आजचं मार्केट – १७ June २०२२

आज क्रूड US $ ११८.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ७८.१० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.२३ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.२४ तर VIX २३.३८ होते.

सोने आणि चांदी मंदीत होती. USA ची मार्केट्स मंदीत होती. युरोपियन मार्केट्स, एशियन मार्केट्स मंदीत होती.

FII ने Rs ३२५८ कोटींची विक्री तर DII ने Rs १९२९ कोटींची खरेदी केली.

आज GST काउन्सिलची बैठक आहे.

बँक ऑफ जपान आज त्यांचे वित्तीय धोरण जाहीर करेल.

युरोपियन काउंसिलबरोबर फ्री ट्रेड ऍग्रीमेंटवर विचार करण्यासाठी बैठक आहे.

२७ जून २०२२ रोजी बजाज ऑटो शेअर बायबॅक वर विचार करेल.

मॅट्रिमोनी.कॉम २२ जूनला शेअर बायबॅकवर विचार करणार आहे.

बँक ऑफ इंग्लंडने ०.२५% एवढे रेट वाढवले. १.२५% केले.

भारती एअरटेलने ८.६ लाख ग्राहक तर रिलायन्स जिओने १६.८ लाख ग्राहक जोडले तर ‘VI’ नी १५.६ लाख ग्राहक गमावले.

LIC ने DR. रेड्डीजमध्ये स्टेक ३.६४% वरून ५.६४% एवढा केला.

मास्टर कार्ड एशियावर जे निर्बंध होते ते RBI ने उठवले. आता त्यांना नवीन कार्ड इशू होतील. याचा फायदा SBI कार्ड्सला होईल.

राईट्स ला Rs ३६४.५६ कोटींची ऑर्डर कंटेनर कॉर्पोरेशनकडून मिळाली.

व्याज दर वाढल्यामुळे कारट्रेड, झोमॅटो, PB फिनटेक, DELHIVERY या कंपन्यांवर प्रतिकूल परिणाम होईल.

HDFC ने ANSAL हौसिंगचे ५० लाख शेअर्स इनव्होक केले.

बाटा ने Rs ५०.५० स्पेशल लाभांश आणि Rs ४ फायनल लाभांश जाहीर केला. या लाभांशासाठी रेकॉर्ड डेट ६ ऑगस्ट २०२२ आहे.

आता टाटा पॉवर यावर्षी इंडोनेशियन मायनर कडून Rs १२००० कोटींचा कोळसा खरेदी करणार आहे.त्यामुळे कोणताही अडथळा न येता कोळसा मिळेल. या माईन मध्ये टाटा पॉवरचा ३०% स्टेक आहे.

एव्हरेड़ीमध्ये बर्मन फॅमिलीने ओपन ऑफर द्वारे १४.३% स्टेक घेतला. त्यामुळे आता त्यांचा स्टेक ३८.३% झाला आहे.

टाटा मोटर्सने असे सांगितले की चीनमधील लॉकडाऊन, सप्लायचेन इशू, युक्रेन वॉर या कारणांमुळे काही प्लान्टमधील उत्पादन बंद करावे लागेल.

डेल्टा कॉर्पने ‘डेल्टाटेक गेमिंग’ च्या IPO साठी पेपर्स फाईल केले

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लहान मुलांसाठी ENJOI A/C लाँच करणार आहे.

HDFC त्यांचे खालील ४ NPA विकण्याच्या फायनल स्टेज मध्ये आहे. ‘SITI नेटवर्क’, ‘MEP इन्फ्रा’, ‘हॉटेल होरायझन’ आणि स्टर्लिंग अर्बन डेव्हलपमेंट.

गोवा इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाकडून डेल्टा कॉर्पला गोव्यामधील PERNEM येथे रिसॉर्ट डेव्हलप करण्यासाठी मंजुरी मिळाली.

L & T मेट्रो रेलने हैदराबाद मेट्रोचे कामकाज पुढील सूचना मिळेपर्यंत थांबवले.

PVR ने पतियाळाच्या VRC सिटी मॉल मध्ये ४ स्क्रीन मल्टिप्लेक्स सुरु केले.

अजंठा फार्माच्या बोनस इशूची रेकॉर्ड डेट २३ जून २०२२ निश्चित केली आहे तसेच हा शेअर २२ जून २०२२ ला EX-बोनस होईल.

आज पुन्हा एकदा मार्केटमध्ये प्रॉफीटबुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५१३६० NSE निर्देशांक निफ्टी १५२९३ बँक निफ्टी ३२७४३ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.