आजचं मार्केट – २० June २०२२

आज क्रूड US $ ११३.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७८.०० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.४० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.२३ VIX २३.५४ होते. आज USA ची मार्केट्स बंद होती..

चीनने व्याजदरात बदल केला नाही. चीनने व्याज दर एक वर्षासाठी ३.७०% ठेवले.

अल्केम लॅबच्या ST. लुइस प्लांटच्या USFDA ने ६ जून २०२२ ते १७ जून २०२२ दरम्यान केलेल्या तपासणीत तीन त्रुटी दाखवून फॉर्म नंबर ४८३ इशू केला .

मॅक्स व्हेंचर्सने ‘अकार्ड हॉटेल & रिसॉर्ट्स मध्ये १००% स्टेक घेतला.

आज CHEVIOT चे NSE वर लिस्टिंग झाले

ICRA ने आवास हौसिंगचे रेटिंग -AA वरून +AA असे सुधारले.

शॉपर्स स्टॉप, ट्रेंट, सारख्या दुकानात २०% ते २५% विक्री वाढत आहे. ऑन लाईन विक्री कमी होत आहे. त्यामुळे या प्रकारच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी झाली आहे.

मंदीच्या भीतीमुळे सर्व कमोडिटीजच्या किमतीवर दबाव आहे. वाढलेली कॉस्ट आणि त्यामुळे कमी झालेला फायदा यांचा परिणाम DELHIVERY आणि कार ट्रेड यावर परिणाम होईल.

सिप्लाने ACHIRA लॅब्समध्ये २१.०५% स्टेक खरेदी केला.

जल जीवन मिशनकडून इंडियन ह्यूम पाईपला Rs १५० कोटींची ऑर्डर मिळाली.

औरोबिंदो फार्माच्या GLS फार्ममध्ये ५१% स्टेक घेण्याला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मंजुरी मिळाली.

कोफोर्जने ‘ESTES एक्स्प्रेस लाईन्स’ बरोबर लॉजिस्टिक आणि ट्रांसपोर्टेशनसाठी डिजिटल सेवा पुरवण्यासाठी करार केला.

मारुतीच्या नवीन ब्रेझा चे बुकिंग Rs ११००० पासून सुरु झाले.

पेज इंडस्ट्रीजच्या प्रमोटर्सनी त्यांचा २.४५% स्टेक विकला.

बिर्ला सॉफ्टने गूगल क्लाउडबरोबर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी करार केला.

चीनमध्ये हौसिंग सेक्टरमध्ये मंदी आहे यामुळे मेटल्सला मागणी नाही.लिक्विडीटी अर्थव्यवस्थेमधून काढून घेतली जात आहे. तेव्हा मेटल्सवर परिणाम होतो. खरे पाहता अल्युमिनियमचा पुरवठा रशियातून होतो तो बंद आहे. पण मागणीच नाही.पावसाळ्यात बांधकाम बंद असते त्यामुळे सर्व धातू ५० आठवड्याच्या किमान स्तरावर आहेत.

वेदांता त्यांचा तामिळनाडूमधील तुतिकोरिन प्लांट विकणार आहे.

टिळकनगर इंडस्ट्रीने प्रीमियम फ्लेवर्ड ब्रँडी लाँच केली .

NIIT ने स्विस मल्टिनॅशनल बरोबर मल्टीइअर ट्रेनिंगसाठी करार केला.

आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस यांनी Rs ७४३ कोटींच्या IPO साठी DRHP फाईल केले.

आज मेटल्स, PSE, रिअल्टी, ऑटो, एनर्जी क्षेत्रात प्रॉफिट बुकिंग झाले तर FMCG, IT बँका आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्स मध्ये आणि एशियन पेंट्स, बर्गर पेंट्स, कन्साई नेरोलॅक, आणि इंडिगो पेन्ट्स या ऑइल पेंट्स बनवणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये (क्रूडचा दर कमी झाल्यामुळे) माफक खरेदी झाली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५१५९७ NSE निर्देशांक निफ्टी १५३५० बँक निफ्टी ३२६८४ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.