोबर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन साठी करार केला.

C G कंझ्युमर्सने किचन अप्लायन्सेसच्या क्षेत्रात पदार्पण केलं. क्रॉम्प्टन सिग्नेचर स्टुडिओ या नावाने ब्रँड आउटलेट काढणार. कंपनीने बटरफ्लाय गांधीमती ही कंपनी अकवायर केली.

USA मधील CHLOR -अल्कली आणि कॉस्टिक सोडा बनवणाऱ्या दुसऱ्या नंबरच्या कंपनीने ‘WESTLAKE’ ने त्यांचा प्लांट बंद केला. उपकरणांच्या फेल्युअरमुळे हा प्लांट बंद करण्यात आला. त्यामुळे आता या दोन्हीही उत्पादनांचे भाव वाढतील आणि भारतीय उत्पादकांना उदा गुजरात अल्कलीज, GHCL, ग्रासिम, केमप्लास्ट सनमार निर्यातीची चांगली संधी उपलब्ध होऊ शकेल.

अडानी पॉवरला हरयाणा डिस्कॉम ने Rs १४०० कोटी पेमेंट केले पाहिजे असे कोर्टाने सांगितले.

सॅमसंगसाठी डिक्सन टेक्नॉलॉजी कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग करते. सॅमसंगने सांगितले की मागणी कमी झाल्यामुळे आणि इन्व्हेन्टरी वाढल्यामुळे आम्ही व्हेंडर्सना ऑर्डर देणे बंद केले आहे.

अडाणी विल्मर आणि रुची सोया या कंपन्यांनी खाद्य तेलाचे भाव Rs १० ते Rs २० एवढे कमी केले. पण हे कमी केलेले भाव फक्त नवीन STOCKS ला लागू होईल.

श्रीराम सिटी युनियन फायनान्स आणि श्रीराम कॅपिटल यांचे श्री राम ट्रान्सपोर्टमध्ये मर्जर करून सर्वात मोठी रिटेल फायनान्स NBFC स्थापन करण्याच्या योजनेला RBI ने मंजुरी दिली.

ड्रेजिंग कॉर्पोरेशनला Rs २५० कोटींचे मेंटेनन्सचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

अजंठा फार्माच्या बोनस इशूची रेकॉर्ड डेट १८ सप्टेंबर २०२२ निश्चित केली आहे.

आज सर्व क्षेत्रात विशेषतः IT, एनर्जी, मेटल्स, रिअल्टी, ऑटो, बॅंक्स आणि फायनान्सियल्स या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५१४९५ NSE निर्देशांक निफ्टी १५३६० बँक निफ्टी ३२६१७ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.