आजचं मार्केट – २१ June २०२२

आज क्रूड US $ ११५.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७८.०० च्या आसपास होते.US $ निर्देशांक १०४.३० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.२८ VIX २१.८२ होते.

पेट्रोलवरील टॅक्स काढून टाकू यासाठी ऑइल कंपन्यांशी बोलून उपाय काढू असे सांगितल्यामुळे क्रूड पुन्हा US $ ११५ वर पोहोचले.

टेलिकॉम PLI स्कीम १ वर्षांसाठी वाढवली आहे. या योजनेअंतर्गत २० जुलैपर्यंत अर्ज करता येईल. Rs ४००० कोटींची तरतूद केली आहे. इन्सेंटिव्हमध्ये ९% वाढ केली. याचा फायदा स्मार्ट लिंक, D-लिंक, तेजस नेटवर्क्स, स्टरलाईट टेक्नॉलॉजि, ITI यांना होईल.

KEC इंटरनॅशनलला T&D आणि रेल्वेकडून Rs १०९२ कोटींची ऑर्डर मिळाली.

अजंता फार्माच्या बोनस इशूची २२ जून २०२२ ही EX-डेट आहे.

सुवेन लाईफ सायन्स २४ जूनला राईट्स इशूवर विचार करणार आहे.

अशोक लेलँडने ‘ECOMET STAR १११५’ हा ११.४४ टन GVW ( ग्रॉस व्हॅल्यू वेट ) चा ट्रक लाँच केला.

बंधन बँकेच्या लोन बुकमध्ये ६% हिस्सा आसाममधील आहे. तेथे पूर आला आहे . बँकेच्या ऍसेट गुणवत्तेवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

निर्यातदारांना उत्तेजन देण्यासाठी ‘RosctL ‘ ( REBATE ऑफ स्टेट अँड सेंट्रल टॅक्सेस अँड लेव्हीज स्कीम ) ही योजना ७ मार्च २०१९ रोजी जाहीर झाली. पण USA ने WTO मध्ये तक्रार केली. भारतीय सरकार निर्यातदारांना UNDUE बेनिफिट देत आहे या योजनेचा फायदा टेक्सटाईल निर्यातदारांना होत होता. त्यांना ड्युटी क्रेडिट स्क्रिप्स दिल्या जात होत्या MEIS आणि Rosctl स्क्रिप्स दिल्या जात होत्या. या पूर्णपणे ट्रान्सफरेबल होत्या आणि ओपन मार्केटमध्ये चढ्या भावाने विकता येत होत्या.पण आता या स्क्रिप्स २०% पर्यंत डिस्काउंटवर विकल्या जात असल्यामुळे पहिल्यासारखा या योजनेचा फायदा टेक्सटाईल आणि गारमेंट निर्यातदारांना होणार नाही. याचा परिणाम गोकुळदास एक्स्पोर्ट्स, रेमंड्स, मॉन्टेकार्लो, अरविंद यांच्यावर होईल.

सरकार नवीन साखर निर्यात धोरण जुलै- ऑगस्ट २०२२ मध्ये जाहीर करण्याची शक्यता आहे.

निर्यातीची मंजुरी उत्पादनाशी निगडीत असेल. २०२२ -२०२३ चे स्टॉक लिमिट उत्पादनावर अवलंबून असेल. सरकार साखर उत्पादकांकडून प्रस्ताव मागवत आहे.

HAL २८ जूनच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बैठकीत अंतिम लाभांशावर विचार करेल.

मार्कसन फार्माने १२ लॉटमधील २.०९ लाख युनिट्स ( KROJER BR, ऍस्पिरिन, IBUPROFEN या औषधांची ) लेबर पॅकेजींग इशुमुळे रिकॉल केली.
सविता ऑइल टेक्नॉलॉजी या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने कंपनीच्या १ शेअरचे ५ शेअर्समध्ये स्प्लिट करण्यासाठी मंजुरी दिली.

ऑस्ट्रेलियामध्ये कोळशाच्या उत्पादनावर ४०% रॉयल्टी द्यावी लागते. ऑस्ट्रेलियातून आयात करणे महाग पडते. याचा कोल इंडियाला फायदा तर JSW स्टील सारख्या कंपन्या ज्या कोळशा आयात करतात त्यांना तोटा होईल.

आज मार्केटमध्ये तेजी होती. IT, रिअल्टी, मेटल्समध्ये खरेदी झाली.

BSE निर्देशांक सेंसेक्स ५२५३२ NSE निर्देशांक निफ्टी १५६३८ बँक निफ्टी ३३१९१ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.